यंदाचे साहित्य संमेलन सॅनफ्रान्सिस्को येथे

Submitted by समीर on 23 June, 2008 - 02:29

यंदाचे साहित्य संमेलन सॅनफ्रान्सिस्को येथे घेण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या आज पुण्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
या निवडीबद्दल सर्वप्रथम बे एरीया महाराष्ट्र मंडळाचे हार्दिक अभिनंदन.

पण प्रथमच परदेशी साहित्य संमेलन भरवण्याच्या मंडळाच्या निर्णयाबद्दल आपल्याला काय वाटते?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुलकर्णी,

मी अगदी तुमच्या दुखर्‍या भागावर बोट ठेवले ना? या तथाकथित विद्रोहींची फुकटेगिरी बाहेर काढलेली पाहून तुमच्या अंगाची लाही लाही झालेली दिसत आहे. प्रस्थापितांनी सरकारकडून मदत घेतली, तर या विद्रोही विदूषकांनी लोकांकडून भीक मागितली. या दोघांनीही स्वतःच्या खिशातून एक पैसाही खर्च केलेला दिसत नाही. मग त्यांच्यात फरक काय? शेवटी दोघेही फुकटेच. तुलनेत प्रस्थापित बरे. ते निदान भीक मागून वर काहितरी क्रांतिकारी कृत्य केल्याचा कांगावा तर करत नाहीत!
तुम्ही रेबीजची लस मिळत नाही पण संमेलनाला २५ लाख रू. दिले म्हणून आरडाओरडा केला आहे. या विद्रोही विदूषकांनी मागून आणलेल्या भीकेतून किती मदत गरजूंना केली ते सांगा बरे! त्यांनी पण मिळलेल्या भीकेतून मौजमजाच केली ना? मग तुमचा साहित्य संमेलनालाला दिलेल्या मदतीवर राग का?
तुमच्या दृष्टिने साहित्य संमेलनापेक्षा इतर अनेक महत्वाच्या गोष्टिंना मदत देणे आवश्यक आहे. मी म्हणतो की इतर अनेक फालतू बाबींवर अब्जावधी रू. सरकार मदत म्हणून देते (उदाहरणे वर दिलेली आहेत. ती वाचा. तीच उदाहरणे परत इथे दिली तर तुमच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे होईल. असो. दिवे घ्या.).साहित्य संमेलनाला दिलेले २५ लाख रू. त्यापुढे अगदी किरकोळ आहेत. त्यामुळे त्या इतर फालतू कारणांकरता दिलेली मदत बंद करून मग साहित्य संमेलनाला दिलेल्या देणगीचा विचार केला पाहिजे.
>>> विषय कोणताही असो, त्यात हिन्दुत्वाचे तुणतुणे वाजविण्याची आपली किमया प्रशन्सनीय आहे.
भीक मागून केलेली मौजमजा असो वा किंवा निधर्मी ढोंगीपणा, त्याला उदात्त क्रांतिकारी मुलामा चढविण्याची आपली किमयासुद्धा प्रशसंनीय आहे!

रत्नागिरी मध्ये स्वा. सावरकरानी हिन्दुधर्मातील सर्वाना प्रवेश घेता यावा असे पतित पावन मन्दिर बान्धले. सर्व हिन्दुना एकाच पन्गतीत भोजन वाढण्याचा धाडसी प्रयोग पण केला. ही पन्गत पहाण्याचा योग आलेले सुद्धा परम भाग्यवन्त. या सर्व उदात्त कार्यासाठी त्यानी लोकान्कडून यथाशक्ती मदत पण घेतली. कीर यान्च्यासारख्या उद्योजकाने आपला हातभार लावला. तुमच्या लेखी हा फुकटेपणा आणी पुक्खा झोडणे होते ?

"आठव्या पन्चवार्षिक योजनेतील सन्करीत ज्वारीचे स्थान" या व्याख्यानात मध्येच उठून "मन्दिर वही बनयेन्गे" च्या घोषणा देण्यासारखा हा प्रकार आहे.

>>> या सर्व उदात्त कार्यासाठी त्यानी लोकान्कडून यथाशक्ती मदत पण घेतली.

