गाओ मॅरॅथॉन २०१४ : ..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ६)

Submitted by मामी on 6 January, 2014 - 22:07

मायबोलीकर, सर्व प्रथम तुम्हा सगळ्यांना नविन वर्षाच्या शुभेच्छा!

गाओ, अर्थात गाणे ओळखा!.

तर तो/ती कोणतं गाणं म्हणेल? या धाग्यांतर्गत आज दिवसभर एक कोड्यांची मॅरॅथॉन आयोजित केली आहे. आज भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजल्यापासून दर तासाला नवनविन कोडी इथे दिली जातील. तुम्हा सगळ्यांना ही कोडी डीकोड करायची आहेत. म्हणजे त्यातली गाणी ओळखायची आहेत.

बक्षिसं तर आहेतच अर्थात.....

तर थोड्याच वेळात मॅरॅथॉन सुरू होत आहे. लक्ष ठेवा! लक्ष ठेवा!! लक्ष ठेवा!!!

- टीम : जिप्सी, स्वप्ना_राज, माधव, मामी

**********************************************************************************************************
१. कोड्यांना क्रमांक दिले आहेत. उत्तरे लिहिताना तो क्रमांक नमुद करावा.
२. जी पहिले बरोबर उत्तर देईल ती व्यक्ती विजेती ठरेल.
३. लागोपाठ दोन बरोबर उत्तरं आली तर त्यातील ज्या पहिल्या उत्तरात कोड्याचा योग्य क्रमांक नमुद केला आहे ती व्यक्ती विजेती ठरेल.
४. नविन कोडी हेडर मध्ये टाकली जातील. जी कोडी सुटतील ती हेडरमधून खाली प्रतिसादांत हलवली जातील. त्यामुळे कोडीत्सुकांनी प्रामुख्याने हेडरवर लक्ष ठेवावे.
५. कोडी लगेच सुटली नाहीत तर क्ल्यू दिले जातील. ते देखिल हेडरमध्येच टाकले जातील.
६. बक्षिसांबद्दल कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही.
७. ऐकूणच कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही.
८. आक्षेप नोंदवण्यास सक्त मनाई आहे.

**********************************************************************************************************

सर्व भाग घेणार्‍यांचे आणि विजेत्यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन!!!

गाओ मॅरॅथॉन २०१४ मध्ये मंगळवार दिनांक ७ जानेवारीला (भा.वे.नु) ९.०० वाजल्यापासून ते बुधवार दिनांक ८ जानेवारीपर्यंत (भा.वे.नु.) ११.३० पर्यंत एकूण ४५ कोडी विचारली होती.

कोडी बनवण्याची जबाबदारी घेतली होती टीम मेंबर्सनी - स्वप्ना_ राज (१४ कोडी), जिप्सी (१७ कोडी), माधव (२ कोडी) आणि मामी (१२ कोडी).

कोडी सोडवण्याची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली : अश्विनी के (२ कोडी), झकासराव (१), श्रद्धा (१६), भरत मयेकर (८), मॅक्स (१), PracheeS (१), स्निग्धा (३), केदार जाधव (१), चमन (१), झिलमिल (७), साती (१), केया (१), स्वाती_आंबोळे (३), इश्श (१) यांनी.

बक्षिसं जिप्सी यांनी स्पॉन्सर केली होती.

आशा आहे की आपण सगळ्यांनी या मॅरॅथॉनचा मनापासून आनंद लुटलात. (आम्ही तरी एंजॉय केलं बुवा!)

आमच्या टीमतर्फे पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केया बरोबर.

कोडं क्र. ३० केयानं सोडवल्याबद्दल तिला मिळत आहे :

आणि एक स्ट्रेपसिलचं पाकीट

कोडं क्र. ३० : जिप्सी --> केया

_ल
_

_ _
_ का
_ही
_ _
_ ल
_ह_
कि
_त
_ _

उत्तर :

दिल जो न कह सका
वोही राजे दिल कहने कि रात आयी

भिगी रात (१९६५)
http://www.youtube.com/watch?v=IFEwzBJlpb4
http://www.imdb.com/title/tt0139065/

ओह म्हणजे हेडरात सगळ्या अनसॉल्व्ह्ड मिस्टरीज आहेत का? Proud
(मी बोल्ड केलेला नियम आधी वाचून निषेध म्हणून बाकी नियम वाचलेच नाहीत. :P)

कोडं क्र २०
कितने अजीब रिश्ते है यहां पर >>> बरोबर चमन.

कोडं क्र. २० सोडवल्याबद्दल चमन यांना मिळत आहे :

आणि एक अ‍ॅनासिनची गोळी.

