३) Autism - लक्षणे व Evaluation

Submitted by Mother Warrior on 7 February, 2014 - 02:03

आधीचे लेख :

पहिला लेख : Autism.. स्वमग्नता..
दुसरा लेख : ऑटीझम(Autism) झालेल्या मुलांशी कसं वागावं/बोलावं/ वागू-बोलू नये?
तिसरा लेख : Autism - लक्षणे व Evaluation

पहिल्या लेखात ओझरता उल्लेख येऊन गेलाच आहे पण या लेखात Autismची लक्षणे खोलात पाहू.

खालील चित्र हे दोन वेगळ्या चित्रांपासून एकत्र केलेले आहे. या लिखाणासाठी मी मराठीमध्ये भाषांतरीत केले आहे( यथाशक्ती).

वरील चित्रातून कल्पना येतच असली तरीही बरीच मोठी लिस्ट असते लक्षणांची. त्यातून ही स्पेक्ट्रम disorder, त्यामुळे प्रत्येक मुल वेगळे, त्याची लक्षणं वेगळी.  http://www.cdc.gov/ncbddd/autism/signs.html

पालकांनी वरील चित्राच्या आधारे आपले मुल हे कोणत्या गोष्टी करत आहे अथवा करत नाही ते पडताळून बघावे. कुठे शंकेची पाल चुकचुकत असेल तर नेटवरती प्रश्नमंजुषा मिळतात. त्याचे नाव : M-CHAT-R (Modified Checklist for Autism in Toddlers, Revised) 

वरील लिंकवर तुम्हाला प्रश्नमालिका मिळेल. मी माझा मुलगा दोन वर्षाचा असताना याच प्रश्नामालीकेवरून माझ्या मुलाचे डायग्नोसीस घरबसल्या  केले होते. डॉक्टरांच्या ऑफिशियल निदानाच्या वेळेस माझी मनाची तयारी होऊ शकली.

इथे मी डॉक्टर म्हणत आहे, पण हा नेहेमीचा लहान मुलांचा डॉक्टर नव्हे. याच्यासाठी शोधला पाहिजे Developmental Pediatrician. पहिल्या  तासा-दीड तासाच्या भेटीत मुलाबरोबर खेळून , आमच्याशी गप्पा मारून वरीलप्रमाणेच प्रश्न विचारले व पुढील भेट निश्चित केली. ही होती जवळजवळ ३ तासाची. यात, developmental pediatrician, clinical psychologist, speech therapist & occupational therapist  इत्यादी तज्ञ उपस्थित होते. सर्वांनी प्रश्न विचारून, मुलाशी खेळून टिप्पणी करून घेतली. एका आठवड्यात या सगळ्या तज्ञसमूहाची बैठक होऊन निदान निश्चित करण्यात आले व आम्हाला बोलावून घेऊन तो निर्णय आमच्याबरोबर डिस्कस करण्यात आला. निदान : "Autism Spectrum Disorder" (Moderate to Severe)

माझ्या मुलामध्ये तेव्हा असलेली व आत्तापर्यंत डेव्हलप झालेली लक्षणं मी इथे नमूद करते.

