इच्छा मरण कायदेशीर असावे का ?

Submitted by प्रमोद् ताम्बे on 21 April, 2014 - 03:26

इच्छा मरण कायदेशीर असावे का ?

माझे एक जेष्ठ स्नेही वय वर्षे ८७ हे गेली दोन वर्षांहून जास्त काळ अंथरुणावर खिळून आहेत. या दोन वर्षात जेंव्हा जेंव्हा मी त्यांना भेटण्यासाठी त्यांचेकडे गेलो त्या प्रत्येक वेळी त्यांनी मला सांगितले आहे की त्यांनी त्यांचे आयुष्य अगदी कृतार्थपणे व्यतीत केले असून त्यांची आता कसलीच इच्छा उरलेली नाही त्यामुळे त्यांना आता जगणे नकोसे झाले असून ते स्वत: संपवावे असे वाटते आहे. परंतु असे जीवन संपवणे याला कायदेशीर मान्यता नाही व तसे केल्यास ती आत्महत्या ठरेल व आयुष्यात त्यांनी कधीही कायदा मोडला नाही त्यामुळे तो मार्ग त्यांना वापरावयाचा नाही. जे काही करेन ते कायदेशीरच असले पाहिजे हा त्यांचा निश्चय आहे.
यावर आपले व्विचार काय आहेत ?
इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता द्यावी का नाही ?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समजा तुम्ही हे सगळे करून ठेवले नि तरी हॉस्पिटलने किंवा इतरांनी तुमचे न ऐकता प्रयत्न चालूच ठेवले, तर?

म्हणजे तुम्हाला यातना सहन करत बसावेच लागेल. त्याला जबाबदार कोण?
मला वाटते, त्यासोबत असेहि लिहून ठेवावे की वरील इच्छेच्या विरुद्ध मला जिवंत ठेवले तर अमुक माणसाला हॉस्पिटल किंवा इतरांनी गडगंज पैसे द्यावेत नाहीतर फिर्याद करण्यात येईल!!

म्हणजे कसं, कायद्यानेच करायचे, तर पूर्ण खात्री करून घ्यावी की अगदी आपल्या इच्छेप्रमाणेच सर्व होईल.

भारतात होते का?
मपलं भारतातच पडायचं ठरलंय म्हणून विचारून ठेवतेय.

होते. आम्हीही भारतातच प्रॅक्टिस करतो.

http://en.wikipedia.org/wiki/Do_not_resuscitate

धन्यवाद लगो, वेगळी माहिती दिल्याबद्द्ल Happy

पुढील अर्थ गुगलने दिले
resuscitate
पुनर्जीवित करना
regenerate, reinvigorate, resuscitate
पुनर्जीवित होना
resurge, resuscitate
फिर से सक्रिय बनाना
resuscitate, revivify
फिर से चालू करना
restore, resuscitate, revivify

विकीपिडीयावर.....
In medicine, a "do not resuscitate" or "DNR", sometimes called a "No Code", is a legal order written either in the hospital or on a legal form to respect the wishes of a patient not to undergo CPR or advanced cardiac life support (ACLS) if their heart were to stop or they were to stop breathing. The term "code" is commonly used by medical professionals as jargon for "calling in a Code Blue" to alert a hospital's resuscitation team. The DNR request is usually made by the patient or health care power of attorney and allows the medical teams taking care of them to respect their wishes. In the health care community "allow natural death" or "AND" is a term that is quickly gaining favor as it focuses on what is being done, not what is being avoided.

अलाऊ न्याचरल डेथ याचा अर्थ दीडशहाण्यासारखा "इच्छामरण" असा घेणे मला अवघड आहे.
कित्येकदा दवाखान्याचा खर्च परवडण्याच्या पलिकडचा होतो/ आख्ख कुटुम्बच उद्ध्वस्त / कन्गाल होते तेव्हा निरुपायाने नातेवाईक आता उपचार थाम्बवा असे सान्गु पहातात, तेव्हा त्यान्ची सोय व दवाखाना/डॉक्टर्सवर कायदेशीर सापळ्यातुन मुक्तता व्हायचा मार्ग म्हणुनच या कन्सेप्टचा वापर बहुतेकवेळा होतो.

