Avocado ठेपला - तिखट - लोला

Submitted by लोला on 17 September, 2013 - 11:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ मध्यम Avocado - पिकलेला. (हे फळ आहे)
३ चमचे क्रीम चीज
१ कप मक्याचे पीठ. इथे दिसते तसले
१-२ चमचे मिरची-आले-कोथिंबीर यांचे वाटण. आवडीनुसार कमीजास्त करु शकता.
जिरे, तीळ, ओवा यातले काहीही किंवा तीनही. वरुन लावण्यासाठी
मीठ चवीपुरते
साखर चवीपुरती
थोडे तेल.

क्रमवार पाककृती: 

-पिकलेला avocado साल काढून मॅश करुन घ्यावा.
- त्यात क्रीम चीज मिसळावे. मग मिरची-आले-कोथिंबीर वाटण घालावे.
- एकजीव करुन घ्यावे.
- मीठ साखर घालून, मक्याचे पीठ हळूहळू घालावे आणि मिसळून घ्यावे. मग हाताने मळावे.
- पीठ मळून गोळा तयार होतो. पाणी अजिबात घालायचे नाही.
- पिठाचे गोळे करुन घ्यावेत.
- प्लॅस्टिकला तेलाचा हात लावून त्यावर लाटावेत. किंवा हातावरही थापू शकता.
- मी लाटल्यावर वाटीने गोल आकार दिलाय जरा बरं दिसावं म्हणून.
- सपाट तव्यावर थोडे तेल टाकून त्यावर ठेपला ठेवावा.
- वरुन ती़ळ, जिरे, ओवा काय हवे ते लावून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावा.
- पेप्पर जेली, सावर क्रीम किंवा गेलाबाजार लोणच्याबरोबर किंवा नुसतेच खाऊ शकता.
- ही रेसिपी हेल्दी असून, विना कटकटीची आहे.
- तिखट असली तरी तुम्ही गोड मानून घ्या!
-धन्यवाद!

av1.jpgav2.jpgav3.jpgav4.jpgav5.jpgav6.jpgav8.jpgav9.jpgav91.jpgav92.jpg

वाढणी/प्रमाण: 
दिलेल्या प्रमाणात मोठ्या वाटीच्या गोलाएवढे वीसेक ठेपले होतील.
अधिक टिपा: 

- या पिठाचे अजून बरेच कायकाय करता येईल. थालिपीठ, वडे, चिप्स इ.
- पिठात आवडीनुसार काहीही घालू शकता.
- लाटायला सोपे जावे म्हणून थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवू शकता.

माहितीचा स्रोत: 
मी
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच मस्त...कल्पक रेसिपी आहे.अवाकाडो चे डिप /चटणी /स्प्रेड या शिवाय करण्याजोगा फारच उत्तम पर्याय.माझ्या मते अवाकाडो सारखी चव इतर काही वापरुन येणार नाही.[पिकलेला अवाकाडो क्रीमी /बटरीअसतो.]

avocado हे भारतात पण मिळत का?
गोड असते का त्याची चव?
त्या ऐवजी सफरचंद घातलं तर?

आत्ता बघितलं गूगलवर!
पेरू चालेल बहुदा रिप्लेसमेंट म्हणून... पिअर पण!
बादवे, अवांतर - ते फळ कसं खातात? मगज खातात की मधलं बी खातात? (फणसासारखं? )

रिया, मधली मोठी बी काढायची. गर खायचा. बारीक चिरून किंवा खूप मऊ असेल तर हातानेच मॅश करून. त्यात बारीक चिरून हिरव्या मिरच्या/हॅलोपिनो कांदा-टोमॅटो-लिंबू रस, मिरपूड, हवी तर साखर आणि मीठ चवीनुसार वगैरे घालून थंड करून चिप्सबरोबर डिप म्हणून छान लागतं.

बरं, पुण्यात मला दोराबजी/ अभिरुची मॉल (सिंहगड रस्ता) किंवा फिनिक्स मॉलमधेही कुठेही अ‍ॅवोकॅडो मिळालेलं नाही. कुठे मिळेल पुण्यातच इतर ठिकाणी?

खूपच दडदडीत व कोरडा दिसतोय..

एका मूवीत, शेतकर्‍याची जमीन पाऊस नसल्याने कोरडी होवून भेगा पडते ना तशी दिसते ते आठवले , प्रत्येक घासाबरोबर पाण्याची गरज लागणार जो खाईल तो. तसाही तो तिखट आहेच , त्यात कोरडा...;)

झम्पी, करीना ३ इडियटस मध्ये विचारत होती "तुम गुजराती लोगोंका खाना इतना खतरनाक क्यू होता है? ढोकला, फाफडा, हंडवा, ठेपला," आज आज मला उत्तर मिळाल - दडदडीत आणि कोरडा आणि तिखट. आल ईईईइज वेल ....

छान पाककृती. आमचे मत लोला ह्यांना.
अवाकाडो शॉपराइट मध्ये मिळते मुंबईत. मला त्याचा ग्रीनिश यलो कलर खूप आवडतो. ( भिंतीला लावायला)

>>तुम गुजराती लोगोंका खाना इतना खतरनाक क्यू होता है? ढोकला,<<

सिमंतीनी, तुम्हाला फक्त कोरडा विरुद्ध तेलकट एवढच असते माहितीय का?

