गाणी मनातली (आवडलेली मराठी गाणी)

Submitted by जिप्सी on 10 June, 2010 - 23:38

मराठी संगीत भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजले आहेत.
गीतकारांचे अर्थवाही शब्द, संगीतकारांनी बांधलेली सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी, अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये आहे.
इथे आपण आपल्याला आवडलेल्या मराठी भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत, लोकगीत, लावणी इ. गाण्यांची चर्चा करुया. यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाळासाहेब स्वत:च्याच चाली फार वेळा चोरतात नै >>>>:-) "जांभूळ पिकल्या झाडाखाली....(जैत रे जैत)" गाण्याची चालसुद्धा "होली आयी होली आयी देखो होली आयी रे...(मशाल)" या गाण्याला आहे ना. Happy

तेच तर.
पण तशी वेगळीही उदाहरणे आहेत.

सुहास्य तूझे या दिनानाथांच्या गाण्याची चालीची छाप, मी मज हरपून बसले ला आहे. अर्थात सुहास्यची चाल त्यांची नाही.

लेकिनमधल्या, झुठे नैना बोले ची चाल ( खरं तर तो राग, बिलासखानी तोडी ) लावणी झाली गं रागिणी मधल्या, बिताई रतिया किनु संग ( मन्ना डे आणि सुलक्षणा पंडीत ) या गाण्याला वापरलीय. लावणी.... चे संगीत त्यांचे नव्हते बहुदा.

लताच्या, गजानना श्री गणराया वर लताच्याच मै पिया तेरी ( बसंत बहार ) या गाण्याची छाप आहे.

आणखी एक वेगळे उदाहरण.. आशाच्या नन्हासा दिल मेरा मचल मचल जाये वर जुने गाणे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले... ची छाया आहे.

भरकटलो मी Happy

अरे वाह. दिनेशदा मस्तच Happy

मी आता "झुकती घटा, गाती हवा, सपने जगाए......पंचमीचा सण आला डोळे माझे ओले" असं काहिसं गुणगुणतोय. Proud

अरे हो की!! दोन्हीची चाल किती एकसारखी आहे!

दिनेशदा.. भरकटलात कुठे.. माहिती मिळाली की छान!

आवडेल असे वाचायला Happy

न मानोगे(गो?) तो दूंगी तोहे गारी रे
अंग भिजवले माझे माझी ओढली शेलारी रे
: निवडुंगमधलं गाणं (एक ओळ हिंदीत पुढची मराठीत असे अख्खे गाणे आहे

हीच चाल
आले रे गणपती आज दारी रे

राधा मंगेशकरने बालपणी गायलेले गाणे. ते लताच्या आवडीच्या गाण्यांतही जाऊन बसले.

राग धरून रचना केली तर असे होतेच...
कर्नाटकी राग हंसध्वनी वर बेतलेल्या अनेक रचना सारख्या वाटतात

वातामि गणपति ( मूळ रचना )
दाता तू गणपति गजानन ( लता )
लागी लगन पति के संग ( उस्ताद अमीर खाँ )
बलमा न जा घर सौतन के ( कंकणा बॅनर्जी )
जा तोसे नही बोलू कन्हैया ( लता, मन्ना डे )
आली हासत पहिली रात ( लता )

"तांबडी माती" या चित्रपटातील

"जा जा, रानीच्या पाखरा, तू जा, रं, भरारा" या गाण्यात

माझ्या खुशालीचा सांगावा दे माउलीला
पड पाया तिच्या सांग येती याद मला
सांग येती याद मला..
तुला भेटाया जीव हुतो माझा घाबरा

यात "याद" हा हिंदीतला शब्द वापरलाय, पण मस्त वाटतो ऐकायला Happy अजुन अशी काही "जुनी" गाणी आहे का?

याच चित्रपटातील शोभा गुर्टु (बहुतेक) यांनी गायलेलं "नजरीया लागे नही कही और..." हे सुरेख हिंदी गाणं आहे.

लक्ष्मी.... ओ रसिया एकदाच ऐकले होते.. आता हे साम्य लक्षात आले.

०००००००००

सख्या सजणा चित्रपटात, लताची लावणी आहे..

त्यात असे शब्द आहेत,

गत करु काई, कळं ना गं बाई
सजण शिपाई, परदेसी बाई गं

००००००००००

हि दोन गाणी मी त्या दोन कलाकारांकडून प्रत्यक्ष ऐकली होती. कुणी ऐकली आहेत का ?

येतो रे येतो, सवतीचा गंध तूझ्या वसनास
मणिबंधावर कुणी बांधला, सैल किती हा गजरा
सराईत हा हात दिसेना... येतो रे येतो..

हे गाणे बहुतेक खानोलकरांचे आहे. किर्ती शिलेदारच्या तोंडून ऐकले होते. बहुतेक नाटकातलेच असणार.