यात दीडशाहाणेपण काय आहे लिंबू? हॉस्पिटलात असताना , आता माझ्यावर पुढील उपचार नकोत, मी मरायचे तेंव्हा मरीन , असे म्हणणे हेही इच्छामरणच आहे. प्रायोपवेशनातही मनुष्य लगेच मरत नाही, यात अन्नाचा त्याग आहे, त्यात उपचाराचा त्याग आहे. दोघींचा एंड मरण कवटाळणे असाच आहे.

नीधप,

अशी कन्सेंट ही त्या वेळच्या हॉस्पिटलायजेशनसाठी असते आणि त्यावेळच्या केसपेपरवर लिहावी लागते. समजा दैवयोगाने पेशंट वाचला, घरी गेला आणि पुन्हा चार दिवसाने तिथेच किंवा दुसर्‍या दवाखान्यात पुन्हा अ‍ॅडमिट झाला, तर पुन्हा नवीन कन्सेंट नव्याने साइन करावी लागते.

एकदाच मोघममध्ये इच्छा व्यक्त करुन ती कुठेही वापरता येईल, अशी सोय बहुधा नसावी. अर्थात, अशी सोय घरच्यांसाठी होऊ शकते. म्हणजे पेशंटने लिहून ठेवले मला गंभीर उपचार नकोत, तरीही केसपेपरवर नातेवाइकांना नवी कन्सेंट द्यावी लागतेच.

कित्येकदा दवाखान्याचा खर्च परवडण्याच्या पलिकडचा होतो/ आख्ख कुटुम्बच उद्ध्वस्त / कन्गाल होते तेव्हा निरुपायाने नातेवाईक आता उपचार थाम्बवा असे सान्गु पहातात, तेव्हा त्यान्ची सोय व दवाखाना/डॉक्टर्सवर कायदेशीर सापळ्यातुन मुक्तता व्हायचा मार्ग म्हणुनच या कन्सेप्टचा वापर बहुतेकवेळा होतो.>>>>>>>>>त्यात गैर काय आहे? पैशाचे सोंग आणता येत नाही हे तर खरे ना? मग दवाखाना/डॉक्टर्सने आपली बाजू सेफ केलीतर काय चुकले?

एस्किमोंबद्दल वाचून मला लिंब्याची आठवण आली. लिंब्या, तुमचे वैदिक खापरपणजोबा उत्तर धृवावरुन इकडे आले ते बरे झाले. नाहीतर तुमच्या डोक्याजवळ म्हातारपणी दिवा लागला असता.

Happy

>>>> मग दवाखाना/डॉक्टर्सने आपली बाजू सेफ केलीतर काय चुकले? >>>>>>
त्यान्ची बाजू सेफ करणे योग्य की अयोग्य हा विषय नसुन, त्यान्ची बाजू सेफ करण्याकरता केलेल्या तरतुदी "इच्छामरणाच्या" समर्थनार्थ मांडणे चुकीचे/अयोग्य वाटते.

त्यान्ची बाजू सेफ करण्याकरता केलेल्या तरतुदी "इच्छामरणाच्या" समर्थनार्थ मांडणे चुकीचे/अयोग्य वाटते.

लिंब्या, यात त्यांच्या बाजू सेफ करण्याचा प्रश्नच नाही. मृत्युपंथावर असलेल्या मनुश्याने किंवा त्यांच्या नातेवाइकाने अशी कन्सेंट दिली तरच असा निर्णय डॉक्टर फॉलो करतात.

लेखी लिहावे लागते कारण पेशंटने ट्रीटमेंट नाकारलेली आहे , याचे रेकॉर्ड म्हणून. पेशंटने / नातेवाइकाने ट्रीटमेंट नाकारली याचे स्पष्टपणे लेखी रेकॉर्‍ड दावाखान्याने ठेवले तर त्यात बिघडले कुठे?

ब्यांक तुम्हाला पसबुक देते, ते तुमच्या सोयीसाठी की त्यांच्या? आता तुम्ही म्हणाल, ब्यांक त्यांच्या सोयीसाठी असे रेकॉर्ड ठेवते ! Happy शिवाय पासबुक जरी ब्यांकेने दिले तरी निर्णय तुमचाच असतो. डी एन आर चे रेकॉर्ड हॉस्पिटलने ठेवले तरी तो निर्णय तुमचाच अस्तो.

