Submitted by दक्षिणा on 3 December, 2013 - 04:15
नविन मालिका होणार सून मी या घरची या धाग्यावरच्या पोष्टी २००० च्या पुढे गेल्याने. हा नविन धागा. सिरियल नविन न राहिल्याने, शिर्षकातला 'नविन' हा शब्द काढलेला आहे. आता उरलेला काथ्याकूट इथे करूया

विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जान्हवीला जानू म्हणणे म्हणजे
जान्हवीला जानू म्हणणे म्हणजे शाळिग्राम गुरुजींना मौलवी हुसैन बख्त म्हणण्यासारखे वाटते.
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
Aaj kaay jhala?
Aaj kaay jhala?
अशोकमामा आले आहेतना आता
अशोकमामा आले आहेतना आता कोल्हापूरला? मामा अपडेट्सची वाट बघतोय आम्ही.
अपडेट्स लिहारे कोणीतरी. मामा
अपडेट्स लिहारे कोणीतरी. मामा काही आले नाहीत लिहायला. इथे येऊन अपडेट्स वाचायची एवढी सवय झाली आहेना, झोपायला जाईपर्यंत डोकावत असते इथे.
सॉरी अन्जू.... मी स्वतःच
सॉरी अन्जू....
मी स्वतःच रात्री बारा नंतर घरी आलो असल्याने मला आजचा भाग पाहाता आला नाही. मात्र घरातील मुलांनी सांगितले की, निव्वळ आईआजी आणि श्री हे दोघेच भांडत होते एकमेकाशी 'खरे बोलणे' या विषयावर आणि बाकीच्या सहा स्त्रिया आजूबाजूला ऐकत उभ्या होत्या...डोळ्यातून पाणी काढत काढत... मुकाटपणे. शेवटी श्री 'गोकुळ' मधून निघून जाणार असा काहीतरी निर्णय झाला आहे.
उद्यापासून मी नियमित लिहितो अपडेट.
काल..... श्री आजीला सांगतो कि
काल.....
श्री आजीला सांगतो कि जान्हवीने मला वाचवायचा प्रयत्न केलाय. लग्नात चंद्रहार हरवला याचा इश्शू होऊ नये म्हणून मी नवीन हार मागविला. मग सगळे खूश झाले.
आजी,"म्हणजे तू माझ्याशी खोटं बोललास. खोटं वागलास."
श्री : माझं ते इन्टेंशन नव्हतं. मला फक्त वेळ मारुन न्यायची होती. मी याच्या परिणामा विचार नाही केला, चुकलं माझं.
आजी: तू अ क न होतस.
श्री : आता चंद्र्हार हरवला तर हरवला त्याचं एव्हढं काय?
आजी :(आता जास्त भडकते) तू हा प्रश्न मला का विचारतोस? जणू हार हरवला म्हणून मी चिडली आहे. अरे हरवला तर हरवला हार. जान्हवी बेजबाबदार मुलगी आहे असं म्हटलं असतं मी. हार हरवल्यानंतर जी लपवाछपवी झाली, जे खोटं बोललं गेलं मला प्रोब्लेम त्या विषयी आहे. आपल्या नात्यात तेव्हढा मोकळेपणा आहे. त्याच वेळेस तू सगळं सांगितले असते त्र मी चार शब्द सुनावले असते..पण लगेच दुसरा हार मागवून घेतला असता.
श्री: त्यावेळी नाही सुचलं.
आजी : म्हणजे ४ हारांची खरेदी झाली तर.
श्री : मी सरु मावशीसाठी हार घेतला नव्हता. (सगळ्यांचे चेहेरे). तिने दाखवलेला हार जान्हवीचा होता.
तेव्हा श्री भीतीपोटी त्या बोललेल्या खोट्याबद्दल सांगतो.
आजी : म्हणजे खरे बोलायची संधी तू गमावलीस आणि इतरांना खोटेपणात सामिल करून घेतलस. हे सगळं जान्हवीला माहित होतं.
तेव्हा मावशी तिने जान्हवीला सांगितल्याचे सांगते.
