गाओ मॅरॅथॉन २०१४ : ..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ६)

Submitted by मामी on 6 January, 2014 - 22:07

मायबोलीकर, सर्व प्रथम तुम्हा सगळ्यांना नविन वर्षाच्या शुभेच्छा!

गाओ, अर्थात गाणे ओळखा!.

तर तो/ती कोणतं गाणं म्हणेल? या धाग्यांतर्गत आज दिवसभर एक कोड्यांची मॅरॅथॉन आयोजित केली आहे. आज भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजल्यापासून दर तासाला नवनविन कोडी इथे दिली जातील. तुम्हा सगळ्यांना ही कोडी डीकोड करायची आहेत. म्हणजे त्यातली गाणी ओळखायची आहेत.

बक्षिसं तर आहेतच अर्थात.....

तर थोड्याच वेळात मॅरॅथॉन सुरू होत आहे. लक्ष ठेवा! लक्ष ठेवा!! लक्ष ठेवा!!!

- टीम : जिप्सी, स्वप्ना_राज, माधव, मामी

**********************************************************************************************************
१. कोड्यांना क्रमांक दिले आहेत. उत्तरे लिहिताना तो क्रमांक नमुद करावा.
२. जी पहिले बरोबर उत्तर देईल ती व्यक्ती विजेती ठरेल.
३. लागोपाठ दोन बरोबर उत्तरं आली तर त्यातील ज्या पहिल्या उत्तरात कोड्याचा योग्य क्रमांक नमुद केला आहे ती व्यक्ती विजेती ठरेल.
४. नविन कोडी हेडर मध्ये टाकली जातील. जी कोडी सुटतील ती हेडरमधून खाली प्रतिसादांत हलवली जातील. त्यामुळे कोडीत्सुकांनी प्रामुख्याने हेडरवर लक्ष ठेवावे.
५. कोडी लगेच सुटली नाहीत तर क्ल्यू दिले जातील. ते देखिल हेडरमध्येच टाकले जातील.
६. बक्षिसांबद्दल कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही.
७. ऐकूणच कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही.
८. आक्षेप नोंदवण्यास सक्त मनाई आहे.

**********************************************************************************************************

सर्व भाग घेणार्‍यांचे आणि विजेत्यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन!!!

गाओ मॅरॅथॉन २०१४ मध्ये मंगळवार दिनांक ७ जानेवारीला (भा.वे.नु) ९.०० वाजल्यापासून ते बुधवार दिनांक ८ जानेवारीपर्यंत (भा.वे.नु.) ११.३० पर्यंत एकूण ४५ कोडी विचारली होती.

कोडी बनवण्याची जबाबदारी घेतली होती टीम मेंबर्सनी - स्वप्ना_ राज (१४ कोडी), जिप्सी (१७ कोडी), माधव (२ कोडी) आणि मामी (१२ कोडी).

कोडी सोडवण्याची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली : अश्विनी के (२ कोडी), झकासराव (१), श्रद्धा (१६), भरत मयेकर (८), मॅक्स (१), PracheeS (१), स्निग्धा (३), केदार जाधव (१), चमन (१), झिलमिल (७), साती (१), केया (१), स्वाती_आंबोळे (३), इश्श (१) यांनी.

बक्षिसं जिप्सी यांनी स्पॉन्सर केली होती.

आशा आहे की आपण सगळ्यांनी या मॅरॅथॉनचा मनापासून आनंद लुटलात. (आम्ही तरी एंजॉय केलं बुवा!)

आमच्या टीमतर्फे पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१८ला क्लू आवश्यक. लै टाईम पेंडिंग आहे.>>>>एका जन्मात न संपलेली कहाणी.

मामी, क्लु हेडरमध्ये अपडेट कर.

