यंदाचे साहित्य संमेलन सॅनफ्रान्सिस्को येथे

Submitted by समीर on 23 June, 2008 - 02:29

यंदाचे साहित्य संमेलन सॅनफ्रान्सिस्को येथे घेण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आज पुण्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
या निवडीबद्दल सर्वप्रथम बे एरीया महाराष्ट्र मंडळाचे हार्दिक अभिनंदन.

पण प्रथमच परदेशी साहित्य संमेलन भरवण्याच्या मंडळाच्या निर्णयाबद्दल आपल्याला काय वाटते?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामान्य रसिकांना वंचित केल्यासारखे वाटते.
यातून काय साधणार हे काही कळत नाही.
होतकरू लेखकाला संपूर्णपणे वगळले आहे. होतकरू लेखक स्वतःच्या खर्चाने जाउ शकणार नाही आणि तो होतकरू असल्याने त्याला कोणी नेणार नाही. हा अर्थात एखादा नवशिक्या लेखक पैशाच्या बळावर लावेलही हजेरी.
अनिवासी भारतीयांना कमी लेखायचं नाहीये पण बीएमएम चे संमेलन आणि साहित्य संमेलन यात फरक आहे. अनिवासी भारतीयांकडून होणारे मराठी लिखाण हे कुठल्याही इतर लिखाणासारखेच दर्जाच्या बाबतीत अगदी वाईट ते उत्तम यामधे कुठेही येते. पण संख्येने कमी असल्याने सगळेच visible होते. म्हणजे अजिता काळ्यांची सशक्त कथा आणि कुणा सोमागोम्याची कविता हे एकाच पद्धतीने तोलले जाते. तर थोडक्यात काय मराठीतून लिहिणारे वा मराठी वाचणारे अमेरिकास्थित भारतीय हा एक छोटा गट त्यातून दर्जेदार लिहिणारे आणि दर्जाचा आग्रह असणारे वाचक हे अजून नगण्य संख्येत... त्यामुळे मु़ळात एका नगण्य संख्येसाठी अनेकांना बाजूला केलं जातंय असं वाटतं.
फारसा काही स्वागतार्ह निर्णय वाटत नाही.

अर्थातच या प्रतिसादावर अनेक जण आक्षेप घेतील पण परवडत नसतानाही दरवर्षी नेमाने खिशाला फोडणी देऊन, प्रसंगी बिनपगारी रजा काढून साहित्य संमेलनाला हजेरी लावणारे आस्वादकांचे अनेक गट मला माहिती आहेत त्यांच्या पार्श्वभूमीवर असं वाटणं साहजिक आहे.

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

ह्या संमेलनाचे नाव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असेच आहे ना? मग जर हे अमेरिकेत घ्यायचे असेल तर त्याचे नाव आंतरराष्ट्रीय असे का नाही केले...
साहित्य संमेलन इथे भारतात (पक्षी : महाराष्ट्रात) घेताना सुद्धा अवस्था गंभीर असते मग अमेरिके घेतल्यावर त्याला मिळणारा प्रतिसाद कसा असेल? तसेच आज्जुकाने वरती उल्लेखिल्याप्रमाणे जर खिशाला परवडत नसताना भारतातील संमेलना आवर्जुन हजेरी लावणारे रसिक अमेरिकेत जाण्याचा विचार तरी करु शकतील का?
साहित्य संमेलनाचा मूळ हेतू काय आहे असाच प्रश्न पडतो आहे? आणि हा हेतू अमेरिकेत साहित्य संमेलन घेऊन साध्य होईल असे मंडळाला का वाटले? उद्या मॉरिशस मध्ये पण साहित्य संमेलन घेतील.. खूप लोकं मराठी बोलतात म्हणून...
अमेरिकेत साहित्य संमेलन घेऊन मंडळाला असे तर सूचित करायचे नसेल की आता मराठी ही सातासमुद्रापार पोहोचली आहे, मराठी ही ग्लोबल झाली आहे आणि तिचा विस्तार होतो आहे.. इथे महाराष्ट्रात मराठीचीच अवस्था गंभीर आहे आणि अमेरिकेत साहित्य संमेलने घडवून आणत आहेत..
==================
फुकट ते पौष्टीक