  1. १.५ वर्षे वयापर्यंत प्रत्येक डेव्हलपमेंटल माईलस्टोन व्यवस्थित , परंतु वृत्ती कायमच अस्थिर व हायपर.
  2. सव्वा वर्षापासून दीड वर्षापर्यंत आम्ही त्याच्या बोलण्याची बरीच वाट पाहिली. हळूहळू अडखळत का होईना प्रगती करत आहे असे वाटत असतानाच तिला अचानक खिळ बसला होता हे आमच्या तेव्हा लक्षात नाही आले. आम्ही कायमच डॉक्टरी सल्ल्यानुसार वाट पाहिली. 
  3. २४व्या महिन्यापर्यंतही बोलेना, तेव्हा श्रवणदोष नाही ना हे तपासून घेतले. (तो नव्हता.) 
  4. मग हळूहळू डेव्हलपमेंटला पिडियाट्रिशिअन वगैरे वगैरे रुतीनामध्ये जाऊन ४ महिन्यांनी निदान झाले. 
  5. हायपर - आपण मुलांसाठी खूप सहज शब्द वापरतो, पण याची हायपर असण्याची लेव्हल प्रचंड वर होती. दुपारी झोपायाचाही नाहे, आणि रात्रीपर्यंत याचा दंगा, सतत इकडून तिकडे पळापळ, सतत डेंजरस वाटेल अशा वागणूकीकडे लक्ष देऊन रात्रीपर्यंत शक्ती उरायची नाही. 
  6. आवडता कार्यक्रम पाहताना हातापायाचे स्नायू ताठरणे. 
  7. hands flapping. पेम्ग्विंस जसे करतात तसे हात सतत उडवणे( flap करणे.)
  8. खाणे : प्रचंड लढा. कारण तोंड अजिबात न उघडणे. कित्येक महिने या मुलाचे केवळ baby formula व Pediasureवर निघाले आहेत. या मुद्द्यासाठी मेन अडथळा होता तो म्हणजे Sensory Integration Disorder. (मी याबद्दल वेगळ्या लेखात लिहीन. खूप व्याप्ती असलेला विषय आहे हा.)
  9. ओळखीच्या लोकांनाही ओळख न दाखवणे.
  10. आई किंवा बाबाच्या एखाद्या कपड्याविषयी अतोनात जवळीक. 
  11. कारच्या चाकाशीच खेळत बसणे.
  12. हाताने एखादी गोष्ट point करून न दाखवणे.
  13. तसेच, आम्ही विमान वगैरे दाखवल्यास कधीच त्या दिशेला न बघणे. 
  14. Toe-walking. पायाच्या चवड्यांवर सतत चालणे/धावणे.
  15. cuddling न आवडणे
  16. इतर मुलांमध्ये न रमणे 
  17. अर्थातच नजरेला नजर नाही. त्यामुळे मोठ्यांचे 'पाहून' शिकणे हा मुद्दा बाद.  
  18. बर्यापैकी हिंसक वागणूक - चावणे, ओरबाडणे, केस ओढणे, डोके आपटणे. डोके कधी दुसर्या व्यक्तीला आपटेल तर क्वचित कधी भिंतीवर. 

इत्यादी.

नशीबाने वय वाढले म्हणून असेल किंवा खरंच ABA चा फायदा होतो म्हणून असेल, पण बिहेविअरल थेरपी चालू झाल्यावर हिंसक वागणूक तसेच इतर काही लक्षणं सौम्य झाली. Thanks to all the therapists!

- स्वमग्नता एकलकोंडेकर.

Without a doubt, this is all written just for the information purpose. It is just a journal of our journey of my son’s Autism. Some things could be wrong or incorrect as I am still learning, and basically because I am not the Medical Doctor. If by reading this blog makes you concerned about your child, you can talk to your doctor about it. If you are planning to try some of the methods or strategies mentioned in the blog, PLEASE keep in mind that it is completely your responsibility and you would always consult your Doctor before proceeding. 

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायो : उपाय म्हणजे हो.. ऑर्गॅनिक फुड जमेल तसे. कारण ते महाग पडते. दुसरी गोष्ट इम्युनायझेशन्स द्यायचीच नाहीत असं ऑटीझम कम्युनिटीत काही पालक करतात. मी अर्थातच ते सजेस्ट करणार नाही.
पण इम्युनायझेशनचे एकत्र शॉट्स देऊ नका. डॉक्टरांच्या ऑफिसात ३-४ वेळा जावे लागले तरी जा, पण एकाच व्हिजिटमध्ये कंबाईन करून देऊ नका. आम्ही ती चूक केली होती. [ वेल, आम्हाला डॉक्टरांनीच सजेस्ट केले तसे करायला. Sad तेव्हा त्यांनी हे पॉसिबल साईड इफेक्ट्स सांगितले असते तर अर्थात आम्ही नसतो त्या वाटेला गेलो. ] तेव्हा तेव्हापर्यंत डॉक्टर म्हणेल ती पूर्वदिशा हा अ‍ॅप्रोच होता आमचा. पण तसे कायमच असले पाहीजे असे नाही हे आम्ही नक्कीच शिकलो.

