अळीव/हळीव लाडू

Submitted by तृप्ती आवटी on 26 December, 2013 - 20:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी अळीव, २ वाट्या किसलेला गूळ, २ वाट्या नारळाचा चव

क्रमवार पाककृती: 

अळीव मंद आचेवर भाजून घ्यावेत. छान खमंग वास सुटतो आणि हलकासा रंग बदलतो. जरासे कोमट झाले की एका कढईत अर्धे अळीव पसरून त्यावर अर्ध्या नारळाचा थर लावावा. नारळावर अर्ध्या गुळाचा थर लावावा. त्यावर आधीच्याच क्रमाने आणखी एक एक थर लावून घ्यावा. झाकण घालून मंsssssद आचेवर शिजवायला ठेवावे. गूळ वितळला की एकदा हलवून घ्यावे. अळीव शिजलेत असे वाटले की झाकण काढून हलवत राहावे. मिश्रण लाडू वळण्यासारखे झाले की आच बंद करावी.

वाढणी/प्रमाण: 
मध्यम आकाराचे १०-१२ लाडू
अधिक टिपा: 

_अळीव भाजून घेतल्याने छान खमंग लाडू होतात.
_मायबोलीवर अळीव भाजून घेऊन करायची कृती सापडली नाही म्हणून ही दिली आहे.
_या आधी इथे आलेल्या कृती: http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/115677.html?1158036653

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायो, मी शोधली. मला तरी अळीव आणि हळीव नावाने एक मेधाची 'नावात काय आहे' आणि जुन्या मायबोलीतली ही वर दिली आहे या दोनच मिळाल्या.

करून बघण्याचे चान्सेस शून्य असले तरी मला ही पाककृती फारच वेगळ्या कारणांसाठी आवडली.

नागपुरी भाषेत सांगायचं तर, "अवं माय वं! ह्ये रेश्पी वाच्ली अन् अस्सा खकाना झाला त्यायच्या अंगाचा, का हिकडल्या तिकडल्या बाफावर लिहू लिहू बोंबले!" Proud

मृण, Biggrin