लेख सातवा - ग्रामिण भागाची लँड्स्केप्स

Submitted by पाटील on 13 April, 2014 - 08:46

आता पर्यंत आपण वेगवेगळी टेक्निक्स , थिअरी , रंग यांचा अभ्यास केला. यापुढे येक येक विषय घेउन त्यावरील लँड्स्केप्स चा आपण सराव करुया. मी गेले दोन दिवस माझ्या गावी होतो. तीथे आमच्या शेतावर , गावात केलेली दोन चित्र इथे पोस्ट्करुन ग्रामिण भागाची लँड्स्केप्स अर्थात ruralscapes बद्दल लिहतो.
ऑन लोकेशन काम करताना आपल्या कामाला १ ते २ तास लागतील या दृष्टीने विचार करुन स्पॉट तसेच बसण्यासाठी सावलीतील जागा शोधुन बसावे. प्रकाश येव्ह्ढ्या वेळात बदलतो म्हणुन सुरुवातीला दुसर्‍या स्केच बुक मधे छोटे व्ह्य्ल्यु स्केच करुन घ्यावे. हल्ली सग्ळ्यांकडे मोबाईल असतात. व्ह्यॅल्यु स्केच करायचे नसेल त त्या स्पॉट्चा फोटो काढुन ठेवावा. जरी त्यावरुन रंगवायचे नसले तरी चित्राच्या सुरुवातीला प्रकाश योजना कशी होती यासाठी हा रेफरंस ठरतो.

आमची भात शेतीत उन्हाळ्यात ओसाड असते. त्यात दुर दुर पर्यंत झाडं नाहीत मात्र असे येखादे झाडं ढोरांसाठी विसाव्याची जागा असते. मी तेव्हढेच स्केच पटकन करुन पहिला वॉश मारुन घेतला.
s1_2.jpgs2_0.jpg

त्यानंतर झाडा चा भाग ब्लॉक करुन घेतला, दुरच डोंगर आणि झाडं काहीही डीटेल्स न टाकता केली.
s3.jpg
म्हशी सावलीत अस्लयाने फार डीटेल्स न दाखवताच अल्ट्रामरीन ब्लु+ बर्न्ट सिएना अशा रंगवल्या, झाड हा या चित्रा चा मुख्य घटक असल्याने यावेळी थॉडे डीटेल्स /पानं सजेस्ट केली मात्र प्र्तयेक पान न करताना खुप डेरेदार झाड असल्याचे इम्प्रेशन तयार केले.
s4.jpg

शेवटी डार्क सावली, झाडाचे खोड , त्यावर रिफ्लेक्ट्ड लाईट असे टाकुन चित्र पुर्ण केले.
s5.jpg

हे दुसरे चित्र गावतल्या घरांचे. क्विक स्केच , कलर ब्लॉकींग ते डेप्थ याच क्रमाने रंगवले. हे चित्र अगेंस्ट लाईट असलयाने भिंती कडचा भाग सावलीत असल्याने थोडा सावली साठी गडद रंगाच्या पातळ शेडने ग्लेझ केले
m drawing.jpgm1_0.jpgm2_0.jpgmf.jpg

या वीषयावरची अजुन काही चित्र करायची असल्यास आपंण करुया, त्या साठी कुणाकडे काही रेफरंस फोटो असतील तर मला पाठवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजय, वाह! ही दोन्ही चित्रं आत्ताच्या आत्ता ट्राय करावीशी वाटतायत.

माझ्याकडे ग्रामीण फोटोंचा साठा आहे बर्‍यापैकी, मी त्यातले फोटो शोधून देऊ शकेन.