>>>> याचे रेकॉर्ड म्हणून. पेशंटने / नातेवाइकाने ट्रीटमेंट नाकारली याचे स्पष्टपणे लेखी रेकॉर्‍ड दावाखान्याने ठेवले तर त्यात बिघडले कुठे? <<<<<<
पुन्हा तेच्च!

वर दिलेली खर्चाची व अन्य कारणांमुळे नाईलाजाने दिलेली कन्सेण्ट, जी मूख्यतः डॉक्टर व नातेवाईक यांचेवर कुणाकडून हलगर्जीपणाचा आरोप करता येऊ नये इतक्याच मर्यादित अर्था-उद्देशाची अशी, अन नेमके त्याउलट
धागा सुरु करताना दिलेली परिस्थिती >>>"त्यांनी मला सांगितले आहे की त्यांनी त्यांचे आयुष्य अगदी कृतार्थपणे व्यतीत केले असून त्यांची आता कसलीच इच्छा उरलेली नाही त्यामुळे त्यांना आता जगणे नकोसे झाले असून ते स्वत: संपवावे असे वाटते आहे. "<<<<< यात जमिनास्मानाचे अंतर आहे.

आता हे मान्यच करायचे नसेल तर तुम्ही बसा वुईथ कन्सेण्ट आमरण उपोषणाला, .... इच्छामरणाचा कायदा व्हावा म्हणून! Proud

इथे विषय काय चाल्ल्लाय, हे धरुन काय बसलेत......

वर दिलेली खर्चाची व अन्य कारणांमुळे नाईलाजाने दिलेली कन्सेण्ट, जी मूख्यतः डॉक्टर व नातेवाईक यांचेवर कुणाकडून हलगर्जीपणाचा आरोप करता येऊ नये इतक्याच मर्यादित अर्था-उद्देशाची अशी,

पेशंटने निर्णय कोणत्या का कारणाने होईना, पण त्याने स्वतः तो निर्णय घेतलेला असतो. हॉस्पिटल फक्त हा निर्णय डोक्युमेंट करुन तो फॉलो करते.

एखाद्याचा निर्दयपणे खून करुन मग त्याची टोचणी लागली की प्रायोपवेशन करुन मरायचं, याला तुम्ही 'देहत्याग' वगैरे उदात्त संकल्पना म्हणता आणि पेशंटने कोणत्याही कारणाने का असेना ; ' उपचार थांबवा, मला मरण आले तरी चालेल, ' असे लिहून मेले तर ती मात्र हॉस्पिटलवाल्यांची सोय... गंमतच आहे लिंबुभाऊ तुमची ! Proud

>>>> पेशंटने निर्णय कोणत्या का कारणाने होईना, पण त्याने स्वतः तो निर्णय घेतलेला असतो. हॉस्पिटल फक्त हा निर्णय डोक्युमेंट करुन तो फॉलो करते. <<<<<

लगो, वेड पान्घरुन पेडगावला कसे जावे ते तुमच्याकडूनच शिकता येईल.
कोमा वा तत्सम बेशुद्धावस्थेतील गम्भिर आजारी/जखमी पेशण्ट "स्वतः निर्णय घेऊन डॉक्युमेण्ट्करता" सह्या वगैरे करुन देत अस्तो अन मगच स्वर्गाची दारे खटखटवायला सुखाने मोकळा होतो असे म्हणायचे आहे का लगो तुम्हाला?
तेव्हा हॉस्पिटलायझेशनच्या मरणान्तिक खर्च/त्रास टाळण्यासाठी, भीक नको पण कुत्र आवर या धर्तीवर, आता मरण परवडले पण उपचार नकोत या स्थितीतच बहुतेकवेळा नातेवाईकान्कडून जी कन्सेण्ट दिली जाते ती इच्छामरणाच्या समर्थनार्थ कुठून वापरताय?
धागा सुरु करताना दिलेले उदाहरण हे इस्पितळात मरणोन्मुख व्यक्तिचे नाहि, तर शाबुत अवस्थेत जगणे नाकारणार्‍यान्चा आहे.
इच्छ्हामरणाच्या कायद्याची अपेक्षा करणारे, केवळ मरणॉन्मुख व्यक्तिकरता हा कायदा मागत नसून,आत्महत्येस गुन्हा मानु नये इथपासुन सुरू झालेली चळवळ आम्हाला हवे तेव्हा मरु द्यावे इथ वर पोहोचली आहे.
तुमच्या त्या इस्पितळातल्या कायदेशीर तरतुदीन्च्या कन्सेण्ट वगैरे यातील किरकोळ भाग आहेत किम्बहुना तो विषयच इथे गैरलागु आहे. असो.