आजी : हे सगळं करण्यापेक्षा तू एका श्ब्दाने मला सांगितलं असतं तर सोप झालं नसतं का? मी काय हंटर घेऊन बसले होते का हातात? का? का केलस हे? हेच शिकवलं मी तुला? काय वागले मी तुझ्याशी कि तुला माझी धास्ती वाटावी?
श्री : माझं चुकलं
आजी : आणखी काही आहे जे तू मा पा खोटं बो? लबाडी केलीस?
इकडे जानूच्या कार्यालयात सर तिची वाट बघत असतात.
जानू ची आई पिंट्याला हाराबद्दल विचारते. तो तिला हार मामाच्या पेटीत सापडल्याचे सांगतो. ते मामाला फोन करतात.
श्री मग पन्नास हजाराबद्दल सांगतो. मग जानूशी भांडण-मो आ चे ते ऐकणे-जानूचे पैसे परत करणे.
आजी : म्हणजे त्या दिवशी तू इंदूला खोटं पाडलंस तर! नंदन ला आपल्या कटात सांइल करून घेतलंस. आणि तू दो मा खो बो. तुला काहिच शरम वाटत नाही
श्री माफी मागतो.
आजी : नंदनला मी विनाकारण बोलले. कारण माझा नातू मा खो बो. (श्री माफी मागतो.) जर हे हाराचं प्र उ आ नसतं तर तू माझ्याशी खरं बोलायच्या भानगडीत पडला असतास?
श्री : नसतं सांगितलं. (आजीला अजूनच वाईट आटते)
मग ती खूप बोलते....घरात सत्यप्रियता जपता आली नाही....श्रीला सुनावते.....म्मझंच चुकलं. वारंवार चुक करणारा निर्ढावतो. माझ्या मुलांनाही मी ज्या सवलती दिल्या नाहीत त्या तुला दिल्या. आपल्या नात्यात पारदर्शीपणा ठेवला. तुझ्यावर कसलीही सक्ती केली नाही. तुझ्या कलाने घेतले. तुला मी सांभाळलं नाही श्री जपलंय मी तुला.
का माझ्याशी खोटं बोलावस वाट्ल?
श्री : मी घाबरलो होतो. तुझी भिती वाटली.
आजी: तुला माझ्याशी बोलायची भिती वाटावी यातच माझं अपयश आहे. मी कमी पडले. माझ्या मुलांच्या बाबतीत जे झालंय तेच तुझ्या बाबतीत झालंय. पण आता जास्त दुखावले आहे. तू मला फसवत आलाय.
श्री प्रत्येक वाक्याला माफी मागत असतो.
आजी : तू बाकिच्या लोकांना खो बो लावलंस. का? कशासाठी हे सगळं? काय वाचवायचं होजा,जान्हवीची इमेज? एव्हढं सगळं करून तू ती वाचवू शकलास असं वाटतंय तुला?
श्री : मला काय पाहिजे ती शिक्षा कर...
आजी : मी काय शिक्षा करणार...तुला काय करायचे ते तू ठरव...शेवटी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकूनच चाललास तू.
श्री : म्हण्जे मी या घरात राहण्याच्या योग्यतेचा नाहिये का?
आजी : ते तू ठरव...
आज्चा भाग भांडण पुढे सुरु.....(नंतर लिहिते..उद्यापासून मामा आहेतच )
सोनाली, सॉलिड. शब्दन् शब्द
सोनाली, सॉलिड.
शब्दन् शब्द कसा काय लक्षात राहतोय तुमच्या? की बघता बघता शॉर्टहँडमध्ये लिहून काढताय? की तुम्हीच मालिकेच्या संवादलेखिका आहात?
नाही नाही....आज दुपारी खूपच
तसं राहतं माझ्या लक्षात.....मी एकदा माझ्या मैत्रिणीला एका चित्रपटाची कथा सांगितली होती...अगदी डायलॉग सुद्धा सेम टू सेम. ती तो चित्रपट बघूच शकली नाही आणि तेव्हापासून मला अशी डिटेल श्टोरी सांगायला मनाई आहे.
