गाओ मॅरॅथॉन २०१४ : ..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ६)

Submitted by मामी on 6 January, 2014 - 22:07

मायबोलीकर, सर्व प्रथम तुम्हा सगळ्यांना नविन वर्षाच्या शुभेच्छा!

गाओ, अर्थात गाणे ओळखा!.

तर तो/ती कोणतं गाणं म्हणेल? या धाग्यांतर्गत आज दिवसभर एक कोड्यांची मॅरॅथॉन आयोजित केली आहे. आज भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजल्यापासून दर तासाला नवनविन कोडी इथे दिली जातील. तुम्हा सगळ्यांना ही कोडी डीकोड करायची आहेत. म्हणजे त्यातली गाणी ओळखायची आहेत.

बक्षिसं तर आहेतच अर्थात.....

तर थोड्याच वेळात मॅरॅथॉन सुरू होत आहे. लक्ष ठेवा! लक्ष ठेवा!! लक्ष ठेवा!!!

- टीम : जिप्सी, स्वप्ना_राज, माधव, मामी

**********************************************************************************************************
१. कोड्यांना क्रमांक दिले आहेत. उत्तरे लिहिताना तो क्रमांक नमुद करावा.
२. जी पहिले बरोबर उत्तर देईल ती व्यक्ती विजेती ठरेल.
३. लागोपाठ दोन बरोबर उत्तरं आली तर त्यातील ज्या पहिल्या उत्तरात कोड्याचा योग्य क्रमांक नमुद केला आहे ती व्यक्ती विजेती ठरेल.
४. नविन कोडी हेडर मध्ये टाकली जातील. जी कोडी सुटतील ती हेडरमधून खाली प्रतिसादांत हलवली जातील. त्यामुळे कोडीत्सुकांनी प्रामुख्याने हेडरवर लक्ष ठेवावे.
५. कोडी लगेच सुटली नाहीत तर क्ल्यू दिले जातील. ते देखिल हेडरमध्येच टाकले जातील.
६. बक्षिसांबद्दल कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही.
७. ऐकूणच कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही.
८. आक्षेप नोंदवण्यास सक्त मनाई आहे.

**********************************************************************************************************

सर्व भाग घेणार्‍यांचे आणि विजेत्यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन!!!

गाओ मॅरॅथॉन २०१४ मध्ये मंगळवार दिनांक ७ जानेवारीला (भा.वे.नु) ९.०० वाजल्यापासून ते बुधवार दिनांक ८ जानेवारीपर्यंत (भा.वे.नु.) ११.३० पर्यंत एकूण ४५ कोडी विचारली होती.

कोडी बनवण्याची जबाबदारी घेतली होती टीम मेंबर्सनी - स्वप्ना_ राज (१४ कोडी), जिप्सी (१७ कोडी), माधव (२ कोडी) आणि मामी (१२ कोडी).

कोडी सोडवण्याची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली : अश्विनी के (२ कोडी), झकासराव (१), श्रद्धा (१६), भरत मयेकर (८), मॅक्स (१), PracheeS (१), स्निग्धा (३), केदार जाधव (१), चमन (१), झिलमिल (७), साती (१), केया (१), स्वाती_आंबोळे (३), इश्श (१) यांनी.

बक्षिसं जिप्सी यांनी स्पॉन्सर केली होती.

आशा आहे की आपण सगळ्यांनी या मॅरॅथॉनचा मनापासून आनंद लुटलात. (आम्ही तरी एंजॉय केलं बुवा!)

आमच्या टीमतर्फे पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रूप तेरा मस्ताना>> रूपकुमार शिल्पकार म्हणून
भूल कोई हमसे ना हो जाए>> राजाज्ञा पूर्ण करण्याचं टेन्शन आलं असेल प्रधानजींना Proud Proud

हां. लॉजिक चांगलं आहे. पण सगळे महत्त्वाचे शब्द लक्षात घे की उत्तर सोप्पं आहे. रुपकुमार एकटाच का घेतलायस? दुसरा देखिल आहे ना. Happy

१० >>> इतक सोप असणार नाही तरी.

जाऊ कहां बता ए दिल, दुनिया बडी है संगदिल
चांदनी आये घर जलाने, सुझे न कोई मंझील

मॅक्स... Lol लै भारी.

कोडं क्र. १०

मैने चांद और सितारों की तमन्ना की थी
मुझको रातों की सियाही के सिवा कुछ ना मिला...

कोडं क्र. ६ : मामी --> मॅक्स

"प्रधानजी, हे काय? हे कारंजं का बंद आहे? आणि त्यातला पुतळा कुठे गेला?"

"महाराज, जुना झाला होता तो पुतळा. तो तुटला म्हणून इथून हलवलाय. आणि म्हणून सध्या कारंजं बंदच आहे."

"ते काही नाही. आत्ताच्या आत्ता आपल्या दोन्ही शिल्पकारांना बोलावून घ्या. एक सुरेखसा संगमरवरी पुतळा बनवून घ्या. आणि तो आधीचा होता तसा नको - माळी झाडाला पाणी घालत असतानाचा. सुंदर स्त्रीचा पुतळा बनवून घ्या. तिच्या डोक्यावर एक घागर, कमरेवर एक घागर, पायाशी एक घागर करवून घ्या. त्या घागरींतून पाणी पडताना दाखवा. जरा तरी रसिकता दाखवा प्रधानजी."

"होय, महाराज. नक्कीच."

