गाओ मॅरॅथॉन २०१४ : ..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ६)

Submitted by मामी on 6 January, 2014 - 22:07

मायबोलीकर, सर्व प्रथम तुम्हा सगळ्यांना नविन वर्षाच्या शुभेच्छा!

गाओ, अर्थात गाणे ओळखा!.

तर तो/ती कोणतं गाणं म्हणेल? या धाग्यांतर्गत आज दिवसभर एक कोड्यांची मॅरॅथॉन आयोजित केली आहे. आज भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजल्यापासून दर तासाला नवनविन कोडी इथे दिली जातील. तुम्हा सगळ्यांना ही कोडी डीकोड करायची आहेत. म्हणजे त्यातली गाणी ओळखायची आहेत.

बक्षिसं तर आहेतच अर्थात.....

तर थोड्याच वेळात मॅरॅथॉन सुरू होत आहे. लक्ष ठेवा! लक्ष ठेवा!! लक्ष ठेवा!!!

- टीम : जिप्सी, स्वप्ना_राज, माधव, मामी

**********************************************************************************************************
१. कोड्यांना क्रमांक दिले आहेत. उत्तरे लिहिताना तो क्रमांक नमुद करावा.
२. जी पहिले बरोबर उत्तर देईल ती व्यक्ती विजेती ठरेल.
३. लागोपाठ दोन बरोबर उत्तरं आली तर त्यातील ज्या पहिल्या उत्तरात कोड्याचा योग्य क्रमांक नमुद केला आहे ती व्यक्ती विजेती ठरेल.
४. नविन कोडी हेडर मध्ये टाकली जातील. जी कोडी सुटतील ती हेडरमधून खाली प्रतिसादांत हलवली जातील. त्यामुळे कोडीत्सुकांनी प्रामुख्याने हेडरवर लक्ष ठेवावे.
५. कोडी लगेच सुटली नाहीत तर क्ल्यू दिले जातील. ते देखिल हेडरमध्येच टाकले जातील.
६. बक्षिसांबद्दल कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही.
७. ऐकूणच कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही.
८. आक्षेप नोंदवण्यास सक्त मनाई आहे.

**********************************************************************************************************

सर्व भाग घेणार्‍यांचे आणि विजेत्यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन!!!

गाओ मॅरॅथॉन २०१४ मध्ये मंगळवार दिनांक ७ जानेवारीला (भा.वे.नु) ९.०० वाजल्यापासून ते बुधवार दिनांक ८ जानेवारीपर्यंत (भा.वे.नु.) ११.३० पर्यंत एकूण ४५ कोडी विचारली होती.

कोडी बनवण्याची जबाबदारी घेतली होती टीम मेंबर्सनी - स्वप्ना_ राज (१४ कोडी), जिप्सी (१७ कोडी), माधव (२ कोडी) आणि मामी (१२ कोडी).

कोडी सोडवण्याची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली : अश्विनी के (२ कोडी), झकासराव (१), श्रद्धा (१६), भरत मयेकर (८), मॅक्स (१), PracheeS (१), स्निग्धा (३), केदार जाधव (१), चमन (१), झिलमिल (७), साती (१), केया (१), स्वाती_आंबोळे (३), इश्श (१) यांनी.

बक्षिसं जिप्सी यांनी स्पॉन्सर केली होती.

आशा आहे की आपण सगळ्यांनी या मॅरॅथॉनचा मनापासून आनंद लुटलात. (आम्ही तरी एंजॉय केलं बुवा!)

आमच्या टीमतर्फे पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

है शाब्बास श्रद्धा!

कोडं क्र. ४ ची विजेती आहे श्रद्धा. आणि तिला बक्षीस मिळत आहे :

आणि शिवाय एक कॅरॅक्टर सर्टिफिकेट (का ते ओळखा).

कोडं क्र. ४ : मामी --> श्रद्धा

वॉल्ट डिस्ने पिक्चर्सनी फाईंडिंग निमोचा ३ रा भाग काढायला घेतला. यावेळी त्यांनी तीनही प्रमुख पात्रांवर अजून जास्त मेहनत घेण्याचं ठरवलं. त्याकरता त्यांनी सर्व जगातून निवडक पंधरा जणांना आमंत्रित केलं. त्यातल्या ५-५ जणांना एक एक कॅरॅक्टर वाटून दिलं.

