१ मध्यम Avocado - पिकलेला. (हे फळ आहे)
३ चमचे क्रीम चीज
१ कप मक्याचे पीठ. इथे दिसते तसले
१-२ चमचे मिरची-आले-कोथिंबीर यांचे वाटण. आवडीनुसार कमीजास्त करु शकता.
जिरे, तीळ, ओवा यातले काहीही किंवा तीनही. वरुन लावण्यासाठी
मीठ चवीपुरते
साखर चवीपुरती
थोडे तेल.
-पिकलेला avocado साल काढून मॅश करुन घ्यावा.
- त्यात क्रीम चीज मिसळावे. मग मिरची-आले-कोथिंबीर वाटण घालावे.
- एकजीव करुन घ्यावे.
- मीठ साखर घालून, मक्याचे पीठ हळूहळू घालावे आणि मिसळून घ्यावे. मग हाताने मळावे.
- पीठ मळून गोळा तयार होतो. पाणी अजिबात घालायचे नाही.
- पिठाचे गोळे करुन घ्यावेत.
- प्लॅस्टिकला तेलाचा हात लावून त्यावर लाटावेत. किंवा हातावरही थापू शकता.
- मी लाटल्यावर वाटीने गोल आकार दिलाय जरा बरं दिसावं म्हणून.
- सपाट तव्यावर थोडे तेल टाकून त्यावर ठेपला ठेवावा.
- वरुन ती़ळ, जिरे, ओवा काय हवे ते लावून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावा.
- पेप्पर जेली, सावर क्रीम किंवा गेलाबाजार लोणच्याबरोबर किंवा नुसतेच खाऊ शकता.
- ही रेसिपी हेल्दी असून, विना कटकटीची आहे.
- तिखट असली तरी तुम्ही गोड मानून घ्या!
-धन्यवाद!
- या पिठाचे अजून बरेच कायकाय करता येईल. थालिपीठ, वडे, चिप्स इ.
- पिठात आवडीनुसार काहीही घालू शकता.
- लाटायला सोपे जावे म्हणून थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवू शकता.
मस्त लोला ...
मस्त लोला ...
(No subject)
ऑ?? तिखट लोलाला गोड
ऑ?? तिखट लोलाला गोड प्रशस्तिपत्रक?
अभिनंदन लोला!
अभिनंदन लोला.. >>पूर्णब्रह्म
अभिनंदन लोला..
>>पूर्णब्रह्म - गोड - पदार्थ स्पर्धेत द्वितीय क्रमांक... ????
संयोजक प्रशस्तीपत्रकात इथे तिखट हवं ना..
तिखट लोलाला गोड प्रशस्तीपत्रक
तिखट लोलाला गोड प्रशस्तीपत्रक भारीये. असेच राहुद्या
लोला, अभिनंदन. तुझं कॅम्पेन
लोला, अभिनंदन.
तुझं कॅम्पेन संयोजकांना गोड भासल्याने त्यांनी तुला गोड प्रशस्तीपत्रक दिले आहे. ते तू गोड मानून घे.
अव्हाकाडो ठेपला पुन्हा करून घरपोच पाठवल्यास अजून एकदा अभिनंदन करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
लोल्स, हार्दिक अभिनंदन !
लोल्स, हार्दिक अभिनंदन !
अभिनंदन, अभिनंदन ......
अभिनंदन, अभिनंदन ......
अभिनंदन
अभिनंदन
लोला, अभिनंदन. <<- तिखट असली
लोला, अभिनंदन. <<- तिखट असली तरी तुम्ही गोड मानून घ्या!>>> म्हटलस म्हणून गोडाचं दिलन की काय?

मनापासून अभिनंदन.
अभिनंदन लोला.
अभिनंदन लोला.
अभिनंदन लोला
अभिनंदन लोला
अभिनंदन लोला!
अभिनंदन लोला!
अभिनंदन लोला.
अभिनंदन लोला.
ये sssय! अभिनंदन लोला!!
ये sssय! अभिनंदन लोला!!
अभिनंदन लोला !
अभिनंदन लोला !
हा घ्या ठेपला .. क्रीम चीज
हा घ्या ठेपला .. क्रीम चीज ऐवजी दही वापरलं आहे आणि मक्याच्या पीठाऐवजी कणिक + मल्टीग्रेन आटा .. वाटणात लसूणही घातली ..
आणि हे ज्युनियर शेफने लाटलेले, भाजलेले .. (फोटो काढेपर्यंत धीर धरवलेला नाहीये .. :हाहा:)
छान आहे चव .. मुख्य म्हणजे अव्हाकाडो ची चव लागत आहे ..
मी पण केला. झक्कास झाले. फक्त
मी पण केला. झक्कास झाले. फक्त मका असल्याने लाटता आले नाही व हातावर फक्त पॅटिसच्या आकाराइतकेच थापले आणि वर तीळ पेरायला पण विसरले तरी चव भन्नाट... गरम गरम खावेत.
पुढच्या वेळेस मीपण कणिक व मका घालणार व लाटुन करायचाच विचार केला.
मस्त फोटो आहे सशल... पानात ते गुलाबी काय आहे?
अवाकडो म्हणजेच मख्खन फळ,
अवाकडो म्हणजेच मख्खन फळ, उत्तर कर्नाटक, गोवा मधे हि झाडे असतात.
बापरे!!! कसले आगळेवेगळे
बापरे!!! कसले आगळेवेगळे पदार्थ!
वा , ठेपले तर मस्तच दिसताहेत.
वा , ठेपले तर मस्तच दिसताहेत.
सॉलीड!!! उद्या-परवा मध्ये हे
सॉलीड!!! उद्या-परवा मध्ये हे बनणार.
Pages