गाणी मनातली (आवडलेली मराठी गाणी)

Submitted by जिप्सी on 10 June, 2010 - 23:38

मराठी संगीत भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजले आहेत.
गीतकारांचे अर्थवाही शब्द, संगीतकारांनी बांधलेली सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी, अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये आहे.
इथे आपण आपल्याला आवडलेल्या मराठी भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत, लोकगीत, लावणी इ. गाण्यांची चर्चा करुया. यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<अखेरचा हा तुला दंडवत माझ ऑल टाइम फेवरेट गाण. इतक ऐकल आहे की आता मधल्या संगीतासकट पाठ झाल आहे.
>>

एक माहिती म्हणून, या गाण्याचा सुरुवातीचा obligato रॉन गूडविन यांच्या एका गाण्यातून घेतला आहे.

मला मात्र "अखेरचा हा तुला दंडवत..." हे गाणं ऐकल्यावर/पाहिल्यावर एका हिंदी गाण्याची आवर्जुन आठवण येते. अर्थात दोन्ही गाणी कानावर अलगद मोरपिस फिरवतात. Happy

गुजरा हुआ जमाना आता नही दोबारा हाफिज खुदा तुम्हारा.... Happy
https://www.youtube.com/watch?v=54F7MxitO8I

अखेरचा हा तुला दंडवत, सोडुन जाते गाव रे....
https://www.youtube.com/watch?v=ADhJqSFnnx0

रात्र काळी घागर काळी या गाण्याच्या शब्दांविषयी जरा शंका आहे. त्या मधे बुंथ काळी असं आहे की गुंथ काळी असं आहे? दुसर्‍या कडव्यात.

रात्र काळी, घागर काळी ।
यमुना जळें ही काळीं वो माय ॥१॥

बुन्थ काळी, बिलवर काळी ।
गळा मोती एकावळी काळी वो माय ॥२॥

मी काळी, कांचोळी काळी ।
कांस कासौळे ते काळीं वो माय ॥३॥

एकली पाण्याला नव जाय साजणी ।
सवें पाठवा मूर्ति सांवळी वो माय ॥४॥

विष्णुदास नाम्याची स्वामिणी काळी ।
कृष्णमूर्ति बहू काळी वो माय ॥५॥

हे मला आठवणीतील गाणी मधून मिळालं. पण गुंथ असं पण वाचलेलं आठवतय.

काय मस्त धागा आहे! मला फार फार आवडणारी आणि फारशी गायली न जाणारी आशा भोसलेंनी गायलेली लावणी शेयर करत आहे! शब्द किती चित्रदर्शी असू शकतात ह्याचं परफेक्ट उदाहरण! पहिल्यांदा ऐकली तेव्हा नायिकेच्या तोंडचे बोल्ड शब्द ऐकून मीच क्लीन बोल्ड झाले होते! लावणीतला सगळा बोल्डनेस ह्या गाण्यात उतरला आहे! नक्की ऐका! सर्व माहिती "आठवणीतील गाणी" या वेबसाईट वरून!

माघ मास पडली थंडी, पती माझे गेले गावा
मुक्कामाला र्‍हावा, पाव्हणं मुक्कामाला र्‍हावा
मजल फार पडली तुम्हा, जरा ओसरीला टेका
गरम तापवीते हंडा, हातपाय थोडे शेका
लिंबोणीला बांधा घोडा, चारा-पाणी त्याला दावा
मुक्कामाला र्‍हावा, पाव्हणं मुक्कामाला र्‍हावा

दूर वावराची वस्ती, गाव लांब तिकडं राही
तिन्हीसांज टळुनी गेली, येत-जात कुणी नाही
चार घास माझ्या हातचे ऊन ऊन तुम्ही जेवा
मुक्कामाला र्‍हावा, पाव्हणं मुक्कामाला र्‍हावा

सकाळीच न्हाले होते अजून केस ओले ओले
आवतन्यावाचून तुमचे पाय कसे दारी आले
उर्स बघायासी गेल्या सासुबाई-नणंदा-जावा
मुक्कामाला र्‍हावा, पाव्हणं मुक्कामाला र्‍हावा
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - आशा भोसले
चित्रपट - झाला महार पंढरीनाथ

http://www.aathavanitli-gani.com/Song/Mukkamala_Rhava_Pavhana

अजुन २ गाण्यांविषयी माहिती हवीय. खरंतर नोटेशन हवंय. लागी कलेजवा कटार आणि हे सुरांनो चंद्र व्हा या गाण्यांचे नोटेशन मिळेल का? निदान राग, ताल ही माहिती चालेल.

