वीज बचतीचे उपाय

Submitted by चायवाला on 5 December, 2013 - 00:41

वीजटंचाई आणि लोड शेडिंग व इतर कारणांनी वीजपुरवठा तात्पुरता खंडित होणे ही आता नेहमीची बाब झाली आहे. त्यासंबंधातली परिस्थिती जेव्हा सुधारेल तेव्हा सुधारेल.

पण एक सामान्य नागरिक म्हणून आपण काय करु शकतो याची चर्चा आपण इथे करुया. अगदी आपल्या मोबाईल पासून ते घरातल्या इतर जड उपकरणे वापरताना वीज बचत कशी करता येईल याची चर्चा आणि उपाय सुचवणे हे इथे करुया.

उदाहरणादाखल काही अगदी छोटी उदाहरणे:

(१) आपल्या भ्रमणध्वनीमधे Cell Info Display नावाचा प्रकार असतो. आपण ज्या विभागात आहोत त्या विभागाचे किंवा अगदी पुरेशी मोठी असेल तर गृहनिर्माण संकुलाचेही नाव मोबाईलच्या पडद्यावर दिसते. हे सेटिंग आपण OFF करुन ठेऊ शकतो.

(२) उर्ध्वभरित स्वयंचलित धुलाईयंत्र (टॉप लोडिंग अ‍ॅटोमॅटिक वॉशिंग मशीन): वरुन कपडे व पाणी घेणारे धुलाईयंत्र 'लावण्याआधी' साधारण दोन ते तीन बादल्या पाणी भरुन ठेवावे. जेव्हा आपण धुलाईयंत्र सुरू करतो व ते पहिल्यांदा पाणी घ्यायला सुरवात करते तेव्हा ते किती पाणी घेते हे सेटिंग ठरलेले असते. त्याच वेळी भरुन ठेवलेल्या बादल्या त्यात ओताव्या. त्याने धुलाईयंत्र सुरू असण्याचा वेळ हा किमान दोन मिनिटांनी वाचतो. असे रोज केले तरी एका वर्षात बरीच वीज वाचू शकते.

तसेच, ते किती मिनिटांनी पुन्हा पाणी घेणार आहे हे साधारण ठाऊक असल्यास लक्ष ठेऊन हाच प्रकार आपल्याला पुन्हा करता येईल. अर्थात तेवढा वेळ आपल्याकडे असेलच असे नाही. किंबहुना नसतोच. पण धुलाईयंत्र सुरु करताना एकदा आपल्याला हे नक्की करता येईल.

मोशन सेन्सरबद्दल इथे शोधा

तर मग, चला वीज बचतीचे उपाय सुचवायला सुरवात करा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याने धुलाईयंत्र सुरू असण्याचा वेळ हा किमान दोन मिनिटांनी वाचतो. >>> पण त्यामुळे वीज वाचत नाही बरं......

१) सीएफएल अथवा एलईडी दिवे वापरावेत.
२) उतरताना शक्यतो लिफ्ट वापरु नये.
३) लिफ्ट मधील फॅन व दिवे बाहेर पडताना बंद करावेत.

आपल्यापैकी अनेक जण तरुण आहेत. अशांनी वेळ हाताशी असेल तर साधारणपणे सहाव्या माळ्यापर्यंत लिफ्ट अजिबात वापरू नये. आपसूक व्यायाम होतो आणि वीज बचतही.

त्याने धुलाईयंत्र सुरू असण्याचा वेळ हा किमान दोन मिनिटांनी वाचतो. >>> पण त्यामुळे वीज वाचत नाही बरं......
कस काय जर वेळ वाचत असेल तर वीज बचतही होणारच ना? प्लीज सांगा कारण मी रोज असे करते Sad

खोलीबाहेर पडताना खोलीतले दिवे, पंखे बंद करण्याची दक्षता घेतली तरी विजेचे बिल जरा कमी येऊ शकते. लोकांना दिवे लावायला हात असतात पण बंद करायला नसतात Sad

सकाळी उठल्यावर खिडक्या उघडल्या तर दिवसा लाईट लावायची गरज पडत नाही.

<<सीएफएल अथवा एलईडी दिवे वापरावेत.<< +१ माझ्या बहिणीच्या नवर्याने सगळीकडे तेच दिवे लावलेत. त्यांना सौर हिटर असल्याने गॅस वाचला, इलेक्ट्रीसीटी वाचली. त्यामुळे त्यांना बील अग्दी ३००-४०० पर्यंतच येतं.
मी ऐकलं की रात्री आपण टीव्ही, डीव्हीडी बंद करतो तेव्हा आपण फक्त टीव्हीचं बटण बंद करतो. किंवा मेन स्वीच. तर संपुर्णपणे सगळ्या वायरीही काढुन टाकाव्यात. Uhoh

आर्या, मुख्य स्विज नक्की बंद करावा. नुसतं रिमोटने बंद करुन काही होत नाही.
वायरीही काढून टाकल्याने किती फरक पडतो यावर आंतरजालावर काही साहित्य/शोधनिबंध/वगैरे उपलब्ध असल्यास त्याची लिंक किंवा एखादाच परिच्छेद असल्यास थेट इथे टाकावा ही विनंती.

