वीज बचतीचे उपाय

Submitted by चायवाला on 5 December, 2013 - 00:41

वीजटंचाई आणि लोड शेडिंग व इतर कारणांनी वीजपुरवठा तात्पुरता खंडित होणे ही आता नेहमीची बाब झाली आहे. त्यासंबंधातली परिस्थिती जेव्हा सुधारेल तेव्हा सुधारेल.

पण एक सामान्य नागरिक म्हणून आपण काय करु शकतो याची चर्चा आपण इथे करुया. अगदी आपल्या मोबाईल पासून ते घरातल्या इतर जड उपकरणे वापरताना वीज बचत कशी करता येईल याची चर्चा आणि उपाय सुचवणे हे इथे करुया.

उदाहरणादाखल काही अगदी छोटी उदाहरणे:

(१) आपल्या भ्रमणध्वनीमधे Cell Info Display नावाचा प्रकार असतो. आपण ज्या विभागात आहोत त्या विभागाचे किंवा अगदी पुरेशी मोठी असेल तर गृहनिर्माण संकुलाचेही नाव मोबाईलच्या पडद्यावर दिसते. हे सेटिंग आपण OFF करुन ठेऊ शकतो.

(२) उर्ध्वभरित स्वयंचलित धुलाईयंत्र (टॉप लोडिंग अ‍ॅटोमॅटिक वॉशिंग मशीन): वरुन कपडे व पाणी घेणारे धुलाईयंत्र 'लावण्याआधी' साधारण दोन ते तीन बादल्या पाणी भरुन ठेवावे. जेव्हा आपण धुलाईयंत्र सुरू करतो व ते पहिल्यांदा पाणी घ्यायला सुरवात करते तेव्हा ते किती पाणी घेते हे सेटिंग ठरलेले असते. त्याच वेळी भरुन ठेवलेल्या बादल्या त्यात ओताव्या. त्याने धुलाईयंत्र सुरू असण्याचा वेळ हा किमान दोन मिनिटांनी वाचतो. असे रोज केले तरी एका वर्षात बरीच वीज वाचू शकते.

तसेच, ते किती मिनिटांनी पुन्हा पाणी घेणार आहे हे साधारण ठाऊक असल्यास लक्ष ठेऊन हाच प्रकार आपल्याला पुन्हा करता येईल. अर्थात तेवढा वेळ आपल्याकडे असेलच असे नाही. किंबहुना नसतोच. पण धुलाईयंत्र सुरु करताना एकदा आपल्याला हे नक्की करता येईल.

मोशन सेन्सरबद्दल इथे शोधा

तर मग, चला वीज बचतीचे उपाय सुचवायला सुरवात करा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ्रिज बंद करु नका मुलींनो, बंद करुन ठेवलेल्या फ्रिजला वास येतो भयाण. माझ्या फ्रिज सर्विसमॅनने सांगितलेले की स्वच्छ साफ केलेला रिकामा फ्रिज जरी बंद करुन ठेवायचा असेल तरीही त्याच्य दरवाज्यावर टोवेल टाकुन तो बंद करा म्हणजे थोडी फट उघडी राहिल आणि फ्रिज वास मारणार नाही.

आणि ऑफिसच्या बाहेरच्या भिंतीना रंगीबेरंगी काचा बसवायचा उद्योग भारतात कोणी आयात केला देवाला ठाऊक. त्याने ऑफिसात अंधार तर पसरतोच पण हवाही पुर्ण बंद होते. आत अजिबात वेंटीलेशन होत नाही, गरम होत राहतं आणि दिवसभर एसी लावुन ठेवावा लागतो. चर्चगेटच्या रेल्वे ऑफिसचे नुतनीकरण केल्यावर आतल्या कर्मचा-यांचे कसे हाल सुरू झाले यावर हल्लीच एक लेख वाचलेला.

