Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.
मित अॅड आवडली पण जाहिरातीतुन
मित अॅड आवडली पण जाहिरातीतुन काय संदेश दिलाय ते कळलं नाही.<<<संदेश कसला डोंबलाचा? एका अर्बन कुटुंबाच्या सकाळची कहाणी दाखवली आहे. थोडी गमतीशीर. त्यातही बाबा उठून लेकाचे सर्व आवरतो वगैरे आहेच की. उत्पादने विकणे हा जाहिरातीचा मुख्य उद्देश. >> १०० टक्के अनुमोदन....
सर्वात भारी त्या अमूलच्या
सर्वात भारी त्या अमूलच्या जाहिरातीत काय असेल तर डिटेलिंग! बाबा मुलाचं कसं आवरतात आणि तीच कामं आई कशी करते हे पाहिलंत? पोराच्या डब्यातलं सॅन्डविच पहा!
पोरगं खूप्प्प्प्प्प्प्प्च क्यूट आहे ते 
सैफची लेटेस्ट अमुल माचो ची
सैफची लेटेस्ट अमुल माचो ची अॅड बघितली.. चोर घरात शिरतात आणी मग हा त्यांच्या आईला फोन लावतो मग चोर सगळ्या वस्तु एकेक करुन ठेवुन जातात, जाताना हा बोलतो, जरा लाईट ऑफ कर के जाना..
असे होतो २ मिनीटं...
काहीही अॅड.. बघितल्यानंतर आम्ही
सॅन्डविच >>>> पूनम +१
सॅन्डविच >>>>
पूनम +१
सैफची लेटेस्ट अमुल माचो ची
सैफची लेटेस्ट अमुल माचो ची अॅड मी अजून नाही बघितली पण अमुल माचोच्या सर्वच अॅड्स प्रचंड डोक्यात जातात. अजीबात आवडत नाहीत.
मला ती लहान मुलांचा डान्स
मला ती लहान मुलांचा डान्स असलेला ढिंक चिका ची जाहिरात आवडली.
क्युट नाचतात सगळे आनि शेवटचा मोठा असलेला पण छोटा झालेला मुलगा पण छान नाचलाय 
संदेश कसला डोंबलाचा? त्यातही
संदेश कसला डोंबलाचा? त्यातही बाबा उठून लेकाचे सर्व आवरतो..
>> संदेश म्हणजे समाजोपयोगी इ. नाही गं.. म्हणजे अमुल फॅमिली म्हणत आहेत तर 'अमुलची सर्व उत्पादने कशी एका फॅमिलीचा अविभाज्य भाग बनुन राहिली आहेत' अश्या टाईपचा संदेश. म्हणजे कदाचित मी अमुलची जास्तीत जास्त उत्पादने अॅड मध्ये एक्स्पेक्ट करत होते. (अशीच 'युनिलिव्हर फॅमिली' म्हणुन अॅड करायची झाली तर काय काय दाखवता येईल हे मनात आलं क्षणभर).
सर्वात भारी त्या अमूलच्या जाहिरातीत काय असेल तर डिटेलिंग! बाबा मुलाचं कसं आवरतात आणि तीच कामं आई कशी करते हे पाहिलंत?
>> यस्स्स्स... १०० मोदक. तुला सँडविच लक्षात राहिलं? मला अंघोळ घालतांनाचं वेगळेपण एकदम लक्षात आलं आणि लक्षात राहिलं.
मला ती लहान मुलांचा डान्स
मला ती लहान मुलांचा डान्स असलेला ढिंक चिका ची जाहिरात आवडली.
>> मलापण.
अमुल फॅमिली म्हणत आहेत तर
अमुल फॅमिली म्हणत आहेत तर 'अमुलची सर्व उत्पादने कशी एका फॅमिलीचा अविभाज्य भाग बनुन राहिली आहेत' अश्या टाईपचा संदेश. <<< सकाळच्या वेळात अमूलची काय काय उत्पादने वापरणार? आता सक्काळीच उठून कुणी आईस्क्रीम खाणार नाही. अमूल दही काय कुणी ब्रेडला लावणार नाही. दूध-चीझ-बटर हेच तर अमूलचे फ्लॅगशिप ब्रॅन्ड आहेत. चीझ आणि बटरशी अमूलचं नाव भारतात इत्कं जोडलं गेलंय की आजही हॉटेलात "अमूल पावभाजी" आणि "अमूल चीज सॅन्डविच" असे मेनू दिसतात.
पूनम, हो. ते डिटेलिंगच त्या अॅडचा युएसपी आहे खरंतर. मला जाहिरात त्यासाठीच आवडली.
