वीज बचतीचे उपाय

Submitted by चायवाला on 5 December, 2013 - 00:41

वीजटंचाई आणि लोड शेडिंग व इतर कारणांनी वीजपुरवठा तात्पुरता खंडित होणे ही आता नेहमीची बाब झाली आहे. त्यासंबंधातली परिस्थिती जेव्हा सुधारेल तेव्हा सुधारेल.

पण एक सामान्य नागरिक म्हणून आपण काय करु शकतो याची चर्चा आपण इथे करुया. अगदी आपल्या मोबाईल पासून ते घरातल्या इतर जड उपकरणे वापरताना वीज बचत कशी करता येईल याची चर्चा आणि उपाय सुचवणे हे इथे करुया.

उदाहरणादाखल काही अगदी छोटी उदाहरणे:

(१) आपल्या भ्रमणध्वनीमधे Cell Info Display नावाचा प्रकार असतो. आपण ज्या विभागात आहोत त्या विभागाचे किंवा अगदी पुरेशी मोठी असेल तर गृहनिर्माण संकुलाचेही नाव मोबाईलच्या पडद्यावर दिसते. हे सेटिंग आपण OFF करुन ठेऊ शकतो.

(२) उर्ध्वभरित स्वयंचलित धुलाईयंत्र (टॉप लोडिंग अ‍ॅटोमॅटिक वॉशिंग मशीन): वरुन कपडे व पाणी घेणारे धुलाईयंत्र 'लावण्याआधी' साधारण दोन ते तीन बादल्या पाणी भरुन ठेवावे. जेव्हा आपण धुलाईयंत्र सुरू करतो व ते पहिल्यांदा पाणी घ्यायला सुरवात करते तेव्हा ते किती पाणी घेते हे सेटिंग ठरलेले असते. त्याच वेळी भरुन ठेवलेल्या बादल्या त्यात ओताव्या. त्याने धुलाईयंत्र सुरू असण्याचा वेळ हा किमान दोन मिनिटांनी वाचतो. असे रोज केले तरी एका वर्षात बरीच वीज वाचू शकते.

तसेच, ते किती मिनिटांनी पुन्हा पाणी घेणार आहे हे साधारण ठाऊक असल्यास लक्ष ठेऊन हाच प्रकार आपल्याला पुन्हा करता येईल. अर्थात तेवढा वेळ आपल्याकडे असेलच असे नाही. किंबहुना नसतोच. पण धुलाईयंत्र सुरु करताना एकदा आपल्याला हे नक्की करता येईल.

मोशन सेन्सरबद्दल इथे शोधा

तर मग, चला वीज बचतीचे उपाय सुचवायला सुरवात करा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केनयामधे (नैरोबीमधे ) आमच्या फॅक्टरीतले एक्झॉस्ट फॅन ( हे थोडेसे घुमटासारखे दिसत ) हे वीजेशिवाय चालणारे होते. गरम हवा सिलिंगजवळ गेली कि त्या झोतानेच चालू होत व थंड हवा आत आणत. तसेच छतावरच्या काही शीट्स खास पारदर्शक होत्या. त्यामुळे फॅक्टरीत दिवे फार उशीरा लावावे लागत. हाच उपाय तिथल्या मॉल्समधे पण केलेला आहे.

नैरोबीचे हवामान वर्षभर थंडच असल्याने तिथले मॉल्सही एसी नाहीत.

निवांत पाटील,

>> आपण न्हाणीला बोळा आणि दरवाजा उघडा असा तर प्रकार करत नाहीना हे नक्की पाहिले पाहिजे.

यावरून आठवलं की दिवानळी (ट्यूबलाईट) सुरू होतांना जी उघडझाप होते ती म्हणे २० मिनिटांची वीज खाते. खखोदेजा! कोणी यावर अधिक प्रकाश (!) टाकेल काय?

आ.न.,
-गा.पै.

मी असं ऐकलय की एमेसीबी तुमच्या राहण्याच्या ठिकाणाप्रमाणे मिनिमम बिल आकारतेच... खरं आहे का?

