गाओ मॅरॅथॉन २०१४ : ..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ६)

Submitted by मामी on 6 January, 2014 - 22:07

मायबोलीकर, सर्व प्रथम तुम्हा सगळ्यांना नविन वर्षाच्या शुभेच्छा!

गाओ, अर्थात गाणे ओळखा!.

तर तो/ती कोणतं गाणं म्हणेल? या धाग्यांतर्गत आज दिवसभर एक कोड्यांची मॅरॅथॉन आयोजित केली आहे. आज भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजल्यापासून दर तासाला नवनविन कोडी इथे दिली जातील. तुम्हा सगळ्यांना ही कोडी डीकोड करायची आहेत. म्हणजे त्यातली गाणी ओळखायची आहेत.

बक्षिसं तर आहेतच अर्थात.....

तर थोड्याच वेळात मॅरॅथॉन सुरू होत आहे. लक्ष ठेवा! लक्ष ठेवा!! लक्ष ठेवा!!!

- टीम : जिप्सी, स्वप्ना_राज, माधव, मामी

**********************************************************************************************************
१. कोड्यांना क्रमांक दिले आहेत. उत्तरे लिहिताना तो क्रमांक नमुद करावा.
२. जी पहिले बरोबर उत्तर देईल ती व्यक्ती विजेती ठरेल.
३. लागोपाठ दोन बरोबर उत्तरं आली तर त्यातील ज्या पहिल्या उत्तरात कोड्याचा योग्य क्रमांक नमुद केला आहे ती व्यक्ती विजेती ठरेल.
४. नविन कोडी हेडर मध्ये टाकली जातील. जी कोडी सुटतील ती हेडरमधून खाली प्रतिसादांत हलवली जातील. त्यामुळे कोडीत्सुकांनी प्रामुख्याने हेडरवर लक्ष ठेवावे.
५. कोडी लगेच सुटली नाहीत तर क्ल्यू दिले जातील. ते देखिल हेडरमध्येच टाकले जातील.
६. बक्षिसांबद्दल कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही.
७. ऐकूणच कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही.
८. आक्षेप नोंदवण्यास सक्त मनाई आहे.

**********************************************************************************************************

सर्व भाग घेणार्‍यांचे आणि विजेत्यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन!!!

गाओ मॅरॅथॉन २०१४ मध्ये मंगळवार दिनांक ७ जानेवारीला (भा.वे.नु) ९.०० वाजल्यापासून ते बुधवार दिनांक ८ जानेवारीपर्यंत (भा.वे.नु.) ११.३० पर्यंत एकूण ४५ कोडी विचारली होती.

कोडी बनवण्याची जबाबदारी घेतली होती टीम मेंबर्सनी - स्वप्ना_ राज (१४ कोडी), जिप्सी (१७ कोडी), माधव (२ कोडी) आणि मामी (१२ कोडी).

कोडी सोडवण्याची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली : अश्विनी के (२ कोडी), झकासराव (१), श्रद्धा (१६), भरत मयेकर (८), मॅक्स (१), PracheeS (१), स्निग्धा (३), केदार जाधव (१), चमन (१), झिलमिल (७), साती (१), केया (१), स्वाती_आंबोळे (३), इश्श (१) यांनी.

बक्षिसं जिप्सी यांनी स्पॉन्सर केली होती.

आशा आहे की आपण सगळ्यांनी या मॅरॅथॉनचा मनापासून आनंद लुटलात. (आम्ही तरी एंजॉय केलं बुवा!)

आमच्या टीमतर्फे पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोडं क्र ४१ : जिप्सी --> झिलमिल

उत्तर :

ये चांद सा रोशन चेहरा
जुल्फों का रंग सुनेहरा
ये झील सी निली आंखे
कोई राज है इनमे गहरा
तारीफ करूं क्या उसकी
जिसने तुम्हे बनाया

कश्मिर की कली (१९६४)
http://en.wikipedia.org/wiki/Kashmir_Ki_Kali
http://www.youtube.com/watch?v=txv7RCe8DXM

कोडं क्र. ४२ : स्वप्ना_राज --> स्वाती_आंबोळे

"मी नोकरीचा राजीनामा देतेय" तिनं त्याच्या हातात तिच्या राजीनाम्याचं लेटर देत म्हटलं.