विद्रोही साहित्य संमेलन म्हणे. या तथाकथित विद्रोहींनी स्वतःच्या खिशातून एक रूपया सुद्धा न काढता लोकांकडून पैसे आणि धान्य गोळा करून म्हणे विद्रोही साहित्य संमेलन आयोजित केले. यात त्यांनी कोणते उदात्त (!) आणि सनाजपयोगी कार्य केले हे सांगा पाहू! लोकांच्या पैशातून नुसती भाषणे ठोकली असतील.
साहित्य संमेलनाच्या २५ लाख रू.च्या देणगीवर टीका करणारे हे विद्रोही, अब्जावधी रू. च्या फालतू उधळपट्टीवर एक अवाक्षर सुद्धा का काढत नाहीत? तुम्ही यावर सोयीस्कर मौन पाळले आहे.
महान क्रांतिकारक वीर सावरकर व हे फुकटचंबू विद्रोही यांच्या कार्याची तुलना करणे म्हणजे सूर्याची आणि काजव्याची तुलना करण्यासारखे आहे.

सर्वेपि सुखिनो सन्तु सर्वे सन्तु निरमयह सर्वे भद्राणि पशन्तु मा कश्चिद दुखमाप्नुयात
कवतिकरावांचे मराठी वाचल्यावर महाराष्ट्रात हे सम्मेलन भरत नाही हे वाचून आनंद जाहला

मला अज्जुक्का यांचे लिखाण आवडले. त्यांनी कुणावरहि कसलेहि आरोप न करता, काही योग्य मुद्दे मांडले आहेत.
इतर बर्‍याच जणांचे असे मत दिसते की दुसर्‍याच्या पैशानी चैन करायला हे सगळे चालले आहे! याचे कारण, त्यांना प्रत्यक्ष या संमेलन भरवणार्‍यांबद्दल काही माहिती आहे की उगीच आपला कयास, हे कळत नाही.
त्या दृष्टीने विजय कुलकर्णि यांनी मांडलेला मुद्दा लक्षात घ्या. सावरकर करत असलेल्या कार्याबद्दल, कदाचित् काही कर्मठ ब्राह्मण सोडून, सर्वांचे चांगले मत होते. शिवाय ते कर्मठ ब्राह्मण देखील खुद्द सावरकरांबद्दल आदर बाळगून होते. म्हणून त्याबद्दल असे कुणि आक्षेप घेतले नाहीत, उलट त्या कार्याची प्रशंसा होते.

बिचारे साहित्य संमेलनवाले. त्यांच्या संमेलनाबद्दल कुणाला काही सुख दु:ख नाही, नि त्या लोकांबद्दल कुणालाहि फारसा आदर नाही. म्हणून मग त्यांच्यावर टीका होते. ह्या प्रकारे केलेले वादविवाद विशेष उपयोगी होत नाहीत.
जर अज्जुक्का यांना त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली(?!) तर त्यांचे नाही तरी त्यांच्यासारखे वाटणार्‍यांचे तरी मत बदलेल अशी शंका आहे.

नाहीतर आहेच भारतीय राजकारण्यांचा आदर्श आपल्यासमोर!! केवळ विरोध म्हणून विरोध. त्या अणूकराराला विरोध करणार्‍यांपैकी किंवा पाठिंबा देणार्‍यांपैकी सुद्धा कित्येकांना काही कळते का? कुणि नीट वाचले आहे का?

>>मला अज्जुक्का यांचे लिखाण आवडले.<<
मी स्वप्नात तर नाही ना? Happy
असो... उपस्थित केलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे इथेच काय मेडिया, वर्तमानपत्रे यात चाललेल्या कुठल्याही उहापोहात मिळत नाहीयेत..
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

मला वाटते सान होजेच्या साहित्य संमेलनात भारतातून आलेले सर्वजण इंग्रजीतूनच बोलतील, कारण कुणि अमेरिकन आले असतील तर त्यांना कळायला पाहिजे ना? आणि खुद्द देवकुळे यांनी सांगितले आहे की अस्खलित मराठी बोलणे हे मराठी असल्याचे लक्षण नाही! तेंव्हा आता yes, yes i am knowing marathi. u no, there are nine crore peoples and for hundreds of years they are using marathi only. अशा प्रकारे बोलून हे साहित्य संमेलन साजरे होईल.

झक्की बरोबर आहे आता आय नो मराठीच सगळीकडे होनार.

परवा शिकागोतील काही मराठी अभिनेते ( नाट्य व सिने) आणि निर्माते यांची मिटींग होती. गंमत म्हणजे येथील एका मान्यवर, थोर व्यक्तीने असा प्रस्ताव मांडला की ही नाट्य चळवळ मराठी न राहाता येथील मराठी लोकांच्या मुलांना त्या नाटकांतुन काम करन्यास वाव मिळावा म्हणुन काही नाटक ईंग्रजीतच बसवावी. मराठी भाषा ही मराठी असन्याची ओळख ठेवु नये कारण ग्लोबलायझेशनच्या जमान्यात भाषेला काही महत्व नसते.