फ्रीज एकदा बंद करून (तो पूर्ण नॉम्रल टेम्प्ला आला की) परत चालू केला तर त्याला जास्त प्रमाणात ऊर्जा लागते. बाहेरचे टेम्परेचर कितीही असले तरीही. थंडीच्या दिवसांत फ्रीझच्या आतलं टेम्प नॉब कमीतकमी ठेवला तरी चालू शकतं.

१. विनाकारण डोअर बेल मारणे टाळा.
२. ऊन व्यवस्थित असेल तर वॉशिंगमशिनमधील ड्रायर वपरला नाही तरी चालू शकेल. ऑटोमॅटिक वॉशिंगमशिनम्धे रिन्सिंग झाले की कपडे बाहेर काढून पिळून घ्यायचे.
३. सर्वत्र एल ई डी लाईट्स वापरणे.
४. घर बंधताना जास्तीत जास्त नैसर्गिक उजेड वारा आत येईल याची काळ्जी घेणे.

ऑटोमॅटिक वॉशिंगमशिनम्धे रिन्सिंग झाले की कपडे बाहेर काढून पिळून घ्यायचे.

एवढं करत बसायला वेळ असेल तर वॉम वापरावीच कशाला?
Wink

आमच्याकडे इलेक्ट्रिक हीटर ऐवजी सोलार हीटर, साध्या ट्यूब्जऐवजी सीएफेल लावल्यावर ८०० रू फरक पडला वीजेच्या मासिक बीलात.

साती, वेळ असेल तरच. वेळ नस्ला तर काय करणार? आमच्याकडे तसंही पावसळ्यात अर्धा तास ड्रायर लावावा लागतोच.

मासिक बिल : पाचशे ते चारशे रूपये. विजेचा पंप, टीव्ही, फ्रीझ, वॉशिंगमश्नसीएफेले,, फॅन, पीसी, मावे, वॉटर फिल्टर सर्व काही वापरून.

१. आपल्या मोबाईलमध्ये आणि लॅपटॉपवर एक पॉवर सेव्हर मोड (कदाचित ह्याला तुमच्या मोबाईल्/लॅपटॉपमध्ये काही वेगळे नाव असू शकते) असतो. तो ऑन ठेवल्यास मोबाईल/ लॅपटॉप आपोआप डिसप्ले सेटींग कमीत कमी वीज वापरली जाईल अशी अ‍ॅडजस्ट करतो.
(काही स्मार्टफोन्समध्ये ह्यात बाहेर असलेल्या प्रकाशाचा अंदाज घेऊन डिसप्लेचा ब्राईटनेससुद्धा कमी/जास्त अ‍ॅडजस्ट केला जातो.)
(लॅपटॉपमध्ये डिसप्ले ऑफ ची वेळ जरा अलीकडे येते.. म्हणजे तुम्ही २ मिनिटे जर लॅपटॉपवर काहीच केले नाही तर आपोआप डिसप्ले बंद होतो आणी पर्यायाने वीज वाचते.)

२. जे वायरलेस माऊस/कीबोर्ड वापरतात त्यांनी वापर नसतांना माऊस/कीबोर्ड बंद करायला हरकत नाही.

३. इलेक्ट्रीक गिझर वापरतांना जर शेवटचा अर्धा मिनिट गिझर बंद केला तरी गरम पाणी येत राहाते. हे नियमित केल्यास काही प्रमाणात तरी वीज वाचू शकते.

४. मायक्रोवेव मध्ये अन्न बनवणारे/ गरम करणारे असतील त्या कुटुंबातील सदस्य शक्यतो एकत्र (एकाच वेळेला) जेवायला बसल्यास अन्न पुन्हा पुन्हा गरम करणे टाळले जाऊन वीजेची बचत होते. (गॅसवर अन्न गरम करणारे असल्यास गॅसची बचत होते). शिवाय एकत्र जेवल्याने कुटुंबात संवाद वाढतो आणी गरम अन्न गार अन्नाच्या तुलनेत व्यवस्थीत पचत असल्याने शारीरीक व मानसिक आरोग्य चांगले राहाते.

