गाणी मनातली (आवडलेली मराठी गाणी)

Submitted by जिप्सी on 10 June, 2010 - 23:38

मराठी संगीत भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजले आहेत.
गीतकारांचे अर्थवाही शब्द, संगीतकारांनी बांधलेली सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी, अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये आहे.
इथे आपण आपल्याला आवडलेल्या मराठी भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत, लोकगीत, लावणी इ. गाण्यांची चर्चा करुया. यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खालील गाण्यांचे संगीतकार, गायक, चित्रपट (असल्यास) कोणी सांगू शकेल का? माझ्या अत्यंत आवडीची गाणी आहेत. ती ऐकून अनेक वर्षे झाली आता. पण फार काही माहिती मिळाली नाही.

१. अजून का नं माझा तुज शोध लागला, तू विचारलेस का मनातल्या फुला.
२. जा शोध जा किनारा, जीवनगंगा गोते खाई, झुरतो जीव बिचारा
३. तुला मानिला देव मी प्राण माझा, अशी एक पंचारती वाहू दे
४. आज प्रीतीला पंख हे लाभले रे
५. येशील का येशील का, खराच कधी तू येशील का, घरात कधी तू येशील का

धन्यवाद!

दोन गाणी ओळखीची वाटताहेत.

१) जा शोध जा किनारा. सी रामचंद्रांचे आहे का ?
२) आज प्रितीला पंख हे लाभले रे, झेप घेऊनी पाखरू चालले रे... बहुतेक आशा आणि सुधीर फडके यांचे वाटतेय.

मी येताना काही सिडीज र्‍हिदम हाऊस मधून घेतल्या होत्या. कव्हर्स घरीच राहिली.

आशाची २ सुंदर गाणी त्यात आहेत.

१) देवरुप होऊ सगळे.. असा एक छान अभंग आहे

२) माघाची रात, चांदणं त्यात
कुशी बसून काय भागंना
थंडीची झोप मला लागंना... अशी वेगळ्याच आवाजात गायलेली एक लावणी आहे.

या बाईची गाणी एकायची तर १ आयूष्य पुरायचे नाही.

आज माणिक वर्मांचा वाढदिवस. सकाळीच त्यांचे 'जाळीमंदी पिकली करवंदं' ऐकलं. त्यांनी गायलंय माहितच नव्हतं. इतकं मस्त आंबट-गोड गाणं, अगदी पिकल्या करवंदांसारखंच.

मनी जे दाटले तुला पाहुनी सांगू कसे , हृदय शब्दात ग आणावे कसे

कुठल्या पिक्चर मध्ये आहे हे गाण. मला खूप आवडते हे गाण. लहानपणी कधीतरी रेडिओ वर एकले असेल. प्लीज कोणाकडे हे गाणे असेल तर शेअर् करा. मनात खूप रुतून बसलेले गाणे आहे . आत्ता हा बीबी बघितला आणि परत हे गाणे आठवले
प्लीजजजजजज

मला एक गाणं हवंय... सुधीर फडकेंच्या आवाजातलं -
'मनाचिया घावावरी मनाची फुंकर..' - कृपया कुणी देईल का हे गाणं? खूप शोधलं पण ओरिजिनल गाणं मिळालंच नाही.

जिप्सी , मनापासून धन्यवाद,
आता घरी गेल्यावर ऐकते हे.
खरच मनापासून धन्यवाद

Happy

चीकू, दिनेशदा, "जा शोध जा किनारा" हे गाणं "अनोळखी" चित्रपटातील. संगीत आणि स्वर सुधीर फडके यांचा. याच चित्रपटात "आमचा राजू का रूसला" हे जयवंत कुलकर्णी यांनी गायलेल गाणंही आहे. Happy

त्यांनी गायलंय माहितच नव्हतं. इतकं मस्त आंबट-गोड गाणं, अगदी पिकल्या करवंदांसारखंच.>>>>युट्युबवर आहे बहुतेक हे गाणं.

आज प्रीतिला पंख हे लाभले रे
झेप घेउनी पाखरू चालले रे

उंच मनोरे नव्या जगाचे
चिरंजीव हे स्वप्‍न सुखाचे
तुझी हो‍उनी आज मी राहिले रे

असा लाजरा, बावरा, प्रणय असावा
तुझी सावली त्यात मी घेत विसावा
असे आगळे चित्र मी पाहिले रे

दोन जिवांनी एक असावे
मस्त हो‍उनी धुंद फिरावे
पंचप्राण हे पायी मी वाहिले रे

गीत: - जगदीश खेबूडकर
संगीत: प्रभाकर जोग
स्वर: आशा भोसले, सुधीर फडके
चित्रपट: कुंकवाचा करंडा (१९७१)

मस्त. मला हे गाणं खुप आवडतं.. १०७.५ वर आठवड्यातुन दोनदा तरी हे लागतेच लागते. सोबत रमेश देव-सीमाचे 'हसले आज कुणी, तु का मी , हो...तु का मी' हेही असतेच.