प्रकाशराव, आम्ही इकडे गेली नऊ दहावर्षे जसे रोमन लिपीतील विन्ग्रजी/इन्ग्रजी/मिन्ग्लिश वगैरे वाचत नाही,
तसेच इथे इतर काहीही संदर्भ/शब्द/वाक्य/मजकुर न देता, पान खाउन भिन्तीवर टाकलेल्या पिन्केप्रमाणे केवळ रोमन लिपीतुन फेकलेल्या लिन्काही उघडुन वाचित नाही! Proud कृपया नोन्द घेणे!

लिंटि अहो निस्त क्लिक करायच. समद म्हराटीतच लिवलय वला! बातमीचा आशय
"मुंबईमध्ये 1985 मध्ये "दि सोसायटी फॉर राईट टू डाय विथ अ डिग्निटी'ची स्थापना याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी झाली. त्यास मिळणारा प्रतिसाद अत्यल्प होता; मात्र आता केवळ वयोवृद्ध व्यक्तीच नाही, तर शहरांतील तरुण मुले, विविध कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारा अधिकारीवर्ग, एकट्या राहणाऱ्या व्यक्ती यांचाही "लिव्हिंग विल'कडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिकाधिक सकारात्मक झाल्याचे सोसायटीचे सचिव डॉ. सुरेंद्र ढेलिया यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. नैसर्गिक पद्धतीने मृत्यूला सामोरे जाण्याचा हक्क प्रत्येक व्यक्तीस असतो. त्यामुळे जीव तगविण्यासाठी कोणत्याही कृत्रिम घटकांचा आधार न घेता नैसर्गिक मृत्यू यावा यासाठी बनविण्यात येणाऱ्या "लिव्हिंग विल'बद्दल ही संस्था मार्गदर्शन करते. या लिव्हिंग विलला अजून कायदेशीर मान्यता नसली तरीही या इच्छापत्राची एक प्रत संस्थेकडे, एक प्रत डॉक्‍टरांकडे व एक प्रत त्या व्यक्तीने आपली इच्छा व्यक्त केलेल्या व्यक्तीकडे राहते. लिव्हिंग विल केलेल्या व्यक्तीच्या इच्छेचा आदर करूनच त्याला शेवटचा निरोप दिला जातो."

<कोमा वा तत्सम बेशुद्धावस्थेतील गम्भिर आजारी/जखमी पेशण्ट "स्वतः निर्णय घेऊन डॉक्युमेण्ट्करता" सह्या वगैरे करुन देत अस्तो अन मगच स्वर्गाची दारे खटखटवायला सुखाने मोकळा होतो असे म्हणायचे आहे का लगो तुम्हाला?>

आपल्यावर अशी काही वेळ आली (कोमात जाण्याची किंवा व्हेण्टिलेटरवर/नळ्या लावून जिवंत ठेवण्याची,इ.इ.) तर त्यावेळी नुसते जिवंत ठेवण्याची धडपड करू नये, असे आधीच जाणतेपणी, हातीपायी धड असताना लिहून ठेवायचे असते. याला लिव्हिंग विल म्हणतात
अशी माझी तुटपुंजी माहिती आहे.
सुनीताबाईंनी (देशपांडे) असे लिव्हिंग विल केले होते असे वाचल्याचे आठवते.

