चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

९९ हा चित्रपट पाहिला...मस्तं आहे...कुनाल खेमु, सायरस ब्रोचा, सोहा अली खान, बोमन ईराणी, महेश मांजरेकर...सगळयांनीच एकदम छान कामे केली आहेत...
चित्रपट पहील्या क्षणापासुन शेवट पर्यंत हसवतो...कथा ही रटाळवाणी नाही...
एकदा नककीच पहावा...

अगदीं खरय. शिवाय कथानकाच्या/संवादांच्या प्रत्येक विटेमध्ये चिपलेल्या भाषेची लज्जत सिनेमात नाही चाखता येत. " स्पाय हू केम इन फ्रॉम द कोल्ड " वाचल व नंतर सिनेमा पाहिला. रिचर्ड बर्टन सारखा कसलेला नट व अप्रतिम सादरीकरण असूनही कादंबरी अधिक प्रभावी वाटली. मी शोधलेला उपाय -
जे पुस्तक आपल्याला खूप भावलय, त्याच्यावरचा सिनेमा बघण टाळणं !

वरचा माझा प्रतिसाद i am sam यांच्या अभिप्रायावर आहे.

Dan in real life जरा घाबरतच लावला, कारण मागच्या काही इन्डी चित्रपटांचे अनुभव काही खास नव्हते. पण हा एकदम आवडला.

अशा चित्रपटात सहसा दिसणारे भकास व्यक्तिमत्त्वाचे लोक आणि एकूणच उदास वातावरण यात अजिबात नाही. स्टीव्ह कॅरेल तर मस्त आहेच, पण ती Juliette Binoche सुद्धा एकदम खास. म्हणजे दिसायला फार छान आहे असे नाही पण तिचा एकूणच वावर मस्त आहे.

लाईट कॉमेडी, आणि एकदा जरूर बघण्यासारखा आहे.

मुग्धा याना अनुमोदन Happy

९९ मूव्ही एकदम छान आहे... कुणाल खेमु आणि बोमन इराणी यांची कामे एकदम मस्त... क्रिकेट च्या बेटिंग वर आहे पिक्चर..सही आहे एकदम्...कुठेही फालतुपणा नाही...

जर कुणाला पॅरोडी मुवीज (विडंबनात्मक सिनेमा) आवडत असतील.. हॉट शॉट्स पार्ट १ आणि २ नक्की पहा..
रँबो आणि टॉप गन या मुवीज चे मस्त विडंबन केले आहे... Happy

केदार सहीच,हॉट शॉट सेरीज बरोबर स्केरी मुव्ही सेरीजपण अशीच भन्नाट आहे खासकरून साईन्स,स्क्रीम आणी द ग्रज या तिघांची एकत्रीत खिल्ली उडवलेला स्केरी मुव्ही-२ तर अफलातून.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

आगाउ झकास आठवण करुन दिलित Happy
स्केरी मुव्हीज १-४ सगळेच मस्त आहेत... :)... बहुतेक स्केरी मूव्ही ४ मधे एलियन्स ची जी खिल्ली उडवली आहे ती तर निव्वळ भन्नाट आहे.

हॉट शोट्स मधे रँबो कोंबड्याचा बाणा सारखा जो वापर करतो...तो एकदम अ आणि अ. शॉट आहे Proud

एन्जेल अ‍ॅन्ड डेमॉन एक्दम फालतू वाटला..... न्यु यॉर्क बरा वाटला.... टर्मिनेटर ४ साक्षात मनोरन्जनाचा टर्मिनेटर वाटला...

द गेम प्लॅन आणी फादर ऑफ द ब्राइड आवड्ले का कुणाला. पहिल्यात रॉक आहे. डोळ्यासाठी गोळी( eye candy?)
द हॉलिडे ( Mark Sanford of Maria फेम!)
देमारपट आवडणारे कोणी आहे का? डाय हार्ड सीरीज, कॉन एअर, द फिफ्थ एलेमेन्ट आवडणारे?
World Movies वर Price less व hey good looking, The house of the flying dragon?

द गेम प्लॅन ... टिपिकल आहे.
फादर ऑफ द ब्राइड ... एक नंबर! केवढ संवेदनशील चित्रण... कुठेही अति विनोद वा अति रडारड नाही.
द हॉलिडे (नविन ना?)... एकदम फ्रेश आहे, कितिही वेळा पाहिला तरी बोर होत नाही!