झालं. राजाज्ञाच ती! लगेच रंगराज आणि रुपकुमार या राजशिल्पकारांना बोलावण्यात आलं. त्यांना कन्स्पेप्ट समजावून सांगण्यात आली आणि काही दिवसातच एक सुरेख पुतळा तयार झाला.

पुतळा कारंज्यात बसवला जात असताना प्रधानजी गाणं गुणगुणू लागले......

क्ल्यु :
१. या गाण्यातील काही विशिष्ट शब्दं, पात्रांची नावं वगैरे लक्षात घ्या. खूप फेमस गाणं आहे.
२. दाक्षिणात्य सुंदरी

उत्तर :

गोरी तेरे अंग अंग में
रुप्-रंग के सजे हुए है कलसे, आंहा कलसे

तोहफा (१९८४)
http://en.wikipedia.org/wiki/Tohfa
http://www.youtube.com/watch?v=u4-EIZK6Uac

कोडं क्र. १० सोडवलं आहे श्रद्धानं. तिला याबद्दल मिळत आहे :

आणि एक झाडू विथ डस्टपॅन (का ते ओळखा)

कोडं क्र. १० : मामी --> श्रद्धा

बाहेरच्या अंतराळाकडे बघत तो त्या यानात हताशपणे बसून होता. बाहेर काळाकुच्च अंधार पसरला होता. त्यात तेजस्वी ग्रहतारे दिसत होते. पण त्याला फक्त अंधारच दिसत होता - कायमची रात्रच पसरली होती बाहेर. त्याचे डोळे त्या अंधाराकडे बघत असले तरी त्याच्या मनात मात्र अनेक विचार येत होते.....

"यानाबाहेर या अवकाशाच्या विस्तीर्ण पोकळीत जसा अंधार तसाच आता माझ्या हृदयातही अंधार पसरलाय. किती उच्च ध्येय घेऊन मी या मोहिमेवर आलो होतो. पृथ्वीवरच्या सगळ्या देशांतल्या अनेक अंतराळवीरांमधून माझी एकट्याची या मोहिमेकरता निवड झाली तो क्षण किती अभिमानाचा होता......"

ही पृथ्वीवरची आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी आणि अत्यंत अॅम्बिशस मोहिम होती. यात आधी यानातून चंद्रावर जाऊन तिथले काही मातीचे नमुने गोळा करायचे होते. मग सूर्याच्या जवळात जवळ जाऊन त्याचा अभ्यास करायचा होता. आणि मग Proxima Centauri वर जाऊन त्याचाही अभ्यास करायचा होता. यामुळे आपला सूर्य आणि इतर तारे यांच्या तौलनिक अभ्यासास मदत होणार होती.

पण अगदी काटेकोरपणे आखलेल्या या मोहिमेत पहिल्या टप्प्यातच काहीतरी जबरदस्त गडबड झाली होती. यान चंद्रावरही पोहोचले नव्हते कारण यानाचा पृथ्वीवरून कंट्रोलच गेला होता. आपला ठरलेला रस्ता सोडून यान भरकटतच गेलं ते पार सूर्यमालेबाहेर. आता इथे किती दिवस, किती महिने, किती वर्षं रहायचं माहित नाही. अन्नाचा, इंधनाचा साठा संपण्याआधी पृथ्वीवरून मदत येईल का? माहित नाही. परत जमिनीला कधी पाय लागणार आहेत का? माहित नाही. पृथ्वीशी संपर्क पुन्हा सुरू होईल का? माहित नाही....... हृदयात निराशा दाटून आली आणि त्याला आपले काळेकुट्टं भविष्य समोर दिसायला लागलं. याच निराश अवस्थेत तो गाणं म्हणू लागला...

चंद्रकांता (१९५६)
http://www.imdb.com/title/tt2017700/
http://www.youtube.com/watch?v=Wf-RrIGiPTk

स्निग्धा, तू मेल वाचलीस का? संपर्कातून मेल केलीये मी. Happy

तू, श्र आणि भरत मयेकर यांना पार्शिअली बंदी आहे. आधी इतरांना कोडी सोडवायचा चान्स द्या. नाहीतर तुम्ही अतिरथी महारथी पटापट सगळी कोडी सोडवून टाकाल. Happy

कोडं क्र. १४ : जिप्सी --> स्निग्धा
_ _
ज_
_ म_ के
_प_
_ _ में
_
ग_
_ _
ह_ _
_ ब
_ गा _ _

_ _

उत्तर :

हम जब सिमट के आपकी
बाहोंमे आ गये

वक्त (१९६५)
http://en.wikipedia.org/wiki/Waqt_(1965_film)
http://www.youtube.com/watch?v=MjO2BvwoRdQ

स्निग्धा, तू मेल वाचलीस का? संपर्कातून मेल केलीये मी. >>> सॉरी मामी, पण मी मेल रोज चेक करत नाही. त्यामुळे हे मला माहीतच नव्हत की मला पण बंदी आहे Lol विपुत लिहील असत तर कळल असत.

शेरलॉक होम्सला हिंदी येत असतं तर त्याने कुठलं गाणं म्हणून डॉक्टर वॉटसनचं शंकानिरसन केलं असतं?>>>
कोडं क्र ९

कैसे समझाउ, बडे ना समझ हो..

राजेन्द्र कुमार, वैजयन्तीमालाचा सिनेमा (अशी अंधुक आठवण आहे)

Kod 11:

GA to GA kaise bin aapake
Lagata nahi dil kanhi bin aapake

Sorry for English Sad

Pages