बायदवे, माझ्या पोस्ट्सनी घबराहट पसरवणे हा माझा आजिबात उद्देश नाही. जमलं तर जागरूकता. पण प्लीज घबरून जाऊ नका. फक्त शक्य तिथे प्रश्न विचारा, शक्य तिथे खबरदारी घ्या.

इम्युनायझेशनवर तुमचा लेख वाचायला मला नक्कीच आवडेल. इथे जर्मनीत सुद्धा पालकांचा एक मोठा वर्ग आपल्या मुलांना अनावश्यक वॅक्सिन्स देऊन घेत नाहीत. त्यामुळे आई वडिलांचा कन्सेंट नसेल तर डॉक्टर सुद्धा वॅक्सिन घ्यायची जबरदस्ती करू शकत नाहीत.

एकत्र म्हणजे एकाच दिवशी एम एम आर, फ्लू, चिकन पॉक्स असे ना? इथे मुलं लहान असताना जनरली तसेच दिले जातात. मी इथे आले तेव्हा शाळेपूर्वी माझ्या मुलीला ७ वॅक्सिन्स एकाच दिवशी दिली गेली होती.
बाकी मागच्या मोठ्या पोस्टमधली बरीचशी माहिती माझ्याकरता नवीन होती. धन्यवाद.

उत्तम लेख....... डिस्क्लेमर आवडला. तुम्ही जरी तुमच्या वैयक्तिक अनुभवाबद्दल लिहित असला तरी याचा प्रत्येक वाचकाला नक्कीच फायदा होईल.
तुम्ही पहिल्या लेखापासूनच जेनी मॅकार्थीचा उल्लेख केलात आणि इथेही काही प्रश्न इम्युनायझेशन/व्हॅक्सिनेशन बद्दल आले. तुमचा प्रतिसाद देखील तुमच्या वैयक्तिक अनुभवातून सांगितलात. पण यावर अधिक संशोधन झाले आहे का? यावर वैद्यकीय तज्ञांचे अधिकृत मत (असल्यास) काय आहे?
(मॅकार्थीचा उल्लेख करण्याचे कारण तिच्या यावरील मतावरून काही प्रमाणात गदारोळ झाला होता)

8 February, 2014 - 00:19 स्वमग्नता, इथला प्रतिसाद, पहिल्या लेखात हल्वाल का? (रिस्क फॅक्टर्स अथव्वा कारणे )

वॅक्सिनेशनः immunization may trigger the onset of autism symptoms in a child with an underlying medical or genetic condition.
प्रत्येक मुलाला वॅक्सिनेशन दिल्यावर ऑटिझम होइलच असे नाही.
फॅमिली हिस्ट्री, गरोदर पणी असलेली आईची अशंत्/असंतुलित मानसिक अवस्था या बाबी काही प्रमाणात कारणीभूत ठरतात.

प्रोसेस्ड फूड्/वेफर्स / कुरकुरे आणि तत्सम यांचे अतिप्रमाणात सेवन यामुळे ऑटिझम झालेल्या मुलांचे रेपिटिटिव्ह बिहेविअर (हात हलवणे/वस्तू गोल गोल फिरवणे/ गिरक्या घेणे/इतर काही जे त्याचे मध्ये आढळुन येते) वाढते.

स्वमग्नता, तुम्हि म्हणता ते बरोबर आहे. इम्युनायझेशनचे धोके असतात. डॉक्टर्स मान्य करणार नाहित. पण असे अनुभव बर्याच जणांना येतात. गर्भारपणि दिलेलि इंजेक्शन्स, आयर्न गोळ्या याचाहि बाळावर परिणाम होतो. कधि कमि कधि जास्त. आणि आपण डॉक्टर नाहि म्हणुन आपण हे सिद्ध करु शकत नाहि. कोणता डॉक्टर सांगतो सगळे धोके? आपल्यालाच वाचावे लागते, विचार करावा लागतो. माझ्या मुलाला एक्झिमासाठि भयंकर साईड इफेक्ट्स असलेलि स्टेरोईड्स दिलि होति. आम्हि आमचे रिसर्च करुन ति बंद केलि. आता साधे moisturizer, साबण वापरुन एक्झिमा कंट्रोल मधे आहे. आपल्या मुलाला काय चालते, नाहि आपणच ठरवावे लागते कधिकधि. at our own risk Sad

