गाओ मॅरॅथॉन २०१४ : ..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ६)

Submitted by मामी on 6 January, 2014 - 22:07

मायबोलीकर, सर्व प्रथम तुम्हा सगळ्यांना नविन वर्षाच्या शुभेच्छा!

गाओ, अर्थात गाणे ओळखा!.

तर तो/ती कोणतं गाणं म्हणेल? या धाग्यांतर्गत आज दिवसभर एक कोड्यांची मॅरॅथॉन आयोजित केली आहे. आज भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजल्यापासून दर तासाला नवनविन कोडी इथे दिली जातील. तुम्हा सगळ्यांना ही कोडी डीकोड करायची आहेत. म्हणजे त्यातली गाणी ओळखायची आहेत.

बक्षिसं तर आहेतच अर्थात.....

तर थोड्याच वेळात मॅरॅथॉन सुरू होत आहे. लक्ष ठेवा! लक्ष ठेवा!! लक्ष ठेवा!!!

- टीम : जिप्सी, स्वप्ना_राज, माधव, मामी

**********************************************************************************************************
१. कोड्यांना क्रमांक दिले आहेत. उत्तरे लिहिताना तो क्रमांक नमुद करावा.
२. जी पहिले बरोबर उत्तर देईल ती व्यक्ती विजेती ठरेल.
३. लागोपाठ दोन बरोबर उत्तरं आली तर त्यातील ज्या पहिल्या उत्तरात कोड्याचा योग्य क्रमांक नमुद केला आहे ती व्यक्ती विजेती ठरेल.
४. नविन कोडी हेडर मध्ये टाकली जातील. जी कोडी सुटतील ती हेडरमधून खाली प्रतिसादांत हलवली जातील. त्यामुळे कोडीत्सुकांनी प्रामुख्याने हेडरवर लक्ष ठेवावे.
५. कोडी लगेच सुटली नाहीत तर क्ल्यू दिले जातील. ते देखिल हेडरमध्येच टाकले जातील.
६. बक्षिसांबद्दल कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही.
७. ऐकूणच कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही.
८. आक्षेप नोंदवण्यास सक्त मनाई आहे.

**********************************************************************************************************

सर्व भाग घेणार्‍यांचे आणि विजेत्यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन!!!

गाओ मॅरॅथॉन २०१४ मध्ये मंगळवार दिनांक ७ जानेवारीला (भा.वे.नु) ९.०० वाजल्यापासून ते बुधवार दिनांक ८ जानेवारीपर्यंत (भा.वे.नु.) ११.३० पर्यंत एकूण ४५ कोडी विचारली होती.

कोडी बनवण्याची जबाबदारी घेतली होती टीम मेंबर्सनी - स्वप्ना_ राज (१४ कोडी), जिप्सी (१७ कोडी), माधव (२ कोडी) आणि मामी (१२ कोडी).

कोडी सोडवण्याची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली : अश्विनी के (२ कोडी), झकासराव (१), श्रद्धा (१६), भरत मयेकर (८), मॅक्स (१), PracheeS (१), स्निग्धा (३), केदार जाधव (१), चमन (१), झिलमिल (७), साती (१), केया (१), स्वाती_आंबोळे (३), इश्श (१) यांनी.

बक्षिसं जिप्सी यांनी स्पॉन्सर केली होती.

आशा आहे की आपण सगळ्यांनी या मॅरॅथॉनचा मनापासून आनंद लुटलात. (आम्ही तरी एंजॉय केलं बुवा!)

आमच्या टीमतर्फे पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१५ साठी क्लु द्या.>>>>>भरत, हे गाणं ज्यां चित्रपटातलं आहे त्याच्या नावाचा आणि चित्रपटाच्या तिकिटाचा एके काळी खूप जवळचा संबंध असे.

