मायबोलीकरांचे आणि मायबोलीवर प्रथमच - सायकल राईड गटग!

Submitted by केदार on 3 February, 2014 - 00:12
ठिकाण/पत्ता: 
राजारामपुला जवळ (कोथरुड एंडला) नाहीतर पुल पार करून शोधाल.

मागच्या काही गटग मध्ये सायकल चालविणार्‍यांची चर्चा झाली होती की सगळे मायबोलीकर ( सायकल चालविण्यास उत्सूक असणारे आणि नेहमी चालविणारे) मिळून एक किमान ४०-५० किमीची राईड करूयात.

माझे परागशी नुकतेच बोलणे झाले, तो तयार आहे, हर्पेन मागच्या गटग मध्ये नेहमीच रेडी असे म्हणाला होता. बाकींनी देखील सायकल घेऊन सहभागी व्हायला हरकत नाही.

सर्वानूमते ठरलेला प्लान.

दिवस : रविवार
ता : ९ फेब.
वेळ : ठिक सकाळी साडेसहा. म्हणजे ६:२९:६० ( जो उशीर करेल त्याला इतरांच्या ब्रेकफास्टचे बिल द्यावे लागेल)

राजाराम पुलापाशी जमायचे, तिथून

राईड १ - पुल ते खडकवासला जाणे येणे अंतर साधारण २० किमी (कमीच)
राईड २ - खड्कवासल्यापासून पुढे जाणारे - सिंहगड आणि परत अंतर ४०-४२ (पुल ते पुल)

ज्यांना केवळ १५-२० किमीसाठी सोबत करायची आहे, त्यांनी पण उत्सुकतेने नाव नोंदवून तयारी करावी. खरतर पहिले १० किमी कधी आले हे तुम्हालाही कळणार नाही.

अजूनही जे द्विधा मनस्थितीत आहेत त्यांच्यासाठी - YES YOU CAN!

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, February 8, 2014 - 20:00 to 23:58
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुनश्च विनंती, शक्यतो रविवारी जमवा. निदान यावेळेस तरी. हवे तर पुढच्या वेळेपासून एकदा शनिवारी आणि एकदा रविवारी करा.

अरे जबरीच! सर्व वृत्तांत बेस्ट...

फोटो तर एक नंबर आलाय...

सर्व सायकलवीरांचं अभिनंदन Happy

केदार त्या strava अ‍ॅप मधे एखाद्या राई ड चे रिझल्ट्स्चा म्याप इकडे किन्वा फोनच्या डिस्कस्टोरेज मधे कसा सेव्ह करुन घ्यायचा? मला काही केल्या जमत नाहीये. Sad

जाधवांचा केदार, अरे २३ला मलाही एक गंगापुजन अन सत्यनारायण एकत्र आहे. सकाळी जमणार नाही Sad अन २२ला सुट्टी नाही. Sad

id aaj activate zala marathi typing sathi practice havi

turtas KEDAR ASHUCHAMP ANI SAGALYA MAYBOLIKARANA DHANYAVAD

VERY NICE EXPERIENCE

SHORTLY WRITE IN DEATAIL MY EXP.

Pages