स्वमग्नताताई,

१.
>> ऑटीझम ही बेसिकली न्युर्‍ऑलॉजिकल डीसॉर्डर आहे

असं म्हणतात की brain neurons that are fired together are wired together. तर स्वमग्नतेवर या चेतामंडलांच्या (न्यूरल सर्किट्स) दृष्टीकोनातून कोणी चेतातत्ज्ञाने (न्यूरॉलोजीस्ट) प्रकाश टाकला आहे का?

२.
>> परंतू इथे दिल्या जाणार्‍या इम्युनायझेशन शॉट्स मध्ये १९९९ पर्यंट भरपूर प्रमाणात मर्क्युरी असायचे

बापरे, हे कसं चालू दिलं? पारा आणि शिसे ही हमखास प्राणघातक मूलद्रव्ये आहेत. मोठ्यांसाठी सुद्धा. लहान मुलांची तर बातच नको. Sad Angry

आ.न.,
-गा.पै.

इम्युनायझेशनचे एकत्र शॉट्स देऊ नका. >>>> हे ना भारतात ना अमेरीकेत कोणी सांगितलेय आतापर्यंत.
तुम्ही किती अभ्यास केलाय हे लक्शात येतेय.
खुप धन्यवाद तुम्हांला. मी यापुढे जेवढयांना सांगता येईल त्त्यांना हे नक्कीच सांगेन. हा मुद्दा खरेच खुप महत्त्वाचा आहे.

१६ महिन्याच्या इम्युनायझेशन शॉट्स>>>>स्वमग्नता कुठले शॉट्स दिले होते त्यावेळी सांगु शकाल का?

निशदे,

मी जेनी मॅकार्थीची सर्व पुस्तके वाचली आहेत. तिची भाषा जरा आक्रस्ताळी आहे एव्हढा आक्षेप सोडल्यास मला कुठेही तिच्या बोलण्यात वावगं काही आहे हे दिसले नाही. मी प्रत्यक्ष मेडीकल ऑथोरिटीचे म्हणणे काय आहे हे शोधायला गेले नाही, (कारण मला तितका वेळ मिळात नाही. मिळाला तर शोधीनही.) पण जेनी मॅकार्थी व तत्सम लोकांनी ते काम आधीच केले आहे. मला ते वाचायला मिळते.
जेनीच्या एका पुस्तकांत ('मदर वॉरिअर्स' असेच नाव आहे त्याचे) American Association of pediatrics या संस्थेच्या प्रतिनिधींशी तिचे मुद्दे मांडताना दाखवली आहे. तेव्हा त्यात त्यांचा प्रतिनिधी, "ठिके याच्यामधे लक्ष घालू" असे काहीसे बोलताना दाखवला आहे. [ पार्डन माय मेमरी. मला पुस्तक वाचून बरेच दिवस झालेय. पण मतिथार्थ असाच होता. ]

१० वर्षांहून जास्त व्हॅक्सिन्समधील मर्क्युरी बद्दल इतका गदारोळ होत असताना तसेच त्याहून महत्वाचे कितीतरी ऑटीझम झालेल्या मुलांचे पाल्क जर येऊन सांगत असतील की व्हॅक्सिन दिल्याच्या ८ दिवसात पोरगं बदललं, तर विश्वास ठेवायचा नाही? पालकांच्या बोलण्यावर विश्वास का ठेवायचा नाही? सायन्स माणसानेच शोधून काढले ना? ते परिपूर्ण आहे का? रोजच्या दिवसाला नवीन शोध लागत आहेतच ना? मग इतक्या मोठ्या एपिडेमिक म्हणाव्या अशा या गोष्टीकडे गंभीरतेने बघायला नको का?