साहित्य समेंलनांचा मानकर्यांना अमेरिकेत फुकटात येता यावे ह्यासाठी हा निर्णय घेतला. सामान्य वाचकसाठी वा मराठी साठी तर नक्कीच नाही. अज्जुकाच्या पुर्ण पोस्टला अनुमोदन.
मराठी ग्लोबल बिबल काही झाली नाही पण एक मराठी नाव कुठेही पाहीले की लगेच आपण मराठी माणुस ईकडे पोचला तिकडे पोचला करुन रण गाजवितो. तिकडे मग मराठी माणुस भलेही आपल्या पोराला ओ नो स्विटी डोंट डु धिस असे म्हणत असला तरी चालेल. ईकडील लोक १ पुस्तका ऐवजी ऐकाच वेळेस १० विकत घेतील, तेवढीच पुस्तकाचे प्रदर्शन भरविन्यार्या लोकांची चंगळ होईल. जिकडे पैसा तिकडे आम्ही जाणार ही वृत्ती मात्र ह्यातुन दिसतेय.
आणि हो तेवढाच ग्रंथ दिंडीला आता क्रुकेड स्ट्रीट वर फिरुन आल्याचा मान मिळनार मग भलेही ती महाराष्ट्रातील जिल्हे असनार्या गोंदीया, चंद्रपुर, उस्मानाबाद ईकडे गेली नाही तरी चालेल. नाहीतरी तिकडे वाचक कोणी नाहीतच, असलेच तर त्यांचाकडे प्रदर्शनातील पुस्तके घ्यायला पैसे नसनार. ईकडे आपण इंग्रजी लोकांना मराठी वाचायला लावुयात व मरन्नासन्न भाषा म्हणौन युनो चे अनुदान तरी घेऊयात, तेवढेच दुबई, जर्मनी आणि इतर देशात जाऊन साहीत्य संमेलन करता येतील. तिकडे ही दोन चार मराठी नाव आहेत म्हणे.

अखिल "भारतीय" मराठी साहित्य सम्मेलन "अमेरिकेत"?????
कशासाठी?
या होणार्‍या खर्चात भारतातच काही करु शकणार नाहीत का?

ह्या निर्णयाचा ऊद्देश फक्त मन्डलातिल लोकाना फुकट अमेरिका वारि घडावि एव्हडाच आहे. हे जे ७५०००/- रुपयन्चे पाकेज आहे ते बे अरइअ तिल लोकना द्या उपल्ब्ध करुन आनि मग तिथ्ल्य सहित्य प्रेमिनी भारतात यावे.

केदार,
>>ईकडील लोक १ पुस्तका ऐवजी ऐकाच वेळेस १० विकत घेतील, तेवढीच पुस्तकाचे प्रदर्शन भरविन्यार्या लोकांची चंगळ होईल.
याचा अगदी उलटा अनुभव BMM च्या वेळी आला. सर्व प्रकाशकांची पुस्तकं शेवटच्या दिवसापर्यंत तशीच पडून होती. एकतर बर्‍याच जणाना नेहेमिचे यशस्वी लेखक सोडुन नवीन काही माहीत नव्हतं.

मग हे तर अजुनच वाईट. एकतर लेखक माहीत् नाहीत, पुस्तक खपले जातील की नाही हे माहीत नाही. (दर वेळी ह्यावर प्रत्येक पेपर मध्ये एक दोन लेख असतातच.) जे मान्यवर लेखक आहेत ते येतील पण जे मान्यवर नाहीत त्यांचा कडे तर पैसेही नसनार. नविन लेखकांची ओळख अशा समेंलनातुन सर्वांना होते ती आता होईल की नाही हे माहीत नाही. मग हा अट्टहास का करत आहेत देव जाने.
शिवाय ७५ लाख रु पण हवे आहेत आणि फुकटात परदेशवारीही.