प्रीपेड-वीज हा प्रकार भारता मध्ये ऑलरेडी आहे.
एन्सीआर रीजन मध्ये प्रत्येक मोठ्या सोसायटीत घ्री दोन प्रीपेड मीटर असतात, एक नॉर्मल वीज आणि एक बॅकप. बॅल्न्स कमी झाल्यावर इंडीकेशन मिळते. त्याप्राणे सोसायटी ऑफिस मध्ये जाउन रीचार्ज करता येते. वीज मंडळाचे बिल सोसायटी भरते. तुमच्या नावाचे वीज मंडळा कडुन बिल येत नाही.

घरातले कोणते उपकरण किती बिल(युनिटस) खाते ते शोधणे :

तुमचा रोजचा सरासरी वीज वापर पाहा.

यानंतर एखादे यंत्र वॉशिंग मशीन अथवा गिझर (फक्त एकच यंत्र)तीन दिवस बंद ठेऊन चौथ्या दिवशी मिटर पाहा .कोणते यंत्र फार वीज खाते ते कळेल .

सासरी प्रत्येक कपड्याच्या सेट ला वाशिंग machine on होते.
Office चे फक्त Shirts एक batch , Trousers -batch , jeans batch , घराचे रोजचे कपडे batch , चादरी batch . दिवस भर machine सुरु. बरे २ कपडे असो नाहीतर १०-१२ सगळ्यांना पाणी चे setting एकच full load चे. वीज बचत चे ३-१३.>>>> बापरे. डेंजर आहे. आमच्याकडे मोबाईल चार्ज झाल्यावर तो घेउन आपल काम सुरु करायच एवढच माहित आहे. ते करताना समोर असलेल बटन बंद करावस काही वाटत नाही. नवरा तर आपल घर म्हणजे अंधार कोठडीच असल्याच्या थाटात दिवसाच्या कोणत्याही वेळी लाईट्स चालु करत असतो... काय बोलायच?

सीएफएल दिव्यांचा अनुभव खूपच चांगला आहे. किंमत खूप असली तरी पूर्ण पैसा वसूल प्रकारचे दिवे वाटले.
आमच्याकडे दिवा विकत घेताना दुकानदार तारीख घालून देतो त्यामुळे तो गेला की किती वर्ष टिकला ते समजते.
गेल्या पाच वर्षात फार कमी वेळा दिवे बदलावे लागले आहेत.

मस्त चर्चा चालू आहे. वाचतेय.
पाणी आणि वीजेची माझ्या परीने शक्य होईल तितकी आणि माहीत असेल तेवढी बचत मी करतेय. पण इथे बर्‍याच नवीन सूचना आहेत. छान. धन्यवाद गप्पिष्ठ धाग्याची लिंक दिल्याबद्दल.

डॉ. इब्लिस यांचा दीर्घ आणि अभ्यासू प्रतिसाद वाचला.

त्यानी मला उद्देश्यून एक वाक्य लिहिले आहे...."...वापर वाढत नसला तरी प्रति युनिट किम्मत वाढवल्याने बिल वाढलेले दिसते..."

~ आता माझे डोके अजिबात काम करत नाही या युनिटच्या मारामारीत....पण तुम्ही लिहिल्यावरून आठवले की माझ्याकडे इन्व्हर्टर आहे....आणि तो २४ तास चालूच असतो, त्यामुळे वीज बिल वाढत असेल तर मग मी मूग गिळून गप्प बसायला हवे. माझा फ्लॅट टिंबर मार्केट एरियात असल्याने इथे सक्तीचे लोडशेडिंग आहेच, सबब आम्ही निवासी लोकांनी इन्व्हर्टर घेऊन ठेवले आहेत, लाईट जात नाही....शिवाय माझ्याकडे फिश टँक आहे, त्यातील बबल्स मोटर २४ तास....ट्यूब रात्रभर चालू....असले सारे जादाचे प्रयोग असल्याने बिल १५००/- च्या पुढे येणारच असे दिसते.