कोडं क्र. २४ : जिप्सी --> श्रद्धा

उत्तर :
क्या गजब करते हो जी
प्यार से डरते हो जी
डरके तुम और हंसी लगते हो जी

लव स्टोरी (१९८१)
http://en.wikipedia.org/wiki/Love_Story_(1981_film)
http://www.youtube.com/watch?v=TH2OYfCqcb8

कोडं क्र. १५ : स्वप्ना_राज --> भरत मयेकर

किरण ग्रोवर अगदी वैतागून गेला होती. गेले अडीच महिने ती आपल्या नव्या पिक्चरसाठी हिरोईन शोधत होती पण हवा तसा चेहेरा काही तिला मिळत नव्हता. 'छोड यार मन, इतने दिनोसे धुंड रहे है. पर कोई मिल नही रही है. इस छोटे शहरमे कोई क्या मिलेगा? लगता है अब केटरीनाकोही साईन करना पडेगा. इतने धुंडने पर भगवान भी मिला गया होता अब तक.'. तिचा सहाय्यक मनमीत डोग्रा तिला पूर्ण ओळखून होता. आज काम झालं नाही तर मुंबईला जायला लागणार. केटरीनाला साईन करूनही किरण खुश नसणार आणि त्याचा पिक्चरच्या quality वर परिणाम होणार हे त्याला पुरतं ठाऊक होतं. त्याने मनोमन देवाची प्रार्थना केली. आणि गाडी 'चम्बेरा' च्या दिशेने हाकली. पण गाडी चालवता चालवता त्याच्या डोळ्यांसमोर एक चेहेरा सारखा येत होता - गेले काही दिवस स्वप्नात दिसत असलेला. किरणने त्याचं बोलणं हसण्यावारी नेलं होतं. पण कसं कोण जाणे मनमीतला माहित होतं की हा चेहेरा त्यांच्या पिक्चरच्या हिरोईनचा आहे. भेटेल का ती चम्बेरात?

गाडी गावात अजून शिरली नव्हती तोच किरण झोपेतून जागी झाली आणि हिंदी पिक्चरला शोभेल असा dialogue तिने मारला 'हम कहा है?'. मनमीत हसला 'अभी दस मिनिटमे गाव आ जायेगा'. 'ओये रोक रोक, गाडी रोक.' मनमीतने करकचून ब्रेक मारत गाडी थांबवली. 'वो देख, वो उपर एक मंदिर दिख रहा है. चलो सब दर्शन करके आते है.'
'लेकिन.....'
'अरे. गाव कही भागा नही जा रहा. हम सब वापस आयेंगे तबभी यही पर होगा. चल ना.'
सगळे टेकडीवरच्या मंदिरात पोचले आणि त्यांना एकदम प्रसन्न वाटलं. दर्शन घेऊन बाहेर आल्यावर वरून दूरचा परिसर निरखण्यात सगळे दंग झाले. एव्हढ्यात देवळाची घंटा वाजली. किरण आणि मनमीतने वळून पाहिलं आणि बघतच राहिले. एक सुंदर मुलगी पूजेच तबक घेऊन देवळात आली होती.

'मेरी कंचन' किरणच्या तोंडातून नकळत शब्द बाहेर पडले. ती झपाझप पुढे चालत गेली. आणि मनमीत? तो जागीच खिळून राहिला. तीच त्याच्या स्वप्नातली मुलगी. जरा वेळाने किरण परत आली तीच उत्साहाने फसफसत. 'यार, मिल गयी कंचन मुझे. मुझे तो विश्वास ही नही हो रहा. God is great! ओये, तुझे क्या हुआ? कुछ तो बोल"

"किरण, यही लडकी मुझे सपनेमे दिखती थी.' मनमीत कसाबसा बोलला. किरण आधी अवाक होऊन त्याच्याकडे पहात राहिली आणि मग म्हणाली. "फिर तो अभी कें अभी इसके फोटोज लेते है. बहोत सारे क्लोजअप्स लेना"

हेच गाणं म्हणून सांगायचं असतं तर किरण ग्रोव्हरने काय गाणं म्हटलं असतं?

क्लू:

१. हे गाणं ज्यां चित्रपटातलं आहे त्याच्या नावाचा आणि चित्रपटाच्या तिकिटाचा एके काळी खूप जवळचा संबंध असे.