येथील नविन पिढीला मराठीची ओळ्ख व्हावी म्हणुन हे संमेलन फ्रिस्को ला भरवित आहोत हे कौतीकराव ढाले (पाटील) लिहीतात. कमॉन कौतीकराव. लोकसत्तात एक पत्र लिहायला हवे.

>>> येथील नविन पिढीला मराठीची ओळ्ख व्हावी म्हणुन हे संमेलन फ्रिस्को ला भरवित आहोत हे कौतीकराव ढाले (पाटील) लिहीतात...
Happy अरे ही केवळ एक मखलाशी असती एक वेळ ठिक होतं. पण त्यांचा यावर मनापासून विश्वास दिसतो हे अचंबित करणारं आहे. राजकारणीसुद्धा मखलाशी करतात, पण ते स्वतः निदान भ्रमात नसतात. साहित्यिक, विचारवंत जेव्हा असे भ्रम बाळगतात तेव्हा ते करूण दिसतं.
वरच्या सर्वांना मोदक.

    ***
    Three Laws of Thermodynamics, 'God and you play dice' style : (1)You can't win. (2)You can't break even. (3)You can't even get out of the game.

    साहित्य संमेलनाला लागणारा पैसा येणार तो सरकार कडूनच ना? म्हणजे शेवटी करदात्यांच्या खिशातून! इथे आपले पंतप्रधान काटकसर करा म्हणून सांगत आहेत. मंत्र्यांचे परदेश दौरे कमी करावेत अशी सूचना ही केली गेली आहे. महागाईने कंबर मोडली असताना हे खर्च कशासाठी?

    हे संमेलन म्हणजे होतकरू लेखकांसाठी नावाजलेले लेखक, कवी, तसेच प्रकाशक आणि त्या क्षेत्रातील महत्त्वाचे (इन्फ्लुएंस वाले) लोक यांच्या नेटवर्किंग साठी आणि नवीन लेखकांची पुस्तके जास्तीत जास्त वाचकांसमोर यावी या मार्केटिंग साठी असते का? (मला माहीत नाही, एक अन्दाज). तसे असेल तर येथे ठेवण्यात काही व्यापक हेतू साध्य होणार आहे का? होणार असेल तर तो होताना काही लोकांना त्यात काही फायदा मिळाला तर ते अपरिहार्य आहे आणि सर्वच संस्था, कंपन्या यात तसे होते.

    येथील रसिकांचा फायदा आहे, पण त्यासाठी मुख्य संमेलनासारखेच दुसरे काहीतरी करता येऊ शकते. किंवा बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला जोडून असे काहीतरी करता येईल.

    पण वरती समीर ने म्हंटल्याप्रमाणे जर पुस्तके खपली जाणार नसतील तर नवीन लेखकांना तो ही फायदा नाही. (पण त्यात थोडा मार्केटिंग चाही भाग असेल. मी मायबोलीवर त्याबद्दल वाचून माहीत झाल्यावरच अनेक पुस्तके आणली).

    बे एरिया महाराष्ट्र मंडळाचा ही यात उद्देश काय आहे हे त्यांच्यापैकी कोणी मायबोलीकर असतील तर सांगू शकतील काय?

    नेटवर्किंग तर असेलच, पण ते महाराष्ट्रात सर्वात जास्त व्यापक होईल असं वाटतं. नेटवर्किंग हे नवोदितांना खरंच आवश्यक असतं, त्यांना त्यातून सर्वात जास्त फायदा होऊ शकतो. पण होतकरूंपैकी बर्‍याच लोकांना जर जमणार नसेल (विशेषतः ग्रामीण भागातील) तर ते प्रस्थापितांमध्येच होईल, ज्यासाठी त्यांना तिथे जायची गरज मुळीच नाही. समावेशकतेचा प्रश्न येतोच.
    अर्थात पुस्तके मात्र जाऊ शकतात हे खरे. पण तसे मार्केटींग करायचे असेल तर प्रकाशकांना इतरही अनेक संधी आहेत (अमोल म्हणतो तसे अधिवेशनाबरोबर), त्यासाठी व्यापक सहभागाशी तडजोड करण्याची खरंच गरज आहे का हे पाहिले पाहिजे.