त्यांचे वय व मान पाहुन मी सौम्य शब्दात त्यांचाशी वाद घातला, पण त्यांचे म्हणने असे होते की मराठी भाषेत मराठी माणसाने अडकुन पडायला नाही पाहीजे. घ्या आता. पुढचे संमेलन शिकागोला होनार यात काही वाद नाही.

नाट्य चळवळ मराठी न राहाता येथील मराठी लोकांच्या मुलांना त्या नाटकांतुन काम करन्यास वाव मिळावा म्हणुन काही नाटक ईंग्रजीतच बसवावी.
----खुप छान विचार मांडलेत त्या महाभागांनी, पण मग फक्त मराठी लोकांच्याच मुलांना काम करण्यास वाव हा $ ग्लोबलायझेशन $ च्या जमान्यात संकुचीत विचार कां?

मराठी साहित्य संमेलनाची सफल उद्दिष्टे आणि त्यातून उद्भवलेले वादंग यापैकी कशाची संख्या जास्त आहे हे सांगणे कठीण आहे. क्षणभर धरून चालू की मराठी साहित्य संमेलन ही एक आवश्यक गोष्ट आहे आणि ते झालं पाहिजे. आता अमेरिकेकडे जे जगाचं अनभिषिक्त नेतॄत्व आहे (आहे!) त्यामुळे अमेरिकेपर्यन्त कुठलीही गोष्ट पोचली की यशाची परमसीमा झाली असं बरयाच लोकांना वाटत असतं. उदा. NYSE वर आपली कंपनी लिस्ट होणं, अमेरिकेत आपल्या कंपनीचं उत्पादन यशस्वी होणं इ. त्यामुळे बरीच लोकं हा निकष सरसकट सगळ्या गोष्टींना लावू पहातात. जसं काहीजणं तिथल्या मराठी मंडळात/लोकांच्या घरी कीर्तन वगैरे कार्यक्रम करतात आणि भारतात परत येउन स्थानिक वर्तमानपत्रात "अमेरिका गाजवून आल्याची" जंगी जाहिरात देतात. आता एखाद्या भाबड्या जिवाला असं वाटू शकेल की आता तिथले मजूर देखील बांधकामावर जाताना i-pod च्या गुंड्या कानात घालून कीर्तनाच्या तालावर डुलत डुलत जात असतील पण बहुतेकाना जाहिरातीतील मजकुराची किंमत माहीत असते (देवकुळेंच्या निवेदनातील सण, "Long Term" अशा मुद्यांबद्दल काही वेगळं बोलायला नको). जसा काही मराठी लेखकांना, त्यांच्या पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर हा एक उच्च मानबिन्दू वाटतो तसंच काहीसं हे असेल कदाचित. अहो, स्वातंत्र्यदिनाच्या आसपासच्या वीक-एण्डला शहरातील शांत रस्त्यावरून तिरंग्याबरोबर हळूच भगवाही "फ्लोट" करून त्याबद्दल छाती फुगवून डिंग्या मारणारे लोकसुद्धा असतातच!

कौस्तुभ तुमचे लिखाण वाचले. तुम्ही पुण्याचेच असणार!
"देवकुळेंच्या निवेदनातील सण," "हळूच भगवाही "फ्लोट" करून त्याबद्दल छाती फुगवून डिंग्या मारणारे लोकसुद्धा असतातच!"
अहो, हळूच नाही, चांगला उघड उघड भगवा मिरवला! आणि या सगळे गोष्टी आम्ही इथे करतो त्या 'डिंग्या' मारायला करतो म्हणून कोण सांगतो? आम्हाला जे वाटते ते आम्ही करतो.

भारतातले लोक इथे येऊन परत गेल्यावर काय म्हणतात, किंवा करतात याबद्दल आम्हाला काहीहि देणे घेणे नाही. काही असते तर इकडे राहिलोच नसतो! तिथेच येऊन 'डिंग्या' मारल्या असत्या. हे असले लोकांना दाखवण्यासाठी काही करायची सवय, भारतीयांचीच, विशेषतः तुमच्या गावच्या लोकांचीच फक्त. इथे येऊन ती सवय सुटते. मग ज्यांना खरेच गणपति, दिवाळी कराविशी वाटते ते न्यू जर्सीत अक्षरशः हजारोंच्या संख्येने येतात. त्याबद्दल भारतात कोण काय म्हणतात याची कुणाला पर्वा? आणि काही शेकडो जण येतहि नाहीत. त्याची तरी कुणाला उठाठेव? फक्त तुमच्यासारख्यांना. जे गेले त्यांना म्हणायचे डिंग्या मारायला गेले, नि जे नाही गेले त्यांना म्हणायचे 'बाटले', 'India ला विसरले' वगैरे. (त्यात सुद्धा 'भारताला' नाही, 'India' ला!). एकूण काय नुसता असंतुष्ट आत्मा!