उत्तर :

सच हुए सपने तेरे
झूम ले ओ मन मेरे

काला बझार (१९६०)
http://en.wikipedia.org/wiki/Kala_Bazar
http://www.youtube.com/watch?v=rxdxqqZDFHk

२५ : गुस्ताखी माफ करा.

तू मुझे कुबूल मैं तुझे कुबूल
इस बात का गवाह खुदा
खुदा गवाह खुदा गवाह

कोडं क्र. २५ : मामी --> भरत मयेकर

त्यानं आणि तिनं शेवटी आपापल्या अमा-अब्बांना न जुमानता एका काझीला बोलवून निकाह लावलाच. पण नंतर गावात गदारोळ माजला. दोन तट पडले, मारामार्या झाल्या, पोलिस केस झाली. ते लग्न न करताच एकत्र राहत होते असा समाजानं त्यांच्यावर आरोप ठेवला. त्यांच्या मित्र मैत्रिणींचं म्हणणंही कोणी ऐकून घेईना. ते ही त्या दोघांनाच सामिल असणार असं सगळे म्हणत होते. आता भिस्त त्या निकाह लावलेल्या काझीवरच!

पण नेमका जो प्रमुख साक्षीदार ठरू शकणार होता तो काझीच गायब झाला. आता काय करायचं? त्या दोघांनाही प्रश्नच पडला. उद्या पोलिसचौकीत त्यांना त्या काझीला घेऊन जायचं होतं. पण त्याला शोधणार कसा आणि कुठे ?

कोणीतरी त्याला बातमी दिली त्यानुसार तो त्या ठिकाणी गेला. काझीला मारून म्हणे इथे दफन करून टाकलं होतं. मित्रांच्या मदतीनं त्यानं त्या जागी खणून काझीचा मुडदा बाहेर काढला. आणि घरी येऊन तिला सांगितलं .... कोणतं गाणं म्हणून?

उत्तर :

तू मुझे कबुल, मै तुझे कबुल
इस बात का गवाह खुदा,
खुदा गवाह, खुदा गवाह

खुदा गवाह (१९९२)
http://en.wikipedia.org/wiki/Khuda_Gawah
http://www.youtube.com/watch?v=2rmyS6G12Zo

येस्स, साती. बरोबर.

कोडं क्र. २७ सोडवल्याबद्दल सातीला मिळत आहे हे बक्षिस :

आणि सोबत आरमानी सुटाचं एक बटण.

कोडं क्र. २७ : मामी --> साती

दिलवर खान कडे अफाट संपत्ती होती. त्या चाळीस चोरांचा त्या संपत्तीवर केव्हाचा डोळा होता. पण ती संपत्ती अगदी कडेकोट बंदोबस्तात ठेवलेली असल्याने त्यांना चान्सच नव्हता. नुकताच दिलवर खान पॅरीसची सफर करून आलाय आणि येताना एकोणचाळीस अरमानी सुटस घेऊन आलाय आणि ते त्याच्या बेडरूममध्येच आहेत हे कळल्यावर चोरांच्या सरदारणीच्या तोंडाला पाणी सुटलं. हे सुट मिळाले तर तिचे सगळे चोर साथीदार एकदम डॅशिंग दिसतील असं तिला वाटायला लागलं.

पण सगळे चोर वेगवेगळ्या मोहिमांवर गुंतले होते. स्वतः सरदारीणही अशाच एका मोहिमेत बिझी होती. पण एक विशिष्ट नंबरचा चोर जरा मोकळा होता. त्याला मग सरदारणीनं एक क्रिप्टिक मेसेज पाठवला. त्यात तिने त्या चोराला जाऊन दिलवर खानचे अरमानी सुटस लुटून आणण्याची आज्ञा एका गाण्यातून केली.....

उत्तर :

१३ जाना
दिल के अरमानों का लुट जाना

अनाडी (१९५९)
http://en.wikipedia.org/wiki/Anari
http://www.youtube.com/watch?v=MKl_2d45Zeo

Pages