मी नताशा,
हो, वेळ वाचल्याने वीजही वाचतेच. हा अनुभव आहे.

मोबाईल चार्ज झाल्यावर तो चार्जरपासुन वेगळा करताना बटण बंद करावे. मिक्सर, मा.वे. आणि अनेक इलेक्ट्रिक उपकरणे वापरुन झाल्यावर बटण बंद करुनच वायर प्लग आउट करावी....

बिघडलेली इलेक्ट्रिक उपकरणे दुरुस्त करावी, तशीच वापरत राहु नये....

सर्वात आधी मालिका बघणे बंद करा.......... Light 1 Happy

संपुर्ण भारतात ६ ते १० या वेळेत टिव्हीची विज घालवली तर एका दिवसाची वीजबचत एका छोट्यागाव मधल्या मासिक वीज वापरा इतकी होईल Happy

धागा चांगला आहे. वीजबचतीच्या नवनवीन कल्पना या निमित्ताने समजतील.
--------------------------------------------------------------------------------------------------------
सद्ध्या माझ्यातर्फे एक पीजे :
उर्ध्वभरित स्वयंचलित धुलाईयंत्र >>> ही असली भाषांतरे आणि त्यापुढे मूळ इंग्रजी शब्द कंसात देणे टाळल्यास, अशा शब्दांचा अर्थ समजण्यास लागणारा वाचकाचा वेळ
आणि पर्यायाने वीजही वाचविता येईल. Wink

संपुर्ण भारतात ६ ते १० या वेळेत टिव्हीची विज घालवली तर एका दिवसाची वीजबचत एका छोट्यागाव मधल्या मासिक वीज वापरा इतकी होईल>>>> उदयन, या सगळ्या मालिकांचे रिपिट टेलिकास्ट रात्री १० नंतर आणि दुसर्‍या दिवशी फुल्ल डे चालु असतात. आता काय सुचवशील तु?

थंडीच्या दिवसात रात्री फ्रीज बंद ठेवला तरी चालतो. फ्रीजचा दरवाजा घट्ट बंद असेल तर आतील वस्तु काही खराब होणार नाहीत.
४-५ दिवस गावी जाणार असाल आणि फ्रीजमधे नाशवंत वस्तु नसतील तर तेव्हाही फ्रीज बंद ठेवला तर चालतं. दुध, भाज्या आपण संपवुनच जात असतो. बटाटे, आलं हे फ्रीजमधे ठेवतच नसतो. उगाच फक्त मसाल्याच्या पाकीटांसाठी फ्रीज कशाला सुरु ठेवायचा?

थंडीच्या दिवसात रात्री फ्रीज बंद ठेवला तरी चालतो. फ्रीजचा दरवाजा घट्ट बंद असेल तर आतील वस्तु काही खराब होणार नाहीत.>>>> खर कोट माहित नाही पण मी अस ऐकल आहे की फ्रीज वगैरेसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तु बंद करुन पुन्हा चालु केल्यावर जास्त वीज कंझ्युम करतात. कुणाला माहिती असेल तर जरा प्रकाश टाका या मुद्द्यावर

प्रगत देशांतील Day light saving या संकल्पनेचा आपल्याही देशात
वीजबचतीसाठी उपयोग होऊ शकेल का यावर तज्ञांनी विचार करावा असे वाटते.

हो मुग्धा... पुन्हा तेव्हढा थंड व्हायला फ्रीजला जास्त उर्जा लागते म्हणा. म्हणुनच थंडीच्या दिवसात विशेष करुन डीसेंबरातल्या थंडीत म्हणाले मी. पुण्यात रात्रीचं टेम्परेचर ८पर्यंत जातं तेव्हा बंद ठेवण्यास काहीच हरकत नसावी. निदान आम्ही तरी बंद ठेवतो. सकाळी उठल्या उठल्या फ्रीजचं बटण ऑन करतो.

१. ऑफीसात/घरी काँप्युटर मॉनिटर काम नसताना किंवा आपण जागेवर नसताना बंद करावा.
२. ऑफीसात वॉशरुम मधले लाईट्स गरज असेल तेंव्हाच लावावेत. बहुतेक सगळ्या ऑफीसेस मधे ते सदा सर्वदा चालुच असतात.
३. पाण्याची मोटार वेळेत बंद करण्यासाठी तेव्हड्या वेळेचा गजर लावावा.
४. सणवारांना / शुभकार्याला घरभर केली जाणारी रोषणाई रात्री झोपताना बंद करावी.
५. मोशन/ऑक्युपेंसी सेंसर लाईट्सचा वापर

रात्रीचे जेवण झाल्यावर सर्वांनीच घराबाहेर जरा (२०-४० मि.) एकत्र शतपावली करावी - सहाजिकच घरातील सर्व लाईट्स, टी व्ही, पी सी बंद होतील आणि वीजबचत होईल, त्याबरोबर सर्वांचे आरोग्य सुधारेल ते वेगळेच.