५. मायक्रोवेव मध्ये एका वेळेला एकच पदार्थ गरम करण्याऐवजी शक्यतो गरम व्हायला समान वेळ घेणारे जास्तीत जास्त पदार्थ लावल्यास थोडीशी वीज वाचते.

६. जर प्रिंटर/ स्कॅनर हे वरचेवर (दर अर्ध्या तासाने वै.) लागत नसतील तर त्यांची कनेकशन्स गरज नसतांना सरळ काढुन ठेवणे आणी प्रिंट कमांड देण्याआधी/ स्कॅन करण्याआधी लावणे आणी काम संपल्यावर पुन्हा काढून ठेवणे ह्याने बरीचशी वीज बचत होते.

मासिक बिल : पाचशे ते चारशे रूपये. विजेचा पंप, टीव्ही, फ्रीझ, वॉशिंगमश्नसीएफेले,, फॅन, पीसी, मावे, वॉटर फिल्टर सर्व काही वापरून?>>> मामाश्री बघा.
फक्त तुमचच बिल त्यामानाने जास्त आहे.
माझ्याकडे ३०० रु च्या रेन्ज मध्ये असतं बिल.
जास्तीत जास्त ३५०.

हॉलमध्ये ट्युब देखील मी ४० वॅट ची ढब्बु न लावता, २८ वॅटची स्लिम लावली आहे. )साधारण ५०० रु ला संच मिळतो. फिलिप्सची आहे.
भरपुर प्रकाश देखील आणि विजेची बचतदेखील.
किचन आणि बेड मध्ये सीएफएल आहेत.
ज्या खोलीत आम्ही नसतो तिथे लाइट्स बंद असतात.

टिव्ही पाहण्याचं प्रमाण मात्र खरच कमी आहे.

लोक मी फारच लकी. माझ्याकडे घरात लागतात ती सर्व इक्विपमेंट्स आहेत. टिव्ही, फ्रिज, गिझर (इलेक्ट्रिक) मिक्सर मावे सगळं
माझा महिन्याचा वीजेचा खर्च २५० ते २७५ इतकाच आहे.

छान धागा गप्पिष्ट .
बरेचसे इलाज वरती आलेच आहेत, वीज वापरावर स्वयंनिर्बंध कसे घालावेत याबद्दल. इस्त्री, गीझर चा वापर,सीएफेल बसवणे वगैरे या तर मूलभूतच गोष्टी आहेत .. टीव्ही ,नेट, ए सी च्या वापराने बिल लक्षणीय रीत्या वाढते, त्यांच्या वापराच्या वेळा संयोजित केल्याने फरक पडतो..अर्थात प्रत्येकाच्या सवयी वेगळ्या.मी टी.व्ही. एकूणच कमी बघते, त्यातही टीव्ही चालू ठेवून नेटवर असते ( दोन कामे एकत्रित होतात )अन ए.सी. मला अगदीच वैशाख वणवा असेल तरच लागतो.
गेल्या वर्षी मी घरात दोन तीन ठिकाणी Power saver Line Tester असं नाव असलेलं प्लगसारखं दिसणारं उपकरण ( कोणीतरी ऑफीसात विकायला आणलं होतं ) बसवलं ,उपयोग झाला.बिल दोन-तीनशे रुपये कमी झालं.

केनयात आणि अंगोलातही वीज ही प्रीपेड आहे. घरातल्या मीटरवर किंवा एका खास उपकरणावर, अजून किती बॅलन्स बाकी आहे ते दिसत राहते.. या आकड्याचा मानसिक परिणाम होतो व आपोआप गरजे एवढीच वीज वापरली जाते. आमच्याकडे बहुतेक दिव्यांना दोन बटणे असतात. बेडजवळच्या बटणाने दिवा बंद करता येत असल्याने, गरज नसल्यास आपोआप हात तिकडे जातो.