मला आवडलेले काही..

माय कझिन विनी
द रॉक
डाय हार्ड -१,२,३ -मस्त!
...४ मजा आली नाही..
लीगली ब्लाँड (फक्त पहिला..दुसरा आवडला नाही).
कॉन एअर
एक्सिक्युटीव डीसीजन
एअर फोर्स वन
बॅड बॉय्स (फक्त पहिला छान आहे..दुसरा मजा आली नाही).
द अनटचेबल्स
seven
टँगो अँड कॅश - (टाईमपास्. हिंदी टाईप)
Bringing down the House

Parody/spoof मधे (अर्थातच माझे मत):

Airplane, Naked Gun-1, Hot Shots-II (Part Deux) - सर्वात चांगले. कितीही वेळा बघा नवीन काहीतरी सापडते. आणि जितके तुम्हाला इतर इंग्रजी चित्रपट माहीत असतील तितके जास्त आवडतील.

Naked Gun -2, Naked Gun-3, Hot Shots-I, Spy Hard, Wrongfully accused - त्या खालोखाल. नवीन Get Smart ही साधारण यात

Top Secret, Not another teen movie, - बर्‍यापैकी चांगले.

Austin Powers series - अजागळ पणा सहन करायची तयारी असेल तर धमाल.

Scary movie series/Epic movie वगैरे - काही चांगले विनोद पण इतर कमालीचे ओंगळ शॉट्स बघवत नाहीत. त्यात चांगले विनोदही हरवून जातात.

सर्वात चांगला कोणता यात कदाचित एअरप्लेन किंवा नेकेड गन-१ पैकी एक. एअरप्लेन कदाचित जास्त चांगला असला तरी मला नेकेड गन-१ जास्त विनोदी वाटतो. आणखी एक कारण म्हणजे एअरप्लेन च्या काळचे इतर चित्रपट फारसे बघितलेले नसल्याने त्यातील काही विनोद पटकन लक्षात येत नाहीत.

फारएंड ना अनुमोदन Happy
Hot Shots-II (Part Deux) हा माझाही फेवरेट आहे... तो पहिल्या नंतर रँबो II मी परत पाहिला Proud
Airplane, Naked Gun सिरिज पाहिली नाही Sad ... कशावर आहे Naked Gun ?,

०-------------------------------------------०
दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?

फारेंड,
space balls पाहिलास की नाही? Happy

फारेंड अगदी अगदी. स्पूफ बघायला आनी मजा येते.

स्पेस बॉल्स पाहिल्याचे आठवत नाही समीर. बहुधा नाही.

केदार, ती पूर्ण सिरीज पाहा. त्याला तोड नाही. स्पूफ मधे दोन प्रकार असावेत - एक म्हणजे प्रसिद्ध चित्रपटांचे विडंबन करणारे आणि दुसरे म्हणजे कोणत्याही चित्रपटात जे ठराविक ठोकताळे वापरले जातात त्याचे विडंबन करणारे - नेकेड गन हे दुसर्‍या प्रकारात येतात बहुधा.

फारेंड,अनुमोदन
या'ठराविक ठोकताळ्यांना' स्टॉक कॅरॅक्टर' म्हणतात आणि नेकेडगनचे विनोद नक्कीच जास्त उच्च आहेत.
ऑस्टीन पॉवर्स तर इंग्रजीतले दादा कोंडकेच.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

हो, नेकेड गन बद्दल अनुमोदन. हॉट शॉट्स (२) अफलातून. वरील यादीत माझे बरेच आहेत आणि त्यात नसलेले काही -
स्पेसबॉल्स (साय-फाय),
स्लीपर (साय-फाय)
शॉन ऑफ द डेड (झाँबी चित्रपट)
ड्रॅक्युला : डेड अँड लव्हिंग इट (ड्रॅक्युला, व्हॅम्पायर चित्रपट)
यंग फ्रँकेन्स्टाईन (जुने कृष्णधवल फ्रँकेन्स्टाईन चित्रपट)
रॉबिन हूड : मेन इन टाईट्स (रॉबिन हूड चित्रपट)

    ***
    Assume there is something witty and creative here.

    History of the World कोनी पाहिला आहे का?

