एनीटाईम राईस

Submitted by बेफ़िकीर on 23 November, 2013 - 01:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तांदुळ दिड वाटी, भाज्या (उदाहरणार्थ श्रावण घेवडा, तोंडली, मटार, गाजर, बटाटा, टोमॅटो), आले, लसूण, कांदा, मिरची, लिंबू, कोथिंबीर, गरम मसाला (मिरे, लवंग, दालचिनी, तमालपत्र), ड्राय फ्रूट्स (बदाम, काजू व बेदाणे) तसेच हवे असल्यास पनीर किंवा टोफू!

क्रमवार पाककृती: 

तांदूळ धुवून घ्यावेत.

सर्व भाज्या पातळ, उभ्या चिरून घ्याव्यात.

लसूण, आले, कोथिंबीर व मिरची ह्यांची पेस्ट करून घ्यावी.

पातेल्यात तेल घेऊन त्यात गरम मसाला घालून फोडणी करावी.

त्यात कांदा परतावा.

त्यात लसुण, आले, मिरची व कोथिंबीर ह्यांची पेस्ट घालावी व परतावी.

त्यानंतर चिरलेल्या भाज्या घालून पुन्हा परतावे.

ड्राय फ्रूट्स घालावीत.

तांदूळ घालावेत.

चवीप्रमाणे मीठ, चिंच, गूळ हे घालून भात शिजवावा.

(मांसाहारींनी इच्छेनुसार अंडी किंवा चिकन / मटन पिसेस घालावेत)

एकुण, हा भात करताना काय व किती घालायचे ह्याचे कोणतेही ठराविक निकष नाहीत. त्यामुळे असेल ते साहित्य घेऊन हा भात होऊ शकतो. स्वादिष्ट लागतो व जितका न्युट्रिशिअस केला जाईल तितका न्युट्रिशिअसही ठरतो.

Rice - Sahitya.jpgRice - Ready.jpg

वाढणी/प्रमाण: 
चारजणांसाठी पुरेसा भात
अधिक टिपा: 

आपण आपल्या इच्छेनुसार हा भात मॉडिफाय करू शकता.

एनीटाईम राईस असे म्हणण्याचे कारण की हा दिवसातील अगदी कोणत्याही वेळी खाण्यासारखा वाटतो.

(सशल ह्यांच्या सूचनेनुसार लिंक दिल्यावर चित्रे मूळ मजकुरात दिसू लागली. सशल ह्यांचे आभार)

ही पाकक्रिया सौ. यशःश्रीची आहे, तिचे येथे सदस्यत्व नसल्याने मी फक्त लिहून काढली आहे.

माहितीचा स्रोत: 
स्त्रोत असा नाही, एकदा करून पाहिला व नंतर वेगवेगळी व्हर्जन्स करत राहिलो.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व स्वादप्रेमींच्या दिलखुलास अभिप्रायांसाठी आभारी आहे.

>>>स्वतःच स्वतःच्या बायकोला "सौभाग्यवती" म्हणायचं म्हणजे जरा जास्तच नै का<<<

त्याचे असे आहे मै देवी, की अनेकांना यशःश्री म्हणजे कोण असा(ही) प्रश्न पडू शकेल असे वाटले, म्हणून सौ. असे लिहिले. Happy

कोणीतरी कृपया चित्रे मूळ मजकूरात कशी द्यायची ते सांगावेत, मला 'इमेज द्या' हा पर्यायच दिसला नाही.

धन्यवाद!

पाककृती विभाग कधीच उघडत नाही, पण नाव वाचून उघडलं. कुणालाही करता येईल आणि चवीला पण मस्त दिसतेय अशी डिश.
थँक्स बेफिजी.

बेफिकीर , तुमचं निरीक्षण बरोबर आहे .. रेसिपी द्यायची असेल तर इमेज द्या हा टॅब दिसत नाही .. तुम्ही प्रतिसादात दिलेल्या इमेज ची स्क्रिप्ट कट पेस्ट करा मूळ पाककृतीत ..

क्या बा(भा)त है!! +१
पण पाककृती लिहिताना वापरलेल्या घटकांचे प्रमाण इत्यादी तपशील अत्यंत महत्त्वाचाच अनिवार्यच
अजून येवूद्यात !!

त्यापेक्षा माझी इछा अशी की वहिनींना माबोवर येवूद्यात ....जाम मजा येईल Lol

मैत्रेयी, अगं, हिंदीत नाही का म्हणत... अरी ओ भागवान... तस्सच. हो किए नै, बेफिकीर?
मस्तच दिस्तोय भात.
चिंच, गूळ मभातात ऐकलं नव्हतं.
खरच कधीही बोलवा येतोच. मला थोडा अशिक वेळ द्या पोचायला. सिडनीहून थोडका जास्तं लागेल इतकच्. Happy

व्वा.

वहिनींनी केला आहे म्हटल्यावर चवीबद्दल काय लिहावे.

तो बदामाचा शिरा अजूनही रेंगाळतो आहे जिभेवर....... स्ल....र्प.....

मस्तच !

आज ही रेसिपी मायनस चिंच, गूळ अशी ट्राय केली .. Happy

आता ही रेसिपी आणि मी करते त्या मेथी पुलाव ची रेसिपी ह्यांचा समन्वय साधण्याचा विचार चालू आहे ..

Pages