यंदाचे साहित्य संमेलन सॅनफ्रान्सिस्को येथे

Submitted by समीर on 23 June, 2008 - 02:29

यंदाचे साहित्य संमेलन सॅनफ्रान्सिस्को येथे घेण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आज पुण्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
या निवडीबद्दल सर्वप्रथम बे एरीया महाराष्ट्र मंडळाचे हार्दिक अभिनंदन.

पण प्रथमच परदेशी साहित्य संमेलन भरवण्याच्या मंडळाच्या निर्णयाबद्दल आपल्याला काय वाटते?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणजे? अजून तुमच्याकडून देणगी मागितली नाही त्यांनी? मागतील, मागतील. तयार ठेवा पैसे.
कदाचित् इकडे न्यू जर्सीत पण येतील त्यांची पत्रे. त्यांना एव्हढा हव्यास आहे असले काहीतरी करायचा, लोकाच्या पैशानी!

पन पानतावणे कशाला अध्यक्ष ?
त्यांचे काय कर्त्रुत्व?

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

टोणगा तुम्हाला 'कर्तृत्व' (kartRutva) म्हणायच आहे ना. Happy

त्यांचे काय कर्त्रुत्व?
---- त्यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे, सोबत मराठी लिहा-वाचायला येते.

ते अस्मितादर्श या नियतकालिकाचे संपादक आहेत. त्यांच्या निवडी बद्दल स्वागताचे शब्द २१ ऑगस्ट च्या सकाळच्या संपादकीयात आले आहेत.
http://esakal.com/esakal/08212008/Sampadakiya83E73329AB.htm

सम्पादक हा साहित्यिक असतोच काय ?? तो तर कट पेष्ट्या !

मग केतकराना का अध्यक्ष करू नये ?

ए. भा. प्र.
Uhoh

(ती पहा सुळे परजून येनारी मंडळी मला दिसताहेत . पानतावणे चालतील पण केतकर नाही . वा: खासा न्याय !!!)---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

लोळूण घ्या!!!

या अधिवेशनाला कुणि जाणार असलात तर माझ्यासाठी एक काम करा. भाषणाचे छापील कागद मला पाठवा. मराठीत केव्हढे इंग्रजी नि हिंदी मिसळून बोलतात, ते सुद्धा मराठीत प्रतिशब्द उपलब्ध नि प्रचलित असताना सुद्धा! हे लोक काय मराठी साठी करणार? त्यापेक्षा सरळ सरळ म्हणा की मराठी मेली, आता हे असेच धेडगुजरी बोलायचे!
काही वाईट नाही त्यात. संस्कृतवरून प्राकृत नि त्यात मग शेकडो वर्षे मुसलमानी नि नंतर इंग्रजी शब्दांची भर पडून मराठी झाली असे म्हणतात. मग ही आजकालची मराठी अशीच!
वाईफच्या डिलिव्हरी साठी नाईन फिफ्टी फाईव्ह ची फास्ट लोकल घेऊन सायन हॉस्पिटलला गेलो!

मराठी ग्लोबल होण्याच्या मार्गावर आहे... Best Luck (शुभेच्छा) द्या. कार्यक्रमाचा काही भाग हा इंग्रजीत असणार आहे (मी या संदर्भात कुठेतरी बातमी वाचली होती), त्याचे भाषांतर (कशासाठी?) मराठीत मिळायला हरकत नसावी.

http://esakal.com/esakal/08282008/Specialnews7508A7C5D6.htm

या बातमीत काश्‍मीरवर डेझर्टेशन! असे शेवटच्या परिच्छेदाचे शीर्षक आहे. मला आधी समजलेच नाही, वाळ्वंट काश्मीर मधे... नंतर बातमी वाचल्यावर लख्ख प्रकाश पडला. जसे आडात आहे तसेच...

मग मुंबईत पाट्या कशाला मराठीत हव्यात? इंग्रजीतच लावा. दुकानदारांना स्वस्त पडेल. जोडाक्षरे नसतात इंग्रजी लिपीत. म्हणजे पाट्या बदलायलाहि सोपे. लिहीणेहि इंग्रजी लिपीतच करा. सोपे पडेल. उगाच transliterators लिहायला नकोत. मग हळू हळू सगळेच इंग्रजीत.
नाहीतरी सगळे संस्कृतवरून सगळे हिंदी, इंग्रजीवर आलोच आहोत. आता पूर्ण इंग्रजी!
मज्जाच मज्जा! एकच भाषा शाळेत.

“ग्लोबल” मराठी चा हा नमुना संयोजकांच्या शब्दात पहा. अशीच जर “ग्लोबल” मराठी संमेलनात वापरली जाणार असेल तर त्याऐवजी इंग्रजी बोललेलं बरं...

http://www.sfsahityasammelan.org/talent.html

पुर्णपणे मराठी भाषेत बोललो तर नावं ठेवतात काहीजणं.

>>>>>> पुर्णपणे मराठी भाषेत बोललो तर नावं ठेवतात काहीजणं.

च्यामारी, हे म्हणजे "एखाद्या सुन्दरीने पुर्णपणे कपडे घातले तर नावं ठेवतात काहीजण" अशा चालीवरच झाल! Proud
...;
आपला, लिम्बुटिम्बु

आताच साइट बघितली संमेलनाची. मराठी संमेलनाच्या साइटवर मराठी, महाराष्ट्र, मराठी साहित्यिक अन साहित्य यांच्याबद्दल इंग्रजीतून वाचून अगदी धन्य झाले! पुढच्या पिढीला मराठी चा इतिहास कळण्या साठी, मराठी बद्दल, महाराष्ट्राबद्दल अभिमान वाटण्यासाठी हे सगळं इंगजीतूनच सांगणं इफेक्टिव्ह नाही का?
साइटची कलात्मकता, निर्मिती मूल्यं वगैरे कुठे बरं सांडली असतील ....

मी पण संमेलनाच्या संयोजकांना लिहीले आहे, की, आजकालच्या मराठी भाषेतील इंग्रजी शब्दांचे प्रमाण पहाता, कदाचित् महाराष्ट्रातील बर्‍याच लोकांना ही ग्लोबल मराठी कळणारच नाही, मग भारतात कशाला संमेलने? परदेशातच घ्या. आणि सगळ्यांचे कामकाज इंग्रजीतूनच चालवा.
अरे हो, हळू हळू सगळेच जुने मराठी शब्द इंग्रजी झाले की मग काय? मराठीची गरजच उरणार नाही. मग त्या भाषेला ग्लोबल मराठी ऐवजी नुसतेच ग्लोबल म्हणायचे. म्हणजे कसे, पूर्वी ज्याला संस्कृत, मग प्राकृत नि नंतर मराठी झाले तसे ग्लोबल. आता काही लोक अजूनहि संस्कृतचा अभ्यास करतात, तसे मराठीचा पण करतील. पण महाराष्ट्रातले लोक नाही करणार!

आध्यश, आध्यशपद, स्विकारुन, आजून, नविन नविन, खुप, सहित्याचे, नकाश्या
असले अशुद्ध मराठी पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या वेबसाइट वर आहे, यालाच ग्लोबल मराठी म्हणायचं का? अर्थात संयोजकांनी आधीच म्हंटलं आहे की जो शुद्ध मराठी बोलतो तो मराठी हा विचार आता जुना झाला आहे.

Pages