मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'डिओडरंट' फक्त पोरी पटवण्यासाठीच लावायचा असा समज हळु हळु नव्या पिढीत पसरत जातोय.>>> अर्जुन रामपालची पण अशीच काहीतरि अ‍ॅड आहे ना

अर्जुन रामपाल म्हणतो की फ्रेश स्टार्ट करायला डिओ वापरा. बाकी सर्व आपल्या हिंमतीवर मिळवा. "डिओ लावा, पोरगी पटवा" टाईप्स अ‍ॅड्सना चांगलं उत्तर आहे.

प्रेस्टिज कुकरची अभिषेक आणि अ‍ॅशची अ‍ॅड बोअर वाटतेय. दोघेही ओव्हरअ‍ॅक्टींग करताहेत. प्रेस्टिजवाल्यांनी कोणाला पैसे दिलेत आणि त्यावर कोण फ्री मिळालंय सांगणं कठिण आहे.

प्रेस्टिज कुकरची अभिषेक आणि अ‍ॅशची अ‍ॅड बोअर वाटतेय. दोघेही ओव्हरअ‍ॅक्टींग करताहेत. प्रेस्टिजवाल्यांनी कोणाला पैसे दिलेत आणि त्यावर कोण फ्री मिळालंय सांगणं कठिण आहे.>>>>> अगदी अगदी.

प्रेस्टीजची अ‍ॅड बोअर वाटतेय.>>>>+११
काय पकाऊ वाटतायत दोघे. ऐश्वर्या तर कुठ्ल्याच अँगलने किचन मधे काम करतेय असं वाटत नाही.
बळंबळंच कुकर मधे काहीतरी ठेवून शिट्ट्या काढताहेत. Happy

'डिओडरंट' फक्त पोरी पटवण्यासाठीच लावायचा असा समज हळु हळु नव्या पिढीत पसरत जातोय.
<<
अहो,
"तुझ्या अंगाला घाण वास मारर्तोय. एकतर आंघोळ कर नैतर हा स्प्रे घे विकत." अशी जाहिरात केली तर तुमचा डिओ कुणी घेईल का विकत?
या पोट्ट्यांना रोजचे रोज स्वतःचे सॉक्स धुवायला शिकवा. मग डीओचा खर्च कमी होईल आपोआप.

इब्लिस, सध्याच्या डिओच्या जाहिरातींमधुन 'डिओडरंट' फक्त पोरी पटवण्यासाठीच नाही तर त्याहीपेक्षा पुढे जाण्यासाठी लावायचा असतो अस दाखवत असतात..... एका जाहिरातीत समोरच्या खिडकीतल्या माणसाच्या डिओच्या वासाने लग्नाच्या पहिल्या रात्रीच नववधु नवर्‍याशी प्रतारणा करण्याच्या विचारात असलेली दाखवली आहे. आठवा जाहिरातीचा शेवट..... डिओच नाव नाही आठवत आहे आता.
अर्जुन रामपाल म्हणतो की फ्रेश स्टार्ट करायला डिओ वापरा. बाकी सर्व आपल्या हिंमतीवर मिळवा. "डिओ लावा, पोरगी पटवा" टाईप्स अ‍ॅड्सना चांगलं उत्तर आहे.>>>> स्वप्ना खरच असच हव आहे काहितरी.

फाईव्ह स्टार- 'पिताजी की पतलून' घेऊन रमेश आणि सुरेश घरी येतात...>>
अगदी अगदी... आणि पिताजी ती पतलून घालून आरशात बघतात आणि मागच्या बाजूला मोलकरीण हसते ते दृश्य तर अप्रतिम... या ‌जाहिरातीचे सर्व सिक्वेल चांगले आहेत.

सध्याची एशियन पेण्ट्सची जाहिरात मला खूप आवडते. एक आर्मी ऑफिसर आपल्या नवपरिणित बायकोला घेऊन आपल्या घरी येतो, ती...>>+++++++++११११११११११११११

भारती अक्सा लाईफ ची पण जाहीरात मस्त्त आहे. ते काका किती क्युट हस्तात फोटो काढतांना.. म्हण्जे तो फोटोग्राफर हसवतो... त्यांना Happy

अजून एक आवडलेली जाहिरात...त्रिभुवनदास भिमजी जवेरीची.
मुलगी आणि वडलांचं नातं मस्त दाखवलय...आकांक्षा सिंग सुंदर दिसतेय!!

http://www.youtube.com/watch?v=7qqWrmU_Kjk

भ्रमर........

मस्तच .......... अत्यंत सुचक जाहीरात आहे......

काही मोजक्याच शब्दातुन अख्खा मागचा पुढचा जीवनपट उलगडतो...

झी मराठी वर गेले काही दिवस "घंट्याला मिळणार सोनं" या जाहिरातीने उत आणला आहे. अगदी पकाउ. आणि तो भाऊ कदम का कोण तो सध्या जरा अतीच फोफावलाय…

तनिष्कची नवी जाहिरात पाहिली का? मला खूपच आवडली... सावळ्या वर्णाची वधू आणि तिचं दुसर लग्न असा विषय घेऊन केलेली.. खूपच सुंदर... कालच्या मिड-डे पेपररमध्ये वेगळ्या विषयांवरच्या जाहिरातींबाबत एक सुंदर लेख आलाय.. लोकांची बदललेली मत आणि त्याला एन्कॅश करणा-या जाहिराती...adguru प्रल्हाद कक्कर आदींनी मतं मांडली आहेत.. जरूर वाचा...!

Pages