लेख पाचवा - निगेटीव पेंटींग , ग्लेझींग, स्प्लॅटर , स्क्रेपींग इ. तंत्र

Submitted by पाटील on 8 March, 2014 - 09:22

या लेखात आपण अजुन काही तंत्र थोडक्यात पाहु आणि त्यांचा वापर करुन काही सोप्पई चित्र करुया.

पहीले तंत्र - निगेटीव्ह पेंटीग - यात आधि येक रंग मारुन तो सुकू द्यावा ,नंतर त्या भोवती दुसरा किंवा पहिल्या रंगा पेक्षा डार्क शेड वापरुन आपण आपल्याला हव तो आकार मिळवायचा. आपल्याला ह्वा तो आकार न रंगवता त्या भोवती रंगवाचे म्हणजे आकारा बाहेरचा निगेटिव्ह शेप रंगवायच्जा म्ह॑णुन निगेटिव्ह पेंटींग.
इथे मी येक झाडाच्या आकार मिलवायचा प्रयत्न केला आहे
negative.jpg

दुसरे तंत्र - ग्लेझिंग - आधि येक रंग मारुन तो सुकु द्यायचा , त्यावर खालचा रंग दिसेल असा दुसर्‍या रंगाचा पातळ थर द्यायचा , यामुळे आपल्याला व दोन्ही रंगाच्या मिश्रणाने मिळते त्या तिसर्‍या शेडचा इफेक्ट मिळेल.
इथे मीऑ पहिल्यांदा पिवळ्या रंगाचा वॉश दिला . तो सुकल्यावर लाल रंगाचा पातळ हात दिला . त्यातुन थोडा ऑरेंज शेडचा इफेक्ट मिळाला.
galzing.jpg

स्प्लॅटर - टुथ ब्रश किंवा पेंट ब्रश रंगात बूडउन ब्रिसल्स मधुन बोट फिरुऊन किंवा ब्रश बोटावर आपटुन रंगाचे शिंतोडे पेपरवर उडवायचे. काही टेक्स्चर मिळवायला , किंवा चित्र थोडे स्टायलाईज करायला हे तंत्र वापरता येते.
splatter.jpg
स्क्रेपींग - रेंग ओला असतानाच ब्रशचे मागचे टोक किंवा येखादा कडक प्लस्टिक चा तुअकडा इत्यादिने त्यावर रेषा ओढायच्या , झाडाच्या फांद्या ईं दाखवायला हे तंत्र वापरता येते मात्र यात पेपर फाटणार
नाही याची काळजी घ्या.

scrpng.jpg

आता या तंत्रांचा वापर करुन दोन चित्र करुया.
पहिल्यांदा कागदावर चित्र रेखाटुन घेतले
L1.jpg
त्यानंतर वॉटर लिलिज रंगवुन सुकु दिल्या.
त्यानंतर पिवळ्या+ निळ्या रंगाचा वॉश वॉटर लिलीज सोडुन पुर्ण कागदभर लावला. यात मधे मधे नीळा, पिवळा रंग कमी जास्त करीत थोडे वेऋएसहन /पाण्याचा इफेक्ट आणला.
l2.jpgl3.jpg
आता चित्र पुर्ण सुकु दिले.
त्यानंतर या हिरव्या रंगात बर्न्ट सिएना+ कोवाल्ट ब्लू अ‍ॅड करुन डार्क हिरवा रंग तयार केला आणि तो लिलीज ची पाने सोडुन त्याभोवती नीगेटीव्ह तंत्राने रंगवला. हे चित्र सुकताना लिली मधे अजुन कही डीटेल्स टाकुन चित्र संपवले.
l4.jpgl5.jpg