माझेही प्रचंड आवडते गाणे आहे हे.>>>>फारएण्ड +१ Happy

धनश्री,
"बुंथ" म्हणजे "डोक्यावरुन सर्व शरीरावर आच्छादनार्थ घेतलेलें वस्त्र" "ओढणी".
कनकांबराची घेऊन बुंथी । बैसली सती कौसल्या ।

संदर्भ

गाण्याचा अर्थ लक्षात घेता "बुंथ" बरोबर वाटतंय. जाणकार प्रकाश टाकतीलच. Happy

जिज्ञासा +१०० Happy

आशाताईंची अशीच अजुन एक लावणी Happy

मी तर जाते जत्रंला
गाडीचा खोंड बिथरला
बरं नाही घरच्या गणोबाला
कुणी तरी बोलवा दाजिबाला

दाजिबा सारखा दिर दुनियेमध्ये नाही
गोर्‍या भावजयीची त्यांना लई अपुर्वाई
त्यांची बाईल होईल तिची खरी पुण्याई
हेंदट आमच्या नशिबाला,
कुणी तरी बोलवा दाजिबाला

दाजिबांचा स्वभाव लई गुलहौशी
सजवतील घोडा सांगितल्यासरशी
मला पुढं घेतील हसून चटदिशी
निघता निघता उशीर झाला,
कुणी तरी बोलवा दाजिबाला

दाजिबा म्होरं घोड्यावर बसल्या-बसल्या
अंगाला अंग लागतं, अन्‌ होती गुदगुल्या
बाळपणीच्या येती आठवणी फार मागल्या
मी लई भुलते रुबाबाला,
कुणी तरी बोलवा दजिबाला

साज शिणगार केला, ल्याले साखळ्या तोडे
ऐन्याची घातली चोळी अन्‌ जरीचे लुगडे
अशा मध्ये असावे संगे दाजिबा तगडे
म्होरं मग ठाउक जोतिबाला,
कुणी तरी बोलवा दाजिबाला

गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - आशा भोसले
चित्रपट -देवमाणूस

http://www.aathavanitli-gani.com/Song/Kuni_Tari_Bolava_Dajibala

जिप्सी, ही पण लावणी भारीए!

कोणाला "कळले तुला काही कळले मलाही" हे गाणं माहिती आहे का? एका सारेगम च्या पर्वात संहिता चांदोरकर गायली होती. हे गीत जीवनाचे ह्या चित्रपटातील गाणं आहे. हृदयनाथांचे संगीत आहे. हृदयनाथांनी त्यांच्या नेहमीच्या style पेक्षा अतिशय वेगळं संगीत दिलं आहे. Total contemporary style!

कळले तुला काही
http://www.aathavanitli-gani.com/Song/Kalale_Tula_Kahi

जिप्सी, धन्यवाद.
>>अजुन २ गाण्यांविषयी माहिती हवीय. खरंतर नोटेशन हवंय. लागी कलेजवा कटार आणि हे सुरांनो चंद्र व्हा या गाण्यांचे नोटेशन मिळेल का? निदान राग, ताल ही माहिती चालेल.

जिज्ञासा
कळले तुला काही कळले मलाही.... कसलं जबरी गाणं आहे.
भिन्न षड्ज रागात बांधलंय ते.

त्या सिनेमातली सगळीच गाणी मस्त आहेत.
आशाने गायिलेलं
खुळ्या खुळ्या रे पावसा, किती भिजविसी मला
नाही नाही म्हणताना, मीही बिलगले तुला | हेही असंच कंटेम्पररी स्टाइलचं संगीत असलेलं गाणं आहे.