ही लिंक वाचा. मागील पोस्टमधे लिहीलेल्या फ्लु/एमेम्मार मध्ये मर्क्युरी असते त्याबद्दल. thimerosal अशा नावाने असतो. http://en.wikipedia.org/wiki/Thiomersal_controversy
वेबएम्डीची ही लिंक देखील उपयुक्त आहे : http://www.webmd.com/brain/autism/searching-for-answers/vaccines-autism
(मला माहिती आहे हे वैद्यकिय संशोधन नाही, मला माहिती शेअर करायची असल्याने ही लिंक दिली आहे.)

अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ पेडीयाट्रिक्सची देखील एक लिंक सापडली.. मात्र यात सगळ्यात ऑटीझमचा व वॅक्सिन्सचा काही संबंध नही असेच म्हटले आहे.

Robert w sears - यांचे the autism book वाचा जमल्यास. सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.
जेनी मॅकार्थी केवळ सेलेब्रिटी आहे वा ती आकांडतांडव करते म्हणून ती काय बोलते आहे तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. उलट मी तिला थँक्स म्हणीन, तिने इतका आकंडतांडाव केलाय म्हणूनच लोकांना जरा तरी लक्षात राहीले आहे..

आय विश, याची उत्तरं लवकर मिळतील. मला माहीत आहे, ती वरची अमेरिकन असोशिएशन ऑफ पेडीयाट्रिक्सची लिंक वाचली की लगेच सगळ्यांना हे थोतांड वाटणार आहे. कारण ते ऑफिशिअल स्टेटमेंट आहे. Sad पण इथे पालक जो लढा देतात, बायो मेडीकल ट्र्रिटमेंट देऊन जी मुलं बरी होतात त्यांचे काय मग? (AAP किंवा pediatricians म्हणतात त्याप्रमाणे : 'ओह, बरा झाला? मग तुमच्या मुलाचे डायग्नोसिस चुकले असेल. ऑटीझम बरा होत नाही.. Sad )

असो.मी यातली तज्ञ नाही, पण जमेल तितकं वाचन, अभ्यास जरूर केला आहे. आत्ताच डॉक्टरांच्या ऑफिसात विचारले ८ दिवसापूर्वी, मुलाला फ्लु शॉट्स हवेत का? मी नाही सांगितले.. २-३दा विचारले. भारतात कुठे असतात फ्लू शॉट्स? मला फ्लू झालेला आठवतोय. ४-५ दिवस गेले असतील दुखण्यात अजुन काय झाले? बरं झाले आता मला माहीत आहे, फ्लू शॉट्स मध्ये अजुनही मर्क्युरी आहे. नो वे. डॅमेज इज ऑलरेडी डन. मी त्यात हातभार लावणार नाही.
मर्क्युरी पूर्वी, रूग्णाईतांना त्याची मरणाची प्रोसेस लवकर यावी यासाठी दिला जायचा. तो कितीही छोट्याश्या अमाउंटमध्ये असला तरी तुम्ही तो बाळाला देताय?? मर्क्युरीचा अ‍ॅटम डिरेक्टली ब्रेनकडे आकर्षित होतो.

The Effects of Mercury on Neurons-Study
Researchers at the University of Calgary Faculty of Medicine experimented on neurons by introducing mercury and observing what happened. The results were startling.

Mercury ions attach to the neuron and cause the protective microtubules surrounding the neuron to break down. The unprotected neuron joins other unprotected neurons and they tangle together in clumps. These neurons are now damaged and do not function properly.
रिसोर्स : http://www.fi.edu/learn/brain/metals.html

बराच मोठा झाला प्रतिसाद. सॉरी फॉर दॅट. विषयच जवळचा आहे. शोधवं तितके कमी. एक सिंपल गोष्ट कदाचित मी केली नसती तर आज माझे बाळ व्यवस्थित हसतं, खेळतं, बोलतं, सोशली,इमोशनली हेल्दी असतं हा विचार गप्प बसू देत नाही. झोप लागू देत नाही.. कदाचित त्याच्यात आधीपासूनच ऑटीझमचे ट्रेट्स असतीलही पण व्हॅक्सिन्सने त्या सिम्प्टम्सना पुश मिळतो, ट्रिगर मिळतो हे तर नाकारता येणार नाही Sad