आता दुसरे चित्र
चित्र रेखाटुन , काही बॅगराऊंड वेट इन वेट पद्धतीने ब्लॉक करुन घेतले
fh1.jpg
ते सुकल्यावर घराचा भाग ब्लॉक करुन घेतला.
fh2.jpg
हे स्रव करताना रेलिंगचा भाग /पुढिल तुळ्शी वृंदावनाचा भाग पांढराच राहिल याची काळजी घेतली.
त्या नंतर चित्र सुकल्यावर थोडया दार्क किरब्या शेडने झाडांचा आकार लुल्जली /बोल्ड ब्रश स्त्रोक्स्ने केला तर माग्ची काही झाडे /पालवी निळसर हिरव्या रंगात केली. हे सर्व सुकु देउन पिवळ्या भिंतीवर निळ्या+ लाल अशा जांभुळक्या रंगाच्या पातळ थराने ग्लेझिंग तंत्राने घरावर पडलेली सावली बोल्ड ब्रशस्ट्रोकस्नी रंगवली. पिवळा व जांभळा हे विरुद्ध रंग (हे आपण कलर्व थिअरिच्या वेळेला डिस्कस करु) अस्ल्याने सावलीचा रंग छान ग्लेझींग ने हा इफेक्ट छान आला.
FH3.jpg

त्यानंतर निळा+लाल+ बर्न्ट सियेना असा डार्क रंग घेउन निगेटिव्ह पेंटिंग तंत्राने रेलींग आणि खांब यांचे आकार मिळवले , फोरग्राऊंड्च्।ई हीरवी झूडपे ही सुद्धा निगेटिव्ह पद्धतीने उटुन दिअसतील हे बघीतले.
fh4.jpg
त्यानंतर थोडा हिरवा रंग स्प्लॅटर केला आणि चित्र संपवले
fh5.jpg
PS: माझा पीसी खराब झाल्याने OS रीईन्स्टॉल करावी लागली आणि फोटो एडीटर चालत नाहीये, त्यामुळे काही ठीकाणी रंग मुळ चित्राबरोबर मॅछ होत नसतील तसेच दोन स्टेप्स मधे सुद्धा रंगात फरक दिसत असेल त्याबदाल क्षमस्व.
या लेखा बरोबर आपण आवश्यक त्या सर्व तंत्रांवर बोललो आहोत. अजुन बरीच छोटो मोठी तंत्र असली तरी त्यावाचुन सध्या आपले काही अडणार नाही Happy यापुढील लेखात आपण बेसिक कलर थिअरी आणि चित्र चांगले होण्यासाठी कसा वापर करायचा हे पाहु.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेझिंग. चित्र असे ट्प्प्या टप्प्याने पूर्ण होताना बघायला मिळाल्याने समजण्यात खूप फरक पडतोय. लगेच करून बघावेसे वाटतेय, याचे सगळे श्रेय तुमच्या डेमोला.
मी ही मालिका सध्या फक्त वाचक म्हणून फॉलो करतेय. लवकरच साहित्य मागवेन अन कामाला सुरुवात करेन.

अप्रतिम. मूळ कला हातात हवीच पण तुमचे हे भाग तंत्राची खूप सोप्या तर्‍हेने ओळख करून देत आहेत. नक्की प्रयत्न करून पाहणार Happy

vasai.jpg
हे चित्र वसईला ऑन दी स्पॉट केले होते. घरावरच्या तसेच पुढील सावल्या ग्लेझ करुन मिळवल्यात . ती ट्रांस्परंसी राखल्याने सुंदर दिसतात.

खूपच सुंदर! आणि किती तपशीलवार, छोट्या छोट्या बारकाव्यांसह समजावलंय तुम्ही. मस्तच!

सुंदर... असे काही तंत्र वापरले असेल हे पूर्ण झालेले चित्र बघितल्यावर लक्षात येत नाही.