तसं राहतं माझ्या
तसं राहतं माझ्या लक्षात.....मी एकदा माझ्या मैत्रिणीला एका चित्रपटाची कथा सांगितली होती...अगदी डायलॉग सुद्धा सेम टू सेम. ती तो चित्रपट बघूच शकली नाही आणि तेव्हापासून मला अशी डिटेल श्टोरी सांगायला मनाई आहे.>>>> सोनाली
>>शब्दन् शब्द कसा काय लक्षात
>>शब्दन् शब्द कसा काय लक्षात राहतोय तुमच्या?>> अगदी मला पण हाच प्रश्न पडला.. थोर माणूस
जान्हवीच्या लग्नानंतर गीताच
जान्हवीच्या लग्नानंतर गीताच छान दिसायला लागलीय . आणि काम पण छान करतेय
हट्टंगडी बैंचं अॅक्टींग जरा नाटकी होतय.....म्हणजे संवादफेक नाटकात असते तशी....
शशिकला बाईंनी बेअरींग चांगलं सांभाळलय.
बाबा, सॉरी पण घरात आता ताईचा पगार नाही, मी नोकरी करावी तर माझं शिक्षण नाही म्हणून धंदा चालू करण्यासाठी तो हार विकायचा मला मोह झाला. असं जर पिंट्या म्हणाला असता तर ?
नाहीतरी तो हार पडूनच राहणार होता......हे उत्तर पटलं नाही......... हे असे डायलॉग लिहून ......त्यापात्राबद्दलची सहानुभूती जाते. आणि मालिकेतला इंटरेस्ट कमी होतो..
सोनाली.... अप्रतिम अपडेट....
सोनाली.... अप्रतिम अपडेट.... अगदी लेखिकेनेच लिहिल्यप्रमाणे प्रत्येक पात्राचे संवाद जसेच्या तसे इथे देणे म्हणजे तुमच्या स्मरणशक्तीला दाद दिलीच पाहिजे. मी स्वतः ही मालिका अगदी मनःपूर्वक पाहातो {कितीही वैताग देणारा एपिसोड असला तरीही....} पण ज्यावेळी अपडेट लिहायला कॉम्प्युटरसमोर येतो त्यावेळी प्रसंग डोळ्यासमोर येत असतील तरीही घडलेले संवाद न संवाद बोटातून उतरतीलच असे नसते....ते तुम्ही केले आहे.
आज सकाळी काल हुकलेला भाग पाहिला...इथे येऊन लिहायचे मनी होते, पण तुम्हीच ते कार्य केलेले पाहिले अन् त्याचा वाचन आनंद घेतला. आजपासून मी जरूर लिहितो.
रोहिणी हट्टंगडीच्या अभिनयकौशल्याबद्दल वाद नाहीच, पण गेले दोन दिवस सलग त्याच प्रामुख्याने पडद्यावर आहेत आणि एकटा श्री सोडल्यास अन्यांच्या तोंडी संवाद नाहीत हे हट्टंगडीच्या प्रभावाचे लक्षण मानले पाहिजे.
काल सहस्त्रबुद्धे यांच्या घरातील प्रसंगात सदाशिवरावांनी कलाबाई आणि पिंट्याला शाब्दिक झोडणे बरोबर होते; पण इतके होऊनसुद्धा 'पिंट्या, आता तो चंद्रहार कुठे आहे ? काय केलेस त्याचे ?" असा प्रश्न ते का विचारीत नाहीत ? याबद्दल काहीच नाही. म्हणजे आपल्या पोराने त्याच्या मामाने चोरलेला हार विकायला नेला, इतपतच त्याना समजले....पण तो चोरीचा आहे, तेव्हा तो दुकानदार पोलिसांकडे तक्रार करू शकतो, घरी पोलिस येऊ शकतातही.... तसेच जान्हवीसाठी सासरच्या लोकांनी तो खास चंद्रहार दिला होता हे त्याना माहीत होते, तेव्हा रात्री चोरीला गेलेला हार सापडला आणि तो जान्हवीने अक्षताच्या वेळी घातला आणि वेळ टळली. पण आता पिंट्याकडे एक हार आहे, म्हणजे मग आपल्या मुलीकडे कुठला हार आला, तो तिला कुणी दिला ? याचा विचार सदाशिवरावांनी करायला हवा होता. दोनचार शब्द बोलले आणि ते खोलीतून निघून गेले.