माझ्या ओळखीतल्या एकानेही अमेरिकेतलीच एक केस सांगितली होती. दुसर्‍या वर्षानंतर त्यांच्या मुलात आजार डिटेक्ट झाला (ऑटिझम का ते नक्की मला आठवत नाहीये). नंतर पालकांच्या सपोर्ट ग्रुपमध्ये चर्चा झाली की त्या सुमारास दिल्या गेलेल्या वॅक्सिन शॉट्समध्ये मर्क्युरी आणि अजून एक घटक प्रमाणापेक्षा जास्त आढळला होता. त्यामुळे त्यासुमारास बरीच मुलं अफेक्ट झाली होती.
औषध कंपन्यांवर केस करणं वगैरे झालच, पण संपूर्ण बरे न होणारे आजार झाल्यावर त्या केस जिंकून/ न जिंकूनही काय फायदा ? Sad

लेख तर उत्तम आहेच पण तुमच्या नंतरच्या प्रतिसादांमधून जे मुद्दे कळत आहेत ते फार चिंताजनक आणि गंभीर आहेत.
मनःपूर्वक धन्यवाद ह्या लेखमालिकेसाठी !

अनावश्यक इम्युनायजेशन टाळा +१
एक आई म्हणून मी माझ्या मुलांकरिता अनावश्यक इम्युनायजेशन टाळलंय.
एक डॉक्टर म्हणून मात्रं मी असं जाहिर मत देऊ शकत नाही.

मी स्वतः सुद्धा स्वाईन फ्लूच्या वार्डात काम करत असतानाही एच वन एन वन वॅक्सिन नाही घेतली.
फ्ल्यू करता नॅचरल इम्युनिटीच आली पाहिजे , हेच चिकन पॉक्स, टायफॉईड, हिपॅटायटिस ए, इ, रोटावायरस यांच्याबाबतीत असे माझे वैयक्तिक मत आहे. माझ्या आणि मुलांच्या बाबतीत ते मी पाळू शकते कारण ह्या वॅक्सिन काही कंपल्सरी नॅशनल इम्युनायजेशन शेड्यूलमध्ये नाहीत.
मात्र कुणी सल्ला विचारल्यास 'चेक विथ युअर पेडी' एवढच सांगू शकते.

माझ्या बहिणीच्या ओळखीत अशी एक केस ऐकली होती. मुलगा २ वर्षांचा होता, अगदी नॉर्मल, सर्व माईलस्टोन्स वेळेवर. ६ च महिन्यासाठी अमेरिकेत आले अन प्रोजेक्ट संपवून परत गेले. गेल्यावर मुलाला ऑटीझम असल्याचे निदान झाले. त्या कुटूंबाने तरी इथे अमेरिकेत दिलेल्या इम्युनायझेशन मुळेच झाले असे सांगितले होते.

नमस्कार !
आपली लेखमाला वाचली. आवडली. विशेषतः चित्रलिपीचा चपखल वापर सुरेख आहे. मराठी शीर्षके छान ! खूपच श्रम घेतले आहेत असे दिसते.
माझ्या हार्डडिस्क वर autism या विषयावर अशी भरपूर पीडीएफ बुक्स आहेत जी आपण dropbox द्वारे शेअर करू शकता.
रस असल्यास अवश्य कळवा.
आपल्या उपक्रमास खूपसार्या शुभेच्छा !

स्वमग्नताताई,

तुम्ही दिलेल्या दुव्यावरून स्वमग्नत्व वा तत्सम विकार हे प्रामुख्याने पाऱ्याच्या विषबाधेमुळे उत्पन्न झालेले दिसतात. Sad पारा काढून टाकायला तसेच बिघडलेले न्यूरॉन्स दुरुस्त करायला काही औषध आहे का?

आ.न.,
-गा.पै.

वॅक्सिन काही कंपल्सरी नॅशनल इम्युनायजेशन शेड्यूलमध्ये नाहीत. >>>> साती माझी लेक ३ वर्षाची आहे तिला अशी वॅक्सिन दिली आहेत.