कोडं क्र. २० : स्वप्ना_राज --> चमन

'काय ग आई? आज कुठली पकाऊ सिरियल बघतेयस?' bagpack खाली ठेवता ठेवता पुर्वाने विचारलं.
'ससुराल सिमर का' तिची आई म्हणाली.
'बाप रे! solid रडारडीची दिसतेय. ही कोण?'
'ही सिमर.'
'ओह! म्हणजे जिचं ससुराल ती ही बया काय. आणि ही दुसरी झिपरी?'
'ती तिची धाकटी बहिण रोली'
'रोली? काय पण नाव आहे. हा हिरो तिचा नवरा दिसतोय'
'हो, हा रोलीचा नवरा सिध्दार्थ.'
'मग सिमरचा नवरा कुठे आहे?'
'तो काय. प्रेम. तो सिध्दार्थचा धाकटा भाऊ'
'एक मिनीट, एक मिनीट. सिमरचं लग्न धाकटया भावाशी आणि तिची धाकटी बहिण असून रोलीचं लग्न त्याच्या मोठ्या भावाशी? बहुत नाइन्साफी है'
'पूर्वा, गप्प बसायला काय घेशील?' आईने दटावताच पूर्वा थोडा वेळ गप्प बसली. मग मात्र तिला रहावेना.
'अग, कश्यावरून एव्हढी बोंबाबोंब चालली आहे?'
'प्रेम हा सिद्धार्थचा खरा भाऊ नाही.'
'आं?'
'तो सिद्धार्थच्या वडिलांच्या बिझनेस पार्टनरचा मुलगा आहे. त्याला ह्यांनी आपला म्हणून वाढवलंय. आणि ते त्याला आत्ता सांगताहेत.'
'आणि ही जान्हवी कोण आहे? ती का रडतेय?'
'ती सिध्दार्थची धाकटी बहिण आहे खरं तर. तिला प्रेमच्या खर्या आजीने पळवून नेलं होतं. आणि आपली नात म्हणून वाढवलं. ती प्रेमला आपला भाऊ समजत होती.'

'अरे देवा!' पूर्वाचं डोकं एव्हाना गरगरायला लागलं होतं. आतल्या खोलीत जाता जाता तिने एका हिंदी गाण्याची पहिली ओळ म्हटली असेल?

उत्तर:

कितने अजीब रिश्ते है यहा पर

पेज थ्री (२००५)
http://en.wikipedia.org/wiki/Page_3_%28film%29
http://www.youtube.com/watch?v=rydPYHqsNBQ

ओह म्हणजे हेडरात सगळ्या अनसॉल्व्ह्ड मिस्टरीज आहेत का?
(मी बोल्ड केलेला नियम आधी वाचून निषेध म्हणून बाकी नियम वाचलेच नाहीत. >>> Lol

कोडं क्र. २९ : जिप्सी --> श्रद्धा

उत्तर :

जान की कसम सच कहते है हम
खुशी हो या गम बांट लेंगे हम आधा आधा

आझाद (१९७८)
http://en.wikipedia.org/wiki/Azaad_(1978_film)
http://www.youtube.com/watch?v=cZ-rSIUg_Ps

कोडं क्र. २१ सोडवलं आहे श्रद्धा यांनी आणि त्याबद्दल त्यांना मिळत आहे :

आणि एक रंगपेटी.

कोडं क्र. २१ : मामी --> श्रद्धा

"हिरवा होता." ती.

"नाही पिवळाच होता." तो.

"काहीतरीच काय? मी बघितलं ना स्वतःच्या डोळ्यांनी. नवरीचा शालू हिरवाच होता. आम्हा बायकांना सग्गळे डिटेल्स बरोब्बर लक्षात राहतात हां. तुमच्या सारखं नाही." ती आपलाच मुद्दा पुढे दामटवीत.

"हे बघ. मी इतर वेळी तुझं ऐकून घेतो. पण याबाबतीत अजिबात ऐकणार नाही. शालू पिवळा होता. पिवळा होता. पिवळाच होता. हे त्रिवार सत्य आहे." तो ही मागे हटायला तयार नव्हता.

"आहाहा! आला मोठा त्रिवार सत्य सांगणारा. तिकडे लग्नाच्या गर्दीत इतकी 'हिरवळ' पाहून तुझे डोळे विटले असणार म्हणून तो हिरवा शालू तुला पिवळा दिसायला लागला. तसंही रिसेप्शनला कोणी पिवळा शालू नेसतच नाही. लग्न लागताना पिवळी साडी नेसतात. तीच असेल तुझ्या लक्षात." तिचा पाँईंटाचा मुद्दा आला आणि तो गोंधळला. खात्री होती पण १००% नव्हती.

अचानक त्याला आठवलं की रिसेप्शनच्या वेळी त्याच्या काही मित्रांचे फोटो घेत असताना बॅकग्राउंडला स्टेज होतं. त्यानं घाईघाईनं स्वतःचा मोबाईल काढला, फोटो शोधला आणि एक नजर टाकून तिला तो फोटो बघायला दिला.

फोटो बघून तिनं एक गाणं म्हटलं. कोणतं?

उत्तर :

Yellow! मै हारी पिया
हुई तेरी जीत रे

आरपार (१९५४)
http://en.wikipedia.org/wiki/Aar_Paar
http://www.youtube.com/watch?v=5bEEWUhEwec

Pages