भारतरत्न सचिन

Submitted by अंड्या on 16 November, 2013 - 05:48

आपल्या सचिनला भारतरत्न जाहीर झाले आहे हो sssssss !!!!

त्याच्या जाण्याने जड झालेले मन हलके करायला यापेक्षा आनंदाची बातमी ती आणखी काय..

माझ्यासह सर्वच सचिनच्या चाहत्यांचे अभिनंदन !! अभिनंदन !!! अभिनंदन !!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'त्याग करणारा' हा निकष कशाला ? सरळमार्गाने पैसे कमावणे ही चुकीची गोष्ट आहे का?<<<

हे पटत आहे. पण त्यागामुळे येणारी झळाळी और असते.

कला, क्रीडा याही माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. यांनीही माणसाच्या आयुष्यात गुणात्मक फरक पडतो. आपण आदिमानव होतो, त्याला बराच काळ लोटला.<<<

लोकांना खायला नाही, शिक्षण नाही, रस्ते नाहीत, अनागोंदी आहे, तांत्रिक विकास (काही देशांच्या तुलनेत) कमी आहे, लोकसंख्या नियंत्रण नाही, इतकी संकटे असताना कला आणि क्रीडा ह्यांचा असा गौरव करणे ही कमकुवत बाब वाटते.

भारतरत्न कुणाला द्यावा,कुणाला देऊ नये.किंबहुना असा पुरस्कारच असावा/नसावा वगैरे ठरवण्यासाठी मायबोलीची एक समिती नेमावी आणि त्या समितीच्या शिफारसी अंमलात आणण्याचे कायदेशीर बंधन केंद्र सरकारवर असावे असा मी ठराव मांडतो. Proud

सेवाक्षेत्रातील अनेक लायक व्यक्तींना भारतरत्न मिळालेला नाही असे माझे मत आहे. पण त्यामुळे ज्यांना तो मिळाला, त्यांची कामगिरी कमी होत नाही.>> अनुमोदन

अहो हे सचिन तेंडुलकरबाबत चाललेले आहे, तो क्रिकेटर आहे, भारतापुढे वर्तणुकीचा आदर्श ठेवायला तो कोणी संतमहात्मा नव्हे हो!>>

म्हणजे संतमहात्म्यांना द्यावे का?
यात आसाराम बापू, अनिरुद्ध बापू, रामदेवबाबा यांच्यात कोणाला द्यावे?

मग जोवर आपल्या देशातल्या सगळ्या लोकांना दोन वेळ खायला मिळत नाही, तोवर आम्ही फक्त पोटापुरतेच खाऊ, जिभेचे चोचले पुरवणार नाही.
सगळ्यांना धड कपडे नाहीत तोवर फक्त पंचा नेसू.
सगळीकडे वीज पोचत नाही तोवर फक्त उत्पादक कामांसाठीच वीज वापरू . टीव्ही पाहणार नाही. मायबोलीवर अजिबात येणार नाही. असे म्हणायचे का?
या समस्या सुटत नाहीत तोवर भारताने ऑलिंपिक्ससारख्या स्पर्धा आयोजित करण्याचा विचार सोडूनच द्यावा. वर खेळासाठी जो काय पैसा खर्च होतो तोही थांबवावा का?
प्लीज डोन्ट टेक ऑल धिस पर्सनली.

जीवनात कितीही समस्या असल्या तरी आपण आनंदाचे क्षण शोधतच असतो. हे व्यक्तीच्या बाबत खरे आहे, तसेच समाजाच्या, देशाच्याही बाबत.

खाऊन पिऊन सुखी असलेल्या लोकांनीच कला-क्रीडा यांच्या मागे लागावे असे म्हटले असते तर आपल्याला कितीतरी क्रीडापटू, कलावंत मिळालेच नसते.
आपल्या क्षेत्रातल्या व्यक्तीला पुरस्कार सर्वसामान्य (त्या क्षेत्रापुरता मर्यादित नसलेला) पुरस्कार मिळाल्याचा आनंद त्या क्षेत्रातल्या सगळ्यांनाच होतो.
जसा आता भारतीय वैज्ञानिकांना झाला असेल.नाहीतर वैज्ञानिकांसाठीही शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार आहेच की.(जसे खेळाडूंसाठी खेलरत्न, चित्रपटासाठी फाळके पुरस्कार आहेत)

खेळ आणि खिलाडूवृत्ती या दोन्हीबाबत उदासीन असणारेच सचिनच्या भारतरत्नला विरोध करू शकतात.