ते साहित्य संमेलन इथे झाले तर वर अज्जुक्का यांनी लिहिलेले काही तोटे आहेत, पण त्यांचा विचार साहित्य संमेलन भरवणार्‍या लोकांनी नि भारतातलल्या लोकांनी करावा ना!
आम्ही बोलावले, तुम्ही आलात तर आम्हाला आनंदच होईल, त्यात डिंग्या मारण्यासारखे आम्हाला तरी काही वाटत नाही. आम्ही बर्‍याच भारतीयांना इथे बोलावतो, नि आशा भोसले यांच्यासारख्यांना प्रचंड रक्कमहि देतो. लता मंगेशकरांकडून निंदा ऐकतो. त्यात 'डिंग्या' मारण्यासारखे काही नाही. मुळातच फुकट अमेरिका यात्रा घडत असेल, तर कुठलाहि भारतीय अमेरिकेला यायला तयार होईल! (अपवादः जे पूर्वी अमेरिकेला येऊन गेलेले आहेत, त्यातल्या शहाण्या लोकांचा.)

सध्या भारतातल्या लोकांनी संमेलनाला विरोध करणे त्यांच्या फायद्याचे नाही. त्या ऐवजी जर जोरात आवाज उठवून पाठिंबा दिला तर त्या लोकांना पण कदाचित् फुकट अमेरिकेची वारी घडेल, हे व्यवहारज्ञान भारतातल्या कुठल्याहि गृहिणीला असेल. तेंव्हा जरा चाल बदला. सगळेच विरोध करत असतील तर आपण त्याची बाजू घ्यायची हे तुमच्या गावच्या लोकांचे वैशिष्ठ्य आहे. त्यात तुमचाहि फायदाच आहे. फुक्कट अमेरिका!

जसं काहीजणं तिथल्या मराठी मंडळात/लोकांच्या घरी कीर्तन वगैरे कार्यक्रम करतात आणि भारतात परत येउन स्थानिक वर्तमानपत्रात "अमेरिका गाजवून आल्याची" जंगी जाहिरात देतात. >>> अगदी अगदी!!

अहो, त्यांच्या दृष्टीने अमेरिका म्हणजे अमेरिकेतील चार मराठी मंडळी!
बाकी केदार नि उदय, त्यात आश्चर्य काय? आत्ताहि मराठी बोलणारे, मराठी, कितीतरी हिंदी हित्रपटात काम करून पुढे आलेले आहेत नि येतहि आहेत. शिवाय आजकाल तर काय, मराठी असो, हिंदी असो, इकडल्या हिंदी, मराठी न कळणार्‍या अमेरिकनांना सुद्धा समजेल इतक्या मोठ्या प्रमाणात त्यात इंग्रजीचा भरणा असतो. म्हणजे globalization भारतात राहूनच चांगले झाले आहे.
अडचण एकच. अट्टाहासाने त्या चित्रपटातील संवादांचे इंग्रजी(?!)त भाषांतर करतात, त्याने जरा गोंधळ होतो. म्हणजे काय की 'बाई मी विकत घेतला श्याम' गाण्याचे भाषांतर केले होते - I purchased a black slave from Nanda's house. That slave had worked in many places, in different places, he took different names वगैरे वगैरे. 'So, you too had slavery in India, eh?...'
हा भाषांतराचा मुद्दा आठवण्याचे कारण की आजकाल कुठल्याहि भारतीय भाषेतील कार्यक्रमांचे इंग्रजी भाषांतर करून ते प्रेक्षकांना दिल्या जाते. उद्या जर या मराठी लेखक नि कवि यांनी लिहीलेल्या गोष्टी नि कविता यांचे 'असेच' भाषांतर केले तर मराठी साहित्याबद्दल लोकांचे काय मत होईल?

अमेरिकास्थित भारतीयांचं भारतीयपण किती नी कसं हे चर्चेला का घेतलं जातंय सतत ह्या संमेलनाच्या मुद्द्याला धरून हे अनाकलनीय आहे.
गंमत म्हणजे देवकुळे ही तीच तबकडी वाजवतायत.
तुम्ही तुमच्या मते 'गुड इनफ' भारतीय/ मराठी आहात ना मनापासून मग समर्थनं कसली देताय?