"अगं पण का? आता दुसरी नोकरी शोधणार आहेस का तू?" त्याला धक्काच बसला होता.

"शोधणार आहे कशाला? आधीच मिळालीये. पुढच्या आठवड्यापासून मी वर्ल्ड हेल्थ ऑरगायझेशन जॉईन करत आहे. तिथे मला खूपच ब्राईट प्रॉस्पेक्ट्स आहेत."

"हो, मला कळतंय हे पण इथे मीच काय ऑफिसमधली सगळीच लोकं तुझ्यावर किती प्रेम करायची? तसं वातावरण तुला तिथे मिळणार आहे का?" त्यानं कळवळून विचारलं

"......." ती गप्पच.

"सांग ना!" असं म्हणून त्यानं तोच प्रश्न पुन्हा एकदा गाण्यातून विचारला......

उत्तर:

हमने तुझको प्यार किया है जितना,
कौन (WHO - वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) करेगा इतना

दुल्हा दुल्हन (१९६४)
http://en.wikipedia.org/wiki/Dulha_Dulhan
http://www.youtube.com/watch?v=0aBVQyn7Fqc

@ झिलमिल
४५: उनसे मिली॑ नज़र के मेरे होश उड गए? >>> नाही.

@ असामी

४५ :

येह आंखे देखकर हम सारी दुनिया भूल जाते है

अमित देशपांडे असल्यामूळे येह काली काली आंखे, येह गोरे गोरे गाल लावायचे का ? >>> दोन्ही नाही.

कोडं क्र. २८ : मामी --> झिलमिल

केरळमधील बोटमहोत्सवाचा दिवस. किनार्यावर ही तोबा गर्दी जमलेली. त्या गर्दीत पहिल्यांदाच ही स्पर्धा पहायला आलेले लोकही होते. अशाच एकाने पहिलटकराने ही स्पर्धा नक्की कशी घेतली जाते असा प्रश्न एका स्थानिकाला विचारला.

'त्या दूरच्या टोकापासून स्पर्धा सुरू होईल. खूप लांब आहे स्टार्टिंग पॉइंट पण आपल्याला बंदुकीचा आवाज ऐकू येईल. मग सगळे सपासप बोट चालवत इथे येतील तेव्हा आपल्याला दिसतील. इथूनच पुढे स्पर्धा संपेल. आणि जो पहिला पोहोचेल त्या ग्रुपला लगेच बक्षिस देण्यात येईल.' स्थानिकानं उत्तर दिलं.

'पण आपल्याला कसं कळणार कोणाला बक्षिस मिळालं ते?' पाहुण्यानं शंका उपस्थित केली.

'सोप्पं आहे.....' असं म्हणून त्या स्थानिकानं चक्क एक हिंदी गाणं म्हणून दाखवलं आणि पहिल्या आलेल्या नशिबवान गृपला ओळखण्याची खूण सांगितली.

उत्तरः

Rowते हुए आते है सब
हंसता हुआ जो जायेगा'
वो मुकद्दर का सिकंदर
जानेमन कहलायेगा

मुकद्दर का सिकंदर (१९७८)
http://en.wikipedia.org/wiki/Muqaddar_Ka_Sikandar
http://www.youtube.com/watch?v=RuQMjuvMugk

३६ : शीशी भरी गुलाब की पथ्थर पे फोड दूं
तेरी गली न छोडूं दुनिया मैं छोड दूं
आंसूं की डोर से पिया माला का काम लूं
करके बहाना रम का तेरा मिअं नाम लूं

