लेख सातवा - ग्रामिण भागाची लँड्स्केप्स

Submitted by पाटील on 13 April, 2014 - 08:46

आता पर्यंत आपण वेगवेगळी टेक्निक्स , थिअरी , रंग यांचा अभ्यास केला. यापुढे येक येक विषय घेउन त्यावरील लँड्स्केप्स चा आपण सराव करुया. मी गेले दोन दिवस माझ्या गावी होतो. तीथे आमच्या शेतावर , गावात केलेली दोन चित्र इथे पोस्ट्करुन ग्रामिण भागाची लँड्स्केप्स अर्थात ruralscapes बद्दल लिहतो.
ऑन लोकेशन काम करताना आपल्या कामाला १ ते २ तास लागतील या दृष्टीने विचार करुन स्पॉट तसेच बसण्यासाठी सावलीतील जागा शोधुन बसावे. प्रकाश येव्ह्ढ्या वेळात बदलतो म्हणुन सुरुवातीला दुसर्‍या स्केच बुक मधे छोटे व्ह्य्ल्यु स्केच करुन घ्यावे. हल्ली सग्ळ्यांकडे मोबाईल असतात. व्ह्यॅल्यु स्केच करायचे नसेल त त्या स्पॉट्चा फोटो काढुन ठेवावा. जरी त्यावरुन रंगवायचे नसले तरी चित्राच्या सुरुवातीला प्रकाश योजना कशी होती यासाठी हा रेफरंस ठरतो.

आमची भात शेतीत उन्हाळ्यात ओसाड असते. त्यात दुर दुर पर्यंत झाडं नाहीत मात्र असे येखादे झाडं ढोरांसाठी विसाव्याची जागा असते. मी तेव्हढेच स्केच पटकन करुन पहिला वॉश मारुन घेतला.
s1_2.jpgs2_0.jpg

त्यानंतर झाडा चा भाग ब्लॉक करुन घेतला, दुरच डोंगर आणि झाडं काहीही डीटेल्स न टाकता केली.
s3.jpg
म्हशी सावलीत अस्लयाने फार डीटेल्स न दाखवताच अल्ट्रामरीन ब्लु+ बर्न्ट सिएना अशा रंगवल्या, झाड हा या चित्रा चा मुख्य घटक असल्याने यावेळी थॉडे डीटेल्स /पानं सजेस्ट केली मात्र प्र्तयेक पान न करताना खुप डेरेदार झाड असल्याचे इम्प्रेशन तयार केले.
s4.jpg

शेवटी डार्क सावली, झाडाचे खोड , त्यावर रिफ्लेक्ट्ड लाईट असे टाकुन चित्र पुर्ण केले.
s5.jpg

हे दुसरे चित्र गावतल्या घरांचे. क्विक स्केच , कलर ब्लॉकींग ते डेप्थ याच क्रमाने रंगवले. हे चित्र अगेंस्ट लाईट असलयाने भिंती कडचा भाग सावलीत असल्याने थोडा सावली साठी गडद रंगाच्या पातळ शेडने ग्लेझ केले
m drawing.jpgm1_0.jpgm2_0.jpgmf.jpg

या वीषयावरची अजुन काही चित्र करायची असल्यास आपंण करुया, त्या साठी कुणाकडे काही रेफरंस फोटो असतील तर मला पाठवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्विनी, एकूण स्पेसच्या तुलनेत दोन्ही वेळेला माझं घर खोपच मोठं आलं. पहिल्या वेळी हे लक्षात आलं होतं म्हणून दुसर्‍या वेळी लहान काढलं. अजून लहान काढलं तर रंगवता यायचं नाही असं वाटून आता दिसतंय इतकं(च) लहान काढलं गेलं. पण तरीही मोठंच ( * ) आलंय. अजयच्या चित्रात जसं मोकळं वातावरण दिसतंय तसं मला जमलेलं नाही. झाडपण खेळण्यातलं उचलून घरापुढे ठेवलेय असं आलंय. आणि कलर थिअरीच्या लेखावर बरेच चिंतन आणि प्रॅक्टीसची गरज आहे, हे जाणवतंय. याआधीच्या चित्रांकरता कोणता कलर कसा मिळवायचा हे अजय सांगत होते, त्यामुळे रंगछटा त्यातल्या त्यात बर्‍या यायच्या. आता आपल्यालाच कलर थिअरीनुसार ते ठरवायचे आहे.

