एनीटाईम राईस

Submitted by बेफ़िकीर on 23 November, 2013 - 01:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तांदुळ दिड वाटी, भाज्या (उदाहरणार्थ श्रावण घेवडा, तोंडली, मटार, गाजर, बटाटा, टोमॅटो), आले, लसूण, कांदा, मिरची, लिंबू, कोथिंबीर, गरम मसाला (मिरे, लवंग, दालचिनी, तमालपत्र), ड्राय फ्रूट्स (बदाम, काजू व बेदाणे) तसेच हवे असल्यास पनीर किंवा टोफू!

क्रमवार पाककृती: 

तांदूळ धुवून घ्यावेत.

सर्व भाज्या पातळ, उभ्या चिरून घ्याव्यात.

लसूण, आले, कोथिंबीर व मिरची ह्यांची पेस्ट करून घ्यावी.

पातेल्यात तेल घेऊन त्यात गरम मसाला घालून फोडणी करावी.

त्यात कांदा परतावा.

त्यात लसुण, आले, मिरची व कोथिंबीर ह्यांची पेस्ट घालावी व परतावी.

त्यानंतर चिरलेल्या भाज्या घालून पुन्हा परतावे.

ड्राय फ्रूट्स घालावीत.

तांदूळ घालावेत.

चवीप्रमाणे मीठ, चिंच, गूळ हे घालून भात शिजवावा.

(मांसाहारींनी इच्छेनुसार अंडी किंवा चिकन / मटन पिसेस घालावेत)

एकुण, हा भात करताना काय व किती घालायचे ह्याचे कोणतेही ठराविक निकष नाहीत. त्यामुळे असेल ते साहित्य घेऊन हा भात होऊ शकतो. स्वादिष्ट लागतो व जितका न्युट्रिशिअस केला जाईल तितका न्युट्रिशिअसही ठरतो.

Rice - Sahitya.jpgRice - Ready.jpg

वाढणी/प्रमाण: 
चारजणांसाठी पुरेसा भात
अधिक टिपा: 

आपण आपल्या इच्छेनुसार हा भात मॉडिफाय करू शकता.

एनीटाईम राईस असे म्हणण्याचे कारण की हा दिवसातील अगदी कोणत्याही वेळी खाण्यासारखा वाटतो.

(सशल ह्यांच्या सूचनेनुसार लिंक दिल्यावर चित्रे मूळ मजकुरात दिसू लागली. सशल ह्यांचे आभार)

ही पाकक्रिया सौ. यशःश्रीची आहे, तिचे येथे सदस्यत्व नसल्याने मी फक्त लिहून काढली आहे.

माहितीचा स्रोत: 
स्त्रोत असा नाही, एकदा करून पाहिला व नंतर वेगवेगळी व्हर्जन्स करत राहिलो.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त....................

बेफी आता तुम्ही शिकुन घ्याच.......... Wink

चक्क बेफींनी पाकृ टाकली?? Uhoh
क्या बा(भा)त है!!

बाकी पाकृ मस्तच! फोटो पाहुन भुक लागलीय! तोंपासु! Happy

चविष्ट प्रकार. बेफिकीर वहिनींना धन्यवाद सांगा. ( वहिनी म्हणले तर चालेल ना?) असा भात आमच्या कडे असतोच. त्यात तुम्ही फरसबी, तोंडली काय पण टाका. बरोबर पापड आणी दही. जबरी!:स्मित:

मस्त..
हा भात बघून ग्रॅड स्कूलचे दिवस आठवले. दिवसातला संध्याकाळचा अर्धा-पाऊणच तास स्वैपाक आणि जेवणासाठी मिळे. तेव्हा हाती लागतील त्या भाज्या, मनाला येईल ते मसाले घालून नुसता भात किंवा खिचडी करण्यात येई. पापड असेल तर मावेमधे फिरवून आणि लोणचं, दही डब्यातून काढून त्या भात/ खिचडी बरोबर गडप केले जाई.
परत भरपूर करायचे म्हणजे लंचला न्यायला लेफ्टोव्हरसुद्धा.. Happy

उठा ले रे बाबा इस कूकर को अपने घर.
फुकट ते पौष्टीकच्या दिवसात कँटीनमधली टोमॅटो सॉस घातलेत अश्या भातात. सुका मेवाचे दिवस खूप नंतर पाहिले पण मित्र राहिले नाही.

मस्त.
प्राची +१. मोडाचे मूग ढकलले तरी छान लागतात. मी गरम मसाला घालत नाही, फक्त जिरं, मिरचीची फोडणी करते आणि चवीला माईल्ड करते

चक्क बेफींनी पाकृ टाकली?? +१

मस्त दिसतोय प्रचित! मी असतील तेवढ्या भाज्या ढकलते किंवा कडधान्ये.. सही होतोच

अरे वा मस्त फोटो आला आहे. मला पण सकाळी अर्धा ते पाउण तासच मिळतो स्वैपाक करायला. एकदा हे उकडले कि काम झाले.

मस्त दिसतोय भात. मी यात मोड आलेले कढधान्य पण घालते. मी अशाच पद्धतीने दलियाची खिचडी आणि बार्ली पण शिजवते मात्र बार्ली ओवनमधे शिजवते.

मस्तं पाककृती. फोटोपण सुंदर आहेत.

पुळिओग्रे सोडून चिंच घातलेला मसालेभात कधी खाल्ला नव्हता. करून बघायला हवा.

चांगली दिसतेय रेसिपी ! करून बघेन हा भात.
ते असो . पण स्वतःच स्वतःच्या बायकोला "सौभाग्यवती" म्हणायचं म्हणजे जरा जास्तच नै का .... Proud

Pages