कोडं क्र. ३२ : जिप्सी --> भरत मयेकर

उत्तर :

मेरी किस्मत में तु नही शायद
क्यो तेरा इंतजार करता हु
मै तुझे कल भी प्यार करता था
मै तुझे अब भी प्यार करता हु

प्रेम रोग (१९८२)
http://en.wikipedia.org/wiki/Prem_Rog
http://www.youtube.com/watch?v=7VPrRirnFgc

१८ गापुचि गापुचि गम गम किशी कि किशी कि कम कम >>> नाही.

हा सुपरस्टार, देखणा स्टार आणि स्वप्नसुंदरी यांमधला त्रिकोण होता. - घ्या तिसरा क्लू.

१८ छोडो सनम काहे का गम हंसते रहो खिलते रहो
मिट जाएगा सारा गिला हमसे गले मिलते रहो

नील आणि आकाश यावर किती डोके खपवले.

कर्म!

कोडं क्र १८ कठीण असूनही ते सोडवल्याबद्दल भरत मयेकरांना हे बक्षिस :

आणि एक फेव्हिकॉल

आणि बोनस म्हणून झंडूबामची बाटली.

कोडं क्र. १८ : स्वप्ना_राज --> भरत मयेकर

'इईईई! हा आकाश जमत नाही तर कशाला हे क्राफ्ट्सचे प्रोजेक्ट्स करतो देव जाणे.' आकाशचा आवडता निळ्या रंगाचा टीशर्ट ओरडला.
'काय झालं?' आजीच्या पोथीवर झाकायच्या रुमालाने शांतपणे विचारलं. अनेक वर्ष ह्या घरात असल्याने तो स्वत:ला सिनियर समजत असे. 'आजकालच्या कपड्यांना सहनशक्ती म्हणून कशी ती अजिबात नाही' असं त्याचं स्पष्ट मत होतं.
'सगळी फेव्हिकॉलची बाटली उपडी केली माझ्यावर त्याने. आता हे सगळे डाग् कसे जाणार? मग फेकून देईल मला शर्ट खराब झाला म्हणून. मी त्याच्या बर्थडे पार्टीला जाणार होतो त्याच्याबरोबर.'
'अरे, काळजी करू नकोस. वॉशिंग् मशीन मध्ये धुवून निघालास की जाईल सगळं फेव्हिकॉल निघून. अगदी नव्यासारखा होशील बघ परत.' रुमालाने दिलासा दिला.
टीशर्टने कान टवकारले. 'वॉशिंग् मशीन? पण ते तर खराब झालं होतं ना? मला तर वाटलं शांताबाई धुवेल मला.'
'म्हणजे? तुला माहीत नाही? कालच आकाशची आई विजय सेल्समधून नवं वॉशिंग् मशीन घेऊन आली. फुल्ली ऑटोमॅटिक आहे. कपडे धुताना मस्त शीळ मारतं' रुमालाने आखो देखी सांगितली.
एका तासाने आकाशच्या आईने धुवायचे कपडे एकत्र करून वॉशिंग् मशीनजवळ आणून ठेवले. टीशर्टने मान उंच करून त्याच्याकडे पाहिलं.
'Hello Young Man, how are you? आपण काल भेटलो नाही.' वॉशिंग मशीनने शीळ मारत म्हटलं.
'ओह, हाय' टीशर्ट म्हणाला.
'अरे, काय झालं यार? एव्हढा उदास दिसतो आहेस?'
'आकाशने माझ्यावर फेव्हिकॉलची बाटली उपडी केली. आता हे डाग गेले नाहीत तर सरळ फेकून देईल मला तो.'
'नो वरीज यार. हम है ना. असा मस्त धुवून काढतो तुला. आकाशला लक्षात पण रहाणार नाही की तुझ्यावर फेव्हिकॉल सांडलं होतं.'
'हे मस्त होईल. पण आता पावसाळा सुरु झालाय. त्याचा वाढदिवस तर उद्या आहे. मी वाळेन का उद्यापर्यंत?' टीशर्टने आपली शंका बोलून दाखवली.
'Chill यार. ड्रायर आहे ना. मस्त पापडासारखा वाळून निघशील.'
आणि आकाशच्या घरचं वॉशिंग मशीन चक्क गायला लागलं. गाणं गोल्डन एरातलं नाही बरं का. पण बघा ओळखता येतं का ते.