मला तर अपेक्षा होती की बाबा
मला तर अपेक्षा होती की बाबा पिंट्याला खडसावुन सांगतील की आत्ताच्या आत्ता गोखल्यांच्या घरी जाउन विकायला नेलेला हार तुला कुठे आणि कसा मिळाला याचा सगळा उलगडा करुन ये..
काल पिंट्या आणि शशिकला बाईंमधले संवाद मस्त होते.... पिंट्याने आपल्या वागण्याच खापर आईच्या माथी फोडल.
सोनाली मस्त आणि धन्यवाद, मी
सोनाली मस्त आणि धन्यवाद, मी वाटच बघत होते.
बुधवार दि. २५ डिसेंबर २०१३ :
बुधवार दि. २५ डिसेंबर २०१३ : अपडेट
~ आज नाताळच्या सुट्टीचा कथानकावर काही परिणाम होतोय की काय अशी फसवी शंका मनी आली होती. पण तसे काहीच झाले नाही. कथानक काल जिथे थांबले होते तिथूनच सुरू झाले आणि आईआज्जीने श्री ला बोल लावणे आणि श्री ने आईआज्जीच्या हुकूमशाही वृत्तीबद्दल ताडताड बोलणे....हाच प्रकार वीसेक मिनिटे चालू होता. भांडणाचे कारण "सत्यच बोलले पाहिजे..." हा आजीचा आग्रह तर "सत्याने एखाद्याचे नुकसान होत असेल तर काही प्रमाणात त्यात असत्य मिसळून आपला उद्देश्य साध्य केल्यास तो गुन्हा मानला जाऊ नये..." हा श्री च बचाव....जो आजी मान्य करीत नाहीत. "मी जो उद्योग उभा केला आहे त्याचा पाया सत्यावर आधारित आहे.... तू मला खोटे बोलून फसविले आहेस, त्याला क्षमा नाही" असे आजी म्हणत आहेत तर श्री त्याना उत्तर देताना "होय, कबूल करतो मी खोटे बोललो...पण जे बोललो ते चांगल्यासाठीच बोललो. नेहमी सत्य बोलावे हे लॉजिक चांगले आहे पण ते नेहमीच चांगले असते असे मानू नये...." या युक्तीवादाला आजी प्रखरतेने विरोध करतात आणि मग अशा स्वरुपात "मी या घरात राहणे ठीक नाही. मी सोडतो हे घर" असे श्री सार्यांसमोर जाहीर करतो. त्याला उत्तर म्हणून आजी...'तो तुझा निर्णय आहे." आजीचा असा ठामपणा पाहून काहीसा अस्वस्थ झालेला श्री नंतर जान्हवीपुढे "मी जाताना आजीला ऑफिसमध्येही मी येणार नाही असे सांगणार आणि त्यावेळी जर आजीनी मला ऑफिसमध्येही येऊ नकोस असे म्हटले तर मात्र या घराची पायरी पुन्हा कधी चढणार नाही..." असा निर्वाणीचा इशारा देतो. आजीना समजावण्याच्या दृष्टीने बेबीआत्या मध्यस्थ म्हणून शक्यतो प्रयत्न करते....तर बाकीच्या आया डोळ्यातून निव्वळ गंगाजमुना काढतच उभ्या असतात मुकाटपणे. जान्हवी फक्त "श्री मी तुझ्यासोबत येणार..." इतकेच म्हणत राहाते.
