लिंबाचे गोड लोणचे -limbache lonche

Submitted by शलाका पाटील on 30 January, 2014 - 03:46
lemon-pickle-limbache-lonache
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ दिवस
लागणारे जिन्नस: 

१२ लिंबं ,
१ किलो साखर (४ मोठ्या वाट्या वरपर्यंत भरून),
मिठ,
३/४ वाटी लाल तिखट,
२ टिस्पून जिरेपूड,

क्रमवार पाककृती: 

१) लिंबं धुवून घ्यावीत. व्यवस्थित पुसून घ्यावी, पाणी राहू देवू नये. मध्यम आकाराच्या फोडी करून त्यातील बिया काढून टाकाव्यात. एका लिंबाच्या साधारण ८ ते १० फोडी कराव्यात.
२) फोडींना मिठ, तिखट, जिरेपूड लावून साधारण ८ दिवस स्वच्छ काचेच्या कोरड्या बरणीत भरून ठेवावे.
साखरेचा १ तारी पाक करावा (१ किलो साखरेला दिड वाटी पाणी). पाक गार करावा. त्या पातेल्यात ८ दिवस मुरवलेल्या लिंबाच्या फोडी घालव्यात. ढवळून बरणीत भरावे.
सर्व लोणचे बरणीत भरले कि बरणीच्या तोंडाशी १ मुठभर साखर घालून झाकण बंद करावे. लोणचे चांगले मुरायला ४-५ महिने लागतात.

अधिक टिपा: 

लिंबं पातळ सालीची घ्यावी. जर लिंब जड़ सलीची असतील तर पाणी एकदम चांगले उकळवावे. गॅस बंद करून त्यात आख्खी लिंबं घालावीत आणि वर झाकण ठेवावे. पाणी गार झाले कि लिंबं व्यवस्थित पुसून घ्यावी आणि एकदोन तास वार्‍यावर ठेवावी म्हणजे पाणी पूर्ण निघून जाईल. मग वरच्या कृतीनेच लोणचे करावे.
limbache lonche recipe in marathi language

माहितीचा स्रोत: 
आई
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिंबाचं गोड लोणचं आवडीचचं पण लोणचे चांगले मुरायला ४-५ महिने लागतात. Sad

हे वाक्य फारच डिप्रेसिंग आहे. एवढा धीर कोणाला धरवणार.

२५ लिंबं धुवून पुसून चांगली कोरडी करून त्याच्या नेहमीप्रमाणे फोडी करायच्या. निघतील तितक्या बिया काढायच्या, राहतील त्या राहू देत. साधारण अर्धी बरणी फोडी झाल्या तर बरणीचा तळ झाकला जाईल इतकं मीठ अंदाजे (साधारण पाव/अर्धा वाटी) घेऊन ते त्या फोडींवर टाकायचं. घराला गच्ची असेल आणि तिथे ऊन्ह येत असतील तर तिथे नाहीतर ती बरणी घट्ट झाकण लावून घरात आत ठेवायची. रोज सकाळी उलटी पालटी करायची. म्हणजे हलवायची. मिठाच्या पाण्यात त्या फोडी ४ दिवसात चांगल्या मूरतात. चौथ्या दिवशी एक किलो साखरेचा एक तारी पाक करायचा.... आणि त्यात एक वाटी (छोटी) लाल तिखट घालायचं आणि हलवायचं. पाक किंचित घट्ट झाला आणि तिखट त्यात नीट मिक्स झालं की त्यात लगेच त्या फोडी घालून भराभर हलवायचं. पातेलं झाकून तसंच ठेवायाच. थंड झालं की बरणीत भरायचं... खायला तयार. Happy

>>> लोणचे चांगले मुरायला ४-५ महिने लागतात.

नाय नाय.. जास्तीत जास्त ७ दिवसांत हे लोणचे तयार होते. हा स्वानुभव..

फोटो भारी आहे.

ज्यांना धीर धरवत नाही त्यांनी बेडेकरांचं तयार लोणचं आणा. चांगलं लागतं ते पण.

सोपं आहे करायला. फोटोही छान आलाय.

केप्र च्या लिंबू लोणच्याला पर्याय नाही. ते जोवर मिळतेय तोवर माझ्याकडून काही लोणचं करणं होणार नाही Proud

वॉव. वरची आणि दक्षिणाची दोन्ही रेसिप्या एकदम लाळगाळू आहेत.

मी झटपट लिंबाचं लोणचं करते. लिंबं चिरून बिया काढून टाकायच्या आणि पाणी न घालता कूकरला शिजवून घ्यायच्या. शिजून गार झाल्यावर मिक्सरमधून लगदा Wink करून घ्यायचा. जितका लगदा असेल त्याच्या दुप्पट साखर आणि चवीपुरतं मीठ मिक्स करून गॅसवर दोन चटके द्यायचे.

उपासाला हवं असेल तर त्यात आलं किसून, जिरं आणि तिखट घालायचं.
उपासाला नको असेल तर लोणचं मसाला घालायचा.

निम्मा गूळ आणि निम्मी साखरही घालू शकतो. त्यामुळे लोणच्याला वेगळीच चव येते. मला आवडते Happy

हे झटपट लोणचं चिकार टिकतं. मी एकावेळी डझन लिंबांचं करते. संपलं की परत करते. काहीच खटपट नाही. त्यामुळे लोड घ्यायची गरज नसते Happy

आजच केलंय. जमलं तर फोटो टाकते.

Dakshina I mixed sugar first and then tikhat, jeere ani aale mixer madhe firavun add kele ani sagale ektra shijavale. Sorry mobile varun marathi kasa type kartat mahit nahi Sad

चिवा, लिंबाची बी चुकून वाटली गेली असेल तर कडसर लागेल.
लोणचं बाहेर ठेव, फ्रीजमध्ये नको. मुरेल तसतसा हा कडसरपणा जाईल.

दक्षिणे, उशीर झाला हे सांगायला Happy पण चटका देतानाच त्यात तिखट/ आलं/ जिरेपुड/ लोणचं मसाला वगैरे घालायचं.

Pages