दुसरे

बाई बाई बाई, नोकरी कसली ही
ही तर डोक्यावर टांगती तलवार
आता तुम्हीच सांगा, आहेत कि नाहित
इथली पोरटी एकापेक्षा एक तालेवार

हे गाणे मी आशा खाडीलकर कडून ऐकलेय. दोन्ही कलाकारांच्या नेहमीच्या गाण्यांपेक्षा अगदी वेगळी गाणी
ही रेकॉर्ड झालीही नाहीत बहुतेक.

करम की गति न्यारी = उद्धवा अजब तुझे सरकार>>
नाही नाही..
बहुतेक रामदास कामतांनी गायिलेलं 'दैव किती अविचारी' हे गाणं 'करम की गति न्यारी' चं मराठी रूप आहे.

धन्यवाद दिनेशदा. Happy

२-३ दिवसांपूर्वी एफएम गोल्डवर अभिनेत्री "रेहाना सुलतानची" गाणी ऐकवत होते. (दस्तक, चेतना इ. चित्रपटातील) त्यात माहिती सांगताना "प्रेमपर्बत" (कि पर्वत?) या चित्रपटाचा उल्लेख आला होता. "दस्तक" मधली सगळीच गाणी अप्रतिम आहे ("बैय्या ना धरो बलमा", "हम है मताए कुचाओ" आणि "मायी रे मै कासे कहु" इ.) पण त्यागाण्यांचे पडद्यावरचे चित्रीकरण (मला) तितकंस नाही आवडलं (कदाचित चित्रपटाच्या कथेची तशी गरज असेल). "प्रेमपर्बत" चित्रपटातील जयदेव यांचे संगीत असलेले लता मंगेशकरने गायलेल "ये दिल और उनकी निगाहोंके साये, मुझे घेरे लेते है बाहोंके साये" हे माझं अत्यंत आवडतं गाणं. पण याचा व्हिडियो अजुन बघितला नाही. (चित्रपटाची डिव्हीडी शोधतोय पण सापडत नाहीए Sad ). गुगलवर अधिक शोधलं असता या चित्रपटात "हेमा मालिनी"सुद्धा आहे.

तर "ये दिल और उनके...." हे गाणं नक्की कोणावर चित्रीत झालं आहे? रेहाना सुलतान कि हेमा मालिनी?

विकिवर हे मिळालं Sad
"According to films director, Ved Rahi the print of the film got destroyed over time, and is now unable to be viewed."

मला तर आशा परेख व धर्मेंद्र असलेला विडीओ मिळाला.

http://www.youtube.com/watch?v=DuFqOua2grc

(इथे मराठी गाण्याची चर्चा अपेक्षा आहे पण वरती मुद्दा आला म्हणून लिहिलेय.):)
गाणं माझं अत्यंत आवडतं आहे.

झंपी, नीट पाहिले तर कळते आहे की तो व्हीडीओ भलताच आहे. आशाचे ओठ भलतच म्हणताहेत, भलत्याच वेळेला व दृष्यांचा गाण्याशी संबंधच नाही.

(पण गाणे अ प्र ति म आहे)...

रेहाना सुलतानवर. हाही दस्तकप्रमाणे black & white होता.>>>>>धन्यवाद mbhure Happy

झंपी, नीट पाहिले तर कळते आहे की तो व्हीडीओ भलताच आहे. आशाचे ओठ भलतच म्हणताहेत, भलत्याच वेळेला व दृष्यांचा गाण्याशी संबंधच नाही.>>>>हो झंपी, सुनिधी. आशा पारेख, धर्मेंद्रचं ते गाणं "सुनो सजना पपीहेने...." हे आहे. Happy
https://www.youtube.com/watch?v=ihTP_arJSIo

"ये दिल और उनके...." चा व्हिडियो उपलब्ध नाही आहे. Sad

(इथे मराठी गाण्याची चर्चा अपेक्षा आहे पण वरती मुद्दा आला म्हणून लिहिलेय.)>>>>>काही हरकत नाही. मीसुद्धा तेच केलंय. Happy माहिती मिळावी हाच उद्देश. Happy

कालच्या लोकसत्तामध्ये विशेष संपादकीय सदरात प्रसिद्ध झालेला सुधीर मोघे यांच्यावरील एक अप्रतिम लेख.

