फोडणि चा Brown Rice

Submitted by गोपिका on 24 February, 2014 - 11:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. शिजवलेला Brown Rice - २ कप
२. फोडणि साठि - २ टेबल स्पून तेल, जिरे,मोहरि,हिन्ग,हळद
३. लसुण - २ पाकळया
४. चिरलेला कांदा - १,मध्यम आकाराचा
५. चिरलेलि हिरवि मिरचि -१ (मि हॅलापेन्यो (jalapeno),वापरले आहे)
६. कापलेल्या भाज्या - तुम्हाला आवडत असतिल त्या
७. दाणे - १/४ कप
८. मीठ - चविनुसार

क्रमवार पाककृती: 

क्रमवार क्रुति मि सांगण्याचि गरज नाहि ह्याचि मला कल्पना आहे.तरि थोडक्यात सांगते....

तेल गरम करुन त्यात फोडणि चे जिन्नस घालावेत.नंतर लसुण्,कांदा, मिरचि, भाज्या व दाणे घालुन परतावे.मीठ घालावे.मग षिजलेला भात त्यात घालुन चांगले परतुन घ्यावे.

अप्रतिम लागतो.वाटत्च नाहि कि आपण ब्राउन राइस खातो आहोत

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे
अधिक टिपा: 

आवडत असल्यास गरम मसाला व लिंबाचा रस हि घालावा.
फोटो प्रतिसादात देत आहे

माहितीचा स्रोत: 
स्व प्रयत्न
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Brown Rice म्हणजे काय ? आणि तो मिळतो कुठे? सांगाल का ? मला हवा आहे. कसा लागतो ? डायबेत्क साठी Brown Rice चांगला की वाईट ?

ब्राउन राईस मस्स्स्त लागतो मला तरी....एक प्रश्ण....मला डॉ. नी Low carb diet घ्यायला सांगितलाय......ब्राउन राईस याला चालतो का? प्लिज माहितगारांनी माहिती द्यावी.....

Brown Rice म्हणजे काय ? आणि तो मिळतो कुठे? सांगाल का ? मला हवा आहे. कसा लागतो ? डायबेत्क साठी Brown Rice चांगला की वाईट ? >>>>>>> म्हणजे, पॉलिश न केलेला तांदुळ.पांढरा तांदुळ हा पूर्वि ब्राउनच असतो पण नंतर प्रॉसेस केलेला असतो ज्यामुळे त्यतिल फायबर निघुन गेलेले असते.ब्राउन राइस मध्ये फायबर असते झ्यामुळे मेटाबॉलिस्म वाढते.
भारतात तो कोणत्या दुकान किवा मॉल मध्ये मिळेल माहित नाहिये
खायचा असेल तर एकदा डॉक्टरांना विचारूनच मग खा.

छान दिसतोय. मी कधीच खाल्ला नाहिये ब्राऊन राईस. चविला कसा लागतो? >> >>>>>ऑर्गॅनिक तांदुळ घे जो नीट निवडलेला हि असतो आणि स्वछ हि.चविला थोड फरक असतोच पण मुगाचि खिचडि,फोडणिचा भात्,मसाले भात वगरे अप्रतिम लागतो.

ब्राउन राईस मस्स्स्त लागतो मला तरी....एक प्रश्ण....मला डॉ. नी Low carb diet घ्यायला सांगितलाय......ब्राउन राईस याला चालतो का? प्लिज माहितगारांनी माहिती द्यावी..... >>> +१११११११

म्हणजे आम्ही घरी जो 'हातसडीचा ' तांदुळ घेतो तोच ब्राऊन राईस हे आत्ता समजले. तो सगळ्या वाण्यांकडे नाही मिळत,शिवाय महागही असतो. पण डायबेटीसला हाच उत्तम. हा लो कॅलरीसुद्धा असतो.पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये मिळतो. आमच्या वाण्याला दम देऊन मुद्दाम आणायला लावला तेंव्हा आता तो माझ्यासाठी आणून ठेवतो.

राईस ब्रान तेलसुद्धा मिळते.(म्हणजे तांदुळाच्या टरफलापासून काढलेले तेल.) यात बरेच चांगले घटक असतात. बीपी च्या लोकांसाठी ऊत्तम