जीवनात कितीही समस्या असल्या तरी आपण आनंदाचे क्षण शोधतच असतो. हे व्यक्तीच्या बाबत खरे आहे, तसेच समाजाच्या, देशाच्याही बाबत.<<<

भारतरत्न पुरस्कारासाठी योग्य व्यक्ती निवडणे हे आनंदाचे क्षण शोधण्यात मोडत नाही.

म्हणजे संतमहात्म्यांना द्यावे का?
यात आसाराम बापू, अनिरुद्ध बापू, रामदेवबाबा यांच्यात कोणाला द्यावे?<<<

विपर्यास आहे, तेव्हा दुर्लक्ष!

मुळात कला-क्रीडा यांना कमी लेखायचे कारण मला कळलेले नाही.
माझ्या एका बॅचमेटने फेसबुकवर देशासाठी (?) धान्य पिकवणार्‍यांना कोणी विचारत नाही आणि चीप एंटरटेनमेंट देणार्‍यांचा उदो उदो असा त्रागा व्यक्त केला. नंतर त्यानेच या दोन्ही गोष्टींचा संबंध मी (त्याच्या माहितीतल्या काही) शेतकर्‍यांच्या स्थितीबद्दलच्या उद्विग्नतेतून काढला असे म्हटले.

म्हणजे संतमहात्म्यांना द्यावे का?
यात आसाराम बापू, अनिरुद्ध बापू, रामदेवबाबा यांच्यात कोणाला द्यावे?<<<

विपर्यास आहे, तेव्हा दुर्लक्ष!

>>>>>>>

तुम्ही सचिनला का देऊ नये याचे उदाहरण देताना जे मुद्दे मांडत आहात त्याचे एक उदाहरण दिले तर विपर्यास झाला का?
तुम्ही चांगले संतमाहात्म्य सुचवू शकता तुमच्या ओळखीतले, पटले तर देऊ !

पण त्यागामुळे येणारी झळाळी और असते.>>> हा रोमॅन्टीसीझम आणि भाबडेपणा केव्हाच लयाला गेला. भारतातच नव्हे, तर अख्ख्या जगात.

लोकांना खायला नाही, शिक्षण नाही, रस्ते नाहीत, अनागोंदी आहे, तांत्रिक विकास (काही देशांच्या तुलनेत) कमी आहे, लोकसंख्या नियंत्रण नाही, इतकी संकटे असताना कला आणि क्रीडा ह्यांचा असा गौरव करणे ही कमकुवत बाब वाटते.<<< मग कला आणि क्रीडा वगैरे फालतू गोष्टी बंद कराव्यात की काय??? कमकुवत बाब म्हणजे काय? एका शास्त्रज्ञ आणि एका खेळाडूचा सन्मान झालाय भारतरत्न देऊन. अजून काय वेगळे हवे होते?

लोकांना खायला देण्यासाठी सरकार झटत आहे, त्याचे खाते वेगळे, कला-क्रीडा वेगळे.
शिक्षण देण्यासाठी सरकार झटत आहे, त्याचे खाते वेगळे, कला-क्रीडा वेगळे. (पन्नास वर्षापूर्वी शिक्षणासाठी मैलोनमैल चालत गेलेल्या पिढ्या आणि प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा हे चित्र नक्कीच चांगले आहे)
रस्ते बांधायला सरकार झटत आहे, त्याचे खाते वेगळे, कला-क्रीडा वेगळे. (पन्नास वर्षापूर्वी भारतातले रस्ते, जलमार्ग आणी विमानमार्ग आणि आजचे यांची तुलना केल्यास चित्र नक्कीच चांगले आहे)
अनागोंदी म्हणजे नक्की काय माहित नाही,
तांत्रिक विकास (काही देशांच्या तुलनेत) कमी आहे आणी बर्‍याच देशांच्या तुलनेत उत्तम आहे. घरोघरी इंटरनेट, मोबाईल, वीज, टीव्ही यांचे चित्र पाहता उत्तम आहे. आपला संरक्षणासाठीचा तांत्रिक विकासदेखील उच्च दर्जाचा आहे)
(वरच्या उदांमधे सरकार म्हटल्याबरोबर लगेच कॉन्ग्रेस वगैरे म्हणायची गरज नाही!! सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष दोघेही तितकेच जबाबदार घटक आहेत लोकशाहीमध!!)
हे एवढे सगळे असताना सचिनला भारतरत्न दिल्यावर लगेच कममुवत बाब ती कसली?
समस्या आहेत हे मान्य, पण त्या समस्या आहेत म्हणून कला-क्रीडा इत्यादिंचे सेलेब्रेशन करूच नये??
बरं, सचिनला भारतरत्न दिले नाही म्हणून वरच्या गोष्टी बदलणार आहेत का? खचितच नाही. ती बदलण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, एकट्या सचिनची, सरकारची अथवा दुसर्‍याची नव्हे!!!