      ***
      Three Laws of Thermodynamics, 'God and you play dice' style : (1)You can't win. (2)You can't break even. (3)You can't even get out of the game.

      काल अजुन एक नविन घडामोड झाली ह्यात.. आता म्हणे समांतर संमेलन करणार आहेत रत्नागिरीत.. आणि ह्याची जबाबदारी घ्यायला कोमसाप तयार ही झाली आहे.. उगाच काहितरी फालतूपणा.
      ==================
      फुकट ते पौष्टीक

      Happy दोन्ही साहित्य संमेलने व्हिडिओ कॉन्फरन्स करून एकमेकाशी गप्पा मारतील. अगदी आय टी कंपन्यांमध्ये होतात तश्शी!!

      काय हो???? पन्ढरीची वारी अजुनही पन्ढरपुरालाच होते ना?????
      की ती पण अमेरिकेत नेणारेत???? Proud
      ...;
      आपला, लिम्बुटिम्बु

      -----काय हो???? पन्ढरीची वारी अजुनही पन्ढरपुरालाच होते ना?????
      की ती पण अमेरिकेत नेणारेत--------
      अवो, तो इठ्ठल पंढरपुरास पुंडलिकाने आणला, कुणा सोम्यागोम्याने न्हाई ! त्येला फ्यान्सीडरेस वाल्या वारकर्‍यांची गरज न्हाई. त्यामुळे वारी हिथंच हाये. तो हितं उभा र्‍हाउनबी सगळीकडं लक्ष ठिउन हाये.
      ------

      BTW जशी सिग्नेचर कँपेन असते तसे काही आपल्याला साहित्य संमेलन अमेरिकेत भरवण्याविरुध्द निदान निषेधात्मक करता येईल का ?

      हा निर्णय म्हणजे सरकारच्या आणि बे एरियातल्या मंडळींच्या पैशांनी अमेरिकावारी व मजा करण्याचा इकडच्या पदाधिकार्‍यांचा अट्टाहास आहे. यातून इतर काही चांगले साध्य होईल असे वाटत नाही.
      आयोजनात बे एरिया महाराष्ट्र मंडळाचे जे काही पैसे आणि श्रम खर्च होणार त्यातून तिथे मराठी रूजण्यासाठी इतर बरेच काही करता येईल, ( तिथे त्यासाठी बरेच सक्षम लोक आहेत असे इतर कार्यक्रमांचे वर्णन ऐकून वाटते. ) त्यासाठी इकडच्या फुकट्यांना तिकडे नेण्याची गरज नसावी Happy

      अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भारतातच व्हावे, सामान्य मराठी माणसाला, नव्या होतकरू साहित्यिकांना सहभागी होता यावे अशा ठिकाणी आणि स्वरुपात व्हावे. जे साहित्यिक नाहीत अशा राजकारणी माणसांच्या उपस्थितीशिवाय व्हावे. याव्यतिरिक्त हवे तर एखादे आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलन दरवर्षी वेगवेगळ्या देशात करावे.

      येथील नविन पिढीला मराठीची ओळ्ख व्हावी म्हणुन हे संमेलन फ्रिस्को ला भरवित आहोत हे कौतीकराव ढाले (पाटील) लिहीतात. कमॉन कौतीकराव. लोकसत्तात एक पत्र लिहायला हवे.


      अरे या कौतिकरावाने या साहित्यसंमेलनाला विरोध केला होता ना? तपासायला हवे. कदाचित उपहासाने म्हटले असेल...:)

      बाय द वे हे कौतिकराव ठाले पाटील (ढाले नव्हेत) हे कवयित्री अनुराधा पाटील यांचे पतिराज आहेत.

      अज्जुकाच्या पोस्टला अनुमोदन.

      गेल्या दोन दशकात मोठ्या प्रमाणावर मराठी समाज महाराष्ट्राबाहेर स्थाईक झाला.