ऑफिसच्या मुद्द्यावरसुद्धा श्री चा पराभव होतो....मग तो "मी एक महिना ऑफिसमध्ये येत जातो...तेथील शिस्त लावतो..." इतकेच बोलतो...त्याला आजीची मूक संमती दिसते. बॅग घेऊन बाहेर पडतेवेळी आजी सोडून बाकीच्या सार्या स्त्रिया त्याला निरोप द्यायला आलेल्या दाखविल्या आहेत...त्यामध्ये जान्हवीदेखील दरवाजातच उभी आहे....म्हणजे ती श्री सोबत गेली नाही, असा अर्थ होऊ शकतो....उद्या सविस्तर समजेलच.
मामा मस्तच, आले बघा वाचायला.
मामा मस्तच, आले बघा वाचायला. सोनाली यांनीपण छान अपडेट्स लिहिले तुमच्या अनुपस्थितीत, बेफिकीर यांनीपण खुसखुशीत लिहिले. मामा तुमचे अपडेट्स वाचायची सवयच लागलीय त्यामुळे आज लिहिलेत त्यासाठी धन्यवाद. वेलकम मामा.
थॅन्क्स अन्जू.... वास्तविक
थॅन्क्स अन्जू....
वास्तविक काहीसे अजून विस्ताराने लिहिण्याचा मानस होता....पण सारीच पात्रे तोच तो मुद्दा...घरात राहाणे वा घराबाहेर पडणे...उगाळत होती....वाक्येही तिच ती....त्यामुळे लिखाणाला जास्त वाव नव्हताच.
धन्यवाद लोकहो पण मी फक्त
धन्यवाद लोकहो
पण मी फक्त परवाचा भाग टकला होता कालचा लिहायचा राहून गेला.... मामा खरच तुम्ही कसं काय लिहित एव्हढं ..मी तर थकते लिहून.
कालच्या भागात श्रीची घर सोडून जायची ईच्छा नसते तरी तो मी घर सोडून जाऊ का विचारतो....त्याला आजीने घर सोडून जाऊ नको असे म्हणायला हवे होते.
तसेच पूर्ण भांडणात आजी श्रीला घर सोडून जा असेही म्हणत नाही आणि थांबवतही नाही. उलट मी खोटेपणाचा जाब विचारला तर हा घर सोडून जायची भाषा करतो याचच तिला वाईट वाटते.
< आईआज्जीने श्री ला बोल लावणे
< आईआज्जीने श्री ला बोल लावणे आणि श्री ने आईआज्जीच्या हुकूमशाही वृत्तीबद्दल ताडताड बोलणे....हाच प्रकार वीसेक मिनिटे चालू होता> हे कालच्या भागात होते की परवाच्या?
कालच्या भागात बेबी आणि नर्मदा आईआजीशी बोलताना, तर जान्हवी, शरयू आणि सरू श्रीशी बोलताना दाखवल्या. या तिघी श्रीबरोबर घर सोडायला तयार आहेत. पण श्री तुम्ही आईआजीला एकटे सोडू नका असे म्हणतो. त्यांच्या या वेगवेगळ्या बोलण्यातून कळते की श्रीला घर सोडून जायचे नाही आहे पण आजीने तसे म्हणावे असे त्याला वाटते. आईआजीचे म्हणणे, श्रीने घर सोडून जावे असे मी म्हटलेलेच नाही. [बहुतेक ह्या घरात राहण्या न राहण्याचा निर्णय त्या खोटारड्या व्यक्तीने घ्यावा म्हणताना तिच्या मनात जान्हवी (श्रीने अजून सत्यावरून पडदा उचलला नसल्याने) होती.]
जान्हवी श्रीला विचारते की नाते श्रेष्ठ की इगो ..यावर श्री म्हणतो की नाते. मात्र दोघेही इगो धरून बसलेले दिसतात.
यानंतर आपण ऑफिसही सोडू असे सांगून श्री आजीला पेचात टाकायचा प्रयत्न करतो. आजी त्याचा विपर्यास करतात.