संमेलन नक्की कुणाकुणासाठी असतं आणि कशाकशासाठी असतं (याठिकाणी टेबलाखालचे उद्देश चर्चेसाठी म्हणून बाजूला ठेवूया!!) याचा विचार केल्यावरच हे संमेलन कुठे असायला हवे याची उत्तरे मिळणार आहेत.

कॉलेजच्या वयात एकदोन संमेलनांना हजेरी लावली होती. आई तिच्या मैत्रिणींबरोबर रजा काढून दरवर्षी जायची. त्यामुळे थोडासा एक आपला अंदाज आहे तो मांडतेय.

सामान्य माणूस संमेलनाला कशासाठी जातो?
१. आपला आवडता साहित्यिक याची देही याची डोळा बघायला ऐकायला मिळावा.
२. साहित्यिक वातावरणात रमायला मिळावं.
३. चारदोन चर्चा ऐकून थोडीशी आपल्याही विचाराला चालना मिळावी वा किमानपक्षी तशी भावना तरी निर्माण व्हावी.
४. नवीन काही ऐकायला मिळावे.
५. एरवी मुद्दामून पुस्तकांची खरेदी केली जात नाही वा पुस्तके बघितली जात नाहीत ती एकगठ्ठा इथे बघायला मिळतात आणि संग्रहात घेतली जातात. नाहीतर निदान नवीन काय आलंय बाजारात आणि कुठलं किती लोकप्रिय आहे हे तरी कळतं.
६. आपल्यासारखेच अनेक साहित्यरसिक भेटतात आणि त्यातून बर्‍याच विचारांचं आदानप्रदान होऊ शकतं.
७. माणसाला उत्सव/ सोहळा आवडतो मग भले तो मराठी माणूस असेल नाहीतर अजून कोणी..

ही काही ठळक कारणे. आता या कारणांसाठीच अमेरिकास्थित भारतीयांना वाटले की असावे बाबा हे संमेलन आपल्याकडे तर त्यात त्यांची काही चूक नाही.

आता हे वरचे उद्देश सफल होतात का सामान्य माणसासाठी? तर बर्‍याच अंशी होतात. सगळ्या साहित्यरसिकांमधे संचारलेल्या उत्साहाची लागण आपण गेलो तर आपल्यालाही होते आणि पुढचे बरेच दिवस त्यात आपण रंगून जाऊ शकतो. ते छान होतं पासून ते किती वाईट होतं इथपर्यंत सर्व...

आता साहित्य संमेलन भरवणारे काय उद्देशाने भरवतात ह्याचा थोडा विचार केला तर.. अपेक्षित उद्देश.. (टेबलाखालचे उद्देश चर्चेसाठी बाजूला ठेवू!)
१. विचारांचे आदानप्रदान आणि घुसळण
२. मोठ्या साहित्यिकांचा गौरव
३. नवोदितांना व्यासपीठ
४. प्रकाशकांचे स्टॉल्स, देणगी प्रवेशिका इत्यादींमधून संस्थेला होणारी थोडीफार मिळकत. ज्यातून मराठी पुस्तके जतन करणे, नवीन लेखकांना प्रोत्साहन देणे यासारख्या गोष्टी करता येतात.
५. मराठी पुस्तकांचा खप.
६. ज्या ठिकाणी फारसे साहित्यिक वातावरण नाही त्या ठिकाणच्या माणसालाही वंचित न ठेवणे..

आता हे घडतं का? तर हो काही प्रमाणात(च) घडतं.

मग आता हे संमेलन अमेरिकेत घेण्याने काय होणार? किंवा काय बदलणार?
१.सामान्य माणूस नाकारला जाणार ज्याच्या बळावर, जीवावर साहित्याचा सगळा डोलारा उभा आहे.
२.सुस्थितीत असलेला मध्यमवर्गसुद्धा संमेलनासाठी अमेरिकावारी करू शकणार नाही.
३.विंदांच्यासारखे झळझळीत कर्तुत्वाचे लोक सोडले तर मध्यम लेखक व नवोदीत हे सर्व बाजूला सारले जाणार.

अमेरिकास्थित/ परदेशस्थ मध्यम लेखक व नवोदित ही संख्या एकूणात मराठीतील मध्यम लेखक व नवोदित यांच्या मानाने नगण्य आहे. परत यातले बहुतांश लोक तिथे उत्तम नोकरीधंद्यासाठी आहेत. लेखन हा केवळ छंदाचा भाग आहे, उदरनिर्वाहाचा नाही त्यामुळे कदाचित त्यातले अनेक जण भारतातल्या संमेलनाला हजेरी लावण्याचा विचार तरी करू शकतात. जे उलटे होण्याची शक्यता खूपच कमी...