      अमेरिकेच्या वेगवेगळ्या शहरात मनापासून मराठी साहित्यावर प्रेम करणारे, मराठी बुक क्लब चालवणारे, लिखाण करणारे अनेक गट आहेत.

      ह्या बृहन महाराष्ट्राच्या अस्तीत्वाची दखल म्हणून SF ला संमेलन भरवले तर काही निंदा जनक घडले अहे असे मला वाट्त नाही.

      ह्यातून परदेशातील मराठी सांस्कृतिक जीवनाला चालना मिळाली, परदेशस्थ मराठी साहीत्याचा कसदार प्रवाह तयार झाला तर ऊत्तमच.

      SF ची मंड्ळी तन मन लावून हे संमेलन यशस्वी करतील अशी खात्री आहे.

      - झक्कास.

      दर-वर्षी जवळ-पास ४०,००० लोक संमेलनाला हजेरी लावतात असे माझ्या वाचनात आले आहे. यातील बहुतांश (१२ + ५० वगळता) साहित्य प्रेमी संमेलनाला मुकतील ह्या गोष्टीचे वाईट वाटते. संमेलन सॅनफ्रान्सिस्को ला घेण्यात पदाधिकार्‍यांची फुकट वारी हाच जर सुप्त हेतु असेल तर मराठीचे दुर-दैव.

      गेली काही वर्षे साहित्य सम्मेलनात घुसलेल्या दोन अनिष्ट गोष्टी म्हणजे वारेमाप पैशाची उधळपट्टी आणी राजकारण्यान्ची घुसखोरी.
      सान्गली सम्मेलनात तर याचा कहरच झाला. सम्मेलनाचे बजेट दीड दोन कोटीन्वर गेले.
      इतके पैसे जमविण्याची शक्ती नसल्यामुळे मुख्यमन्त्र्यान्चया दारात झोळी घेवून उभे रहाणे क्रमप्राप्तच होते.
      (मोठा गाजावाजा करून वसुन्धरा पेन्डसे नाइकानी सुरु केलेला महकोश कुठे गेला? )
      त्यानी ही बारबालेवर दौलतजादा केल्याच्या थाटात पन्चवीस लाखाचा चेक फाडला.
      ( हलवायाच्या घरावर तुळशीपत्र म्हणतात ते हेच)
      त्याच दिवशी विदर्भात एका दुर्गम खेड्यात एका गरीब मुलाचा म्रुत्यु झालेली बातमी वाचली.
      कारण काय तर चारशे रुपयाची रेबीज लस सरकारी दवाखान्यात उपलब्ध नव्हती.
      इतकेही कमीच म्हणून महापालिकेकडून थोडीशी वसुली झाली.
      ( लोकाना शुद्ध पाणी काय, पुढेमागे केव्हाही देता येयील. समेलन महत्वाचे)
      सम्मेलनाला पाहुणे म्हणून थेट राष्ट्रपतीनाच बोलवले गेले.
      राष्ट्रपतीन्च्या प्रोटोकॉल अधिकार्‍यानी सम्मेलन अध्यक्ष्याना भाषण पाच मिनिटात उरकण्याची तम्बी दिली आणी
      सम्मेलनात साहित्याचे स्थान काय याची जाणीव करून दिली.
      त्याआधी सोलापूर साहित्यसम्मेलानाच्या बरोबरच विद्रोही साहित्यसम्मेलन ही झाले.
      विद्रोही नी सरकार कडून एक पैसाही न घेता लोकान्कडून एक रुपया आणी मुठभर धान्य एवढी
      देणगी गोळा करून सम्मेलन यशस्वी केलेच पण सम्पूर्ण सम्मेलनाचा हिशोब एका महिन्यात जाहीर केला.
      याउलट गेल्या पाचसहा साहित्य सम्मेलनाचा हिशेबाचा अजुनही पत्ता नाही.

      बे एरियातल्या मराठी मन्डळाला आपले डॉलर खर्च करून फुकटचम्बू बाबुरावाना अमेरिका वारी घडविण्याची हौस
      असेल तर आपण सान्गणारे कोण? फक्त या सम्मेलनातून सरकारी मदत न घेण्याचा पायन्डा पडावा.

      ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांनी केलेल्या उपहासपूर्ण टिपण्णी च्या पार्श्वभुमीवर जर साहित्य संमेलन दक्षिण ध्रुवावर झाले तर कुठला प्रकाशक तिथे जाईल ?
      .
      .
      .
      .
      कोठवळे ... नाही
      .
      .
      .
      .
      परचुरे ... नाही
      .
      .
      .
      .
      मेहता ... नाही
      .
      .
      .
      .
      पॉपुलर ... नाही
      .
      .
      .
      .
      फक्त 'पेंग्विन पब्लिकेशन'
      Lol

      >>> विद्रोही नी सरकार कडून एक पैसाही न घेता लोकान्कडून एक रुपया आणी मुठभर धान्य एवढी देणगी गोळा करून सम्मेलन यशस्वी केलेच

      थोडक्यात काय, हे तथाकथित विद्रोही असोत वा प्रस्थापित, दोघांनाही साहित्य संमेलनात मिरवायची हौस आहे आणि दोघांनीही स्वतःच्या खिशातून एक रूपयाही खर्च न करता लोकांच्या पैशातून चंगळ केली. Lol Lol Lol
      प्रस्थापितांनी सरकारकडून मिळालेली देणगी वापरून जेवणावळी झोडल्या तर या तथाकथित विद्रोह्यांनी वर्गणी गोळा करून व लोकांकडून मिळालेले धान्य विकून पुख्खा झोडला. Wink Wink Wink

      >>> ( हलवायाच्या घरावर तुळशीपत्र म्हणतात ते हेच)
      त्याच दिवशी विदर्भात एका दुर्गम खेड्यात एका गरीब मुलाचा म्रुत्यु झालेली बातमी वाचली.
      कारण काय तर चारशे रुपयाची रेबीज लस सरकारी दवाखान्यात उपलब्ध नव्हती.
      इतकेही कमीच म्हणून महापालिकेकडून थोडीशी वसुली झाली.
      ( लोकाना शुद्ध पाणी काय, पुढेमागे केव्हाही देता येयील. समेलन महत्वाचे)

      "नेमेचि येतो मग पावसाळा" ही उक्ती सार्थ ठरवत ही तथाकथित विद्रोही मंडळी दरवर्षी कांगावा करत असतात.
      या तथाकथित विद्रोहींना साहित्य संमेलनाच्या किरकोळ देणगीचे कुसळ दिसते, परंतु त्यांना, ज्यांची असंख्य स्मारके आणि पुतळे उभे आहेत अशा काहि ठराविक व्यक्तींचे नवीन पुतळे व स्मारके (यातले बहुसंख्य पुतळे या तथाकथित विद्रोही मंडळींच्या लाडक्या व्यक्तींचे आहेत), तथाकथित लोकनेत्यांच्या १० मिनिटांच्या सभेवर केला जाणारा कोट्यावधी रूपयांचा खर्च, एका विशिष्ट वर्गाला धार्मिक प्रवासासाठी दिल्या जाणार्‍या अब्जावधी रूपयांच्या सवलती इ. मुसळे अजिबात दिसत नाहीत.

      माढेकर साहेब,
      विषय कोणताही असो, त्यात हिन्दुत्वाचे तुणतुणे वाजविण्याची आपली किमया प्रशन्सनीय आहे.

      प्रस्थापितांनी सरकारकडून मिळालेली देणगी वापरून जेवणावळी झोडल्या तर या तथाकथित विद्रोह्यांनी वर्गणी गोळा करून व लोकांकडून मिळालेले धान्य विकून पुख्खा झोडला.
      हे धान्य विकले असे तुम्हाल कसे बरे कळले?
      तुम्हीच तर खरेदी केले नाही ना? Happy Happy Happy Happy

      शोनू, लेख सही आहे Happy

        ***
        Insane : When you're crazy and it bothers you.
        Crazy : When you're insane and you like it.

        Pages