सोलर एनर्जी चा वापर करणे लवकरात लवकर सुलभ व्हायला हवे.
दुबई एअरपोर्टवर एक छान होर्डींग होते. सहारा वाळवंटातला केवळ ०.०३ % सुर्यप्रकाश वापरून संपुर्ण युरपची गरज भागवता येईल. ( टक्का बरोबर असावा Happy )

आपल्याकडे उंचावरून झेपावणार्‍या नद्या फारश्या नाहीत. आहेत त्यांना वर्षभर पाणी नसते. नाहीतर वीजेचा प्रश्न एवढा जाचक ठरला नसता. मेधा पाटकरांच्या आंदोलनात ग्रामीण पातळीवर गावाच्या गरजेपुरती वीज
निर्माण करण्याचे प्रयत्न झाले होते असे वाचले होते. त्याबद्दल काही अधिक माहिती आहे का ?

इथे तसे गैरलागू आहे, पण पश्चिम आफ्रिकेतील काही देशांत मुबलक पेट्रोलियम असल्याने एनर्जी हा कळीचा मुद्दा नसतोच. नायजेरियात काच कारखान्याची फर्नेस आम्ही गॅसवर चालवत होतो.

अशोक,

(इन्वर्टर मधील) बॅटरी जुनी झाली असेल तर चार्ज जास्त वेळ होल्ड करु शकत नाही त्यामुळे वारंवार चार्ज होताना वीजेचा वापर वाढण्याची शक्यता आहे. जर बॅटरी बरोबर असेल तर वीज जास्त खर्च होत नाही. दर सहा महिन्यानी एकदा मेंटेनन्स करुन घ्या. चांगल्या कंपनीची बॅटरी किमान ५ वर्षे किंवा जास्त चालते.

मनस्मि,
ब्याटरि छे लाइफ़ चार्जिंग सायकल वर असते ना? दिवसातून २दा लाइट जात असतील तर ब्याटरी लौकर जाते असे इनवर्टर वाल्यानी सांगितले.

यावरून आठवलं की दिवानळी (ट्यूबलाईट) सुरू होतांना जी उघडझाप होते ती म्हणे २० मिनिटांची वीज खाते. खखोदेजा! कोणी यावर अधिक प्रकाश (!) टाकेल काय? >>>> Happy

आताच्या इलेक्ट्रॉनिक चोक ला तसेही होत नाही.

इब्लिस भाय, ५०० वॅ. वगैरे असते त्याचे रेटींग. दोन तासात एक युनिट खातो प्लाझ्मा.

Typical power consumption is 400 watts for a 127 cm (50 in) screen. 200 to 310 watts for a 127 cm (50 in) display when set to cinema mode. Most screens are set to "shop" mode by default, which draws at least twice the power (around 500–700 watts) of a "home" setting of less extreme brightness.[ विकि साभार)

ब्याटरि छे लाइफ़ चार्जिंग सायकल वर असते ना? दिवसातून २दा लाइट जात असतील तर ब्याटरी लौकर जाते असे इनवर्टर वाल्यानी सांगितले.>>> ह्या बॅटर्या लेड / अ‍ॅसिड असतात. ओवर चार्जिंग आणि नो चार्जिंगचा बॅटरी लाइफवर इफेक्ट होतो. आतले पॅडस हार्ड होतात. पण लाइट किती वेला येतात जातात त्यवर काही फरक पडत असेल तर माहिती नाही ( विशेष पडत नसावा).

मानस्मी १८, अनुमोदन.

आज एक लिक्वीड डिटर्जंट नी कपडे धुतले वॉमत. एक पाण्याची सायकल कमी लागली. कपडेही मस्त धुतल्या गेलेत.
पण कॉस्ट पहाता सध्या तरी मला ते महाग वाटतंय कारण डिटर्ज्ंट ची बाटली ४००/- ला मिळाली ५०० मिलीची, अन मशिन वॉश ला जवळजवळ २० मिली वापरायला लागंल; पण रिझल्ट्स मस्त आहेत.... पाहू पुढे

चांगला धागा आहे आपल्या पुरती जरी वीज कमी वापरली तरी खुप आहे.
रात्री टीव्हीचा वापर शक्यतो कमी करणे. फिरायला जाणे इ. करुन शिवाय आजकाल डे-नाईट मॅचेसचे प्रकार खुप वाढलेत. त्यामुळे कित्येक घरी टीव्हीवर मॅचेस चालु असतात. सोबत फॅनही लागतोच. तेही टाळता आले पाहीजे. सोलर उर्जा वापर करणे शक्य व्हावे यासाठी त्यांचे दर कमी केल्यास कित्येक घरी सौर दिवे दिसल्याने वीज बचत होईल.