कोण किती पैसे खाणार?
कोण कुणाची वर्णी लावणार?
कितीजणांना फुकट अमेरिकावारी मिळणार?
इत्यादी प्रश्न तर आहेतच पण ते सगळं अगदी पारदर्शकरित्या झालं तरी (स्वप्न बघायला काय हरकत आहे?) सामान्य रसिक, मध्यम व नवोदित लेखक हे वंचितच रहाणार. आणि आक्षेप तिथेच आहे वा असायला हवा.

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

अज्जुका,
एकदम बरोबर..
मात्र इथे भारतातही गेल्या काही वर्षांत आपण लिहिलेले व अपेक्षित असलेले उद्देश फारसे सफल झालेले दिसत नाहीत..
पण तरीही राजकारण्यांच्या आणि भोजनभाऊंच्या गर्दीत मुठभर रसिकांचे समाधान झाले तरी पुरे.. अमेरिकेत हे होणे नाही..

वा झक्की! तुम्ही झटकन व्यक्तिगत पातळीवर आलात. शिवाय तुम्ही झटकन शिक्केही मारता. आणि माझ्या लिखाणातला मुख्य मुद्दाही झटकन डावललात - तो हा की लोकांना तिथे संमेलन का करावसं वाटतं. मुळात मी पुण्याचा नव्हे. आणि याचा अर्थ असा नव्हे की मला स्वतःला पुणेकर म्हणवून घेण्यात कमीपणा वाटतो. मी ८-९ वर्षे अमेरिकेत होतो आणि काही काही गोष्टी जवळून बघायची सन्धी मला मिळाली म्हणून लिहिलं. (Madison Avenue वरच्या परेडही बघितल्या). आणि अजूनही कामानिमित्ताने येऊन जाऊन असतो. तेव्हा तुम्हीही हे व्यक्तिगत पातळीवरून घेऊन मनस्ताप करून घेऊ नका, please?

btw - "... आम्ही बर्‍याच भारतीयांना इथे बोलावतो, नि आशा भोसले यांच्यासारख्यांना प्रचंड रक्कमहि देतो ... " - या डिंग्या/फुशारक्या नसाव्यात! Happy

अज्जुका, अनुमोदन. सुरेख विवेचन केलंस.
कौस्तुभ, त्यांना तो 'डिंग्या मारण्याचा' मुद्दा वर्मी लागलेला दिसतो. तो का वर्मी लागला, त्यावरून तावातावाने बचावयुक्त समर्थनही करावेसे का वाटले (त्यांना संशयाचा फायदा देण्यासाठी 'आशा भोसले वगैरे वगैरे' याला आपण डिंग्या न मानता 'सोदाहरण बचाव' असे मानू) हे विचार करण्यासारखे आहे...म्हणजे आपणच, त्यांनी विचार केला असता तर काय... (परत आव मात्र असा की आम्हाला पर्वा नाही.) मानसिकतेचे हे विश्लेषणसुद्धा काही उत्तरांकडे घेऊन जाईल. तेव्हा जर काही कटू सत्ये आढळली तर ती स्विकारण्याची तयारीसुद्धा पाहिजे.
शेवटी, काही जण डिंग्या मारतात, काहीजण मारत नाहीत हे सुज्ञपणाने समजून घेणे महत्वाचे (पुण्यात शिकण्यासाठी राहिल्यामुळे तो सूज्ञपणा 'शिकायचा' राहून गेला असा एक बचाव असण्याची शक्यता आहे.)

    ***
    Twinkle twinkle little star
    I don't wonder what you are
    Studying your spectrum, ignorance I've none
    You're not a diamond, you're just hydrogen.

    सर्व साहित्य प्रेमींना व्हिसा मिळेल कां? व्हिसाची चर्चा कुणिच येथे केलेली नाही, ते गृहीत धरले आहे कां? मला (J1/J2, B1/B2) नेहेमी १-३ महिने लागतात (काहींना ६ महीने पण लागतात, TOI मधे लेख पण आला होता या विलंबा बाबत), बरेच कागदी घोडे आणि प्रत्यक्ष मुलाखतीला जावे लागते, तो मिळेलच याची काहीच शाष्वती नसते.

    नुसते मंडळाचे आमंत्रण पत्र असुन चालत नाही. अर्थात हा Q (साहित्तीकांसाठी) व्हिसा सहज मिळत असावा किवा त्यांच्यासाठी शिथीलता असेल. गायक असेल तर त्याला क्वचित गायला पण लावतात, आता काही साहित्तीकांना लिहायला/ वाचायला Happy देतील बहुधा...