कॉन्ग्रेसची भारत निर्माणची जाहिरात आतिशय कन्फ्युजिंग केलेली आहे. प्रगती झाली हे दाखवण्याऐवजी "आधी काय होते" हे दाखवायच्या नादांत एकदम निगेटीव्ह ईफेक्ट घेऊन येते कारण, बहुतांश ठिकाणी आधीची परिस्थिती आहेच अद्याप.... बेक्कार कन्सेप्ट आणि बेकार एक्झिक्युशन. (यांचं फील गूड होऊ नये म्ह्णजे मिळवली)
अगदी अगदी, ती भारत निर्माण्ची
अगदी अगदी, ती भारत निर्माण्ची अॅड काय झेपलीच नाय!
त्या अॅड मध्ये अमूलची बरीच
त्या अॅड मध्ये अमूलची बरीच उत्पादने दाखवली आहेत. अगदी ताज्या दुधापसून टेट्रापॅक दुधापर्यंत. आणि अमूल बटर पासून चीझ स्प्रेड पर्यंत.
जेव्हा आई सँडविच करत असते तेव्हा बाजूला ३-४ अमूलची उत्पादने आहेत.
त्या अॅड मध्ये अमूलची बरीच
त्या अॅड मध्ये अमूलची बरीच उत्पादने दाखवली आहेत. अगदी ताज्या दुधापसून टेट्रापॅक दुधापर्यंत. आणि अमूल बटर पासून चीझ स्प्रेड पर्यंत.
जेव्हा आई सँडविच करत असते तेव्हा बाजूला ३-४ अमूलची उत्पादने आहेत.>>> फ्रिजमध्ये फ्लेवर्ड मिल्कच्या बाटल्यापण दाखवल्या आहेत.
सैफची लेटेस्ट अमुल माचो ची
सैफची लेटेस्ट अमुल माचो ची अॅड मी अजून नाही बघितली पण अमुल माचोच्या सर्वच अॅड्स प्रचंड डोक्यात जातात. अजीबात आवडत नाहीत.>>>> +१. कैच्याकैच असतात त्या अॅड्स...
किटकॅट्ची छोट्या मुलांची अॅड मस्त आहे...
कॉन्ग्रेसची भारत निर्माणची
कॉन्ग्रेसची भारत निर्माणची जाहिरात आतिशय कन्फ्युजिंग केलेली आहे. प्रगती झाली हे दाखवण्याऐवजी "आधी काय होते" हे दाखवायच्या नादांत एकदम निगेटीव्ह ईफेक्ट घेऊन येते कारण, बहुतांश ठिकाणी आधीची परिस्थिती आहेच अद्याप.... बेक्कार कन्सेप्ट आणि बेकार एक्झिक्युशन. (यांचं फील गूड होऊ नये म्ह्णजे मिळवली)>>>>+१००१
अतीशय बंडल !! काही च्या काही...मोबाईल गेल्या १० वर्षात आला ????? आधी चे दिवस काय Con-Men
म्हणजे Congress वाले झोपा काढत होते की काय ???
http://en.wikipedia.org/wiki/Telecommunications_in_India
1995 – First mobile telephone service started on non-commercial basis on 15 August 1995 in Delhi. असे स्पष्ट लिहिले आहे...
हो, त्या 'भारत निर्माण'
हो, त्या 'भारत निर्माण' जाहिराती का-ही-ही आहेत.
सध्याची ती ओएलएक्सची जाहिरात
सध्याची ती ओएलएक्सची जाहिरात छान आहे. घरापुढे अनेक चपला असल्याचं पाहून ‘म्हातारा’ गेला असे त्या जोडप्याला वाटते. ते त्याच अँगलने बोलतात. पण नंतर म्हाताराच चड्डीवर दारात उभा राहिल्यावर ती म्हणते, नया सामान लेने से पहले पुराना सामान लोग ओएलएक्सपर बेच देते है. हा शेवटचा पंच भारी आहे.
सध्याची ती ओएलएक्सची जाहिरात
सध्याची ती ओएलएक्सची जाहिरात छान आहे. घरापुढे अनेक चपला असल्याचं पाहून ‘म्हातारा’ गेला असे त्या जोडप्याला वाटते. ते त्याच अँगलने बोलतात. पण नंतर म्हाताराच चड्डीवर दारात उभा राहिल्यावर ती म्हणते, नया सामान लेने से पहले पुराना सामान लोग ओएलएक्सपर बेच देते है. हा शेवटचा पंच भारी आहे. >> मला कळलीच नाही ती अॅड...
