लेख पहिला -जलरंग तोंडओळख , तयारी

Submitted by पाटील on 28 January, 2014 - 12:34

सर्वांचे या उपक्रमात स्वागत.

जलरंगाची व्याख्या करताना जे रंग पाण्यात मिसळुन पेंटींग साठी वापरले जाताते रंग अशी थोडक्यात करता येईल मात्र त्या व्याख्ये नुसार अ‍ॅक्रेलीक तसेच , पोस्टर कलर्स, काही इंक अशा बर्‍याच माध्यमांचा यात सामावेश करावा लागेल.
आपण मात्र फक्त transparent watercolors अर्थात पारदर्शक जलरंगांचाच इथे विचार करणार आहोत.
वॉटर कलर पेंसिल या वापरुन सुद्धा असा परिणाम साधला जातो मात्र त्यांचाही सामवेश या उपक्रमात केला नाही.
जलरंगांचा पारदर्शीपणा त्यांच्यात वापरलेल्या पिगमेंट्स नुसार कमि अधिक असतो, काही रंग पुर्णता पारदर्शक असतात त्यांच्या वापरानंतर सुद्धा खालचा कागद किंवा त्यावर काढलेल्या पेंसिलच्या रेषा दिसत राहतात. जे रंग जसे कि पांढरा किंवा काळा हे पुर्ण अपारदर्शक असतात आणि म्हणुन बरेच चित्रकार (purist) या रंगांचा वापर टाळतात. आपणही या कार्यशाळेपुरता तरी या दोन रंगांचा वापर टाळणार आहोत.
काही रंग हे अर्धपारदर्शक असतात.

हे रंग मुख्यता ट्युब्ज आणि केक्स या प्रकारात उपलब्ध असतात
यात टयुब मधले रंग मिसळुन मोठी चित्र करणे सोपे असल्याने ते जास्त लोकप्रिय आहेत, केक्स हे प्रवासात बरोबर ठेवायला किंवा छोट्या चित्रांसाठी उपयुक्त असतात. मी स्वतः चित्रात काही फिगर्स टाकायच्या असतील तर केक्स वाल्या रंग पेटीतुन थोडे थोडे रंग वापरुन त्या फिगर्स रंगवतो बाकिच्या कामासाठी मात्र ट्युबमधले रंग वापरतो

यात वापरलेल्या pigments च्या प्रमाण आणि शुद्धतेनुसार student आणि artist या दोन ग्रेड्स मधे उपलब्ध असतात.

उदा. winsor & newton या प्रसिद्द ब्रँड मधे cotman सिरीज ही इकॉनॉमिकल सिरीज आहे तसेच भारतात कॅमल कंपनिचे रंग student आणि artist या दोन ग्रेड मधे उपलब्ध आहे. या कार्यशाळेसाठी आपण शक्यतो पुढे जाऊन आर्टीस्ट क्वालीटीचे रंग वापरु मात्र कुणाकडे स्टुडन्ट क्वालीटीचे रंग असतील तरीही चालतील. स्टुडन्ट क्वालीटीचे रंग fugitive अर्थात कालांतराने फिके पडणारे/उडून जाणारए असतात म्हणुन चित्रकार मंडळी याचा वापर करीत नाही मात्र आपल्याला शिकायला याचा वापर करायला हरकत नाही. या रंगांचे बरेच ब्रँड उपलब्धा आहेत. मात्र आपण कुण्या एका ब्रँड्साठी आग्रही असणार नाहीत. मात्र कुणाला एखाद्या ब्रँड्बद्दल माझे मत हवे असेल तर ते मी प्रतिसादात लिहिन.( जर तो ब्रँड मी वापरला असेल तर) मात्र आपण काही ठरावीक रंग छटांचाच वापर करणार आहोत (limited palette),ही palette प्रत्येकाची जसे आप्ण काम रीत जाऊ तशी डेव्हलप होत जाते. या कर्यशाळेपुरता खालिल रंगांपुरती आपली पॅलेट मर्यादित ठेऊया.
यात आपण मुख्यता: cobalt blue, ultramarine blue, Persian blue , gamboge yellow, cadmium yellow , yellow ochre , vermillion red , orange , burnt sienna या रंगांचा वापर करणार आहोत. जर बारा रंगांचा जो सेट बाजारात उपल्ब्ध असतो तो घेतला तर त्यात हे रंग उपलब्ध असतील, त्यामुळे जरी मला व्यक्तीश: Indian yellow, viridian green , payne's gray इत्यादी रंग आवडत असले तरी ते टाळायचा प्रतत्न राहील.