आम्हाला हव्या तितक्या पैश्याची वीज विकत घेता येते. आपला मीटर नंबर देऊन आम्ही पैसे भरतो. त्या पैश्यातच मंथली फिक्स्ड चार्जेस वजा केले जातात आणि आपल्याला किती युनिट वीज मिळाली ते कळते.
त्या रिसिटवर एक नंबर असतो, तो नंबर घरच्या मीटरवर फीड केला ( ही केनयातली पद्धत, अंगोलात थेट जमा होते. ) कि तेवढे युनिट मीटरवर दिसू लागतात. रोज त्यावर नजर पडतेच. आणि आपण वापरत असलेल्या वीजेचा / खर्चाचा अंदाज येतो.

प्रीपेड वीज ही संकल्पना आवडली.
इथे यायला हवी.

घरात माणसे किती यावरही वीजेचे बील अवलंबून आहे.
एकट्या दुकट्या रहाणार्या माणसांचे बील व्यवस्थित वीज वापरल्यास कमिच येते.
आमच्यासारखा मोठा कुटुंब कबिला असणार्यांचे बील जास्त येते कारण माणसे जास्तं हे आहेच त्यात सगळ्यांच्या वीज वापरण्यावर आपण अंकुश ठेऊ शकत नाही.

एक अतिशय "ढ" प्रश्न - पाणी गळतीसारखी वीज गळतीही असते का? उत्तर हो असेल तर ते कसे ओळखावे आणि काय उपाय करावेत?

एक अतिशय "ढ" प्रश्न - पाणी गळतीसारखी वीज गळतीही असते का? << आजिबात ढ प्रश्ण नाहीये
विज गळती सुद्धा असते, आपल्या घरात जेवढा विज वापर आहे त्या पेक्षा जास्त मिटर वर रिडींग येत असेल तर एकदा वायरिंग चेक करून घ्यावे. ह्यामागे अनेक कारणे असतात त्यातले एक म्हणजे मेन (फेज)वायर अर्थिंग वायर ला जोडली गेली असल्यास असे होते.

उपयुक्त धागा आहे. बहुतेकांना अनुमोदन! आमच्याकडे लहानपणापासूनच संस्कार झाले. एका खोलीतून दुसर्‍या खोलीत जाताना दिवे, पंखे बंद करणे वगैरे!

सर्वजण उपाय सुचवत आहेत, दरम्यान मला एक प्रश्न सर्वांनाच विचारावासा वाटत आहे.

तुमच्या मुलाबाळांना विजेची उपकरणे जरूर नसताना बंद करून ठेवण्याची सवय लावलेली आहेत का? त्यांना त्या बाबीचे महत्व व्यवस्थित समजलेले आहे का?

हे विचारण्याचे कारण म्हणजे (मायबोलीचा सरासरी वयोगट तीस ते पंचेचाळीस असा काहीसा गृहीत धरला तर) बहुतेक मायबोलीकरांना विजेच्या खर्चाची व बचतीची जाणीव असेल, पण पुढच्या पिढीला आपण ही जाणीव करून देतो आहोत का हे समजून घेणे रंजक वाटेल असे वाटले.

बेफीकीर, अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलात. घरी संस्कार करताना हा संस्कार सुद्धा तितकाच महत्वाचा आहे.

स_सा ; घरातल्या वायरींगमध्ये होणारी गळती फार कमी असते,शक्यतो मिटरमध्ये दिसत नाही, आणि तुम्ही म्हणताय तशी फेज वायर आर्थिंगला जोडली गेली तर फ्युज उडेल, पण विजगळती होते, ती मेन लाईन्स आणि ट्रान्सफॉर्मर मधून होते आणि त्याचेही चार्जेस आपल्याकडूनच घेतले जातात.