मला कळलीच नाही ती अॅड... >>
मला कळलीच नाही ती अॅड... >> मलापण
जाह्नवी, पियू, मला कळलीच नाही
जाह्नवी, पियू,
मला कळलीच नाही ती अॅड... >> मलापण >>
परत एकदा बघा... आता कळेल
भारत निर्माण पाठोपाठ राजीव
भारत निर्माण पाठोपाठ राजीव आवास योजना आणि राहुल गांधींच्या अॅडने डोकं उठवलं आहे. राहुल गांधी त्या फोटोमध्ये किती बावळट दिसतोय आणि त्याचे युवा कॉंग्रेस नेते काय बोलतात त्याला ताळतंत्रच नाहीये.
हातात चहाचा कप घेऊन जो माणूस बोलतो तो बहुतेक विरूद्ध पार्टीचा प्रचार करतोय, कारण राहुल गांधीपेक्षा चहावाला जास्त वेळ दिसत रहतो
पण कंटेंटवाईज फार वाईट जाहिराती आहेत.
नंदिनीला अनुमोदन, खरंच डोकं
नंदिनीला अनुमोदन, खरंच डोकं उठवलय ह्या addsनी.
भारत निर्माण पाठोपाठ राजीव
भारत निर्माण पाठोपाठ राजीव आवास योजना आणि राहुल गांधींच्या अॅडने डोकं उठवलं आहे. राहुल गांधी त्या फोटोमध्ये किती बावळट दिसतोय आणि त्याचे युवा कॉंग्रेस नेते काय बोलतात त्याला ताळतंत्रच नाहीये.
हातात चहाचा कप घेऊन जो माणूस बोलतो तो बहुतेक विरूद्ध पार्टीचा प्रचार करतोय, कारण राहुल गांधीपेक्षा चहावाला जास्त वेळ दिसत रहतो फिदीफिदी+ १०००
पाचशे कोटी खर्चून राहूलची प्रतिमा उजळवण्याऐवजी मलीन करताहेत...इतरही जाहिराती त्यांनी काय केलं हे सांगण्यापेक्षा काय नव्हतं हे सांगणाऱ्याच आहेत. पंधरा वर्षांपासून यांचंच राज्य आहे ना. मग??
नंदिनी ताई.....भारत निर्माण
नंदिनी ताई.....भारत निर्माण पाठोपाठ राजीव आवास योजना आणि राहुल गांधींच्या अॅडने डोकं उठवलं आहे >>>>> +१००० पण त्या हुन ही टुक्कार अॅड्स आहेत च की.
ती नवीन sensodyne ची अॅड् अशीच बंड्ल.
म्हणे तुमच्या दातांत सणक येते का ?? सणक ???????
माझ्या डोक्यात सणक गेली... त्या अॅड चा निर्माता आणि त्याचा Translator भेटु दे एकदा मला....मग दाखवितो त्यांना मी माझा नागपुरी ईंगा..आणि सणक कशी येते ते !!! पराकोटी चा
काल कोणच्या तरी बिस्कीटाच्या
काल कोणच्या तरी बिस्कीटाच्या झायरातीत 'माझ्याकडे पाच रुपयाचा शिक्का आहे' असे वाक्य ऐकले, आता तो शिक्का काय दुकानदाराच्या कपाळावर मारायचा का?
ती नवीन sensodyne ची अॅड्
ती नवीन sensodyne ची अॅड् अशीच बंड्ल.>>>>>> +१११
ती युकेतल्या डॉक्टरची ना? नंतर म्हणतो नसीपर्यंत जाऊन शांत करतं :रागः अरे काय हे मराठी ?
ती नवीन sensodyne ची अॅड्
ती नवीन sensodyne ची अॅड् अशीच बंड्ल.>>>>>> +१११
ती युकेतल्या डॉक्टरची ना? नंतर म्हणतो नसीपर्यंत जाऊन शांत करतं :रागः अरे काय हे मराठी ?>>>>>>>>>>>>>>>>>.. सेन्सोडाईन वापरणारे सारे भारतीय डॉक्टर्स युके मधलेच असतात...
येस अनिश्का ... मी पण बघितलंय
येस अनिश्का ... मी पण बघितलंय खूप वेळा
सरकारी जाहिरातीचा अतिमारा
सरकारी जाहिरातीचा अतिमारा सुरुय राव..
कन्टाळलो.
सरकारी जाहिरातीचा अतिमारा
सरकारी जाहिरातीचा अतिमारा सुरुय राव..
कन्टाळलो
>>>>>>>>>> तुम्हाला अनुमोदन झकासराव !!!
दातात भाजी अडकलेली असते, ती जाहीरात किती बवकास आहे
अनिश्का, अंजली_१२>>>>> हो हो
अनिश्का, अंजली_१२>>>>> हो हो तीच ती नवीन sensodyne ची अॅड्.
म्हणे तुमच्या दातांत सणक येते का ?? आणि बरोब्बर......नंतर म्हणतो नसीपर्यंत जाऊन शांत करतं......
Pages