पेन्लेस वॅक्सिन बद्दल तुमच कांय मत आहे, आणि डॉक लहान मुलांना अशी बरीच इंजक्शने देतात ७ इन १ वगैरे टाईप त्याबद्दल कांय मत आहे, शिवाय हे वारंवार पोलीओ डोस असतात त्याचं कांय

आजच मी 'ऑटिझम'- एक बिकट वाट ते वहिवाट हे पुस्तक वाचायला सुरुवात केली, माझ्या मुलाच्या टीचरनी आणून दिलेय मला. एका ऑटिझम असलेल्या मुलाच्या आईनेच लिहिलेय त्यांचे नाव- सुनिता लेले आहे. पुस्तक समजून घेऊन वाचायला मला वेळ लागेल, वाचून झाल्यावर मी इथे लिहीन.

पोलिओ डोस चांगलेच आहेत.
बाकीच्या वॅक्सिअन्सबद्दल(नॅशनल इम्युनायज्र्शन शेड्यूल सोडून) आपापल्या पेडिबरोबर डिस्कस करून घ्या.)

गापै, पारा कारणीभूत असणे ही एक थिअरी आहे.
आणि पारा काही टॉक्सिक लेव्हल इतका नसतो.(नाहीतर सगळ्याच मुलांच्या मेम्दूत बिघाड झाला असता)
काही कारणामुळे वल्नरेबल ब्रेन सेल्स मर्क्युरीमुळे आणखी इनफ्लेम आणि डॅमेज होत असाव्यात अशी थेअरी आहे.

सुरेशशिंदे, चालेल. माझा इमेल अ‍ॅड्रेस : autisminmarathi@outlook.com

गामा पैलवान : असे ब्रेनवर संशोधन चालले असेल, पण औषध निघालेले मी वाचले नाही. कालच एका स्टडीबद्दल वाचले मी, फ्रांस्नमधील एका डॉक्टरांनी उंदरांवर हाय ब्लड प्रेशरचे औशध देऊन ऑटीझमसारखी लक्षणे कमी झाल्याचे निरिक्षण केले.

जरी काही संशोधन असले तरी सगळे फार प्राथमिक लेव्हलला आहे. क्लिनिकल ट्रायल्समध्ये भाग घेण्यास माझे मन धजावणार नाही..

त्यातल्या त्यात बायोमेडीकल अ‍ॅप्रोच बर्यापैकी रूळला आहे, व बर्याच मुलांना त्यांचा काहीनाकाहीतरी फायदा होतो. mB12 चे शॉट्स, कॉड लिव्हर ऑईल, प्रोबायोटीक्स इत्यादी बर्यापैकी चांगले गूण देणारे व कमी रिस्की उपाय ऑटीझमच्या काही लक्षणांवर उपयोगी पडतात.

अन्जू : पुस्तकाबद्दल नक्की लिहा.

सातीअक्का,
कंपल्सरी इम्युनायझेशन, विरुद्ध, गळ्यात मारण्यात येणारी मेंदूज्वर लस इ. बद्दल एक उद्बोधन करून टाका.
इथे थोडे कन्फ्युजन तयार होताना दिसते आहे Happy

उद्बोधन केलेत तर बरेच होईल. माबोवरिल डॉक मंडळि माहिति पुरवतिल जे अन्य डॉक्स करत नाहित, आमच्या सारख्या पालकांना फायदाच होईल.
आपलि लहान लहान मुले आपण डॉक्टर कडे नेतो, ते सांगतिल ति इंजेक्शन्स, औषधे देतो. आणि असे काहि झाले कि कुणाला दोष द्यावा? त्यापेक्शा माहिति मिळवुन निर्णय घेणे उत्तम. so please share your knowledge and opinions.

इब्लिस, उद्बोधन केले तर खरंच बरे होईल. (माझ्या कुठल्या प्रतिसादात कन्फ्युजन दिसले का? तसे असेल तर प्लीज सांगा.)

बायदवे, ही कुठली लस? " गळ्यात मारण्यात येणारी मेंदूज्वर लस "

Pages