Granulation, light fastness,Non-Staining and Staining इत्यादी काही गुण्धर्मांबाबत आपण पुढे कधितरी आवश्यकतेनुसार बोलु. आर्टीस्ट क्वालीटीच्या ट्युब्ज वर प्रत्येक रंगांच्या प्रतीप्रमाणे याबाबत रेटींग आणि माहिती असते. त्या ब्रँड्च्या वेबसाईट वर तसेच आर्ट शॉप मधे प्रत्येक ब्रँडचे कलर चार्ट असतात त्यात ही माहीती मिळते, यात मुख्यता ट्रान्स्परन्सी आणि लाईट पास्टनेस ची रेटींग बघुन घ्यावी.

मात्र या सगळ्यात या रंगाचा प्रवाहिपणा हा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म ज्याचा वापर योग्य रितीने केल्यास सुंदर परीणाम साधता येतो. या मुळेच कदाचीत जलरंग इतर माध्यमांपेक्षा वेगळे आणि थोडे कठीण असावेत. ऑईल, अ‍ॅक्रेलीक, पेस्टल, पेंसिल मधे परत तोच परीणाम साधणे तसेच चित्र कॉपी करणे हे सरावाने शक्य होते मात्र जलरंगात तोच परीणाम तशाचा तसा पुन्हा साधणे कठीण.

पेपर :
जलरंगातली चित्र प्रामुख्याने कागदावर काढली जातात ( काही खास कॅन्व्हास, तसेच बोर्ड यावरही या माध्यमाचा वापर होतो जो फारसा प्रचलित नाही)

जलरंगाचा कागद हा कॉट्न पासुन खास पद्धतीने बनवला जातो आणि त्यानुसार त्याचे मु़ख्यत्वे दोने प्रकार
१) हॉट प्रेस्ड हँडमेड पेपरः यात लगदा हॉट रोलर प्रेस मधुन जातो , त्याने कागद जास्त गुळगुळीत होतो. जलरंगासाठी हा कागद टाळावा ( काही कामासाठी अधिक स्रावाअने हा पेपर वापरता येतो)
२.कोल्ड प्रेस्ड किंवा नॉट (प्रेस्स्ड) - या पेपर ला येक टेक्श्चर असते , यात रंग उत्तम बसतात आणि बहुतेक आर्टीस्ट वॉटरकलर साठी हा पेपर निवडतात, यात खुप जास्त असलेला पेपर न निवडता मध्यम ग्रेन्स वाला पेपर निवडावा.
यात चांगला कागद ph neutral,अ‍ॅसिड फ्री आणि आर्कायवल प्रतीचा असतो. यावरुन कागदाची किंमत ठरते.
तसेच कागदाची जाडी खरे तर वजन (GSM - grams per square meter) हा येक महत्वाचा घटक आहे.
या कागदाच्या शीट्स साधारण पणे इंपिरीअल साईज ( २०x३०")मधे उपलब्ध असतात. कागद ओला झाल्यावर वाकडा तिकडा होतो म्हणुन ३०० GSM चा कागद वापरला जातो जो थोडा जाडसर असल्याने कमी वाकदातिकडा होतो.
या सुट्या शिट्स शिवाय , रोल , पॅड इत्यादी स्वरुपात हे कागग मिळतात.
परदेशी बनावटीचे कागद बर्‍यापैकी महाग असल्याने सरावासाठी भारतीय हँड्मेड पेपर वापरायला हरकत नाही. किंबहुना या कार्यशाळेसाठी मी हेच पेपर वापरणार आहे.
भारतीय पेपर हे रफ आणि मॅट या दोन स्वरुपात उपल्बध असतात. यातला रफ पेपर हा कोल्ड प्रेस्ड (नॉट) च्या जवळ जाणारा आहे जो आपण निवडुया.
भारतात या पेपरचा खास कोणता ब्रँड प्रसिद्ध नाही मात्र येकेकाळी Handmade Paper Institute पुणे यांचे पेपर खुप पॉप्युलर होते.
आपल्या जवळ्च्या आर्ट शॉप मधे जो कागद खुप पाणी शोशत नाही आणि अगदिच कमी शोशतो असा न पेपर न निवडता या मधला पेपर निवडावा.
किंवा काही अशा पेपरचे पॅड मिळतात ते वापरावे.

