ह्या श्वानप्रेमींचं काय करायचं ?

Submitted by मेधावि on 22 May, 2014 - 01:16

सकाळी फिरायला गेल्यावर रस्त्याच्या बाजूने विश्रांती/विरंगुळ्यासाठी जे बाक असतात त्यावर माणसांऐवजी श्वानप्रेमी त्यांच्या श्वानासकट बसतात. एका श्वानप्रेमीला श्वानास उठवायची विनंती केली असता बाक तुमच्या मालकीचे आहे का असे ऐकावे लागले. आपल्या मालकीचे बाक नसले तर श्वानापेक्षा जास्त प्राधान्य माणसास मिळवावे ह्यासाठी काही नियम वगैरे असतात का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या भागातल्या काही ढाबावाल्यांनी भटकी कुत्री पकडून त्यांचे मांस साध्या मटणात बेमालुम मिसळण्याची टूम काढली होती, एकवर्ष एकतीस डीसेंबरच्या दुसर्यादिवशी गावाबाहेर अनेक श्वानमुंडकी सापडली होती, लोकांना कळले काल आपण कशाचे लचके तोडलेत ते.त्याचबरोबर डुड्डुचेही मांस मिसळत होते म्हणे, डुड्डू म्हणजे पोरं उकीडवे बसल्यानंतर जे येतात ते.

सिव्हिल हॉस्पिटल (ठाणे)ला अधून मधून श्वानदंशाचे पेशंट्स येत असतात. त्यांचे नातेवाईक अत्यंत घाबरे घुबरे होऊन पळ्त पळत हेल्प डेस्कला येतात आणि शॉकमध्ये असलेला पेशंट ऑन द वे असतो. माणसं काय आणि प्राणी काय, उपद्रवी असतील तर त्यांचं कौतुक केलं जाऊ शकत नाही. समोर त्या चाव्याने तडफडणारा माणूस असेल तर कुत्र्याच्या मालकाने त्या कुत्र्याला गोंजारत बसणे हे अनाकलनीय आहे. स्वतःच्या मुलाने कुणाला चावा घेतला, ओरबाडले तरी दोन फटके देऊन तरी शिक्षा केली जाईल...मग कुत्र्याचे कसे काय लाड केले जातात?

मला काही वर्षापुर्वी कुत्रा चावला होता. तेव्हा बेंबीत इंजेक्शने घ्यावी लागली होती भयानक दुखायचे बरुन गारेगार बर्फ बेंबीवर ठेवायचा. कुत्रयाला चावायला काही कारण नव्हते मी अ‍ॅटो ठरवित होतो. कुठुन आले कोण जाणे भस्कन टांगेला चावा घेतला दात बरेच आत गेले होते. कुत्रे पाळलेले होते म्हणुन बरे. डॉ. म्हणे कुत्र्यावर लक्ष ठेवा ते जर मेले तर डोज वाढवावा लागेल.

मूळ धागा हा श्वानद्वेषाकडे भरकटणार याचे भाकीत मी अगोदरच (मनाशी) वर्तवले होते >>>>>

चुकीची कल्पना. कुत्रा पाळणार्‍याला कोणाचाही आक्षेप नाहीये. मी आधीच म्हटल्याप्रमाणे हवं तर त्यांची लग्नंही लावा. पण रस्त्यावरुन चालताना अथवा घरी, आपला कुत्रा आपल्या ताब्यात ठेवा ही अपेक्षा आहे.

माझ्या बाबतीत एक गंमत लक्षात आली. मी चारचाकी गाडी चालवत असलो की कुत्री मागे लागतात. पण मी कधी सायकलवरुन त्याच कुत्र्यांच्या समोरून जरी गेलो तरी डुंकून बघत नाहीत.

हवं तर त्यांची लग्नंही लावा<<<

लग्न तो कुत्रा लावेल स्वतःचं स्वतंच! पण मुंज नक्की करा त्याची! आणि जानवे म्हणून एक चामडी पट्टा त्याच्या गळ्यात बांधून त्याचे एक टोक स्वतःच्या हातात ठेवा सतत!