वरती कोणीतरी सांगितलंय तसे शक्यतो लिफ्ट वापरुच नये (जितके शक्य होईल तितके मजले) - आपल्याबरोबर इतरांनाही प्रवृत्त करावे, आग्रह नको.

एल इ डी चा वापर करावा.

ज्यांना शक्य आहे त्यांनी सोलर हीटर वापरावेत.

आपण ज्या सोसायटीत/गृहसंकुलात रहातो तेथील अनावश्यक दिवे स्वतःहून बंद करावेत - याची आज टर्न आहे - तो बंद करेल, मला काय करायचे हा अभिनिवेश नसावा.

चांगला धागा, धन्यवाद.

हो पण लाईटला लागणारी वीज आणि सेंस्नरला लागणारी वीज यात फरक आहे. सेंसरला कमी वीज लागते अस मला सांगण्यात आलय.
या लिंकमधे साधारण किती बचत होऊ शकते हे दिलेले आहे. तसेच सेंसर्स्चे प्रकार आणि ते काम कसे करतात याची माहीती आहे.
http://www.energysavingsensors.com/General-Information.htm

<<आपल्या भ्रमणध्वनीमधे Cell Info Display नावाचा प्रकार असतो. आपण ज्या विभागात आहोत त्या विभागाचे किंवा अगदी पुरेशी मोठी असेल तर गृहनिर्माण संकुलाचेही नाव मोबाईलच्या पडद्यावर दिसते. हे सेटिंग आपण OFF करुन ठेऊ शकतो<<
हे कळलं नाही. त्याच्याने काय फरक पडतो? Uhoh

चांगला विषय तसेच उपयुक्त सल्लेही मिळत आहेत इथे.

मी तर दरमहाच्या वाढीव वीज बिलांकडे पाहून अक्षरशः वैतागलो आहे.....१३५० ते १५५० या दरम्यान बिल येते. मान्य आहे की बरीचशी विद्युत उपकरणे आहेत घरी....पण ती नेहमीच चालू असतात असेही नाही. माझी बिले पाहून इथल्याच नेटवरील भाचेभाच्यांनी मला डोके अजिबात नाही असा [पटण्यासारखा] निष्कर्ष काढला आहे. तरीही बचत नेमकी कुठे आणि कशी करावी हे काही उमजत नाही....आणि मुकाटपणे बिल भरत बसतोय मी.

मी_आर्या आणि मुग्धा यानी फ्रीझ संदर्भात चर्चा केलेली वाचली. गावी जायचे असेल तरच फ्रीझचा मुख्य स्वीच बंद करत होतो मीदेखील....एरव्ही रात्रभर चालूच.....असेच एकदा चारपाच दिवस बाहेरगावी होतो, फ्रीझ बंद... आणि जेव्हा परत आलो आणि नित्याप्रमाणे फ्रीझ चालू केला तर मोटार [की कंडक्टर] चा आवाज शून्य. चारपाच प्रयत्न केले....काहीही नाही. सायंकाळी गोदरेजच्या मेकॅनिकला बोलाविले तर त्या पठ्ठ्याने 'अमुकतमुक पार्ट गेला आहे....चार हजार रुपये खर्च येईल....". खर्च करावा लागला....तरीही ज्यावेळी फ्रीझ दुरुस्त झाला त्यावेळी त्यालाच कारण विचारले तर तो म्हणाला, "फ्रीझ बंद करत जाऊ नका....." ~ काय बोलणार ? त्यानंतर मात्र कधीही कुठेही बाहेर जावे लागत असले तरी तो बंद करीत नाही. राहिलाही आहे व्यवस्थित.

फ्रीझ बंद करण्याची गरज नाहिये. ऑटो ऑन-ऑफ असतो टेम्परेचर कन्ट्रोल नुसार.
आतला टेम्परेचरचा नॉब थन्डीच्या दिवसात खुप हायला ठेवण्यात पोईन्ट नाही.

हापिसला काचेच्या भिन्ती असतात.
त्यामुळे आत मध्ये अत्यन्त कमी प्रकाश अस्ल्याने सर्व लाइट्स ऑन राहतात. Sad

डे लाईट सेव्हींगचा आपल्याकडे फारसा उपयोग होणार नाही कारण आपल्याकडचे दिवस तितके मोठे नसतात.
मुंबईतील बी के सी मधे, सी एम सी ची इमारत अशी बांधलेली आहे कि जिथे दिवसा लाईट लावायची गरज
पडणार नाही. तसा विचार नव्या बांधकामात व्हायला पाहिजे.
शहरातही रस्त्यावरचे दिवे, सौर उर्जेवर चालवता येतील.
आमच्या कॉलनीत ( इथे अंगोलात ) खास रिफ्लेक्टर्स लावून छोट्या दिव्यांचा भरपूर प्रकाश पडेल, अशी रचना केलेली आहे.

Pages