सुख

Submitted by रीया on 26 May, 2014 - 02:45

सुख..!

'इतका कसा रे निष्ठुर तू?'
काल न राहुन देवाला विचारलं
'जरा तरी सुख द्यायचंस की पदरात'
चांगलंच त्याला सुनावलं..

हळूच हसला तो
म्हणाला हिशोब देतोच आज
सुखाचं उदाहरण मी सांगतो,
तू दु:खाचे पाढे वाच..

मी यादीच ठेवली त्याच्यापुढे,
म्हणलं 'आता तू सुख दाखव बरं
दु:खापेक्षा ते दिसलं ना मोठं
तरंच मी तुला मानेन खरं'

'आता का रे इतका शांत?'
मी चिडुन त्याला विचारलं
त्याने हळूवार पाहिलं माझ्याकडे
अन् 'तुझ्याकडे' बोट दाखवलं..

हिशोब दिलाय त्याने,
या वादात त्याची बाजु वरचढ आहे.
कारण खरचं रे माझ्या आयुष्यात
सुखाचं पारडं 'जड' आहे.. Happy

-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस

Group content visibility: 
Public - accessible to all site users

देव पण पक्का कन्हैय्या होता Wink

वाह किती दिवसांनी आज मी एखादी कविता वाचली, थोडक्यात आयुष्यात प्रेम मिळाले की दुखांचे कौतुक फारसे राहत नाही तर..

केदारदादा Happy मला खात्री होती की तूझा आणि धीरजदादाचा ( तो आता माबोवर नाहीये म्हणून पण तरिही... ओह गॉड आय मिस हिम) प्रतिसाद येणारच.... थँक्स दादा Happy
बर्‍याच दिवसंनी चक्क मलाही कविता आवडली Happy

आदिती, आशिका ,अग्निपंख,वर्षा, दक्षिणातै, आर्यातै,जाई : खुप खुप थँक्स Happy

ओवी, :* टच वूड ना Happy

अभिषेक दादा : वाह किती दिवसांनी आज मी एखादी कविता वाचली, >> बरीच मोठी काँप्लिमेंट आहे ही माझ्यासाठी Happy
थोडक्यात आयुष्यात प्रेम मिळाले की दुखांचे कौतुक फारसे राहत नाही तर..

>>>> वॉट डू यू थिंक?????? Wink

Happy

अमेयदादा,अंजली, अन्जु थँक्स Happy

भूषणदादा : आय स्वेअर अनपेक्षित प्रतिसाद आहे तुझा Happy छान वाटलं एवढं मात्र नक्की Happy

"अन् 'तुझ्याकडे' बोट दाखवलं.." >>> तुझ्याकडे म्हणजे कोणाकडे हे नीटसं समजलं नाही मला.

त्याने हळूवार पाहिलं माझ्याकडे
अन् 'तुझ्याकडे' बोट दाखवलं..>>>>> पोहोचल ग अगदी.. मस्तच Happy

वैवकु ,साती,चनस्,मुकु,प्रिती,अनू,सुप्रियातै,भिडेकाका : धन्स Happy

भिडेकाका : कोणीही! आपली'प्रिय' व्यक्ती.... मग ती कोणीही असू शकते Happy
मी 'तू' म्हणजे 'तो' या अर्थी लिहिलय Happy

Happy :*

Pages