सायकलवरुन त्याच कुत्र्यांच्या समोरून जरी गेलो तरी डुंकून बघत नाहीत >>>> अरे वा! कुत्रा पण क्वॉलीटी ओळखतो!.........गाडीची!

दिवा घ्यालच!

लग्न तो कुत्रा लावेल स्वतःचं स्वतंच! पण मुंज नक्की करा त्याची! आणि जानवे म्हणून एक चामडी पट्टा त्याच्या गळ्यात बांधून त्याचे एक टोक स्वतःच्या हातात ठेवा सतत!

>>>> Biggrin

लग्न तो कुत्रा लावेल स्वतःचं स्वतंच! पण मुंज नक्की करा त्याची! आणि जानवे म्हणून एक चामडी पट्टा त्याच्या गळ्यात बांधून त्याचे एक टोक स्वतःच्या हातात ठेवा सतत! >>>>> wink.gif

पुरे आता!!

मूळ मुद्द्याकडे वळा.
नियम/ कायदे आहेत की नाहीत, नसले तर का नाहीत?, असले तर काय आहेत? काय असायला हवेत यावर चर्चा होऊ द्या.

मंजूडी,
माझ्या माहीतीप्रमाणे कुत्रा पाळणार्‍यांनी त्याचं जन्मापासूनचं सर्व रेकॉर्ड, त्याला देण्यात आलेली इंजेक्शनं इत्यादी ठेवणं हे आवश्यंक आहे. मात्रं बंधनकारक आहे की नाही याची कल्पना नाही. माझ्या कुत्र्याचं सर्व रेकॉर्ड तो गेल्याला पाच वर्ष झाली तरी आजही ठेवलेलं आहे. अर्थात मी रीतसर ब्रीडींग करणार्‍यांकडून कुत्रा विकत घेतला असल्याने त्याच्या जन्माचं रेकॉर्ड (आई-बापाच्या नावांसकट!) मिळालं होतं.

स्पार्टाकस तुमचे म्हणणे मान्यच आहे . माझे प्रतिसाद वाचा http://www.maayboli.com/node/49070?page=4#comment-3126329
धाग्यावर आलेले प्रतिसाद पहाता काहि लोकांना आपला श्वानद्वेष लपवता येत नाही एवढाच माझ्या म्हणण्याचा अन्वयार्थ. मी वरच्या एका प्रतिसादात डॉ समीर कुलकर्णी यांचा अनुभव एप्रिल २०१४ मधील धर्मांतर या स्वानुभवाचा उल्लेख त्यासाठीच केला.
जगात सर्व प्रकारचे लोक असणार आहेत. एकाचे अन्न दुसर्‍यासाठी विष असणार आहे. तरीही निसर्गात प्राणीमात्रांचे (त्यात आपणही आलोच) सहजीवन चालू असतेच
देहबोली व मौखिक बोली यात जसे अंतर असते तसेच टंकन व टंकबोली यात अंतर असते. मी प्रतिसादातील टंकबोलीच्या अन्वयार्थाविषयी बोललो. असो! आंतरजालावर तुच्छता व आढ्यता दर्शवणारे प्रतिसाद जसे असतात तसेच माहितीपुर्ण विवेकी व नम्रता दर्शवणारे पण असतात. त्याविषी पुन्हा कधीतरी. लोभ असावा Happy

भटके कुत्रे वाढायला माणूसच कारणीभूत असतो. उगाचच भूतदयेपोटी रस्त्यावरच्या कुत्र्यांना बिस्किटे व इतर अन्न खायला घालणे (आणि जबाबदारी मात्र शून्य घेणे) यातून भटकी कुत्री वाढतात आणि मग लोकांना उपद्रव देऊ लागले की त्यांच्याविषयी लोकांना द्वेष नाही निर्माण होणार तर काय?

