मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हायला थँक्स उदयन.. Happy

पण मला पहिलीच सगळ्यात जास्त आवडली. गुगलमुळे 'हरवलेले दोन मित्र खुप वर्षांनी एकमेकांना भेटले' हे गुगलमुळे 'शुगर फ्री हलवा आणी रसगुल्ला बनवता आला' किंवा 'लाईट गेलेले असतांना सुद्धा क्रिकेटचा स्कोर बघता आला' यापेक्षा खुप जास्त अपीलींग आहे.

मिलिंद सोमणची अ‍ॅड खरंच कैच्या कैच आहे.

एक अ‍ॅड पाहिली. त्यात एक छोटा मुलगा जोराने ओरडत बाहेर येतो, काय झालं ते बघायला त्याचे वडिल आत जातात आणि ते पण 'मम्मी मम्मी' असं ओरडत बाहेर येतात. दोघांच्या ओरडण्याचं कारण पाहिलं की हसायलाच येतं. मस्त अ‍ॅड होती. पण फक्त एकदाच पहायला मिळाली. कुठल्या ब्रॅन्डची अ‍ॅड आहे? ब्रॅन्ड आठवत नाही म्हणजे जाहिरातीचा उद्देश फ्लॉपच झाला नै?

आयडीबीआयची ती छोटी मुलगी आणि मुलगा बसलेले असतात ती अ‍ॅड फार आवडली. पण बॅकांचे व्यवहार पहाता 'बॅन्क ऐसा दोस्त जैसा' वगैरे मेसेज पोकळ वाटतात.

इसमे गरमी बोहोत है वाली विंटर वेअरची अ‍ॅड, तो स्वेटर त्या माणसाल मारतो, त्या प्रोडक्टच नावं काय आहे? Uhoh
मी विसरले

प्राची + १०० Happy
ती आयेगा आयेगा गाणवाली मंत्रा.कॉम ची जाहीरात अजिबात नाही आवडली.. त्या गाण्यामुळे..त्या आवाजामुळे..

पण बॅकांचे व्यवहार पहाता 'बॅन्क ऐसा दोस्त जैसा' वगैरे मेसेज पोकळ वाटतात. >> +१

हे कुठे लिहु हे कळत नव्हतं पण जाहिरातींविषयी आहे म्हणुन इथे टाकतेयः

ते लहान मुलांच्या प्रोडक्ट्स 'लिबेरो' ची जाहिरात पाहिली का कोणी? त्यात अगदी पहिल्या शॉटमध्ये मला आणी माझ्या घरच्यांना झाला तसा 'जिया खान'चा भास झाला का कोणाला?

बाकी ते "इतकं सोपं की.. चुंबन घेणं आणी कुरवाळणं" हे भाषांतर मला अगदी विचित्र वाटलं ऐकायला.

हो पियू परी, लीबेरोची add पहिल्यांदा बघितली तेव्हाच मला, ती जिया खान आहे असे वाटले. तीच आहे बहुतेक (नक्कीच ती आहे).

फेअरनेस क्रीमच्या अ‍ॅड कधीच आवडल्या नाहीत पण आता डोक्यात जायला लागल्या आहेत. गोरं होणं म्हणजे आयुष्याची इतिकर्तव्यता आहे असंच दाखवतात त्यात. Angry

काल टायटनची अ‍ॅड पाहीली.
सरांना बर्थडे गिफ्ट म्हणुन टायटनच वॉच देतात. मस्त झालीय ती अ‍ॅड मला आवडली.

गोरं होणं म्हणजे आयुष्याची इतिकर्तव्यता आहे असंच दाखवतात त्यात<< अगदी गंमत म्हनजे हे इतके दिवस स्त्रियांसाठी होतं आता पुरूषांसाठी पण चालू झालं आहे. शाहरूख खानसारख्या अभिनेत्याने असल्या जाहिराती केल्याचे बघून फार मजा वाटली, याच्या टॅलंटपेक्षा गोरेपणा जास्त महत्वाचा.

शा खा च्या फेअरनेस क्रीमच्या अ‍ॅडमधला पहिलवान काय त्या क्रीमनी अंघोळ करतो का? पहिल्यांद्या आख्खा काळा दाखवलेला मग हात पण येकदम चकाचक गोरे गोरे.... काय पण
ओरीओ बिस्कीटची रणबिर कपुरची अ‍ॅड मस्त आहे.

काल टायटनची अ‍ॅड पाहीली.
सरांना बर्थडे गिफ्ट म्हणुन टायटनच वॉच देतात. मस्त झालीय ती अ‍ॅड मला आवडली.

>> मलापण. अजुन एक म्हणजे ते स्टेशनरीच्या साध्या साध्या वस्तूतून (पट्टी, वही इ.) संगीत तयार करतात हे फार आवडले.

सगळेच जण डिओच्या जाहिराती हिडिस प्रकारे करत असताना, नवीनच आलेल्या एका डिओची जाहिरात आवडली. ब्रॅन्ड आठवत नाही, जाहिरातीत श्रद्धा कपूर आहे आणि हेमंत कुमारांचं "बेकरार करके हमे यू ना जाईए" गाणं बॅकग्राउंडला आहे. गाणं रिमिक्स असलं तरी कानावर अत्याचार करणारं नाही वाटलं. एकंदरच जाहिरात आवडली...

Pages