सोलर उर्जा वापर करणे शक्य व्हावे यासाठी त्यांचे दर कमी केल्यास कित्येक घरी सौर दिवे दिसल्याने वीज बचत होईल.

>> मी ऐकले आहे की सोलर उपकरणे बसवल्यास सरकार त्याच्या किमतीचा काही भाग आपल्याला रीफंड करते म्हणुन. माझ्या इलेक्ट्रीशिअन मित्राने सांगितले. त्याला विचारून इथे डीटेल माहिती टाकते. कारण आपल्याला फक्त एवढंच माहितीये की ही उपकरणे महाग असतात.

सर्वांनी उत्तम सूचना केल्या आहेत. पण आपण सर्व मंडळी आपापल्या घरातील उर्जा वाचवण्याबद्दल विचार करतो, बोलत असतो व कृतीही करत असतो. पण सार्वजनीक ठिकाणी वाया जाणार्‍या उर्जेबद्दल आपण तितकेसे जागरूक नसतो. जसे की ऑफिस, सोसायटी, इतर सार्वजनीक जागा. यापैकी ऑफिस व सोसायटी मधे आपल्या उर्जा बचती बाबतच्या सूचना मान्य होउन लगेच अमलात येउ शकतात व आपल्या घरापेक्षा किती तरी पटीने उर्जा बचत होउ शकते. उदाहरणार्थ वाया जाणार्‍या पाण्यात सुद्धा दिसत नसली तरी वीज वाया जात असते व पर्यायाने उर्जा.
सोसायटीतील अनावश्यक काळी चालू रहाणारे दिवे, लिफ्टचा गैर वापर, ऑफिसमधे एखाद्याच व्यक्तिसाठी चालू असणारा जनरेटर किंवा संपूर्ण मजल्या वरील चालू रहाणारे दिवे, केबीन मध्ये नसताना चालू रहणारी वातानूकुल यंत्रे व दिवे, इत्यादी तर तातडीने बंद होउ शकते.

विक्रमसिंह उत्तम निरिक्षण.. पण ह्याचे कारण म्हणजे ऑफिस व सोसायटी व्यतिरीक्त सार्वजनिक ठिकाणची वीजबचत संपूर्णपणे आपल्या हातात नसते. आमच्या घरासमोरील स्ट्रीट लाईट्स दिवसासुद्धा चालू असल्यास आम्ही अनेकदा फोन करून ते बंद करा असे कळवतो. पण फोन केल्यावरही एखाद तासाने लाईट्स बंद होतात.
रस्त्यावर प्रवास करतांना आसपास कित्येक वेळेला पाण्याची पाईपलाईन फुटुन पाणी वाया जातांना दिसते. पण त्याची तक्रार आपण कोणाकडे करू शकतो? त्या-त्या वेळेला तिथला नगरसेवक शोधत बसणे आपल्याला शक्य असतेच असे नाही.

एका पोस्टीत केलेल्या सूचनेनुसार प्रतिसादात दिलेले उपाय वर वेळ मिळताच लेखनात टाकणार आहे त्यामुळे एकाच ठिकाणी बरीच माहिती संकलित होईल.

मुळात कश्शाला वाचवायची वीज?
आणि किती वाचवणार वाचवून वाचवून?
वीज काही पेट्रोल सारखी साठवलेली नसते की वाचवता येईल. जी बनेल ना ती वापरावीच लागते म्हाराज्या!
वीज बचत म्हणजे काही तरी फाल्तूपणा आहे झालं.

काही वीज वाचवू वगैरे नये. मस्त लागेल तेव्हा दणकून वापरावी.
शक्य असेल तेव्हा आणि तेथे एसी लावावाच. नसेल तर तशी तक्रार करावी आणि लक्ष घालून लावून घ्यावा.