माझा भाच्चा २-३ महिन्याचा होता तेव्हाची गोष्ट….ते आधीच प्रि - मेच्युअर्ड बाळ …. आणि त्यामुळे नाजूक…त्याला खायला जायचं नाही आणि झोपवण म्हणजे मोठ्ठी कसरत होती …पण नेमका तो झोपला कसाबसा की खालच्या मजल्यावरचे एक श्वान महाशय तार सप्तकात भुंकून आखी बिल्डिंग उठवायचे… आणि बाळाची झोप मोडायची…मग ते इतक रडायचं … त्या खालच्यांना सांगून उपयोग नाही झाला…. शेवटी वाद विवाद…अखेर वाहिनी बाळाला घेऊन गावाला जाऊन राहिली… आणि काहि दिवसात भावाने ते घर बदललं !!!

कुत्रे पाळणर्‍यांपैकी कोणीच कसे आले नाहीत ह्या धाग्यावर... (माझ्याकडे कुत्रा नाही, भटक्या कुत्र्यांचा मलाही राग येतो कारण ते बिनकामाचे अंगावर येतात आणि रात्री बेरात्री भुंकतात)

कुत्रा हा खरचं खूप चांगला प्राणी आहे जर त्याच्याशी योग्य वागले तर.. कुत्रा पहिल्यांदा तुमच्या जवळ येतो कारण नवीन आलेल्या व्यक्तीची त्याला ओळख करुन घ्यायची असते... एकदा ती ओळख झाल्यावर तो खरच काही करत नाही..

कुठलाही प्राणी स्वतःहून दुसर्‍यावर हल्ला करत नाही... जेव्हा त्याच्यावर काही संकट येते तेव्हाच तो हल्ला करतो... आपल्या टेरीटरी मधे जर कोणी घुसला तर त्याला हुसकावून लावायला नक्कीच हल्ला केला जातो पण तो एक प्रकार संकटाचा सामना करण्यासाठी केलेला हल्लाच असतो..आणि ह्याला कुठलाच प्राणी अपवाद नाही.. जे सगळे मांसाहारी प्राणी आहेत ते सुद्धा त्यांना भूक लागल्यावरच दुसर्‍या प्राण्यांवर हल्ला करायला जातात तो पर्यंत निवांत असतात...

कुठलाही प्राणी स्वतःहून दुसर्‍यावर हल्ला करत नाही... जेव्हा त्याच्यावर काही संकट येते तेव्हाच तो हल्ला करतो... आपल्या टेरीटरी मधे जर कोणी घुसला तर त्याला हुसकावून लावायला नक्कीच हल्ला केला जातो पण तो एक प्रकार संकटाचा सामना करण्यासाठी केलेला हल्लाच असतो..आणि ह्याला कुठलाच प्राणी अपवाद नाही.. जे सगळे मांसाहारी प्राणी आहेत ते सुद्धा त्यांना भूक लागल्यावरच दुसर्‍या प्राण्यांवर हल्ला करायला जातात तो पर्यंत निवांत असतात...<<<

मला वाटते असे एक पत्रक काढून भटक्या कुत्र्यांमध्ये वाटायला हवे आहे, काळाची गरज आहे ही!

Light 1

>>लपवायला कशाला हवाय?<<
लपवू म्हटल तरी लपवता येत नाही असे मला म्हणायचे होते. काही वेळा बर दिसत नाही म्हणुन काही लोक आपल्या भावना लपवू पाहतात तरी त्यांना ते जमत नाही.जसे कि डॊ दाभोलकरांचा खून झाल्याचा आनंद काही लोकांना झाला. असा आनंद व्यक्त करणे सर्वसामान्यपणे समाजात दुष्टपणाचे वाटते. त्यांच्या बोलण्याचालण्यात तो आनंद त्यांना लपवता येत नाही असे मला जाणवले. असो.

बाकी सगळं जाउ द्या ती कुत्री अंगावर येऊ नयेत आणि आजवर अनेकांना चावली आहेत तशी चावू नयेत म्हणून काय करायचं सांगा बरं

हिम्स्कूल.. रेबीज झालेला ( पिसाळलेला ) कुत्रा मात्र कारण नसताना इतरांवर हल्ला करतो, चावतो. रस्त्यावर भटकणारी कुत्री रेबीज झालेली नसतीलच अशी खात्री देता येत नाही.

