गाणी मनातली (आवडलेली मराठी गाणी)

Submitted by जिप्सी on 10 June, 2010 - 23:38

मराठी संगीत भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजले आहेत.
गीतकारांचे अर्थवाही शब्द, संगीतकारांनी बांधलेली सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी, अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये आहे.
इथे आपण आपल्याला आवडलेल्या मराठी भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत, लोकगीत, लावणी इ. गाण्यांची चर्चा करुया. यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

mbhure, बरोबर सुगंधी कट्ट्यातील हे गाणे सुद्धा दोन वेगळ्या चालीत आहे. Happy

रच्याकने, यावरून अजुन असंच एक गाणे आठवले, गायिका बहुतेक उषा मंगेशकर. चित्रपटाचे नाव माहित नाहि Happy
गाण्याचे बोल काहीसे असे होते.

"चंदनाचे दार माझे सोनियाचा उंबरा...." हे कडवं अभिनेत्री रंजनावर चित्रित होते आणि
"आज इश्काचा फुलबाजा उडवा......" हे फास्ट चालीचे मधू कांबीकरवर चित्रित.

फार पूर्वी एक मराठी मालिका होऊन गेली (नाव आठवंत नाही पण बहुतेक श्रीराम लागु आणि जयश्री गडकर (चुभुद्याघ्या) होते त्यात). मालिकेचा विषय काहीच आठवत नाही पण त्याचे शिर्षक गीत खुपच सुंदर होते.

"आनंद या जीवनाचा, सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा, ओठातूनी ओघळावा">>
मालिकेचे नाव संघर्ष होते बहुतेक. त्यात श्रीराम लागु एक कडक बाप असतो. त्याच्या धाकट्या मुलीला, देवास ला कुमारजींकडे गाणे शिकायला जायचे असते. पण त्याचा विरोध असतो. ती मुलगि बहुतेक आत्महत्या करते.
आनंद या जीवनाचा, सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा, ओठातूनी ओघळावा
झिजुनी स्वतः चंदनाने, दुसर्‍यास मधुगंध द्यावा
हे जाणता जीवनाचा, प्रारंभ(?) हा ओळखावा

धन्यवाद मुग्धानंद Happy
काहि मालिकेंची शिर्षक गीते खरच खुप छान होती.

याच कथेवर "चांदणे शिंपित जा" हा चित्रपट आला होता. त्यात " हे चांदणे फुलांनी शिंपित रात्र आली, धरती प्रकाशवेडी ओल्या दवांत न्हाली...." हे एक सुंदर गाणं होतं. Happy

मला "वादळवाट" या मालिकेचे शिर्षकगीतही आवडायचे. Happy

मालिनी राजूरकर यांनी गायलेला शंकरा रागातला अतिद्रुत तराणा आणि दोन नाट्यगीते, इथे ऐकता येतील. हे खाजगी मैफिलीतले ध्वनिमुद्रण आहे. मला नाही वाटत, हे त्यांच्या कुठल्या सीडी वा कॅसेट मधे होते.

http://www.esnips.com/doc/4eb1fab1-5698-4f45-aaf7-b8e8e3f9d584/Malini-Ra...

याच फोल्डरमधे त्यांनी व ग्वाल्हेर घराण्याच्या इतर कलाकारांनी गायलेले इतर काही राग आहेत.

गेल्या आठवड्यात एफेम रेन्बोवर सकाळीच ज्योत्स्ना भोळे यांनी गायिलेली
'आला खुशीत समिंदर' आणि 'जारे खुशाल दर्यावरी' ही दोन गाणी ऐकायला मिळाली. रेकॉर्डिंगसाठी नाही तर मैफलीत गावीत तशी मस्त आळवून तब्बेतीत गायिलेली. दोन्हीचे गीतकार अनंत काणेकर. संगीत बहुधा केशवराव भोळे.
असंच एक गाणं म्हणजे राजा बढे यांचं 'पुल'कित माझिया माहेरा जा,

सुलोचना चव्हाण यांनाही ज्योत्स्नाबाईंच्या फिरणार्‍या गळ्याचं अप्रूप आहे.

मी लहान असताना दूरदर्शनवर कोंकणी कार्यक्रमात ज्योत्स्नाबाईंची मुलाखत पाहिली होती. त्यात त्यांनी 'माजे मना मोगरे कळी फुलत जात्याल फुलतली- एकसुरीच खाकाकुशी रातरातभर परमळतली' हे गाणे ऐकले होते. त्यानंतर पुन्हा कधी ऐकले नाही. तरी अजून लक्षात राहिलेय.

माधव त्या अल्बममधे बराच खजिना आहे. हमीर मधला, घर जाऊ लंगरवा कैसे, हा नसून दुसराच खयाल आहे. फूल गेंदवा ना मारो आहे. काफी मधला, छांडो छांडो हा टप्पा सीडी पेक्षा जास्त तबियतीने गायलाय.
बाईबद्दल काय लिहायचे. ग्रेट हा शब्द पण थिटा पडतो.