सुट्या शीट्चा दोने तुकडे केले तर साधारण १५x२०" चे दोन पेपर मिळतील.
हा पेपर मास्कींग टेपनी १७x२२ च्या प्लायवर ( ८ mm मरिन प्लाय चा तुकडा) बसवावा.

या शिवाय पेपर स्ट्रेच करायचा उत्तम मार्ग म्हणजे
१. पेपर दोन्ही बाजुनी पाण्याने पुर्ण ओला करायचा
२. कागद दोन्ही कोपर्‍यात चिमटीने पकडुन निथळु द्यायचा
३. हा पेपर नंतर प्लायवर पसरवायचा
४.चारी बाजुनी खाकी गम टेप लाउन घ्यायची. * खाकी गम टेप जी पुर्वी बाय्डींग वाले वापरायचे, ब्राउन टेप ने गम निघुन पेपर कडा सोडतो.
५.रात्रभर हा पेपर सुकु द्यायचा म्हणजे दुसर्‍या दिवशी पेंटींग साठी मस्त स्ट्रेच्ड पेपर तयार
हा थोडा कटकटिचा भाग असला तरी या अशा स्टेच्ड पेपर्वर काम करायला मजा येते. ज्याना शक्य असेल त्यानी हे करावे मात्र या कार्य्शाळेसाठी पॅड किंवा मास्किंग टेपने चिकटवलेला पेपर वापरु.
stretched.jpg

ब्रश/ब्रश ची निगा: नॅछरल हेअर ( सेबल, स्क्विरल, मुंगुस हेअर) ब्रश मधे पाणी भरपुर राहते म्हणुन हे ब्रश वॉटरकलर साठी जास्त चांगले , मात्र यावर बंदी असल्याने बाजारात उघडपणे मिळणे कठीण. त्यामुळे चांगल्या सिंथेटिक ब्रशवर आपन भागउया. मात्र हे ब्रशेस जलरंगासाठि बनअव्लेत हे बघुन घ्यावे
ब्रशमधे अनेक प्रकार , उदा. मॉप ब्रश, रिगर ब्रश, लायनर ई. यात आपण १ ईंची फ्लॅट, १२ नं राऊंड ब्रश, ४ नं राऊंड ब्रश वापरणार आहोत , बाकी ब्रशेस तुमच्या तयारी, गरज आणि प्रगती प्रमाणे अ‍ॅड करु.
ब्रश चा केसांचा भाग पाण्यात बुडउन ठेउ नये तसेच काम झाल्यावर पाण्यात व्यवस्थीत धुऊन झट्कुन ठेवावेत.

पॅलेट
पॅलेट पांढर्‍या रंगाची असावी म्हणजे रंग कागदावर कसे दिसतील त्याचा अंदाज पॅलेट मधेच येईल. पॅलेटला तिन तरी मिक्सींग साठी भाग असावेत. आपले रंग ब्लुज, यलोज, रेड्स, अर्थ कलर्स अशा क्रमाने पॅलेट्वर लाउन घ्यावेत. काम झाल्यावर पॅलेट्च्या मिक्सिंग चेंबर साफ धुऊन कापडाने पुसुन ठेवावेत
पॅलेट नसेल तर बश्यांचा वापर घरच्यांचे बोलं खवे लागणार नाहित याची काळजी घेऊन करावा Happy
wcp.jpg

पाणी/भांडी- या साठी दोन भांडी ठेवावीत येकात ब्रश धुता येतील आणि दुसर्‍यातले साफ पाणी रंग मिक्स करायला वापरावे. याशिवाय पाण्याचा स्प्रे ( सलुन मधे असतो तसा) उपयुक्त आअहे.
कपडा , स्पंज: रंग टीपायला, ब्रश मधला जास्तीचा रंग टीपायला किंवा ब्रश साफ करायला कापड आणि स्पंज चा वापर करावा.
पेंसिल - जलरंगा साठी आपण कमीत कमी ड्रॉईंग करणार तसेच , शेडींग करणार नाही म्हणून खुप डार्क पेंसिल वापरु नयेत. तसेच खुप हार्ड पेंसील्ने पेपरवर मार्क उमटतात म्हणुन साधारण HB /B पेन्सील ठीक राहील. ईरेझरने पेपर खारब होतो म्हणुन वापर टाळावा.