प्रकाशराव, माहितीबद्दल धन्यवाद.
प्रकाशराव अन भरत, अशा विल बद्दल आक्षेप घेण्याचे कारण नसावे.
खर तर मी देखिल फार फार पूर्वीच घरच्यान्ना सान्गुन ठेवलय की मी जर आजारी पडलो, अन हॉस्पिटल मधे टाकायची (अर्थातच) वेळ येणार, तेव्हा फक्त अन फक्त सरकारी कमी खर्चाच्या इस्पितळात भरती करा, कसलेही खर्चिक उपाय करु नका, बेडवर मला जीवन्त(?) ठेवण्याची महाखर्चिक व हॉस्पिटलान्ची "धन" करणारी धडपड करुन पुढच्या पिढीला मरणान्तिक कर्जात डुबविण्यापेक्षा मला विनाउपचार मरण स्विकारणेच बरे वाटेल. अन सरकारी हॉस्पिटलला तरी भरती का करा तर मी मेल्यानन्तर माझे डेथ सर्टीफिकीट मिळाल्याशिवाय मला जाळता येणार नाही, अन कसलेच उपचार होत नसतील तर कोणताही डॉक्टर/इस्पितळ डेथ सर्टीफिकीट देत नाहित अन स्थानिक नगरसेवक/तलाठी वगैरेन्चे शिफारसपत्र मिळविण्याकरता धावपळ करावी लागते, नैतर सरळ पोस्टमार्टेम करीत चिरफाड करतात व नन्तरच डेडबॉडी सोपवितात. हे टाळायचे असेल तर मरण्याकरता हॉस्पिटलात भरती होणे/केले जाणे अत्यावश्यक.

तरीही, वरील इच्छा, व धागा कर्त्याला/तत्सम व्यक्तिची "इच्छामरणाची" कल्पना यात प्रचंड महदंतर आहे. फरक आहे.
विरोध होतोय तो तत्सम इच्छामरणाच्या कायद्याला, जिथे धडधाकट असूनही मरण येत नाहीये म्हणून मृत्यु हवाय. विरोधाची कारणेही अनेक व रास्त आहेत.

लिंब्या, माणूस जेंव्हा कोम्यात असतो, तेंव्हा अर्थातच, कोम्यात नसलेला एखादा नातेवाईक निर्ण्नय घेत असतो. इतर वेळेला तो मनुष्य स्वतःच निर्ण्नय घेत असतो.

लिंब्या, भगवद्गीतेत भक्ताचे चार प्रकार वर्णिले आहेत, ज्ञानी, जिद्नासू, आर्ती, मुमुक्षू .. की असेच काहीतरी . म्हणजे प्रत्येकाचा भगवद्प्ताप्तीचा उद्देश भिन्न असतो. पण भगवंत चारी प्रकारात फरक करत नाही, सर्वांना सारख्याच मायेने पहातो.

तद्द्वतच, आयुष्य कृतार्थतेने जगून मग मुद्दाम मरणारा, खुनाची टोचणी लागली की अन्न त्यागून मरणारा, दवाखान्यात औषधोपचार त्यागून मरणारा, बाणावर पडून आता उत्तरायण सुरु झाले म्हणून मरणारे ... सर्वांना सन्मानाने मरण्याचा अधिकार कदाचित समानच ठेवावा लागेल. नै का?

>>>>>तद्द्वतच, आयुष्य कृतार्थतेने जगून मग मुद्दाम मरणारा, खुनाची टोचणी लागली की अन्न त्यागून मरणारा, दवाखान्यात औषधोपचार त्यागून मरणारा, बाणावर पडून आता उत्तरायण सुरु झाले म्हणून मरणारे ... सर्वांना सन्मानाने मरण्याचा अधिकार कदाचित समानच ठेवावा लागेल. नै का? <<<<<
लगो लगो, कित्ती बै तो विनय मरणाकरता? Wink
वरील प्रकारात मरण्याकरता सध्या असलेले कायदे पुरेसे आहेतच की, अन लोक हवे तेव्हा मरताहेतच की, कोणता कायदा आडकाठी करतोय म्हणून नविन कायदा हवाय? हे म्हणजे आक्षी त्या अन्निसवाल्यान्सारखेच झाले. म्हणे असलेले कायदे पुरेसे नाहीत. कायदे पुरेसे नाहित की अंमलबजावणि पुरेशी नाही हे विचारात न घेता मूळ उद्देश भलताच असल्याने देव वा श्रद्धा ही कल्पनाच मान्य नसलेले अन्ध अन्ध नावाखाली "हिन्दुधर्मश्रद्धानिर्मुलनाचा' कायदा करु पहाताहेत, तस्सेच काहीसे हे नाही ना हे तपासायला हवे.