त्या पाच जणांच्या टीमला त्यांना दिलेल्या पात्राचा सखोल अभ्यास करून ते कसं दिसेल, विशिष्ट परिस्थितीत कसं वागेल, त्याचे स्वभाव विशेष ठळक करणारे प्रसंग काय असतील या सगळ्यावर एकत्र काम करायचं होतं. आता या सिनेमापुरते ते पाचजण सतत एकत्र असणार होते.

यातलीच एक टीम बनली त्यात भारताचे के के मेनन आणि केतकी, चीनचा चो फॅट, अमेरीकेची रीहाना आणि कोरीयाची सेन्क्यू होती. टीम बनली त्या दिवशी के के मेनन आजारी होता म्हणून मिटिंगला जाऊ शकला नाही. पण आपल्याला कोणतं कॅरॅक्टर मिळालंय आणि आपल्या टीममध्ये कोणकोण आहे ही उत्सुकता होतीच. मग त्याने केतकीला फोन केला आणि डिटेल्स विचारले. केतकीनंही त्याला एक गाणं म्हणून ही माहिती पुरवली.

उत्तर :

के हम तुम चो, री, से
बंधे एक Dory से

धरती कहे पुकार के (१९६९)
http://en.wikipedia.org/wiki/Dharti_Kahe_Pukarke
http://www.youtube.com/watch?v=mVNaX6X11Js

श्रमातेला गाणं ओळखायला बंदी नाही तर मलाच काय म्हणून? >>> श्रमातेलाही बंदी घातलेय. पण तुम्हा दोघांवरही पार्शियल बंदी आहे. इतर कोणाला बर्‍याच वेळात नाही ओळखता आलं तरच तुम्ही सांगा प्लीज. Happy

कोडं क्र. ६

घट डोईवर घट कमरेवर
सोडी पदरा, (प्रधानजी चावट आहेत)
नंदलाला,
नंदलाला रेऽऽ >>> नाही मंजूडी. Happy

कोडं क्र. ५ : जिप्सी --> भरत मयेकर

_
_ _न
_ _
से
_ड_ _ _
_ _
तु _ _
_ _ र
है
_
_ _
_ _ ग
है
_
र_ _
रे
_ _
_न_
_ज
_

उत्तर :

ओ पवन वेग से उडनेवाले घोडे
तुझपे सवार है जो मेरा सुहाग है वो
रखियो रे आज उनकी लाज रे

जय चितोड (१९६१)
http://www.imdb.com/title/tt0389043/
http://www.youtube.com/watch?v=uRyrKgqxv-0

धन्यवाद. डिश फस्त केली. आता आम्ही घोड्यावर स्वार होऊन मोहिमेवर जात आहोत. ते संध्याकाळीच परत येऊ. तोवर धमाल करा.

बाप्रे, बाप्रे!!! याला म्हणतात होय गाओ मॅरॉथॉन!!
कसली जोरदार चालुये रेस! Happy
विजेत्या आयडींचं अभिनंदन!!

केश्वे, बरोबर.

कोडं क्र. ८ ची विजेती आहे के अश्विनी.

तिला बक्षिस म्हणून मिळत आहे :

आणि एक होकायंत्रं.

कोडं क्र. ८ : जिप्सी --> के अश्विनी

उत्तर :

वादिया मेरा दामन रास्ते मेरी बांहे
जाओ मेरे सिवा तुम कहा जाओगे

अभिलाषा (१९६८)
http://www.imdb.com/title/tt0138994/
http://www.youtube.com/watch?v=TpIfvQ-9BXQ

कोडं ६ :

एक बुत बनाऊंगा तेरा और पूजा करुंगा
अरे मर जाऊंगा प्यार अगर मै दुजा करुंगा

रुप की चांदी, प्यार का सोना, प्रेम नगर से ला के
तेरी सुंदर छवी बनेगी, दोनो चीज मिला के
रंग वफा का मै तेरी मुरत मे भरुंगा

अरे मर जाऊंगा प्यार अगर मै दुजा करुंगा

बराच वेळ झाला कोडं क्र. ३ बाकी आहे म्हणून लिहिते.. Proud

कोडं क्र. ३

तुझे जीवन की डोर (डोअर) से बांध लिया है
तेरे जुल्म-ओ-सितम सर आंखो पर..