भाकरी कोरडी नसली तरी मउ लुशलुशीत वगैरे असू शकते ना? आणि लगेच काय ते जातीवादासारखे विषय काढायचे...गुजराती काय आणि कैच्याकै काहीही...जातीभेदावरून दंगे का होतात ह्याचे उत्तर मिळाले. पदार्थांमध्ये सुद्धा भेदभाव... छे! सुधारा आता. Happy

लोला,
कृपया ह्या धाग्याच्या शब्दखुणांमधे 'पूर्णब्रह्म' असं लिहा.

लिहीलं.

झंपीताई, तो सावर क्रीम, दही, लोणी याबरोबर खा. पाणी मागणार नाही! दात आहेत ना? मऊ लुसलुशीत कशाला पाहिजे?

आपले बहुमोल मत मलाच द्या.
बरं का!

अव्हाकाडोचा रंग टिकवण्यासाठी काही केलेलं नाही, पीठ मळल्यावर लगेच केले. उरलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवले होते दोनेक तास पण रंग बदलला नाही.

कालच केले. मस्त झाले होते. अगदी मऊसूत झाले. रंगही छान आला. फोटोही टाकते थोड्या वेळानी. लोला जियो.

>> पाणी मागणार नाही! दात आहेत ना? मऊ लुसलुशीत कशाला पाहिजे?<<
दात असले म्हणून काय झाले, पराठा कोरडा आहे हा प्रश्ण आहे. एकीकडे अवाकडो व दही घातलेले पराठे खाल्लेले ते खूपच मउसूत होते.. क्रीम चीज घालून इतके का ते कोरडे असा प्रश्ण पडला फक्त. क्रीम चीजमध्ये स्निग्धांश कितीतरी असतो. अवाकडो भाकरी हे ज्यास्त योग्य नाव वाटेल.

(दुसर्‍या मं**बाई म्हणाल्या असत्या, ठेपल्याचा अपमान आहे हा... त्यांना उठसूट लोकांच्या मनाची पडली असते ना त्या...)

(स्वगतः आता मताचे जोगवे कशाला मागताय? नाहि केले तर एकदम मुसक्या बांधून नेवून मतदान करावे लागणार का?)

मतदान पोल उघडले की विचार करतो नी देतो एक ...(मत ब्र का?)

>>एकीकडे अवाकडो व दही घातलेले पराठे खाल्लेले ते खूपच मउसूत होते..
अगंबाई, हो का?..मग हा करुन खाऊन बघा.

>>अवाकडो भाकरी
भाकरी मऊ, लुसलुशीत असते ना? Proud

>>आता मताचे जोगवे कशाला मागताय?
मग कधी मागणार? आत्ताच तर तुमच्या मताला किंमत आहे. एरवी कोण विचारतंय? नाही का?

>>>>अवाकडो भाकरी भाकरी मऊ, लुसलुशीत असते ना?<<
तुमच्या भाकरीचे वर्णन आधीच केलेय.. अवाकडो भेगाळ भाकरी.. आता इतके मोठे नाव बरे दिसत नाही म्हणून 'भेगाळ' सायलंट ठेवले ते समजत नाही का? Wink

>>>>मग कधी मागणार? आत्ताच तर तुमच्या मताला किंमत आहे. एरवी कोण विचारतंय? नाही का?<<

ह्यावरून, 'करंटे' नेते कसे वर्षानूवर्षे टूकारगिरी करून रहातात व मताची गरज लागली की लागतात मताची भिका मागायला ते आठवले आणि ते ही 'एरवी कोण विचारत' नाही अश्यांकडूनच मताच्या भिका मागतात ह्यातच त्या करंट्याचे काय अस्तित्व वा किंमत आहे असे दिसते मग. शेवटी, अश्यांची'च' गरजच लागते ह्यातच काय ते समजायचे.अश्या नेत्यांना आम्ही विचारत/भिका... च्च च्च भाव देत नाही... हे लक्षात घ्या.

एकदा इतरांनी चढवले म्हणून आमच्या इकडचा धोबी उभा राहिलेला निवडणूकीला, लागला मत मागायला. निदान तो कपडे तरी बरे धुवून आणतो म्हणून आम्ही मत द्यायचा विचार करू शकतो .. हे उगीच आठवले इथे आता. पण इथे काय म्हणून... (विचारात पडलेली बाहुली) Proud

तुम्ही ना, जरा बर्‍यापैकी पांढरे कपडे , केसरी टिळा लावून, गुंडगिरीच्या लिंका(फायली म्हणा.. हवे तर) उडवून/काढून जा घरोघरी मागायला... (मतांचे जोगवे.. हो..) इथे वेळ नका घालवू. उद्याला मतदान पोल उघडेल तेव्हा आजचाच दिवस आहे. जा पाहू. Proud

जबरी भाषण.
धोबी निवडून आला का? Proud

>>आता इतके मोठे नाव बरे दिसत नाही म्हणून 'भेगाळ' सायलंट ठेवले ते समजत नाही का?
नाही समजले. मला वाटलं असंबद्ध बोलताय! दही घालायच्या ऐवजी क्रीम चीज घालून करुन बघितला असता तर काय बिघडलं असतं म्हणते मी?

ज्यांना जशी भाषा समजते तशीच वापरली जाते.

आणि आल्या का स्वातीबाई, स्कोअर सेटल करायल्या?

लोला, हो आला ना... Proud

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे.

पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382
पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359
"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45383

Pages