क्लू:
१. एका जन्मात न संपलेली कहाणी.
२. स्वप्नसुंदरी
३. हा सुपरस्टार, देखणा स्टार आणि स्वप्नसुंदरी यांमधला त्रिकोण होता.

उत्तर :

छोडो सनम काहे का गम
हसते रहो खिलते रहो,
मिट जायेगा सारा गिला
हमसे गले मिलते रहो

कुदरत (१९८१)
http://en.wikipedia.org/wiki/Kudrat
http://www.youtube.com/watch?v=jw4SSATf0hI

३४
सुरमई अखियों में नन्हा मुन्ना एक सपना दे जा रे
निन्दिया के उदते पाखी रे, अँखियों में आजा साथी रे

कोडं क्र. ३४ : स्वप्ना_राज --> झिलमिल

मच्छीमारांच्या घरातलं सर्वात पॉप्युलर अंगाईगीत कोणतं असेल?

उत्तर:

'सुरमई' अखियोंमें
नन्हामुन्हा एक सपना दे जा रे

सदमा (१९८३)
http://en.wikipedia.org/wiki/Sadma
http://www.youtube.com/watch?v=V5qMS-K8eYY

कोडं क्र. २२ : मामी --> श्रद्धा

किती तरी वर्षांनी कोशिश त्या बंगल्यापुढे पुन्हा उभा होता. 'ईराणी महल' अजूनही तशाच दिमाखात उभा होता. अजूनही त्याचं बालपण जपून होता. लहानपणीच हा बंगला सोडून त्याचं कुटुंब आधी मुंबईला आणि मग लंडनला गेलं होतं. पण बंगल्यातल्या नोकराचाकरांनी तो बंगला, त्याच्या आजूबाजूची आमराई तशीच राखली होती. नुकताच त्याच्या वडिलांनी तो बंगला विकला होता आणि बंगल्याला शेवटची भेट द्यायला कोशिश आला होता.

बंगल्याच्या मागे असलेल्या भल्यामोठ्या आंब्याच्या झाडाकडे कोशिश भारल्यासारखा धावत गेला. जवळचा दगड उचलून त्यानं घाईघाईनं झाडाच्या तळाशी जमिनीत खणायला सुरवात केली. मागे कधीतरी त्यानं त्या जागी खजिना पुरला होता ना!

तो छोटासा डबा हाती येताच कोशिश हरखून गेला. त्यानं तो डबा उघडला. त्यात ठेवलेली फुलं सुकून गेली होती. पण त्याच झाडाची बी मात्र जशीच्या तशी होती. कोशिश ला त्या बंगल्यातली इतर कोणतीही वस्तू नको होती पण ती बी मात्र त्याला आपल्याबरोबर घेऊन जायची होती.

त्या बी ला पाहून तो कोणतं गाणं म्हणेल????

क्लू :

१. कशाची बी आहे ती?
२. स्केटिंग

उत्तर :

तेरा मुझसे है पहले का नाता, कोयी ( कोयीला संबोधून)
यूं ही नही दिल लुभाता को. ई. (कोशिश ईराणी)

आ गले लग जा (१९७३)
http://www.imdb.com/title/tt0177473/
http://www.youtube.com/watch?v=vO35DVm_5ts

२३ : कह दो ना, कह दो ना, यू आर माय सोनिया? >>> नाही.

क्लू :
१: ६० च्या दशकाच्या सुरुवातीचा चित्रपट
२: ह्यात एक नव्हे तर २-२ कुमार आहेत.
३. सुंदर सोनियानं काही उत्तर लिहिलं नाही.

Pages