भरत, ईप्रसारणवर ज्योस्नाबाईंनी गायलेली खाजगी मैफिलीमधली गाणी ऐकवली होती. पण गेले काही आठवडे, तिथला नाट्यपराग हा कार्यक्रमच बंद आहे.

मस्तच धागा आहे हा.
मला आवडलेली मराठी गाणि :-

झुलतो बाई रास झुला
झुलतो बाई रास झुला
नभ निळे
......
कान्हा ही निळा
झुलतो बाई रास झुला
.................................

विसरु नको श्री रामा मला
विसरु नको श्री रामा मला
मी तुझ्या चरणी जीव वाहिला
प्रिया....

..................................

गो माझो लवताय डावा डॉळा
जाई जुई च्या गजरो माळता
रतन अबोली......
काय शगुन,
शगुन गो सांगताय माका
बाई माझो लवताय डावा डोळा
................................

ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहु दे
आभाळा गत माया तुझी आम्हा वरी राहु दे
...................................................

वाट पाहुनी दिस निजला
दिसा मागुनी दिस गेला
सुर्व्या आला तळपुन गेला
मावळती च्या खडीगाला ला हो ओ
दडणी सखे दडणी
........................................

मुंबई चा जावई या चित्रपटात अरुण सरनाईक यांच्या वर चित्रीत झालेलं हे गीत :-

प्रथम तुझ पाहता
जीव वेडावला
........

हे गाणं पार्श्वगायन ही अरुण सरनाईक यांनी केले आहे का

वाट पाहुनी दिस निजला
दिसा मागुनी दिस गेला
सुर्व्या आला तळपुन गेला
मावळती च्या खडीगाला ला हो ओ
दडणी सखे दडणी

आजच सखीमध्ये हे गाणे ऐकले. अतिशय सुंदर संगित..

वाट पाहुनी जीव शिणला

मावळती च्या खडीगाला ला हो ओ
दडणी सखे दडणी

मावळतीच्या खळीगालाला
सजणी सखे गडणी

गडणी = 'गड्या'चे स्त्रीलिंग का?

आणि हे खळीगाल म्हणजे काय?
दिशा का?

गडणी = 'गड्या'चे स्त्रीलिंग का?

असावे बहुतेक.

डॉक बरोबर सीमा देव आहे ना, करेक्ट मी इफ आय अ‍ॅम राँग>>>>>येस्स्स Happy

त्यात सुरुवातीलाच (श्रेयनामावली दाखवताना) एक गाणे आहे "होडी चाले लाटेवरी, कोण चालवे उमगेना, खेळ नियतीचा कळेना, दैव कळले ना कुणा" ते ही आवडते. Happy
(सुरेश वाडकर, उषा मंगेशकर)

रच्याकने, हे गाणे या चित्रपटातील आहे हे माहितच नव्हते. माबोकर गिरीश यांनी सांगितले. Happy

मोहित्यांची मंजुळा (कि थोरांतांची कमळा) शिन्मात दिदी ने गायलेलं अखेरा चा हा तुला दंडवत हे गाणं ही बेस. जयश्री गडकरांनी त्या गाण्या मधे छान मुद्राभिनय केलंय, मला ते गाणं दिदी आणि जयश्री गडकर दोघां साठी आवडतं Happy

१)"मराठी पाउल पडते पुढे",
२)"म्यानातुन उसळे तलवारीची पात",
३)"नमोस्तुते॥२॥ श्री महंमंगले शिवात्मते शुभदे..."

ही काही गाणी माझ्या आवडीची.
कुणाला पुर्ण येत असल्यास कृपया इथे द्यावी. Happy

"नेसले ग बाई मी
चंद्रकला ठिपक्याची तिरकी नजर माझ्या वर या सावळ्या हरी ची" ,
"नथी चा आकडा ..
बंदोबस्त केला म्हणुन एवढा " हे मी मराठी बाणा नाटकात एकलेले गाणे आहे..कोणाकडे असेल तर कृपया इथे द्यावी

नाकात वाकडा नथीचा आकडा
मोत्याचं कुलूप ओठांच्या कवाडा
बंदोबस्त केला का गं एवढा
हे चित्रपट गीत आहे : गायक : उषा मंगेशकर-जयवंत कुलकर्णी

नेसले ग बाई मी
चंद्रकला ठिपक्याची तिरकी नजर माझ्या वर या सावळ्या हरी ची>>>>हे हि गाणे चित्रपटातीलच ना? "हमाल दे धमाल"???? Uhoh

मस्त धागा! असा कसा मिसला इतके दिवस!
ज्ञानेश्वरांच्या सगळ्या रचना!

घनु वाजे घुणघुणा वारा वाहे रुणझुण
भवतारकु हा कान्हा वेगी भेटवा का..

चांद वो चांदणे चापेपो चंदनु
देवकी नंदने वीण नावडे गा

चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी
कान्हो वनमाळी वेगी भेटवा का ..

सुमनाचे सेज सितळ वो निकी
पोळे आगी सारखी वेगी भेटवा की..

Pages