    कौस्तुभ तुमचे दुसरे पत्र व स्लर्ति यांचे बरोबर आहे.
    बाकी सगळे नुसते नसते आरोप प्रत्यारोप, रेबीजची लस नि साहित्य संमेलन, डिन्ग्या मारणे नि साहित्य संमेलन असे काही पण भरकटत जातात, मग मी पण हात धुवून घेतो. बाकी माझ्या लिखाणाला काही फारसा अर्थ नसतो. खरे तर मायबोलीवर लिहून परिस्थितीत काही फरक पडला असे ऐकीवात नाही. तेंव्हा जेंव्हा जेंव्हा लोक अत्यंत गंभीर चर्चेचा आव आणून मग काही भरकटत जातात, तेंव्हा मला पण सुरसुरी येते, नि ते सर्व किती निरर्थक आहे हे पाहून मजा वाटते.

    खरे तर येथील सर्व पत्रातून मला फक्त एक दोनच पत्रे आवडली.
    मला आशा आहे की त्या लोकांनी आपली पत्रे सम्मेलनाच्या संयोजकांकडे अधिकृत रीत्या पाठवली असतील.

    आता नाट्यसंमेलन इंग्लंडमधे होणार असे वाचले. त्यावरहि अशीच चर्चा करू!! मज्जा न् काय!!

    झक्की, तुम्ही झक्क बोललात! मी अजून इथे (हितगुजवर) नवीन असल्यामुळे येथील स्पंदने आणि त्यांची माझ्या मनात पडणारी टिपरी यात थोडं अंतर आहे. साहित्य संमेलन हा तसाही काही माझ्या फार जिव्हाळ्याचा विषय नव्हे. सत्यकथेचा एक अंक ढीगभर साहित्य संमेलनांपेक्षा जास्त अब्रूदार असेल. साहित्य संमेलनांचा थोडा जरी खर्च सत्यकथेला मिळता तर माझ्यासारख्या बर्‍याचजणांच्या पदरी सत्यकथेचा ताजा अंक पाहण्याचं भाग्य लाभतं. असो.

    येथील स्पंदने आणि त्यांची माझ्या मनात पडणारी टिपरी

    वा, वा. फारच छान वाक्य. वरील शब्द नक्कीच मनाला भिडले. तुम्हाला काय म्हणायचे ते तुम्ही फारच अलंकारिक रीत्या लिहीले आहे. असे तुम्ही नेहेमी लिहीत असाल, तर तुम्हाला अमेरिकेतच काय, कुठेहि साहित्य संमेलनाला आवर्जून बोलावले पाहिजे! आणि तुम्ही काय म्हणता त्याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे.

    तर वर स्लार्टि, उदय, विजय कुलकर्णि, अज्जुक्का इ. नी लिहिलेले मुद्दे संकलित करून कुणि मराठी साहित्य संमेलनाच्या भारतातील संयोजकांकडे (देवकुळे यांच्याकडे नव्हे), पाठवतील काय?

    बे एरीयाचे दीपक करंजीकर यांनी ललित मध्ये लिहिलेला "वाचा आणि स्वस्थ बसा" हा लेख वाचला का?

    संमेलन "वाट हवी मज वळणांची" या आविर्भावात पुढे सरकतय Happy !!

    अहो, ऐकलत का? इथे सान होजेला होणारे संमेलन 'विश्व' मराठी साहित्य संमेलन आहे. त्यामुळे या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे संमेलन या वर्षी होणार नाही.
    हे विधान दस्तुरखुद्द कौतिकराव ढोले यांनीच केले आहे. अशा रीतिने 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमेरिकेत का', हा मुद्दा मुळापासून उखडून टाकण्यात आला आहे. कौतिकराव यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच.
    थोडक्यात पुढची 'विश्व' मराठी साहित्य संमेलने सुद्धा पॅरिस, जपान, ऑस्ट्रेलिया इ. ठिकाणी करण्याची सोय झालेली आहे. अशी संमेलने मात्र भारतात होणार नाहीत. भारतात आजकाल कोण मराठी बोलतात? लिहीतात? फक्त परदेशातच तर मराठी साहित्य होते!