इमारतीचा जिना वगैरे भागात सदैव प्रकाश पडेल अशीच खबरदारी घ्यावी. दिवे सर्वत्र झक्क उजेड देतील असेच लावून ठेवावेत. शक्य तो जास्तीत जास्त वॅट्ट चे दिवे वापरावेत. किंवा कमी वॅटाचे भरपूर वापरावेत. एका खोलीत मंद असे ५-६ दिवे आणि एक झुंबर लावले की मस्त झकास रोम्यांटिक वाटते.
घरात कसे मस्त वाटले पाहिजे. सगळीकडे प्रकाश असला पाहिजे.
ते दर वेळी एका खोलीतून दुसरीकडे जातांना दिवे बंद करण्याचा प्रकार तर कायद्यानीच गुन्हा ठरवला पाहिजे. च्यायला ताप. जो येतो तेच तेच दहावेळा सांगतो. राहिला दिवा चालू तर काय बिघडते भौ? इतक्या फालतू सवयी लागल्यात ना लोकन्ना.

कपडे धुवायला मशिन वापरावे. भांड्यालापण तेच. भांड्यांची बाई असल्यास आधी घासून घेऊन मग परत मशिनला लावले की झकास स्वच्च होतात.

आणि हो वीज नसेल तेव्हा गप पडावं. ते जमत नसेल तर जन्रेटर लावावं आणि त्यावर एसी (सध्या हिटिंगावर) लावावा.

काही येडे तर हपिसाचे दिवे आन पंखे पण बंद करायला मरतात. कशाला? कुणी धडपडला मग? जिकडे तिकडे मुर्खासारखे वागता लोक. माणसाची ना माकडातून आलेली उपजत सवय असते. साला बटन दिस्ला ना की ते दाबायचा! बास!! त्याच्यातून हे सुरू झाले.

हेच पेट्रोल ला पण लागू काही वाचवू वगैरे नये. जेव्हढे जमेल परवडेल तेव्हढे वापरूनच घ्यावे. मस्त फिरावे. जे होईल ते पाहू या दुनियेचे. मी मरेस्तोवर तर नक्की संपत नाही पेट्रोल. लई साठे शिलकीत आहेत अजून.

तुम्ही एकानी वीज आणि पेट्रोल वाचवले म्हणून काही वाचणार नाही. तुम्ही नाही तर मी संपवेन(च) आणि संपले पेट्रोल तर ग्यास असेल! तो संपला तर वाफेची इंजिने परत वापरता येतील!

सध्या पेट्रोलच्या जीवावर चैन होतेय ना? बास मग!

उगाच जगबुडीची हाकाटी करत फिरायचे धंदे बंद करा आणि मस्त मजेत जगायला लागा!

आशा आहे बोळा निघाला असेल...

साला माला ना या प्रतिसादाचा नवीन धागाच करायचाय!
आता व्यवस्थित वीज वापरणार्‍यांचाच गृप बनला पाहिजे.
पण कसा करायचा? कोणत्या विभागात टाकायचा ते समजले नाही.
ते संपादक मदत करतील का?

विक्रीकर भवन, पुणे आणि सेवाकर, पुणे / आकुर्डी या सरकारी कार्यालयांमधे मला विज बचतीचा अनुभव आला

विक्रीकर भवनात ४ लिफ्ट पैकी दोनच चालू ठेवल्या जातात आणि त्या पैकी एक लिफ्ट फक्त ४ थ्या मजल्यावर जाण्यासाठीच वापरतात. सुट्टीच्या दिवशी कामावर आल्यास जिन्याचाच वापर करावा लागतो. अधिकारी जेव्हा त्याच्या केबिन मधे नसतो किंवा केबिन मधुन बाहेर पडताना लाईट आणि पंखा बंद करून जातात. दुपारी जेवणाच्या वेळेत संपुर्ण विभागातलेच लाईट बंद केले जातात. हाच प्रकार सेवाकर विभागातही दिसतो.
कच्च्या कामासाठी रफ पेपर वापरले जातात.

Pages