मायबोलीकरांचे आणि मायबोलीवर प्रथमच - सायकल राईड गटग!

Submitted by केदार on 3 February, 2014 - 00:12
ठिकाण/पत्ता: 
राजारामपुला जवळ (कोथरुड एंडला) नाहीतर पुल पार करून शोधाल.

मागच्या काही गटग मध्ये सायकल चालविणार्‍यांची चर्चा झाली होती की सगळे मायबोलीकर ( सायकल चालविण्यास उत्सूक असणारे आणि नेहमी चालविणारे) मिळून एक किमान ४०-५० किमीची राईड करूयात.

माझे परागशी नुकतेच बोलणे झाले, तो तयार आहे, हर्पेन मागच्या गटग मध्ये नेहमीच रेडी असे म्हणाला होता. बाकींनी देखील सायकल घेऊन सहभागी व्हायला हरकत नाही.

सर्वानूमते ठरलेला प्लान.

दिवस : रविवार
ता : ९ फेब.
वेळ : ठिक सकाळी साडेसहा. म्हणजे ६:२९:६० ( जो उशीर करेल त्याला इतरांच्या ब्रेकफास्टचे बिल द्यावे लागेल)

राजाराम पुलापाशी जमायचे, तिथून

राईड १ - पुल ते खडकवासला जाणे येणे अंतर साधारण २० किमी (कमीच)
राईड २ - खड्कवासल्यापासून पुढे जाणारे - सिंहगड आणि परत अंतर ४०-४२ (पुल ते पुल)

ज्यांना केवळ १५-२० किमीसाठी सोबत करायची आहे, त्यांनी पण उत्सुकतेने नाव नोंदवून तयारी करावी. खरतर पहिले १० किमी कधी आले हे तुम्हालाही कळणार नाही.

अजूनही जे द्विधा मनस्थितीत आहेत त्यांच्यासाठी - YES YOU CAN!

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, February 8, 2014 - 20:00 to 23:58
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हर्पेन.. मी जमणार नाही असं म्हणतच नाहीये.... जमेल ह्यात शंकाच नाहीये.. फक्त अजिबात प्रॅक्टीस न करता एवढे अंतर गेल्यावर पाठदुखी, पायदुखी असले कार्यक्रम व्हायला नको..

मला खूप आवडेल अ‍ॅक्चूली पण मला सायकल अगदी नॉमिनल ना के बराबर चालवता येते. धडपडण्याचे चान्सेस खूप जास्ती आहेत. प्रथम नीट शिकून घेऊन मग येईन Happy

५-६ महिन्यात दिग्गज झाला आहेस. Happy

शनिवारी ठेवा राव. पाय मोडले तर रविवारी डागडुजी तरी होईल. Wink

अरे व्वा! उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा Happy आणि आयोजकांचे अभिनंदन/आभार.
(तब्येतीमुळे व अन्य आधीच ठरविलेल्या कार्यक्रमामुळे माझे येणे अशक्य आहे, पण मनाने मी तुमच्याबरोबरच असेन याची खात्री बाळगा. Happy नुकतेच २६ जाने ला चान्दणि चौक ते युनिव्हर्सिटी असा तब्बल ५/६ किमीचा पल्ला मी पार केलाय म्हणलं! Wink अजुन एक पाचदहा किमी म्हणजे मला तसे अवघड नाही! पण असो. यावेळेस तरि असोच. )

हिम्सकूल, विना सराव करूच नये, आहेत की अजून ५-६ दिवस, करावा रोज थोडा सराव आणि थोडे पाय्-बिय दुखायचेच Wink

एक फु.स. - वेळ ६ चीच ठेवा म्हणजे सगळे जमून साडेसहाला नक्की निघाल Wink

हर्पेन अरे मला राजारामपुलापर्यंत सायकलवर यायला माझ्या घरापासून १७ किमी यावे लागेल. म्हणून ६:३०. पण माझ्यासाठी ६:३० म्हणजे ६:२९:६० पण इतक्या गटगच्या अनुभवाअंती असे म्हणावे लागेल तुझा सल्ला योग्य आहे.

केपी अरे २० किमीत पाय मोडणार नाही.

वेळ अपडेट करतो.

प्रथम नीट शिकून घेऊन मग येईन >> लोकांना आवडले तर अशी राईड महिन्यातून दोनदातरी ठेवायला हरकत नाही तेंव्हा ये.

तर लोकहो ज्यांना शंका आहे त्यांच्यासाठी YES YOU CAN!

वाह..... काय मस्त गटग आहे.
मी पण कुठच्यातरी सायकलराईड गटगला येईन. तेव्हा मला कोणीतरी सायकल द्या आणि रस्ता दाखवा Wink

गटगनंतर काहीच कार्यक्रम नाही का? म्हणजे चहा-कॉफी गटग वगैरे... काहीतरी नाश्तापाणी?? Wink

काहीतरी नाश्तापाणी?? >>> हो आहे की. इत्सिप्त ठिकाणी पोचून नाश्ता करायचा, म्हणजे तेवढा वेळ सगळ्यांना विश्रांती मिळेल आणि मग परत बे एके बे करत घरी.

शनिवार ठेवा रे लोकांनो.. रविवारी दुपारी मुंबईला जायचय.. असो, जर बहुमत रविवार असेल तर रविवार..

अरे सही. मस्त आहे हे गटग. माझ्या शुभेच्छा. केदार डीसीला आलास की करूयात असे सायकल गटग.

मस्तच .....किती छान कल्पना ...:) सर्वांना शुभेच्छा !
सायकल गटग वाचताना हया ले़खाची आठवण आली. पन्नाशीनंतर त्यांनी पहिल्यांदा सायकल चालवली आणि मग सायकलवरून ट्रेकला जाणं हा त्यांचा छंदच कसा झाला.

Pages