मावे तसेच टिव्ही, डिव्हीडी प्लेयर वगैरे इलेक्टॉनिक्स साठी पॉवर स्ट्रीप वापरावी. रात्री स्वीच बंद केला की झाले. अनप्लग करत बसावे लागत नाही.
फ्रीजमधे रिकाम्या जागेत पाण्याचा जग भरुन ठेवावा. थंड तापमान कायम ठेवायला मदत होते. फ्रीजच्या कॉइल्स स्वच्छ ठेवाव्यात.
इथे अमेरिकेत शाळेत एलेक्ट्रीसिटी कंपनीचे लोकं मुलांना डेमो दाखवतात. तसेच हायस्कूलची पर्यावरण शास्त्र अभ्यास करणारी मुले शाळांचे एनर्जी ऑडिट करतात. प्रत्येक वर्ग खोलीचा वापर किती आहे वगैरे मोजले जाते. उपाय सुचवले जातात. या सगळ्यातून बरीच जागृती होते.

आपल्या घरात येणारी वीज किती आली ते मिटर दाखवतो .
प्रत्यक्षात किती पोहोचते ते 'पॉवर फैक्टर' वरून कळते .
हा आकडा '१' ही आदर्श स्थिती आहे .

०.८० पेक्षा कमी असल्यास बिल जास्त येते .

मोठ्या इलेकट्रिशनकडे पॉफै मोजण्याचे यंत्र असते

सोलार हीटर, साध्या ट्यूब्जऐवजी सीएफेल वै, लाउन साधारण (ओन अ‍ॅन अ‍ॅवेरेज) बिल कीती यावे? आम्हाला ५०० रु येते (३बीएच्के, ५ लोक).

वॉशिंग मशिनः जास्तीत जास्त वीज जेंव्हा मोटार सुरु असते तेंव्हाच लागते. बाकि फ्लो कंट्रोल वा इतर तत्स्म कामासाठी कंपेर केले तर खुप खुप कमी वीज लागते. त्यामुळे तुम्ही बकेटने भरा अथवा त्यच्या कंट्रोल ने तुम्हाला मीटर वर दिसण्याइतपत फरक नक्किच जाणवणार नाही.

फ्रिज....... तुमच इन्सुलेशन चांगल असेल दरवाजा व्यवस्थित बस्त असेल आणी फ्रिज फ्रीक्वेंटली उघटला जात नसेल तर त्याच्या वीज बिलाअची पण काळजी करायची गरज नाही. अगदीच ८ -१५ दिवस जाणार असाल तर स्वछ करुन बंद न करता ठेवला तर चालतो. थोडा जरी घाण असेल (अन्नपदर्थांची सात्याला) तर त्याला बुरशी येते आणि घाण वास येतो.

सगळ्यात जास्त वीज खाणारी उपकरणे म्हणजे हिटर (वॉटर, रुम), इंडक्शन, व्हॅक्युम क्लिनर, प्लाझ्मा टीव्ही. पाण्याची मोटार इत्यादी. त्यावर ते उपकरण किती वॅटचे आहे ते लिहलेले असते. त्यानुसारच ते वीज खाते.

उदा. ३०० वॅ. इस्त्री..... एक तास वापरली (लगातार विदाउट अ‍ॅटोस्विच) तर ०.३ युनिट इतके बील येते (०.३*६=१.८ रु. ६रु पर युनिट प्रमाणे)

१५०० वॅ ( किंवा १.५ किलो वॅट) चा व्हॅकुय्म क्लिनर एक तास वापरला तर १.५ उनिट वीज जळते (१.५*६=९ रु.)

मोबाइलच चार्जर (@ ५ वॅट) जर २०० तास वापरला चार्जिंसाठी तर १ युनिट बील येते.

तुमच्या उपकरणाच्या वॅटेज ने १००० ला भागले की जेवढे तास येतात तेवढ्या तासात एक युनिट वीज जळते.