    अशी ही बनवाबनवीचा हिंदी रिमेक पेयिंग गेस्ट

    भयानक ब्येक्कार पिक्चर.
    --------------
    नंदिनी
    --------------

    स्पाय हार्ड
    नार्नियाचापण एक पॅरोडी आहे. मला वाटतं एपिक मुव्ही हाच असावा.
    हॉट शॉट्स
    टेरीफिक! त्या एपिक मूव्हीत तर डॉ. फिल, MJ, हॅरी पॉटर, सुपर मॅन काय काय भरलय!

    एक्सिक्युटीव डीसीजन
    एअर फोर्स वन
    फ्लाईट प्लॅन
    बिहाईंड एनिमी लाईन्स
    टँगो अँड कॅश
    माय कझिन विनी
    केलीज हिरोज (क्लिंट इस्टवुड : आह!)
    ट्क्सिडो
    फार आवडले.

    डाय हार्ड (लेट इट स्नो),
    केलीज हिरोज (बर्निंग ब्रीज)
    एक्सिक्युटीव डीसीजन (बहुतेक यातच आहे)(लाईक टु कम होम)
    टायटॅनिक (माय हार्ट विल गो ऑन)
    ही सगळी गाणीपण मस्त आहेत.
    _______________________________
    "शापादपि शरादपि"

    खर बोललिस नंदिनी. बेकार आहे पेयिंग गेस्ट. ९९ चांगला आहे.

    'God must be crazy I & II' बघितला आहे का कुणि? अप्रतिम! सहसा सिक्वेल आधिच्या चित्रपटाएअवढे चांगले नसतात पण हे दोन्हि अगदि तोडिस तोड आहेत.

    ********************####**************************
    माझि नरकात जाण्याचि तयारि आहे पण त्यामागच कारण मात्र स्वर्गिय असायला हव!

    God must be crazy अगदी निखळ करमणूक.
    आणखी एक आवडलेला wag the dog

    अगदी अगदी. मॅट्रिक्स ट्रिलजी? काय संकल्पना, काय मांडणी, काय कलाकार! वाह वाह. मला त्यातील ट्रिनिटी
    सारखी बुगाटी एकदाच चालवायची आहे. मोनिका बेलुशी सारखे एकदाच दिसायचे आहे. ओरॅकल सती,

    सर्व आवडतात. मारामारी कंटाळवाणी होते थोडी पर अपुन निओ के लिये सह लेता है कुछ भी. बाकी पोस्ट नन्तर.

    एवढी झकास यादी दिल्याबद्दल धन्स स्लार्टी आणि फारेंड Happy

    जर कुणाला Divx Quality English Movies Online पहायच्या असतिल तर इथे पहा... वरचे बहुतेक सर्व पिक्चर्स आहेत Happy
    तुम्ही ते डाउन्लोड पण करु शकता.

    देमार मूव्हीज मधे रश अवर सिरिज, ट्रान्स्पोर्टर सिरिज पहाण्यासारखे आहेत.. वॅन डॅम चा Blood Sport खुप छान आहे..त्यातला डोळे मिटुन फायटिंग करण्याचा सीन..अजय देवगण च्या मूव्ही मधे आहे तसा ढापला होता Proud

    ०-------------------------------------------०
    दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
    सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?

    कॅरी ऑन सिरीज मधले पिक्चर्स डाऊनलोडसाठी आहेत का कुठे उपलब्ध???
    *****&&&*****
    Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

    हँग ओव्हर.

    जबरदस्त. जाम मजा येते बघताना. Happy
    --------------
    नंदिनी
    --------------

    ICE AGE III

    मला खुप आवडला. 'पहायलाच हवा' या catagory मध्ये मोडतो.

    हिन्दी मधील गाइड्चे कोणी चाह्ते आहेत का? कथा किती चान्गली आहे. कामे किती मस्त आणी संगीत! मी गरीबाने त्या बद्द्ल काय लिहावे. माझी एक विनन्ती आहे संजय लीला भन्साली ला. त्याने या सिनेमा चा रीमेक करावा. वहीदाचा रोल ऐश्वर्या राय. देव चा अमीर खान व मार्को चा इर्फान खानला द्यावा. सिनेमा भारतातच शूट करावा. गाणी तीच ठेवावीत. काय म्हन्ता मंडली?

    तसेच काही चान्गली जुनी हिन्दी गाणी घेवोन त्यावर माधुरीने न्रुत्य करावे. जसे

    आजा आजा तीसरी मन्झिल

    रात का समा जिद्दी

    कोइ मतवाला लव इन टोकियो ( का तोक्यो)

    Pages