याशिवाय टीश्यु पेपर हाताशी असले तर चांगले याने कागदावरचा रंग टीपणे, ब्रश पुसणे इ. कामं करता येतात.
mysetup.jpg
आपल्या सगळ्यांची या सामानाची जुळवाजुळव झाली की आपण पुढच्या भागाकडे वळू. दरम्यान स्केचींग /पर्स्पेक्टीव्ह यावर येखादा भाग लिहीन.
या भागात काही शंका असल्यास विचारा.
या मालिकेतील बाकिचे लेख.
लेख दुसरा :रेखांकन http://www.maayboli.com/node/47506
लेख तिसरा- बेसिक वॉशेस http://www.maayboli.com/node/47609
लेख चौथा- वेट इन वेट आणि ड्राय ब्रशींग तंत्र - ढग आणि झाडं स्पेशल.
http://www.maayboli.com/node/47815

पुढचे लेख
9. http://www.maayboli.com/node/50584
8 http://www.maayboli.com/node/49190
7 http://www.maayboli.com/node/48503
6 http://www.maayboli.com/node/48296
5 http://www.maayboli.com/node/48032
4 http://www.maayboli.com/node/47815
3 http://www.maayboli.com/node/47609
2 http://www.maayboli.com/node/47506

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज जे सामान मिळालं ते आणलं.

१८ ट्यूब्स असलेला कॅमलचा आर्टिस्ट्स वॉटर कलर्सचा सेट
११ नंबरचा चपटा आणि ४ व ९ नंबरचे गोल ब्रश
पॅलेट
३०० GSM चा कागद मिळाला नाही म्हणून ३०० GSM ची बॉक्स बोर्डची शीट आणली आहे. ती वापरता येईल काय? अजून साधे ड्रॉईंग पेपर्स आणले आहेत १८० GSM चे. ३०० GSMचा ड्रॉइंग पेपर आणायला सांगितला आहे दुकानदाराला. नाही मिळाला तर काय करु?
माऊंटिंग टेप मिळाली नाही. पेपर भिजवून पाटावर नुसता ठेवून सुकवला तर चालेल का?

विव्हळणारी आणि जळून खाक झालेली बाहुली.
सध्या प्रवासात असल्याने इतक्या सुंदर उपक्रमात भाग घेणे शक्य नाही. खरे तर खूप इच्छा होती यात भाग घ्यायची. मिड मार्च नंतर यात सहभागी व्हायचा प्रयत्न करेन. तेव्हा कदाचित कोर्स खूप पुढे गेलेला असेल. सगळे लेख मात्र नक्की वाचणार. धागा सार्वजनिक केल्याबद्दल धन्यवाद.

पूर्वा- चांगले रंग आहेत , chinese White,Flesh Tint,Ivory Black सध्या वापरु नका आणि शक्य झाल्यास cobalt blue आणा
अश्विनी के - पेपर सुकल्यानंतर परत ओला केल्यावर परत वाकडा तिकडा होईल, मास्कींग टेप हार्ड्वेअर च्या दुकानात ही मिळते , मेस्त्री लोक वापरतात

बरं 'मास्किंग टेप' हार्डवेअरवाल्याकडे बघते. तो ३०० GSMचा बॉक्स बोर्ड चालेल काय? ह्याची एक बाजू किंचित खरखरीत आहे.

थँक्यू अजय.
माझ्याकडे सध्या जे वॉटरकलर पेपर शीट्स आहेत त्यावर लिहिल्याप्रमाणे ते 90lb(185G) आहेत.300 GSM म्हणजे 140lb चे हवेत ना?