इव्हन ०.१ मीली वॅट इतकी वीज जरी आपण वाचवली तरी ती निर्माण केल्यासारखेच आहे,

पण विथ ड्यु रीसपेक्ट टु एनर्जी सेव्हींग,
आपण न्हाणीला बोळा आणि दरवाजा उघडा असा तर प्रकार करत नाहीना हे नक्की पाहिले पाहिजे.

उदा. वॉशिंगमशीन मध्ये बकेटने पाणी ओतायचे पण पाण्याची मोटर सेल्फ प्रायमिंग आहे म्हणुन खाली फुट व्हाल्व्ह न बसवता सक्शन पाइप भरुपर्यंत चालु ठेवणे.

बाकी मुलांना उर्जा संस्कार करणे ही काळाची गरज आहे. सिएफेल ने खुप खुप वीज वाचते.

फक्त जिथे मुले अभ्यास करतात / आपण वाचत बसतो तेथे भले ४ युनिट जास्त जळु देत पण चांगला प्रकाश पडेल अशी व्यवस्था करावी.......

Happy

खूप आवडला लेख. नवीन नवीन सासरी गेल्यावर प्रत्येक खोली मधून बाहेर जाताना lights & fan बंद करायचे पण उलट ओरडा पडला की घरात कुत्रा आहे त्याच्या साठी fan नेहमी सुरु ठेवायचा सगळ्या खोल्यांमध्ये. असे असते का सगळी कडे ?? कोणाकडे कुत्रा असेल तर सांगा.

माहेरी, चुकून रात्री TV चे main button बंद नाही केले की दुसऱ्या दिवशी ओरडा. दिवसा tube lights शक्यतो चालू करायचे नाही. तेव्हा बाबा एकटे कमावणारे मग सगळी काटकसर असायची .आज त्याची value कळत आहे आणि खूप छान सवयी पण आहेत.

१. ऑफिस वाशरूम मध्ये Lights switches स्पष्ट सूचना असून पण कोणी लक्ष देत नाही तेव्हा चिडचिड होते.
२. Laptop नेहमी charging mode ला ठेवणे, एक सवय.
Laptop खूप गरम होतो आणि battery life कमी होते पण lunch break / Tea breaks (२-३)/ cigarette break/ snacks break / birthday celebrations मध्ये charging mode on आणि time - energy waste
३. बरेच लोक laptop on ठेवून travel करतात. घरी आल्यावर तसाच ठेवायचा एकदा mail check करून परत charging etc
४. बरेच वेळा आपण wireless router / hub on ठेवून घरा बाहेर असतो १०-१२ तास.
५. TV सोबत सेट-top box , speaker etc switches ऑफ केले तर खूप फायदा होणार.
६. सासरी प्रत्येक कपड्याच्या सेट ला वाशिंग machine on होते.
Office चे फक्त Shirts एक batch , Trousers -batch , jeans batch , घराचे रोजचे कपडे batch , चादरी batch . दिवस भर machine सुरु. बरे २ कपडे असो नाहीतर १०-१२ सगळ्यांना पाणी चे setting एकच full load चे. वीज बचत चे ३-१३.
वाशिंग Machine कसे वापरावे आणि काय settings modes या कडे पण जास्त लक्ष दिले पाहिजे.
७. इस्त्री वाल्या कडून कपडे इस्त्री करून आणायचे मग नीट ठेवले नाही म्हणून परत सकाळी घालणार तेव्हा इस्त्री. energy waste

चुकून माझी पोस्ट annoying habits चर्चे वर गेली आहे कदाचित Sad .

छप्पन्न उपाय झालेत की सांगून Happy
ही पोस्ट सत्तावन्नावी..

बर्‍याच वेळेला एसी, टीव्ही बंद असतील तरी त्याचे मेन बटण ऑन असते ते बंद करावेत. बिल्डींगमधले लाइट्स दिवसाढवळ्या चालूच असतात. येताजाता बंद करण्याचे चालू ठेवावे, म्हणजे लोकांना सवय लागते Happy

आणि इतर बरेच काही..