सहस्रबुद्ध्यांकडे पिंट्याचा पश्चात्ताप चालू आहे. चंद्रहार प्रकरण गोखल्यांकडे जाऊन सांगायची व माफी मागायची तयारी तो दाखवतो. बाबा त्याला माफ करतात, पुन्हा असे काही करू नको असे म्हणतात. शशिकलाबाईंना "अहो पण तो म्हणतोय ना" असे काहीतरी एकच वाक्य पुन्हा पुन्हा होते.
बायकी घोळ! सरळ समोर बसून एका
बायकी घोळ! सरळ समोर बसून एका मिनिटात सोडविण्यासारखे आहे. पण मग भिजक्या पापण्या
वगैरे? पूर्ण कास्ट मध्ये एकही दमदार प्रॅक्टिकल पुरुष पात्र नाही.
काकवी
काकवी
श्री(राम) वनवासाला
श्री(राम) वनवासाला निघाले......... जान्हवीची उर्मिला झाली
अत्यंत फालतू वादात वेळ
अत्यंत फालतू वादात वेळ घालवतायत हे सिरियल वाले.
दक्षिणा..... १००% सहमत. वाद
दक्षिणा..... १००% सहमत. वाद घरोघरी असतातच, हे मान्य. पण सहा बायका घळाघळा डोळ्यातून पाणी काढीत आहेत {कठोर स्वभावाची समजली जाणारी बेबीआत्यादेखील} आणि आजी व नातू 'तुझे माझे बरोबर की चूक' याचे कांडप करीत आहेत....तेच तेच मुद्दे घेऊन.
प्रेक्षकांना याचा कंटाळा येऊ शकतो याचा रीसर्च करत नसेल का मालिकेची टीम ?
त्यातच जान्हवी ही सून होण्यापूर्वी किती करारी स्वभावाची दाखविली आहे ! तिच्या त्याच स्वभावावर श्रीरंगराव जाम खूष झालेले दाखविले गेले होते.....सुरुवातीला हेमा मालिनीसारखी करारी दाखविली गेलेली ही जान्हवी अचानकच मीनाकुमारीसारखी मनीम्याऊ का झाली असेल ? हाच विचार येत आहे.
बॅग घेऊन बाहेर पडतेवेळी आजी
बॅग घेऊन बाहेर पडतेवेळी आजी सोडून बाकीच्या सार्या स्त्रिया त्याला निरोप द्यायला आलेल्या दाखविल्या आहेत...त्यामध्ये जान्हवीदेखील दरवाजातच उभी आहे....म्हणजे ती श्री सोबत गेली नाही, असा अर्थ होऊ शकतो....उद्या सविस्तर समजेलच.>>>>> मामा मालिकेच्या जाहिरातीत दाखवत होते की जान्हवीपण श्री बरोबर घर सोडुन जायला निघालेली असते, पण आईआजी तिला अडवुन तु जायच नाहीस अस सांगते. आता हिची पण छोटी आई होणार बहुदा... किंवा सगळ्या सासवा तिला दुषण देत बसणार तुझ्यामुळे श्री घर सोडुन गेला म्हणुन त्यातल्या त्यात बेबी आत्या, मोठी आई.... छोटी आई श्रीने घर सोडलय हे विसरणार आणि त्याला शोधत बसणार, सरु मावशी देवाला पाण्यात बुडवणार आणि ते पाणी कमी पडेल म्हणुन डोळ्यातुन गंगा यमुना गाळणार, श्रीच्या आईला आपण काय कराव हेच न समजल्याने ती तोंडाला पदर लावुन रडत बसणार............. हाय राम....
पुढचे काही दिवस एपि या मालिकेमुळे झीवर पुरग्रस्त परिस्थिती ओढवणार आहे.
काही दिवस एपि या मालिकेमुळे
काही दिवस एपि या मालिकेमुळे झीवर पुरग्रस्त परिस्थिती ओढवणार आहे....:D

जान्हवीला कर्तृत्ववान
जान्हवीला कर्तृत्ववान असण्याचे सिद्ध करण्याची मोठी संधी मिळणार असेल. नाहीतर आजीबाई तिला कशाला अडवतील?
मुग्धा करेक्ट!
मुग्धा करेक्ट!
६००
६००
Pages