बरोबर , पण जर टेप लाउन छोट्या साईजची चित्र आपण करणार असु तर चालतील हे पेपर, ३०० GSM चा फायदा म्हणजे पेपर रंगवताना ओला झाल्यावर खुप वाकडातिकडा होत नाही

बॉ़क्स बोर्ड वापरला नाही त्याल येका कोपर्‍यात थोडे पाणी लाउन पहा , खुप पाणी शोसुन घेत नसेल तर चालेल बहुदा

अशा तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली मला खरंच आवडलं असतं परत सुरवात करायला, पण आमच्याकडे हे सगळे साहित्य मिळणे अवघड आहे. वाचणार मात्र नक्की, आणि सर्वांची चित्रे आवर्जून बघणार.

हे माझं साहित्य :

कागद ३०० GSM चा आहे. मोठ्या शीटचे चार तुकडे केले. आता तो तुकडा १० १/२ * १५ " असा आहे. इतपतच झेपेल असं वाटतंय. दोनच तुकडे केले तर जे काही होईल ते फारच मोठं होईल (आतापासून त्याला पेंटिंग म्हणायची हिंमत होत नाहीये. पूर्ण झाल्यावर काय म्हणायचं ते ठरवता येईल.)

चित्रकलेच्या ग्रेड परिक्षांच्या निमित्ताने पोस्टर कलर्स वापरण्याची सवय आहे (होती). नंतर मध्यंतरी एक ऑईल पेंटिंग केलं आहे. जलरंग मात्र पहिल्यांदाच हाताळणार असल्याने धाकधुक आहे.

आता हा पेपर धुऊन स्ट्रेच करून वाळवायचा की नुसताच मास्किंग टेप लावून ठेवायचा. माझ्याकडे खाकी कागदी टेप नाहीये. मास्किंग टेप आहे.

मास्कींग टेप वापरा,
सुरूवातीला १०.५ x ७.५ येव्हढा छोटा पेपरसुद्धा चालेल, जेव्हढा मोठा पेपर तेव्हढा रंगवायला कठीण विशेषत: मोठाले वॉशेस.
साहित्य मस्त पकत ती पॅलेट ऑईल्/अ‍ॅक्रेलिकची आहे, वॉटरकलर साठी नाही . नसेल तर बशी/ प्लास्टीक च्या प्लेट्स वापरता येतात

साहित्य मस्त पकत ती पॅलेट ऑईल्/अ‍ॅक्रेलिकची आहे, वॉटरकलर साठी नाही . >>> असं पण असतं? मला दुकानदाराने आयताकृती पॅलेट दिलं आहे जे ऑलमोस्ट तुमच्या फोटोतल्यासारखं आहे.

केश्विनी, अगं मामीच्या पॅलेटमध्ये रंग तयार करायचे खळगे नाहीयेत. अ‍ॅक्रेलिक रंग किंवा ऑइल्स घट्ट वापरले जातात त्यामूळे ती पॅलेट वापरता येते. पण जलरंग आपण पातळ करून वापरतो त्यामूळे खळगे असलेली पॅलेट लागते.

ओहो...
मी आज बघितला हा धागा...
पाटिल सर... माझि आजपासुन सुर्वात ...
आता सामानाची जुळवा जुळव सुरु करते.

पाटील, आत्ता नेटवर सर्च करताना http://www.snapdeal.com/product/brustro-water-color-paper-12x16/1374893?... हे कागद दिसले. हे कसे आहेत?
(माझ्याकडे आहे सध्या तरी कागद. पण इतरांना माहितीसाठी लिंक दिलीये.)

बहूतेक १० असतिल गजानन.
मी वॉटरकलर पेपर्चे असे पॅक कधी बघितले नाहीत. पण कॅनव्हास पॅड्स असतात त्यात १० असतात, म्हणून अंदाज.

आत्ता तिथेच बघितले तर २४३ ला छोट्या साइझमधे (७*१०) चा ३०० चा सेट आहे त्यात एकूण १८ शीट्स दिसताहेत.
फ्लिपकार्ट्वर पण दिसतोय १३५ ला ६ शीट (९*१२) साइझ्च्या

अल्पना - ते पेपर ठीक आहेत, पेपर buckle होत नाही मात्र पाणि खुप कमी अ‍ॅब्जॉर्ब करतो. प्रॅक्टिस साठी भारतीय हॅंड्मेड पेपर बेस्ट

ओके. Happy

Pages