वांग्याचे दहयातील भरीत

Submitted by प्रमोद् ताम्बे on 10 April, 2014 - 20:22

वांग्याचे दहयातील भरीत

साहित्य : भाजलेल्या एका मध्यम वांग्याचा गर (बलक) , एक मोठा बारीक चिरलेला कांदा , फोडणीसाठी तेल,मोहोरी,हळद,हिंग,जिरे, चवीनुसार हिरव्या मिरचयांचे तुकडे किंवा लाल तिखट , साखर , मीठ, जरुरीप्रमाणे दही , तीन मोठे चमचे शेंगदाण्याचे भरड असे कूट.

 वांग्याचे भरीत xxx.jpg
कृती : तेलात बुडवून काढलेल्या सुरीने वांग्याला सर्व बाजूंनी छेद घ्यावेत व गॅसवर सर्व बाजूंनी ते वांगे चांगले भाजून घ्यावे , व कच्चे राहणार नाही ह्याचे काळजी घ्यावी. भाजलेल्या वांग्याच्या काळ्या साली व देठ काढून टाकून वांग्याचा गर (बलक) एका बाऊलमध्ये काढून घ्यावा व चांगला स्मॅश करून घ्यावा,गुठळ्या रहाणार नाहीत असे पहावे. गॅसवर एका कढल्यात तेल गरम करावे. त्यात जिरे व मोहोरी घालून दोन्ही तडतडेपर्यन्त थांबावे. मग फोडणीत हळद व हिंग आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालावेत. तयार फोडणी वांग्याच्या गरावर घालावी.नंतर त्यात कांदा,मीठ,साखर,दही,शेंगदाण्याचे भरड कूट आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे. जेवणात तोंडीलावणे म्हणून दह्यातील वांग्याचे भरीत फारच छान लागते. विशेषतः मुगाच्या डाळीच्या गरागरम खिचडीबरोबर तर ते जास्तच लज्जतदार व चविष्ट लागते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा.. ही पण नॉस्टेल्जिक रेसिपी.. आई करायची.. मायनस शेंगदाण्याचे कूट..

you really seem to be very very interested in cooking!!! Happy

मलाही रक्तदाब व मधुमेह हे दोन्ही विकार असल्याने डॉक्टरांनी दाण्याचे कूटाचा वापर करू नका असे सांगितले होते त्यामुने एक वेळ मीही मायनस शेंगदाण्याचे कूट असे भरीत केले होते. पण शेंगदाण्याचे कूटाची मजा काय सांगावी,एकदम सही, म्हणून आता डॉक्टरांचा सल्ला बाजूला ठेऊन या भरतात तरी शेंगदाण्याचे कूटाचा सर्रास वापर करतो,काय करणार ? त्याखेरीज जीभ ऐकायलाच तयार नसते ना !