एका विशिष्ठ धर्मात आता हे भूतदयेचे प्रस्थ फारच वाढले आहे. कबूतरांना ज्वारीच द्या, कावळ्यांना शेवगाठ्याच द्या, मुंग्याना साखरच द्या, कुत्रांना ब्रेडच द्या.. असले नेमनियम त्यांच्यात फार बोकाळले आहेत. असे कुठलेही अन्न त्या पक्षी, प्राणी, किटकांचे नैसर्गिक अन्न नाही, हे त्यांना कसे कळत नाही.

पाळीव प्राणी सोडले तर प्रत्येक जीवाकडे स्वतःचे अन्न शोधायची क्षमता असतेच. पाळीव प्राण्यांनी मात्र ही क्षमता गमावलेली आहे. कुत्राने नैसर्गिक रित्या शिकार करून अन्न मिळवले पाहिजे, हि निसर्गाची अपेक्षा. त्याला आयते अन्न मिळत असल्याने त्याची ही नैसर्गिक उर्मी कधी कधी उफाळून येते. कुत्रासमोर जर एखादे तान्हे किंवा लहान मूल पडले तर तो आक्रमक होतो हे अनेकांनी बघितले असेल.

पुर्वी जंगलात त्याला बसण्यासाठी पालापाचोळा गोलाकारात तुडवून बिछाना करावा लागत असे, ती सवय मात्र अजूनही आहेच.

पाळीव कुत्रा हेल्दी राखण्यासाठी त्याला पळवणे गरजेचे असते. ( फक्त चालवणे नाही ) शहरात अशा मोकळ्या जागा कुठे असतात ? तसेच त्याला अति खाऊ घालणेही घातक असते. तसे केले तर तो आळशी होतो. जास्त वेळ झोपतो.

मी श्वानद्वेषी नाही. उलट मला पाळीव प्राणी म्हणून कुत्रे आवडतातच. आमच्या घरी एकाच वेळी दोन कुत्रे होते.
मलाही लहानपणी कुत्रा चावलेला आहे. तरीदेखील मला ते आवडतात.
पाळीव प्राणी म्हणूनच नव्हे तर गुरे राखण्यासाठी, मेंढ्या हाकण्यासाठी, अंध व्यक्तींना, आजारी, वृद्ध व्यक्तींची ते उत्तम काळजी घेतात. ध्रुवीय प्रदेशात तर वाहतुकीसाठी पण त्यांची गरज असते, तरीही त्यांना पाळणार्‍या लोकांचे असे बेजबाबदार वर्तन कधीही समर्थनीय नाही.

कुत्रा पहिल्यांदा तुमच्या जवळ येतो कारण नवीन आलेल्या व्यक्तीची त्याला ओळख करुन घ्यायची असते... एकदा ती ओळख झाल्यावर तो खरच काही करत नाही..>> हे सगळं थिअरीत ठीके रे हिम्सकूल. पण आमच्यासारख्यांना ज्यांना भीती वाटते/ घाण वाटते त्यांना तो जवळ यायला नको असतो त्याचं काय? कुत्र्याचा तो स्वभाव आहे हे मान्य, पण त्याला तसं करण्यापासून रोखायची जबाबदारी मालकाची नाही का?

आमच्याइथल्या एका किराणा दुकानात एक लॅब्रेडॉर कुत्रं आहे मालकाचं. रोज ते तिथेच ठिय्या मारून बसतं दिवसभर. अनेकजण जातायेता त्याचे लाडही करतात. ते बांधलेलं नसतं, पण अतिशय वेल-ट्रेन्ड आहे. कधीही कुणाजवळ आपणहून जात नाही, भुंकत नाही. दुसरी कुत्री/मांजरी दिसली तरी गुरगुरत नाही. त्यामुळे माझ्यासारख्या भित्र्या लोकांनाही तिथे निर्धास्त जाता येतं. मी मालकाला एकदा विचारलं तर त्याने त्याला तसंच ट्रेन केलं आहे असं सांगितलं. याउप्परही खूप छोटं बाळ एकटं कधी इकडे तिकडे करताना दिसलं तर मालक त्या कुत्र्याला दुकानाच्या आतल्या खोलीत पाठवतो हेही बघितलं.
हे असं ट्रेनिंग इतर मालक का देऊ शकत नाहीत?

Pages