अन लोक हवे तेव्हा मरताहेतच की, कोणता कायदा आडकाठी करतोय म्हणून नविन कायदा हवाय?

मरणार्‍यांना कायदा अडवत नाही, न मरणार्‍यांना अडवतो. Happy

आत्महत्या करताना मेला की संपला.

पण चुकून न मरता वाचला, तर आत्मह्त्या करणे हा गुन्हा आहे, या गुन्ह्याखाली शिक्षा होते. त्याला विरोध आहे.

पण मला वाटते, प्रायोपवेशन हा धार्मिक अधिकार या कलमाखाली मान्य होत असावा, नक्की माहीत नाही.

http://www.mightylaws.in/583/constitutionality-die

Euthanasia: It can be defined as the intentional killing by act or omission of a dependent human being for his or her alleged benefit.There are 5 types of euthanasia, namely – (i) Active, (ii) passive, (iii) voluntary, (iv) involuntary, (v) non voluntary.

Active euthanasia means a positive merciful act to end useless sufferings and a meaningless existence. It is an act of commission.

Passive euthanasia means to let die. It implies discontinuing life sustaining measures that will prolong life. It can also include an act of omission such as failure to resuscitate a terminally ill patient or not carrying out a life extending operation, etc.

Voluntary euthanasia happens when the person concerned gives his consent for it.

Involuntary euthanasia is practising euthanasia against the will of the person.

Non voluntary euthanasia happens when the person is in such a condition that he can not possibly give his consent. His relatives may consent for his death at that time.

In India, euthanasia is punishable under clause 1 of section 300 of I.P.C. Non voluntary and involuntary euthanasia is struck down by proviso 1 to section 92 of the I.P.C. Regulation 6.7 of the Indian Medical Council (Professional Conduct, Etiquette and Ethics) Regulations, 2002 also declares euthanasia as an unethical act.

In modern parlance, the ‘freedom to die’ seems to have emerged from the rights of privacy, autonomy and self-determination. But the real issue today is of three types:

(i) The people who want to commit suicide themselves. The act of suicide is an offence but it is not possible to punish the individual who is successful in committing it. The attempt to commit suicide is however punishable under section 309 of I.P.C. Though in some countries, this is not punishable.

(ii) The people who are able to express their desire to commit suicide but are infirm due to some reason and need assistance from others.

(iii) The people who are not capable enough to consent to their death because of physical or mental disability.

लगो, माझ विन्ग्रजी कच्च हे! तवा त्वा वर काय काय रोमनमदी लिवलहेस ते मराठि मधे लिव! तर कायतरी समजेल मला....

आज गुगलवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार मला दिसले म्हणून ते येथे देत आहे अर्थातच कॉपी पेस्ट करून .

On 1 February 1966 Savarkar renounced medicines, food and water which he termed as atmaarpan (fast until death). Before his death he had written an article titled "atmahatya nahi atmaarpan" in which he argued that when one's life mission is over and ability to serve the society is left no more, it is better to end the life at will rather than waiting for death.

The Ballad of Narayama (1983 film)
http://en.wikipedia.org/wiki/The_Ballad_of_Narayama_(1983_film)

हा चित्रपट दूरदर्शनवर दाखवला होता. त्यावेळी आपल्याकडे हा विषय चर्चेतही नव्हता.
लक्ष्मी गोडबोले म्हणताहेत तो प्रसंग, "अनुमती" चित्रपटातही आहे. ( तोच तर विषय आहे. ), गुजारीशमधेही आहे.

असो. चर्चा वाचतोय.. माझा निर्णय मात्र कधीच घेऊन ठेवला आहे !

माझा निर्णय मात्र कधीच घेऊन ठेवला आहे>>>> दिनेशदा तुम्हीसुधा.... जरा नेमके लिहलात तर बरे होइल. काहितरी वेगळाच गैरसमज होतो आहे. प्लिज....

हो नि. पा... कुठल्याही कृत्रिम उपायांनी मला जगवायचे नाही असे मी लिहून ठेवले आहे. ( उपायांची यादी पण केलीय, पण इथे देणे योग्य वाटत नाही. )

Pages