येस्स श्र. शाब्बास! काही कोडी तुझ्याकरताच आहेत आणि असतील गं. काळजी करू नकोस. Happy

आणि कोडं क्र. ३ सोडवलं आहे श्रद्धानं. तिचं बक्षिस आहे :

आणि गोकुळ दुधाची १/२ लिटरची पिशवी (भरलेली).

कोडं क्र. ३ : मामी --> श्रद्धा

"यशोदे, तुझ्या कान्ह्यानं आज पुन्हा आमची दुधाची मडकी फोडली. सगळं दही दूध एकत्र करून काला केला आणि त्याच्य सवंगड्यांसमवेत फस्तही केला. बाई, बाई, बाई, बाई ......... हद्द झाली ही. रोज उठून नविन प्रताप! आणि तुला तर काही नाही त्याचं. आता तुम्ही बेशरम पालकांसारखं वागणार की मुलाला सुधरवण्याचा प्रयत्न करणार? तुम्ही नाही सुधरवाला त्याला तर आम्हालाही आमचा सुसंकृतपणा बाजूला ठेऊन योग्य कारवाई करावी लागेल हे लक्षात घ्या. यशोदे, तू आणि त्या राधानं कन्हैय्याला अतिच डोक्यावर घेतलंय हां...."

असा जालिम अल्टिमेटम मिळाला आणि यशोदेनंही आपली बेशरम पालकाची इमेज बदलण्याचा निर्णय घेतला. आज या कृष्णाला चांगलीच शिक्षा करते. तरातरा जाऊन तिनं त्याला खेचून आणून अंगणात उभं केलं आणि आधी त्याच्या डोळ्याला एक काळी पट्टीच बांधून टाकली. त्याच्या नजरेची जादू तिच्यावर चालू नये म्हणून.

मग ती उखळ शोधू लागली तर तिच्या लक्षात आलं की उखळ तिच्या शेजारणीनं काही दिवसांकरता वापरायला नेली होती. तेवढ्यात जवळच पडलेलं तिच्या घराचं जुनं लोखंडी दार तिला दिसलं.

(नंदानं घराची जुनी दारं बदलून नविन लाकडाची आणि डिझायनर दारं लावायचं एकदाचं मनावर घेतलं होत. गोकुळातलं अव्वल नंबरचं सुंदर घर होतं त्यांचं. सगळे म्हणायचे देखिल की नंदमहाराजांचं घर म्हणजे गोकुळचं सौंदर्य. एकदम A1! तेच घर अधिक सुंदर करण्याची नंदाची खटपट सुरू होती.)

यशोदेनं एक चांगला दोरखंड आणला, कृष्णाला त्या दाराला बांधून टाकलं आणि ती आपल्या कामाला निघून गेली.

थोड्याच वेळात नेहमीप्रमाणं राधा आली कृष्णाची चौकशी करायला. त्याला बांधलेलं बघून ती कळवळली.

"अरे कन्हैय्या, हे काय! तुला इथे कोणी असं बांधलं? आणि का?"

"अगं पण मला बांधलंय कशाला ते तरी सांग. ती आईची आवडती उखळ तर सध्या घरी नाहीये." कृष्णानं राधेला विचारलं. "आणि का बांधलंयस विचारशील तर गौळणींनी माझ्यावर आरोप केलाय मी म्हणे त्यांचं दूध, तूप, दही संपवून त्यांच्यावर अन्याय करतोय.... तुलाही तसंच वाटतं का? मी तुलाही खूप त्रास देतो ना?"

त्याच्या या दोन्ही प्रश्नांना राधेनं गाण्यातून उत्तर दिलं.....

उत्तर :

तुझे G1 की door से बांध लिया है (G1 = गोकुळातील एक नंबरचा बंगला)
तेरे जुल्मों सितम सर आंखोपर

असली नकली (१९६२)
http://en.wikipedia.org/wiki/Asli-Naqli
http://www.youtube.com/watch?v=amRMVEXb-xI

अरे वा मस्तच चाललीय स्पर्धा.