१. सीएफएल अथवा एलईडी दिवे वापरावेत.
<<
या विशेषतः सीएफएल उर्फ काँपॅक्ट फ्ल्युरोसन्ट लाईट्सची गम्मत अशी आहे, की यांचे आयुष्य ऑन ऑफ सायकल्स वर आहे. तितक्यांदा चालूबंद केला, की हा दिवा 'उडतो' अन याची टोटल किम्मत खूपच जास्त आहे.
इतकी, की त्याने केलेल्या विजेची बचत अन बल्ब प्लस वीजबील हा खर्च हिशोबात धरला तर सीएफएल महाग पडतो असे माझ्या लक्षात आलेले आहे.
जाणकारांनी यावर अधिक उजेड पाडावा / प्रकाश टाकावा इ.

२. फ्रीज बंद करणेबद्दलः
<<
आतले टेंपरेचर सेट केले, की त्यानुसारच कॉम्प्रेसर सुरु/बंद होतो. त्यामुळे बटन बंद करून रोजच्या रोज डिफ्रॉस्ट करण्यात अर्थ नाही. झकासरावांना अनुमोदन.

३.
विजेच्या वापरात इन्व्हर्टर हा एक विषय चर्चेत आलेला नाही.
लोडशेडिंग होऊनही बिल भरपूर येण्याचे ते मोठे कारण आहे. कारण वापर कमी असला, तरीही त्याचे दिवसभर चार्जिंग होतच असते.

४. पाण्याची मोटर एक हॉपॉ पेक्षा अर्धा हॉ.पॉ.ची असेल तर खूप कमी वीज खाते.

५. वेगवेगळ्या एरियात, व वेगवेगळ्या वापराच्या प्रमाणात एमेसीबी वेगळी बिले काढते. उदा, १०० पेक्षा कमी युनिट वापरल्यास कमी बिल येते, १०१ युनिट झाले की टोटल बिलावर खूप फरक पाडतात, जे अ‍ॅक्चुअली अनफेअर आहे.
याशिवाय वापर वाढत नसला तरी प्रति युनिट किम्मत वाढवल्याने बिल वाढलेले दिसते. (हा मुद्दा स्पेशल अशोक पाटील सरांसाठी.)

लोडशेडिंग इ. बद्दल पोलिटिकल कॉमेंट लिहिण्याचे टाळल्याबद्दल स्वतःला धन्यवाद देतो, व इतके बोलून मी माझे ५ पैसे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मायबोली.

*
ता.क.
सीआरटी टीव्हीपेक्षा एल्सीडी/एलईडी खूप कमी वीज खातात, असे वाटते. वर प्लाझ्माला वीज जास्त लागते असे बहुतेक निपो यांनी लिहिल्येय? खरे खोटे काय?

आमच्या बिल्डींगमधले कॉमन एरियातले दिवे हे आवाजावर चालतात. म्हणजे जरा जरी खुट झाले ( टाळी वाजवली, बूटाचा पाय आपटला ) कि चालू होतात. दरवाजा उघडण्यापुरता तेवढा लाईट पुरेसा असतो. दोन मिनिटांनी आपोआप बंद होतात. हि यंत्रणा फारशी खर्चिक नसावी.
तसेच लिफ्ट्च्या समोरची जी जाळी आहे तिचे डिझाईन जरा वेगळेच आहे. हवा आणि उजेडही भरपूर असतो. जिन्यात मिट्ट काळोख कधीच नसतो.

न्यू झीलंडमधे तर दरवाजासमोरचा दिवा जराश्या हालचालीने ( अगदी मांजर दरवाज्यासमोरून गेली तरी ) चालू होतो. हि यंत्रणापण खर्चिक नसावी.

चांगला धागा आहे. इथे सुचवले गेलेले उपाय धागाकर्त्यांनी हेडरमध्ये कन्सॉलिडेट करून लिहिले तर नंतर वाचणार्‍यांना एका ठिकाणी सापडतील.

Pages