Avocado ठेपला - तिखट - लोला

Submitted by लोला on 17 September, 2013 - 11:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ मध्यम Avocado - पिकलेला. (हे फळ आहे)
३ चमचे क्रीम चीज
१ कप मक्याचे पीठ. इथे दिसते तसले
१-२ चमचे मिरची-आले-कोथिंबीर यांचे वाटण. आवडीनुसार कमीजास्त करु शकता.
जिरे, तीळ, ओवा यातले काहीही किंवा तीनही. वरुन लावण्यासाठी
मीठ चवीपुरते
साखर चवीपुरती
थोडे तेल.

क्रमवार पाककृती: 

-पिकलेला avocado साल काढून मॅश करुन घ्यावा.
- त्यात क्रीम चीज मिसळावे. मग मिरची-आले-कोथिंबीर वाटण घालावे.
- एकजीव करुन घ्यावे.
- मीठ साखर घालून, मक्याचे पीठ हळूहळू घालावे आणि मिसळून घ्यावे. मग हाताने मळावे.
- पीठ मळून गोळा तयार होतो. पाणी अजिबात घालायचे नाही.
- पिठाचे गोळे करुन घ्यावेत.
- प्लॅस्टिकला तेलाचा हात लावून त्यावर लाटावेत. किंवा हातावरही थापू शकता.
- मी लाटल्यावर वाटीने गोल आकार दिलाय जरा बरं दिसावं म्हणून.
- सपाट तव्यावर थोडे तेल टाकून त्यावर ठेपला ठेवावा.
- वरुन ती़ळ, जिरे, ओवा काय हवे ते लावून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावा.
- पेप्पर जेली, सावर क्रीम किंवा गेलाबाजार लोणच्याबरोबर किंवा नुसतेच खाऊ शकता.
- ही रेसिपी हेल्दी असून, विना कटकटीची आहे.
- तिखट असली तरी तुम्ही गोड मानून घ्या!
-धन्यवाद!

av1.jpgav2.jpgav3.jpgav4.jpgav5.jpgav6.jpgav8.jpgav9.jpgav91.jpgav92.jpg

वाढणी/प्रमाण: 
दिलेल्या प्रमाणात मोठ्या वाटीच्या गोलाएवढे वीसेक ठेपले होतील.
अधिक टिपा: 

- या पिठाचे अजून बरेच कायकाय करता येईल. थालिपीठ, वडे, चिप्स इ.
- पिठात आवडीनुसार काहीही घालू शकता.
- लाटायला सोपे जावे म्हणून थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवू शकता.

माहितीचा स्रोत: 
मी
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन लोला..
>>पूर्णब्रह्म - गोड - पदार्थ स्पर्धेत द्वितीय क्रमांक... ???? Uhoh
संयोजक प्रशस्तीपत्रकात इथे तिखट हवं ना..

लोला, अभिनंदन. Happy

तुझं कॅम्पेन संयोजकांना गोड भासल्याने त्यांनी तुला गोड प्रशस्तीपत्रक दिले आहे. ते तू गोड मानून घे.

अव्हाकाडो ठेपला पुन्हा करून घरपोच पाठवल्यास अजून एकदा अभिनंदन करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

लोला, अभिनंदन. <<- तिखट असली तरी तुम्ही गोड मानून घ्या!>>> म्हटलस म्हणून गोडाचं दिलन की काय?
Wink

मनापासून अभिनंदन.

हा घ्या ठेपला .. क्रीम चीज ऐवजी दही वापरलं आहे आणि मक्याच्या पीठाऐवजी कणिक + मल्टीग्रेन आटा .. वाटणात लसूणही घातली ..

avocado thepla2.jpg

आणि हे ज्युनियर शेफने लाटलेले, भाजलेले .. (फोटो काढेपर्यंत धीर धरवलेला नाहीये .. :हाहा:)

Advait thepla.jpg

छान आहे चव .. मुख्य म्हणजे अव्हाकाडो ची चव लागत आहे .. Happy

मी पण केला. झक्कास झाले. फक्त मका असल्याने लाटता आले नाही व हातावर फक्त पॅटिसच्या आकाराइतकेच थापले आणि वर तीळ पेरायला पण विसरले तरी चव भन्नाट... गरम गरम खावेत.
पुढच्या वेळेस मीपण कणिक व मका घालणार व लाटुन करायचाच विचार केला.

मस्त फोटो आहे सशल... पानात ते गुलाबी काय आहे?

Pages