कोडं क्र. ३६ : जिप्सी --> भरत मयेकर

उत्तर :

शीशी भरी गुलाब कि पत्थर पे तोड दू
तेरी गली ना छोडु दुनिया मैं छोड दु
सांसो की डोर से पिया माला का काम लु
करके बहाना राम का तेरा मै नाम लु

जीत (१९७२)
http://www.imdb.com/title/tt0357811/
You Tube: http://www.youtube.com/watch?v=zl31k2DKzAw

कोडं क्र. ४० : स्वप्ना_राज --> भरत मयेकर

"अरे पण चाललोय कुठे आपण?" अमिताने विचारलं.
"सांगितलं तर मग ते सरप्राईज राहील का?" तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधत समीर म्हणाला.
"पण काहीतरी आयडीया दे की"
"अजिबात नाही. तू चल बघू आता" समीरने तिला रुमच्या बाहेर काढत म्हटलं.
त्याला विचारून काही उपयोग नाही हे अमिताला माहित होतं. तरी तिने एक गाणं म्हणून खडा टाकून पाहिला.

क्लू:
१. गाणं सरळ सोपं आहे.
२. ६० च्या दशकातील सिनेमा आहे.
३. 'भारत कुमार' आहे आणि बाकी कोणी नावाजण्यासारखं नाही.
४. सिनेमाच्या नावाचा आणि कोणत्याही रामसेपटाचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे.

उत्तर:

तुम कहा ले चले हो सजन अलबेले,
ये कौनसा जहा है, बताओ तो बताओ तो

पूनम की रात (१९६५)
http://en.wikipedia.org/wiki/Poonam_Ki_Raat
http://www.youtube.com/watch?v=QdqQP0fJxt4

३६ लुक छिप लुक छिप जाओ ना
ऐसे छिप छिप मुझे सताओ ना
ओ मेरे नन्हे मुन्ने प्यारे प्यारे राजा
आओ मेरे गले लग जाओ ना

दो अन्जाने

दूरदर्शनवरचा कार्यक्रम "ऐसा भी होता है" का? मग यत नाही बसत.

कोडं क्र ३१ : स्वप्ना_राज --> झिलमिल

महाबळेश्वर वरून निघताना अमिता आणि अमोल Mafco च्या दुकानात थांबले. पण काय घ्यावं ह्यावर दोघांचं एकमत होईना.
'काही हरकत नाही madam, तुम्ही ३-४ प्रोडक्ट्स टेस्ट करून बघा. जे आवडेल ते घ्या.' दुकानदार म्हणाला.
पण इथेही अमोलचा धांदरटपणा नडला.
'काय हे अमोल? लहान मुलं पण इतकं सांडत नसतील. सगळे बघताहेत बघ तुझ्याकडे' अमिता वैतागून म्हणाली.
अमोलने एक क्षण विचार केला आणि असं एक गाणं म्हटलं जे ऐकून अमिताच काय पण दुकानदार आणि तिथे असलेले सगळे लोक हसायला लागले.

क्लू :
१. मॅफको ची उत्पादनं लक्षात घ्या की सोप्पं आहे.

उत्तर:

छलका ये जाम आईये
आपकी आखोंके नाम

मेरे हमदम मेरे दोस्त (१९६८)
http://en.wikipedia.org/wiki/Mere_Hamdam_Mere_Dost
http://www.youtube.com/watch?v=WQ6Cg5G2W7Q

छलकाये जाम, आईये आप की आँखों के नाम, होठों के नाम

फूल जैसे तन पे जलवे ये रंग-ओ-बू के
आज जाम-ए-मय उठे इन होठों को छू के
लचकाईये शाख-ए-बदन, महाकाईये ज़ुल्फों की शाम

२६:
मानो तो मैं गंगा माँ हूँ, ना मानो तो बहता पानी
जो स्वर्ग ने दी धरती को, मैं हूँ प्यार की वही निशानी

Pages