पूर्ण क्लासिकल स्टाइलचीही गाणी आहेत.(खाली दिलेली १-५)
१)स्वर शब्दरूप होती आनंदल्या मनाचे | गातो तरी कळेना हे गीत जीवनाचे (सत्यशील देशपांडे)
२) सुर येती विरुन जाती (लता- सत्यशील)
३) मुख तेरो कारो (ही पं. कुमार गंधर्वांची रचना आहे, आशाने गायिलेली)
४) मोरी कर पकरत, गई बंगरी मुरक (सत्यशील देशपांडे)
५) ख्वाजा तोरे दरशन को मै आई (पं. जसराज)
हापिसातून लिंका देता येत नाहियेत. पण यूट्यूबवर असतील नक्की सगळी गाणी....
माझ्याकडे ह्याची कॅसेट होती. ऐकून ऐकून खराब झाली Sad

त्या सिनेमातली सगळीच गाणी मस्त आहेत.
आशाने गायिलेलं
खुळ्या खुळ्या रे पावसा, किती भिजविसी मला
नाही नाही म्हणताना, मीही बिलगले तुला | हेही असंच कंटेम्पररी स्टाइलचं संगीत असलेलं गाणं आहे.>>>>>चैतन्य +१ Happy

माझ्याकडे ह्याची कॅसेट होती. ऐकून ऐकून खराब झाली>>>>>माझ्याकडे आहेत हि सगळी गाणी. Happy

चित्तोडगडावर मीराबाईच्या मंदिरात लता मंगेशकरच्या आवाजात एक सुंदर गाणं वाजत होतं. Happy गाण्याचे बोल काही समजले नव्हते पण संगीत आणि आवाजाने भुरळ घातली. घरी आल्यावर लता मंगेशकर, मीरा आणि राजस्थानी गीत असे सर्च केल्यावर गाणे सापडले. Happy

"थाणी कायी कायी बोल सुणंवाँ, म्हारा सांवरा गिरीधारी...."
हि युट्युबची लिंकः
http://www.youtube.com/watch?v=F85U-teEy48

जिप्स्या, लताची 'चाला वाही देस' अशी एक सिडी मिळते. RPG ने त्यांच्याच 'चाला वाही देस' आणि 'मिरा भजन' अशा २ कॅसेट्स एकत्र करून ही सिडी बनवली आहे. एकूण एक गाणे म्हणजे लखलखता हिरा आहे.

चैतन्य दीक्षित>>>> त्या पिक्चरमध्ये गाण्यांशिवाय काही चांगल आहे अस वाटत नाही मला.

एकूण एक गाणे म्हणजे लखलखता हिरा आहे.>>>>>धन्यवाद माधव. बघतो ती सीडी. यातील फक्त एकच गाणं "सांवरे रंग राची...." हे माहित आहे. Happy

चैतन्य दीक्षित>>>> त्या पिक्चरमध्ये गाण्यांशिवाय काही चांगल आहे अस वाटत नाही मला.>>>>मुग्धा, अगदी अगदी Happy

हो ना जिप्सी, कथा नावाचा प्रकार त्या पिक्चरला नाहिच्चे... आणि तुषार दळवी सोडला तर बघणेबल पण कोणी नाहीये... केवळ गाण्यांसाठी अख्खा पिक्चर बघणे म्हणजे शिक्षा आहे, पण आशा के लिए कुछ भी कॅटेगोरीतली असल्याने मी बघितला आहे हा पिक्चर. Happy

जिप्सी / माधव,
या दोन अल्बमची सलग एकत्र सिडी निघाली होती. त्यात र्‍हुदयनाथ आणि उषा मंगेशकरांनी पण छोट्या छोट्या रचना गायल्या होत्या. शिवाय दोन गाण्यांना जोडणारे म्यूझिक पीसेस होते.

आशाने हिंदीत मीराभजन बहुतेक नाहीच गायले पण मराठीतला त्याचा भावानुवाद गायलाय, सखी मी तर प्रेम दिवाणी.

लताची गुरुबाणी आहे का कुणाकडे ?.. दे हे शिवा मोहे ऐसा वर ( राग : शंकरा ) आणि सतनाम सतनाम या रचना रेडीओवर ऐकल्या होत्या. तिने कुराणपठण करायला मात्र ठाम नकार दिला होता. तिने केलं असतं तर मी नक्कीच ऐकलं असतं.

धन्यवाद दिनेशदा.

आशाच्या आवाजातील हे एक मीरा गीत चिक्कार आवडतं. Happy (हे मीरा भजन नाही ना? )

हरिनाम मुखी रंगते, एकतारी करी वाजते
विनविते, मी तुला, भाववेडी मीरा
गोड नामी तुझ्या दंगते...

