लेख सातवा - ग्रामिण भागाची लँड्स्केप्स

Submitted by पाटील on 13 April, 2014 - 08:46

आता पर्यंत आपण वेगवेगळी टेक्निक्स , थिअरी , रंग यांचा अभ्यास केला. यापुढे येक येक विषय घेउन त्यावरील लँड्स्केप्स चा आपण सराव करुया. मी गेले दोन दिवस माझ्या गावी होतो. तीथे आमच्या शेतावर , गावात केलेली दोन चित्र इथे पोस्ट्करुन ग्रामिण भागाची लँड्स्केप्स अर्थात ruralscapes बद्दल लिहतो.
ऑन लोकेशन काम करताना आपल्या कामाला १ ते २ तास लागतील या दृष्टीने विचार करुन स्पॉट तसेच बसण्यासाठी सावलीतील जागा शोधुन बसावे. प्रकाश येव्ह्ढ्या वेळात बदलतो म्हणुन सुरुवातीला दुसर्‍या स्केच बुक मधे छोटे व्ह्य्ल्यु स्केच करुन घ्यावे. हल्ली सग्ळ्यांकडे मोबाईल असतात. व्ह्यॅल्यु स्केच करायचे नसेल त त्या स्पॉट्चा फोटो काढुन ठेवावा. जरी त्यावरुन रंगवायचे नसले तरी चित्राच्या सुरुवातीला प्रकाश योजना कशी होती यासाठी हा रेफरंस ठरतो.

आमची भात शेतीत उन्हाळ्यात ओसाड असते. त्यात दुर दुर पर्यंत झाडं नाहीत मात्र असे येखादे झाडं ढोरांसाठी विसाव्याची जागा असते. मी तेव्हढेच स्केच पटकन करुन पहिला वॉश मारुन घेतला.
s1_2.jpgs2_0.jpg

त्यानंतर झाडा चा भाग ब्लॉक करुन घेतला, दुरच डोंगर आणि झाडं काहीही डीटेल्स न टाकता केली.
s3.jpg
म्हशी सावलीत अस्लयाने फार डीटेल्स न दाखवताच अल्ट्रामरीन ब्लु+ बर्न्ट सिएना अशा रंगवल्या, झाड हा या चित्रा चा मुख्य घटक असल्याने यावेळी थॉडे डीटेल्स /पानं सजेस्ट केली मात्र प्र्तयेक पान न करताना खुप डेरेदार झाड असल्याचे इम्प्रेशन तयार केले.
s4.jpg

शेवटी डार्क सावली, झाडाचे खोड , त्यावर रिफ्लेक्ट्ड लाईट असे टाकुन चित्र पुर्ण केले.
s5.jpg

हे दुसरे चित्र गावतल्या घरांचे. क्विक स्केच , कलर ब्लॉकींग ते डेप्थ याच क्रमाने रंगवले. हे चित्र अगेंस्ट लाईट असलयाने भिंती कडचा भाग सावलीत असल्याने थोडा सावली साठी गडद रंगाच्या पातळ शेडने ग्लेझ केले
m drawing.jpgm1_0.jpgm2_0.jpgmf.jpg

या वीषयावरची अजुन काही चित्र करायची असल्यास आपंण करुया, त्या साठी कुणाकडे काही रेफरंस फोटो असतील तर मला पाठवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए मी फराटे बहाद्दर आहे. नीलूसारखं काढायला मला आधी पेशन्स खूप कमवावा लागेल. नीलू मास्टर आहे Happy

अजयमुळे मी कॉलेजनंतर इतक्या वर्षांनी हातात ब्रश आणि रंग घेतले तेच अशक्याचं शक्य झाल्यासारखं आहे.

1414990993816.jpg

माझ्या गावी काल केलेले लँडस्केप , आड्वी डोंगर रांग निट कव्हर व्हावी म्हणुन पॅनोरामीक कंपोझिशन केलेय

सुपर्ब!!

अशी छान चित्रं पाहून पुन्हा सुरसुरी येतेय चित्रांची. एकदा स्पॉटवर जाऊनही काढायचं आहे चित्र. तुमच्या चित्रात असतो तसा तरलपणा येत नाही माझ्या चित्रात.

वॉव!

किती बारीक सारीक डिटेलींग केलय! अगदी त्या गुरांचे पाय, त्यांचे वेगवेगळे रंग, कुंपणाचे खांब - अप्रतिम!

Pages