आशा आणि सुधीर फडके यांचेच, रातीच्या गर्भात चांदाची रेघ, चांदाची रेघ.. असे पण गाणे माझ्याकडे होते. ( घरी राहिले ) याचा व्हीडीओ आहे. गाण्यात रत्ना भूषण आहे पण गाणे तिच्या तोंडी नाही तर तिला उद्देशून आहे.

रातीच्या गर्भात चांदाची रेघ, चांदाची रेघ.. >>>>हे गाणं नाही ऐकलंय कधी. Sad

रच्याकने, आशा भोसले आणि सुधीर फडके यांचे अजुन एक "या मिलनी रात्र हि रंगली..." हे गाणंही मस्त आहे. Happy चाल खुपच सुंदर आहे.

बेतात राहू दे नावंचा वेग, नावंचा वेग
रातीच्या गर्भात चांदाची रेघ, चांदाची रेघ... असे शब्द आहेत. छानच आहे ते गाणं.
तिथे आलो कि बघतो शोधून.

धन्यवाद जिप्सी आणि दिनेशदा!

बाकीच्या गाण्यांविषयी कोणाला काही माहिती असेल तर प्लीज कळवा.

मला एक गाणं हवं होत... बहुदा भवानी स्तोत्र असाव.
खुप लहानपणी ऐकल होत... विविधभारतीवर सकाळ-सकाळ लागायच... कोणाला ठाऊक आहे का?
शब्द असे काहीसे होते "गती त्वम गती त्वम.... भवानीनीSSSSS"

जिप्सी ,
खालील लिंकवर या गाण्याचे शब्द आणि ऑनलाईन गाणं उपलब्ध आहे.
(उजव्या कोपर्‍यात प्ले बटन आहे.
सॉरी, पण मला बटन दिसतच नाही

नक्षी, ते आदि शंकराचार्यांचे भवानी अष्टक आहे. शब्द मायबोलीच्या 'स्तोत्रे, श्लोक...' बाफ वर पहिल्याच पानावर मिळतील.

सॉरी, पण मला बटन दिसतच नाही>>>>या स्क्रीनशॉटमध्ये लाल रंगाच्या बॉक्समध्ये दिसत आहे प्ले बटन. Happy

दे मलागे चंद्रिके चा वर उल्लेख आहे. संपूर्ण गाणं सुरेखच ....पण प्रत्येक वेळी ऐकताना
' सोशितोसी झीज कैसी चंदना, मांगल्यास्तव त्याग ही रीती तुझी' ही ओळ मुळापासून हलवून जाते मला.

कवडसा चांदाचा पडला..
ही बैठीकिचि लावणि कोणला माहीति आहे का.. फार पुर्वी माझ्याकडे होती पन आता मिळत नाही आहे..

कोकण्या, मीही हे गाणं कधीपासुन शोधतोय. Happy यागाण्यासाठी चित्रपटाची डिव्हीडीपण विकत घेतली पण नेमकं त्यात हेच गाणं नव्हत. Sad माझ्याकडे आहे पण सुरेखा पुणेकरांच्या आवाजातले. ओरीजनल आशा भोसलेच्या आवाजातील पाहिजेय. Happy

बाहेर चांदणे खिडकी होती बंद
बिलगुन सख्याच्या मिठीत होते धुंद
निलाजरा...निलाजरा तो खट्याळ वारा आला
अन् खिडकी उघडुन पडदा सारून गेला
कवडसा....कवडसा.....कवडसा
चांदाचा पडला.....अन् साजण माझा खुदकन गाली हसला

चित्रपटः जिद्द
गायिका: आशा भोसले
पडद्यावरः उषा चव्हाण

बरोबर.. माझ्याकडे फार पुर्वी होत आशाच्या आवाजातल पन आत सापडतच नाहि आहे...
त्याचे कवी कोन माहिती आहेत का.. काय भन्नाट रचना आहे.. ज्यानं कोनी लिहिल असेल त्याला सलाम..

त्याचे कवी कोन माहिती आहेत का.. काय भन्नाट रचना आहे.. >>>>नेटवर सर्च केल्यावर सापडले
संगीतः पांडुरंग दिक्षीत
गीतकारः राम उगावकर

(संध्याकाळी घरी गेल्यावर डिव्हीडीच्या कव्हरवरपण बघतो. Happy )

दिनेशदा lol.gif..
अहो जे मिळाल ते ऐकल.. ओरिजीनल नाही आहे ना.. प्रयत्न करतोय मिळवन्याचा.. पन नाही ना अजुन मिळाल म्हनुन दुधाची तहान ताकावर.. काय करनार..

तुमच्या कडे आहे का आशा भोसलेच्या आवजातल.. असेल तर प्लिझ शेर करा.. नाहितर पत्ता द्या मे स्वतहा जातिने येवुन कलेक्ट करीन.

Pages