'चाला वाही देस' आणि 'मिरा भजन' अशा २ कॅसेट्स एकत्र करून ही सिडी बनवली आहे. एकूण एक गाणे म्हणजे लखलखता हिरा आहे. >> अनुमोदन

सगळीच गाणी एक से एक आहेत.

हृदयनाथ मंगेशकरांनी कबिराचीही भजनं संगितबद्द केली आहेत. 'मीरा सुर कबिरा'
जरूर ऐका... अगेन सगळेच लखलखते हिरे.

ए री मैं तो प्रेमदिवानी..
मेरो दर्द न जाने कोय.. हे लताचं

माझ्या अत्यंत आवडीचं गाणं.. (मीराभजन)

त्याचंच मराठीत....
सखी मी दर्ददिवानी
माझी व्यथा कुणा नकळे गं...

गायिका शोभा जोशी आहे. चांगलं गायलय तिने हे गाणं Happy

दिनेशदा म्हणताहेत ते आशाचं कोणत मीराभजन आहे ते नाही माहिती..

के अंजली, ते बहुतेक सुवासिनी चित्रपटातले आहे. पडद्यावर सीमा आहे एवढे नक्की.

आशाच्या आवाजात, डोईचा पदर आला खांद्यावरी असे काहीसे नाव असलेला, जनाबाईंच्या अभंगाचा एक अल्बम आला होता. पण त्यातली गाणी तितकिशी गाजली नाहीत.

तुमच्यापैकी खुप कमी जणांना आठवत असेल. लता आणि बाबासाहेब पुरंदर्‍यांनी, शिवकल्याण राजा दूरदर्शनवर प्रत्यक्ष सादर केले होते.
मी जेव्हा जेव्हा ती गाणी ऐकतो, त्या त्या वेळी मला तो कार्यक्रम आठवतो.

आशाने दूरदर्शनवर कधी मराठी गाणी सादर केल्याचे आठवत नाही.
तिचा यह है आशा असा कार्यक्रम दोन भागात सादर झाला होता. त्यात सुनील दत्त, डॅनी वगैरे सहभागी झाले होते.
ओ पंछी प्यारे, काहे तरसाये अशी गाणी तिने सादर केली होती. त्यात तिने डॅनीबरोबर एक नेपाळी गाणे सादर केले होते.

पुढे तिच चाल आरडीने एका चित्रपटात वापरली. नाव आठवत नाही चित्रपटाचे पण बहुतेक लता किशोर ने गायलेय ते गाणे.

घरसे निकले वो संग संग मेरे
बैठ गये थोडीही दूर चलके... असे काहीसे शब्द त्या गाण्याचे होते. छान चाल आहे ती.

आशाने दूरदर्शनवर कधी मराठी गाणी सादर केल्याचे आठवत नाही.>>>>हो, आशाताईंचा कार्यक्रम आठवत नाही. पण लतादीदीचा प्रिया तेंडुलकरसोबत ("माझ्या माहेरची गाणी असं काहिस नाव होतं) आणि हृदयनाथ मंगेशकरांसोबत "ज्ञानेश्वर माऊली" हे कार्यक्रम आठवत आहेत.

"शिवकल्याण राजा" नाही आठवतं. Sad

मी भाग्यवान रे,
लताच्या राजा सारंगा / अभंग तुकयाचे / महानोरांच्या लावण्या / शिवकल्याण राजा - यांचे आगमन मी अनुभवले.

तिचे सुरेश वाडकर बरोबर. माता संतोषी माता माऊली असे पण गाणे ऐकले होते एकदा आपली आवड मधे. पण नंतर नाहीच.

तिचे सुरेश वाडकर बरोबर. माता संतोषी माता माऊली असे पण गाणे ऐकले होते एकदा आपली आवड मधे. पण नंतर नाहीच.>>>>हे लक्ष्मीकांत बेर्डेच्या एका मराठी चित्रपटात आहे गाणं. बहुतेक "लक्ष्या चालला मुंबईला". असं काहीतरी नाव आहे चित्रपटाचं.

"माता संतोषी माता माऊली, राहो आम्हावरी तुझी सावली..."

प्रिया तेंडुलकरसोबतच्या कार्यक्रमात महानोरांच्या लावण्या होत्या.
१. चांद केवड्याची रात
२. किती जिवाला राखायचं राखल
३. बाळगु कशाला व्यर्थ कुणाची भिती

इ. इ. Happy

Pages