आणि दुसरे म्हणजे ही कार्यशाळा सुरू झाल्यापासून कुठे जाईल तिथे चित्राच्या दृष्टीने एखादे चांगले दृष्य दिसले की लगेच मोबाईलमध्ये फोटो काढला जातो. Happy

सुरेख ... दुसर्या चित्रात ती उजवीकडच्या घराची सावली किती खरी वाटत आहे ... खूपच छान...
भाऊंना पूर्ण अनुमोदन

गजानन यांनी मला बरेच फोटो मेल केलेत. त्यातुन एका फोटोवरुन चित्रं रंगवलेय.
यात कंपोझिशन मला भावली तशी थोडी कॉम्पॅक्ट केली , तसेच खुप काम न करता त्या जागेचे इम्रेशन तयार करयचा प्रयत्न केलाय.
मुळ फोटो
o.jpg

सिम्प्लिफाय केलेले रेखाटन
1_5.jpg
पेपर ओला करुन केलेला पहिला वॉश(वेट इन वेट) , फिगर्स आणि देवळाचा भागाचा कागद ओला केला नव्हता आणि तेथे रंग लावला नाही.
2_5.jpg
बॅक टू फ्रंट असे रंगवत गेलो
3_2.jpg4_0.jpg

शेवटी काही डार्क शेड्स ने डेप्थ, फिगर्स असे करुन चित्र संपवले.

5.jpg मुळ फोटोबर्हुकुम चित्र न करताही त्या जागेचा फिल आणणे शक्य असते.

मी पुढील आठव्ड्याच्या मध्या पासुन वार्षीक रजेवर असेन अणि उसगावात असेन , त्यामुळे मे च्या मध्या पर्यंत इथे फारसे येणे होणार नाही. तो पर्यंत ज्यांचा बॅकलॉग असेल त्यानी भरुन काढायचा प्रयत्न करावा.

मे च्या मध्या पर्यंत म्हणजे खूप वेळ मिळेल.बरेच दिवस वेळ नाही मिळाला त्यामुळे बरीच मागे पडले आहे. बेसिक वॉश पासून पुन्हा सुरु करायचे आहे.

अजय, कसले सुंदर दिसतेय चित्र!
मुळ फोटोबर्हुकुम चित्र न करताही त्या जागेचा फिल आणणे शक्य असते. <<< अगदी त्या जागेचा फील येतोय. मला शंका वाटत होती की मी पाठवलेल्या चित्रांपैकी एकतरी जलरंगाराठी योग्य आहे की नाही. मस्तच!

दोन्ही चित्रे खुपच मस्त!
वाचताना जितकं सोप वाटतयं त्याहुन कैकपटीने अवघड असेल .. साधी सरळ रेष ओढता येत नाही मला तर Sad

रेखांकनाच्या भागात मी येक फोटो आणि त्यावरुन केलेले स्केच टाकले होते. त्यावरुन केलेले हे पेंटींग टाकुन हा भाग संपवतोय.
1_6.jpg2_6.jpg3_3.jpg4_1.jpg

फारच सुंदर! Happy

पाटील, मी चित्र रंगवताना रंग कितीही पातळ केला तरी पटकन सुकतोय आणि कंटिन्युइटीसाठी परत ब्रश लावला की फराटे दिसतायत. नितळ येतच नाहिये. टच अप करण्याच्या प्रयत्नात कागद पण तंतू टाकतो.

अश्विनी के - जेव्ह्ढा भाग रंगवायचाय तेव्हढ्या भागावर ब्रशने पाणी लाऊन घ्या , नंतर ते पाणी सुकायच्या आत रंग लाऊन घ्या. याने तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा.

जबरदस्त झालंय ते पेंटींग.
या धाग्यांवर कधी प्रतिसाद दिला का नाही ते आठवत नाही, पण तुमची सगळीच पेंटींग अमेझिंग आहेत. मस्त शिकवणं चाल्लंय आणि विद्यार्थ्यांची चित्र पण भारी आहेत. Happy

नीलूने, फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला होता. http://watercolorspainting.com/are-you-afraid-of-greens/

त्यातल्या खालील ओळी मार्गदर्शक वाटल्या.

Painting is not about the house or the trees or the background or the foreground.
It’s about the shapes… and how the shapes are connected and separated from each other, is the beauty of your painting. If we understand that then the things become very easy.
Whether the painting will turnout good or bad, you don't know. It's much of luck and many other factors I would say. But if you are clear about the shapes, and intermingling of shapes, there are more chances, the painting will be more successful.

- Milind Mulick

अजय, हा माझा प्रयत्न. (खूपच उशिरा ट्राय करतोय.. सॉरी. )

हा दुसरा प्रयत्न आहे. तरीसुद्धा बर्‍यापैकी गंडलेय. कृपया मार्गदर्शन करा.

Pages