    विश्व संम्मेलन हे नामकरण मला आवडले. आता हे "प्रथम विश्वसंम्मेलन" ठरणार आहे असे दिसते. संमेलनाचा काही भाग इंग्रजीत सादर होणार आहे (मान्यवर अमेरिकन साहित्तिक आमंत्रित असतील) असे खालील लिंक मधे श्री. ठाणेदार म्हणतात.

    http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/articleshow/3311839.cms

    वरची चर्चा मी वाचली. छान वाटलं. दरवर्षी भारतात होणारे सा. स. मायबोलिवर कधीच चर्चीले गेले नाही. ते कुठे झाले, अध्यक्ष कोण होते, कुठल्या पुस्तकाला/लेखकाला बक्षिस मिळाले ह्याची देखील नोंद घेतली गेलेली नव्हती. ही चर्चा वाचून अपार आनंद झाला.

    मी खूप पुर्वी एक प्रतिक्रिया ऐकली होती की देशात जे साहित्य सम्मेलन होत असतात तिथे प्रचंड गर्दी असते आणि खाली बसून भाषण ऐकायला देखील सरकारनी व्यवस्था केलेली नसते. कविता वाचनाच्या कार्यक्रमाला धड माईक नसतात. सावली मिळावी म्हणून नीट मंडप नसतात. जी पुस्तकं विकत मिळत नाहीत, अर्थात जी out of print झालेली असतात, ती पुस्तक विकायला ठेवलेली नसतात, अध्यक्षांचे भाषणही सुमार असते, बहुतेक लेखक वर्ग अनुपस्थीत असतो.

    त्यामुळे सा. स. हे अमेरिकेत काय किंवा देशात काय, ते कुठेही झाले तरी चांगले होणे मला जास्त महत्त्वाचे वाटते. देशात सा.स. झाले म्हणजे ते चांगलेच होईल असे नाही. एक प्रयोग म्हणून जर यंदा अमेरिकेत सा. स. होत असेल तर माझ्याकडून ह्या सा. स. लक्ष लक्ष शुभेच्छा!

    वर विजा बद्दल वाक्य वाचले. खरे आहे ते.. पण ज्यांनी हा निर्णय घेतला त्यांनीही ह्या गोष्टीचा विचार केलेला असेल.

    1. साधी बसायची सोय नाही, सावली मिळावी म्हणुन नीट मंडप नाही, माईक चालत नसतात... ही यादी खुप लांब होईल. अशा अत्यंत प्रतिकुल परिस्थीतीत आपण ८१ संम्मेलने (यशस्वी?) सादर केलीत ही अभिमानाची बाब आहे, याचे संपुर्ण श्रेय मराठी साहित्य रसिक माणसाला. पण जर हजेरी लावणार्‍या रसिकांची संख्या बघीतली तर या सर्व सोई पुरवणे हे एक दिव्य आव्हानच ठरेल, सरकार थोडीफार मदत करतेच पण ती पुरेसी नसावी.
    2. भारतातील संम्मेलनास बसायला गुबगुबीत खुर्च्या नसतील, संम्मेलन वातानुकुलीत खोलीतही नसेल, ध्वनी व्यावस्था गलथान असेल, जेवणाची सोय.... पण साहित्य रसिक हा सर्वात महत्वाचा घटक आहे, तो पुर्णार्थाने हजर असतो, आणि हेच महत्वाचे आहे. माझे दु:ख Sad ह्या फार मोठ्या वर्गाला साहित्य संम्मेलनाला मुकावे लागेल याचे आहे. भारतातील संम्मेलनास बाहेर देशीच्या (अमेरिकन) मराठी रसिकांस हजर रहाणे सहज शक्य आहे...
    3. साहित्य संम्मेलन कुठेही झाले तरी माझ्या एक मराठी माणुस म्हणुन शुभेच्छा आहेत. जी हजारो मराठी रसिकांची हजर न रहाता येण्याबद्दलची निराशा होईल ती कमीत-कमी कशी होईल हे आयोजकांनी आवर्जुन पहावे. त्यांना शरिराने नाही पण दृक-श्राव्य माध्यमाने पोहोचता आले तर तेव्हढीच दुधाची तहान ताकावर.

    समीर- (कालानुरुप) शीर्षक बदलायला हवे असे नाही वाटत? आता हे 'यंदाचे' नाही तर 'पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन' आहे. डॉ. गंगाधर पानतावणे यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे.

    http://esakal.com/esakal/08202008/SpecialnewsF095B74FA4.htm

    ह्या इ-सकाळ च्या बातमीत काहितरी चूक असणार. १०६० लोकांचा प्रत्येकी ८०,००० रुपये खर्च जर महाराष्ट्र मंडळ बे एरिया करणार असेल तर लागणारे जवळ जवळ १.९ मिलियन डॉलर ते कुठून आणणार आहेत?

    Pages