त्यांच्या कवितांची जी गाणी झाली त्याच्यावर सहज नजर टाकली तरी त्यातील लुभावणार्‍या काव्याची ओळख व्हावी. 'झुलतो बाई रास झुला, नभ निळे रात निळी कान्हाही निळा' हे गीत असो वा 'काजळ रातीनं ओढून नेला..' हे मनातल्या मनात टोचत राहणारे गीत, सुधीर मोघे मनापासून लिहीत. त्या लिहिण्यात जोरजबरदस्ती नसे. कारण त्यांचा कवी सहज होता. 'जरा विसावू या वळणावर', 'त्या प्रेमाची शपथ तुला', 'माझे मन तुझे झाले', 'विसरू नको श्रीरामा मला', 'सजणा पुन्हा स्मरशील ना'.. अशी सहज गुणगुणली जाणारी अनेक गाणी सुधीर मोघ्यांची आहेत, हे अनेकांना माहीतही नसावे. तेच त्यांचे यश. 'गोमू संगतीनं माझ्या तू येशील का..' या हेमंतकुमार यांच्या सानुनासिक आवाजातला प्रश्न सुधीर मोघे यांच्याच कवितेतला आणि 'दिसं जातील, दिसं येतील..भोग सरंल सुख येईल..' हे आश्वासक शब्दही त्यांचेच. 'मी सोडून सारी लाज, अशी बेभान नाचले आज.. की घुंगरू तुटले रे..' या ओळी हिंदीच्या आधारे रचलेल्या. पण सुधीर मोघे यांनी त्या रचतानाही त्यांना सांस्कृतिकदृष्टय़ा मराठीत आणले. असे झाले की तो नुसता अनुवाद राहात नाही. रूपांतर होते.

पूर्ण लेख इथे वाचा:
फिरूनी नवी जन्मेन मी...

माझ्या आवडत्या गायिका अनुराधा कुबेर ( भेंडीबाजार घराणे ) असा यू ट्यूबवर शोधत होतो..
तर त्यांनी गायलेली बैठकीची लावणी सापडली... केवळ अप्रतिम

https://www.youtube.com/watch?v=bVWgi3bdfOk

त्यांनीच गायलेला रागसागर पण ऐका

https://www.youtube.com/watch?v=okygQmxJjaI

थोडे विषयांतर..
या अनुराधा कुबेर यांना मी काही वर्षांपुर्वी चेंबूरला एका महोत्सवात ऐकले. तेव्हापासून त्यांचा चाहता झालोय.
त्यावेळी प्रेक्षकांत रजनी जोशी, मधुवंती दांडेकर आणि अश्विनी भिडे होत्या. अगदी आवर्जून त्यांचे गायन ऐकायला
आल्या होत्या. अनुराधा कुबेर यांचे गायन रंगात आले होते तरी त्यांनी या तीन कलाकारांची दखल घेऊन त्यांची
गाणे चालू ठेवण्यासाठी परवानगी मागितली होती.

असाच एक प्रसंग.. डॉ. प्रभा अत्रे यांच्याबद्दल ऐकला होता. त्यांच्या एका मैफिलीला किशोरी अमोणकर येऊन प्रेक्षकांत बसल्या. तर डॉ. प्रभा अत्रे यांनी गायन थांबवून त्यांना मचावर आपल्या शेजारी बसण्याची विनंती केली.

किती नम्र असतात हे थोर कलाकार !

जांभुळ पिकल्या झाडाखाली ..हे गाणे एका मु़ळ पंजाबी गाण्यावर आधारीत आहे..
गुलाबी चिरेवाला. शपाही डोगरा.. हा हा शपाही डोगरा.. असे मुळ गाणे आहे.
(शांता शेळके यांच्या इतस्ततः या पुस्तकात त्यानी असे लिहिले आहे).

हे गाणं लिहीलंय का कुणी-

धुंदीत राहू, मस्तीत गाऊ
छेडित जाऊ आज प्रीत साजणा

परफेक्ट हनिमून साँग!

साती,

सुरेख गाण्याची आठवण काढलीत. त्यात जेव्हा महेंद्र कपुर सुरुवात करतो तेव्हा ...धुंदी गुलाबी, हवाही शराबी, छेडीत जाऊ आज प्रित साजणी...अगदी सहजतेने म्हटलेय त्याने. मजा येते ऐकताना.

ते असं आहे गाणं..

हासरा नाचरा
जरासा लाजरा
सुंदर साजिरा
श्रावण आला..

सुंदर आहे !

खालील गाण्यांचे संगीतकार, गायक, चित्रपट (असल्यास) कोणी सांगू शकेल का? माझ्या अत्यंत आवडीची गाणी आहेत. ती ऐकून अनेक वर्षे झाली आता. पण फार काही माहिती मिळाली नाही.

१. अजून का नं माझा तुज शोध लागला, तू विचारलेस का मनातल्या फुला.
2. तुला मानिला देव मी प्राण माझा, अशी एक पंचारती वाहू दे
3. येशील का येशील का, खराच कधी तू येशील का, घरात कधी तू येशील का

धन्यवाद!

'तो मी नव्हेच' नाटकातले..

कानात सांग माझ्या.. मी आवडे तुला का?
माझी अबोल प्रीती.. नयना तुझ्या कळे का?

सांगू कशी प्रिया मी
माझे मला कळेना
हळुवार भावना ही
शब्दात साठवे ना

या डोळ्यांची दोन पाखरे
फिरतील तुमच्याभवती
पाठलाग ही सदैव करतील
असा कुठेही जगती

Pages