* - मोठ्या घराची हाव, हे सुप्त कारण असावे का? Proud

गजानन - प्रयत्न चांगला आहे. आधी लिहल्याप्रंमाणे तीन स्टेजेस मधे चित्र रंगवायचा प्रयत्न करायचा.
पहील्यांदा योग्य ते कलर ब्लॉक करुन घ्यायचे , वेट इन वेट पद्धतीने पाहीजे तिथे थोडे वेरिएअशन आणायचे. माझ्या चित्रात पाहीले तर मागचा नीळा वॉश मारल्यानंतर घराचे रंग मिसळुन घेतले, झाडाच्या खोडावर वेगळे काम करायचे अस्लयाने तो भाग सोडुन दिला.
दुसर्‍या स्टेज मधे डीटेल्स केले. यात घरावरचे डीटेल्स, घरामागची जवळची झाडी , घरापुढील झाड यावर काम केले. यात पाहीले तर घ्रापुढील झाड जास्त डीटेल्स मधे केलेय हे जाणवेल. यावेळी झाडाच्या खोडाचा पहीला वॉश टाकला.
तिसर्‍या स्टेज मधे शॅडो टाकल्या, काही राहुन गेलेले डीटेल्स टाकले . दुरच्या भागावर कमी काम आणि पुढील भागावर जास्त काम केल्याने चित्रात डेप्थ चा आभास येतो ( तिसरी मिती मिळवता येते). यात सावल्या टाकल्याने अजुन डेप्थ वाढवता येते.
पुर्ण चित्रात येके येक घटक न रंगवता सगळ्या चित्रावर येकाच वेळी काम केल्याने चित्र येकसंध असल्याचा परिणाम मिळतो.
तुमच्या चित्रात बॅग ग्राऊंड छान झालिय, पुढील झाडाचे अजुन डीटेल्स आले असते आणि अजुन काही ट्।ईकाणी डार्क शॅडोज येत्या तर मजा अजुन वाढली असती. अश्विनी के यानी म्हटलेय तसे प्रत्यकाची शैली वेगळी आणि त्याने फरक हा येणारच.
मी कित्येकदा येकच स्पॉट वेगवेगळ्या वेळी रंगवलाय आणि त्या वेळच्या मूड आणि लाईट प्रमाणे तो वेगळा झालाय.

अजय, धन्यवाद.

कुठे गेले सगळे?

कलाकार, अश्विनी, नीलू, अंतरा, शैलजा, अल्पना,इन्द्रा तुमचीही चित्रे येऊ द्या ना. त्यानिमित्ताने चर्चा होऊन माहिती मिळते. खेरीज एकमेकांना उत्साह वाढण्यास मदत होते. Happy
तुमचीही चित्रे प्लीज टाका.

आज खूप दिवसांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला चित्र काढ्ण्याचा..गेले कित्येक दिवस कामा मुळे वेळ नाही मिळाला म्हणून
उशीर झाला...
O1.jpg

प्रयत्न..
अजूनही चित्रामधे परिपक्वता आली आहे असं नाही वाटतIMG_0952.JPG,हे चित्र तर मलाच का कोण जाणे नाही आवडलं.कृपया सुधारणा सांगाच.

वृषाली,
वॉशेस आणि हँड्लींग चांगले आहे. चित्रात कलर व्हॅल्यु, टोनल व्हॅल्युचा थोडा विचार करावा लागेल. जर व्हॅल्यु स्गळि कडे सारख्या आल्या तर चित्र फ्लॅट होते. मी तउमचेच चित्र ग्रे स्केल मधे कन्वर्ट केलेय त्यात तुम्हाला बर्‍याचश्या शेड्स सारख्या दिसतील , तसेच येकदम दुरची झाडे डार्क दिसतील, जनरली दुरच्या झाडात , ऑब्जे़ट मधे थोडी निळसर झाक दिसते. दुरची झाडं म्हणुन नीळ्या मधे थोडा हिरवा असा मिक्स करुन आणि पातळ करुन रंगवावीत आणि पुढच्या झाडात , हिरवा , पिअवळा रंग वाढवत /दाट करत रंगवावावा. याने तुम्हाला एरीअल परस्पेक्टीव्ह मिळवता येइल.
IMG_0952.jpg

अजय, हा दुसर्‍या चित्राचा प्रयत्न.

याचेच तुमचे व्हर्जन बघून चांगलेच दडपण आले होते. Happy पण तरीही धाडस केलेय.

अजय, पुढच्या वेळी फिगर्सकडे लक्ष देईन. त्यासाठी काही गाईड लाईन्स सांगाल का प्लीज?
आणि कौलांवर रेषा दाखण्यासाठी चार नंबरचा ब्रश पण खूप जाड्या रेषा काढतो. त्यापेक्षापण बारीक ब्रश येतो का? रेषांसाठी कौलांचाच रंग थोडा गडद करून द्यायचा ना?