कोड क्रमांक ६ - किसी पत्थर की मूरत से मोहब्बत का इरादा हैं...

कोडं क्र. ७ : स्वप्ना_राज --> श्रद्धा

अल्लाउद्दिनने तो दिवा पुसायला घेतला मात्र एकदम लखलखाट झाला आणि त्यातून एक राक्षस बाहेर पडला. आधी अल्लाउद्दिन घाबरलाच. पण तो राक्षस हात जोडून समोर उभा आहे हे बघताच त्याच्या जीवात जीव आला. राक्षसाने 'क्या हुकुम मेरे आका?' म्हटल्यावर तर प्रथम त्याचा आपल्या कानांवर विश्वासच बसेना. पण राक्षसात किती दम आहे हे पहायला आधी त्याने शहरातल्या नामांकित हलवायाच्या दुकानातील मिठाई मागवली. डोळ्याचं पातं लवतं ना लवतं तोच ती हजर झाली. मग त्याने भारी कपड्यांची मागणी केली. ती तत्काळ पूर्ण झाली. "अलिशान बंगला" हे शब्द तोंडातून बाहेर पडायच्या आत तो एका प्रशस्त आणि सर्व सुखसोयींनी युक्त अश्या बंगल्यात होता. राक्षस 'लई पावरबाज' आहे ही त्याची खात्री पटली.

आता मात्र आपलं 'गुज मनीचं' त्याला सांगायचंच असं अल्लाउद्दिनने ठरवलं. 'अरे, मस्तच आहे हा बंगला. पण असं बघ, मला एकट्याला तो फार मोठा आहे. ह्या बंगलीला एक मालकीण हवी.' राक्षसाच्या चेहेर्यावर प्रश्नचिन्ह आलं. लोकांच्या इच्छा पूर्ण करायच्या भानगडीत त्याला बिचाऱ्याला स्वत: प्रेमात पडायला वेळच मिळाला नसावा.

'त्याचं काय आहे' अल्लाउद्दिनने लाजत म्हणाला 'माझं एका मुलीवर प्रेम आहे. तिचं नाव जास्मीन. मला तिच्याशी लग्न करायचं आहे. तू तिला इथे आणशील का?'
'जी हुजूर' म्हणून राक्षस अंतर्धान पावला तो अर्धा तास आलाच नाही. अल्लाउद्दिन हैराण झाला. हा गेला तरी कुठे आणि ह्याला कुठे शोधायचं?
राक्षस आला तो पडलेल्या चेहेर्याने.
'काय रे काय झालं? आणि जास्मीन कुठे आहे?' अल्लाउद्दिनने विचारलं.
'मला माफ करा आका. मी तिला नाही आणू शकलो. तिचं दुसर्या मुलावर प्रेम आहे. तिने "येत नाही जा" असं ठणकावून सांगितलं मला'. राक्षसाची 'फेल' व्हायची ही बहुधा पहिलीच वेळ असावी.

बिचारा अल्लाउद्दिन! त्याचा राक्षसावर केव्हढा विश्वास होता. उदास चेहेर्याने तो एक गाणं गाऊ लागला.

उत्तर:

हम थे 'जिन'के सहारे
'वो' (जास्मिन) हुए ना हमारे...

सफर (१९७०)
http://en.wikipedia.org/wiki/Safar_%28film%29
http://www.youtube.com/watch?v=9T6BflXhcvM

कोडं क्र. ६

ये जीवन (पाणी) है...
इस जीवन का
यही है, यही है
यही है 'रंग' 'रूप'...

हे आहे का? पण नीट लॉजिक बसत नाहीये बहुधा... घागरींचा काही उल्लेख नाही.

६ साठी क्लू द्या.

शेरलॉक होम्सला हिंदी येत असतं तर त्याने कुठलं गाणं म्हणून डॉक्टर वॉटसनचं शंकानिरसन केलं असतं?>>> डॉ. वॅटसनला हिंदी समजलं असतं का हेही लिहा Proud

Pages