पाटीलसाहेब, मीं तुमचा प्रथमपासून पक्का फॅन आहेच. पण या कार्यशाळेमुळे तुमच्याबद्दलचा आदर द्विगुणीत झाला आहे. माझा असाही सलाम रुजूं करतों -

apatil.JPG

मस्त.
पण सध्या १०-१२ दिवसांपुरता माझा पास. त्यानंतर मात्र रोज एक या जोमाने रंगवणार. Happy

पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी

दृक कला प्रदर्शन २०१४

कला प्रात्यक्षिक

श्री वासुदेव कामत (पोट्रेट पेंटीग)
प्रात्यक्षिक दि. ११/०३/२०१४ सायं.४ वाजता

श्री मुन्ना देसाई (कॅलीग्राफी)
प्रात्यक्षिक दि. १२/०३/२०१४ सायं ४ वाजता

श्री विश्वनाथ साबळे (निसर्गचित्र)
प्रात्यक्षिक दि. १४/०३/२०१४ सायं. ४ वाजता

कला प्रदर्शन

श्री सागर भास्कर (निसर्गचित्र)
श्री प्रमोद कुरळेकर (पोट्रेट पेंटींग)
श्री नितीन मेस्त्री (मूर्तीकार)
श्री राजेशकुमार सिंग (फोटोग्राफर)
सौ. शुभांगी सामत (चित्रकार)

दिनांक ११ ते १४ मार्च...वेळ सकाळी ११ ते १ व दु. ४ ते ८
स्थळ आर्ट गॅलरी.
पु. ल. देशपांडे अकादमी इमारत, प्रभादेवी, मुंबई

प्रवेश विनामूल्य..

भाऊ धन्यवाद .
शैलजा- अशा इफेक्ट साठी येक तर कलर स्कीम त्याल साजेशी म्हणजे थोडी ग्रे स्केल कडे झुकणारी , कमि सॅच्युरेतेड रंग आणि कलर लिफ्टींग करुन धुकं दाखवता येते. तुमच्या कडे असल्यास येखादा फोटो मेल करा मी नंतरच्या योग्य त्या लेखात रंगउन दाखवायचा प्रयत्न करेन.

शैलजा यांनी मेल केलेल्या फोटोत(फोटो मायबोलीकर किरू यांनी पाठवल्याचे त्यांनी मेल मधे नमुद केले आहे) धुक्याची येक चादर आहे मात्र त्यापलीकडे अंधुक असे सुद्धा काही दिसत नसल्याने त्याचे चित्र रंगवणे कठीण होते.
IMG-20131007-WA0000.jpg

मी पहील्यांदा स्केच करुन त्यावर ट्रांस्परन्सी कूठेही जाणार नाही असे पातळ रंग मारून घेतले ( धुक्याच्या भागात दिसणारा एक लालसर पॅच ह वॉश ओला असताना कसलेतरी रिफ्लेक्षन आहे , पेंटींग मधे तो प्लॅट निळसर वॉश आहे)
IMG-20140311-00370.jpg
त्यानंतर टूथ ब्रश स्वच्छ पाण्यात बूडउन ते नुसते पाणी धुक्याच्या भागत स्प्लॅटर केले , त्याने त्या भागात थोडे धुक्यात दिसते तसे वेरिएशन मीळाले (मूळ फोटोत तसे वेरीएशन नाही पण इथे थोडे स्वतःचे अ‍ॅडीशन केले)
IMG-20140311-00373.jpg
नंतर कुठेही शार्प एजेस येणार नाहीत अशारीतीने झाडाचा भाग वेट इन वेट पद्धतीने रंगवला , लँप पोस्ट मात्र चित्र सुकत आल्यावर रंगवले तेथेही हार्ड कडा टाळल्या कारण धुक्यात कुठेही हार्ड कडा दिसणार नाहीत , तसेच कुठेही हार्ड सावली दिसणार नाही

सुरेख चित्र ...
नवीन माहिती वाचल्यावर वाटले की सोपे आहे. पण रंगवायला सुरवात केली आणि हे खूप कठिण असे वाटायला लागले.त्यामुळे काढायला गेले एक आणि .........असे झाले

Pages