शिखरात आणखी थोडे डिटेल्स टाकायला यायला हवे होते. उजव्या भागातल्या वॉशेस मध्ये खूप वेळ गेला. बर्‍याचवेळा पेपर भिजवावा लागला.

अश्विनी, धन्यवाद. तुझीही चित्रे येऊ दे. Happy

अश्विनी के , गजानन, इन्द्रधनुष्य धन्यवाद.
वृषाली, गजानन तुमची चित्र खूप छान आली आहेत. माझ्या सरावात खंड पडला त्यामुळे कठीण जाते आहे चित्र रंगवताना. डीटेल्स टाकणे नीट जमत नाही.

गजानन - शिखर चित्रात दुर /मागे आहे त्यामुळे जास्त डीटेल्स नाही टाकले तर चालेल, जास्त योग्य. झिरो, अगदी ट्रीपल झिरो ब्रश येतात, बारीक लाइन्स साठी लायनर ब्रश/ रिगर ब्रश सुद्धा मिळतात. चार नंबर ब्रश ला अगदी चांगले टोक असेल तर चालुन जाईल अन्यथा २ नं ब्रश वापरुन पहा. कौलाच्या लाइन्स तुम्ही काढल्यात तश्याच तूट्क काढाव्यात , अजुन वेरीएशन हवे असेल त लाईन ओल्या असतान त्यात काही ठीकाणी अजुन दुसरा (नीळसर) रंग सोडा.

फिगर्स बद्दल आधिच्या येका लेखात मी लिहलेय पण थोड्क्यात फिगर्स चे प्रपोर्शन (६ हेड/ ७ हेड्स) लक्षात ठेवायचे
इथे http://johnlovett.com/figures.htm सुंदर टीप्स आहेत , किंबहुना सगळेच लेसन्स उपयोगी आहेत

निर्मल - पहिले चित्र खुप छोटे दिसतेय पण वॉश आणि रिफ्लेक्शन्स छान . दुसर्‍या चित्रात फांद्या अजुन चांगल्या येऊ शकतात.
अंतरा प्रयत्न चांगला आहे. सगळ्या घरांना तसेच देवळाना तुम्ही आउट लाइन केली आहे ते टाळा.
प्रत्येक माध्यमाची येक ताकद / कॅरेक्टरीस्टीक असते ते वापरता आले पाहीजे.
उदा.लाईन्स हे पेन, पेंसिल या माध्यमाचे बलस्थान, चारकोल , पेस्ट्ल वापरलात तर लाईन्स काढता येतात पण त्याचे बलस्थान स्मज करुन mass तयार करणे हा आहे. तसेच वॉटरकलर चे बलस्थान हे वॉशेस , पारदर्शकता हे आहेत त्यामुळे लाईन्सचा वापर अगदी आवश्यक तेव्हढाच करावा.

अजय, चित्र ग्रे स्केलमधे कन्वर्ट करून तुम्ही कलर व्हॅल्यू, टोनल व्हॅल्यूबद्दल जे सांगितलंय, ते खूप आवडलं. Happy

धन्यवाद सर.
खूप उपयुक्त माहिती मिळाली..पुन्हा हेच चित्र काढून बघेन आणि तुम्ही दिलेली माहिती पुढचे चित्र रंगवताना लक्षात ठेवेन...ह्या कार्यशाळेच्या निमित्ताने खूप शिकायला मिळते आहे हे पुन्हा पुन्हा सांगावेसे वाटते.

अश्विनी, मस्तच! कसले सहज फटकारे आलेत. अगदी सराईताप्रमाणे! आणि पर्स्पेक्टिव्हपण पर्फेक्ट जमलेय.

(पण थोडेसे स्केच केल्यासारखे दिसतेय का? फिकट रंग आलेत म्हणून का?)

स्केच केल्यासारखं म्हणजे? हलक्या हाताने स्केच काढूनच करायचं ना हे? मी रंग खूप पात्तळ करुन लावलेत कारण पटकन सुकतायत. त्यामुळेही फिक्कट दिसत असेल.

अश्विनी के - रंग सुकल्यावर थोडे अजुन फिक्क्ट दिसतात म्हणुन रंगांचे प्रमान थोडे वाढवावए लागेल, खास करुन चित्राच्या दुसर्‍या टप्प्यात जेव्हा डीटेल्स करायला सुरुवात करता तेव्हा. बाकी चित्र छान , सही कराय्ची राहीलेय ती करुन टाका Happy

Pages