मुळात कला-क्रीडा यांना कमी लेखायचे कारण मला कळलेले नाही.<<<

मला असे वाटते की तुम्हाला हे कळलेले नाही की कोणीच कला आणि क्रीडा क्षेत्राला कमी लेखत नाही आहे. भिन्न क्षेत्रांमध्ये भिन्न पुरस्कार असावेत ही अपेक्षा गैर कशी?

प्रत्येक क्षेत्राचे मानवी जीवनात वेगवेगळे योगदान आहे. कला व क्रीडा यातून (तुम्ही म्हणता तसेच) आनंदाचे क्षण येतात तर एखाद्या निस्सीम राष्ट्रभक्ताने दिलेल्या आहुतीने राष्ट्रभावना जागृत होते व (त्या अल्प प्रमाणात) राष्ट्र सुरक्षित राहते. या दोन्हीला एकच पुरस्कार देणे अयोग्य नाही का? पुरस्कारांच्या स्वरुपात साधर्म्य नसावे असे आधीच्या प्रतिसादात म्हंटलेले आहे त्याची पुन्हा आठवण करून देतो.

ज्याला ऑस्कर मिळाले / हवे आहे, त्याला भारतरत्न देणे योग्य ठरेल का?

<जीवनात कितीही समस्या असल्या तरी आपण आनंदाचे क्षण शोधतच असतो. हे व्यक्तीच्या बाबत खरे आहे, तसेच समाजाच्या, देशाच्याही बाबत.>

समस्यांमध्येही कला-क्रीडा यांमुळे आयुष्यात हिरवळ निर्माण होते. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची नाही? कौतुक करायचे नाही?

तुम्ही चांगले संतमाहात्म्य सुचवू शकता तुमच्या ओळखीतले, पटले तर देऊ !<<<

स्वस्त शेरा! त्यामुळे पुन्हा दुर्लक्ष!

भिन्न क्षेत्रांमध्ये भिन्न पुरस्कार असावेत ही अपेक्षा गैर कशी?

>>>>>>>

ते तर आहेतच ना Uhoh
बंद कुठे केलेयत, पण तेथील सर्वोच्च सन्मान सुद्धा या पठ्ठयाने पटकाऊन झालाय.
आता पुढचे लक्ष्य विश्वरत्न !

समस्यांमध्येही कला-क्रीडा यांमुळे आयुष्यात हिरवळ निर्माण होते. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची नाही? कौतुक करायचे नाही?<<<

भारतरत्न देणे आणि कौतुक करणे यात दर्जात्मक फरक आहे असे वाटते. (पुन्हा, हेही अतिशय वैयक्तीक मत आहे व ते न पटणे ह्याचाही आदरच).

बाकी कोणी निर्मिलेल्या हिरवळी किती मऊसूत ह्याचे निकष असतीलच बहुधा! पण तो चर्चेचा भाग नाही.

तुम्ही चांगले संतमाहात्म्य सुचवू शकता तुमच्या ओळखीतले, पटले तर देऊ !<<<

स्वस्त शेरा! त्यामुळे पुन्हा दुर्लक्ष!

>>>>>>>

दुर्लक्ष करताहेत मग ते तसे बोलून का दाखवत आहात Uhoh

बंद कुठे केलेयत, पण तेथील सर्वोच्च सन्मान सुद्धा या पठ्ठयाने पटकाऊन झालाय.
आता पुढचे लक्ष्य विश्वरत्न !<<<

तुमचे सचिनप्रेम आवडले. त्याबद्दल मुळीच विरोध करण्याची इच्छा नाही मनापासून! Happy

दुर्लक्ष करताहेत मग ते तसे बोलून का दाखवत आहात <<<

आपल्याकडे का दुर्लक्ष केले जात आहे हे धाग्याच्या कोणत्यातरी एका पानावर तुमच्या लक्षात यावे म्हणून!

(तेही धागा तुमचा आहे म्हणून)

भिन्न क्षेत्रांमध्ये भिन्न पुरस्कार असावेत ही अपेक्षा गैर कशी?<<<<

http://en.wikipedia.org/wiki/Indian_honours_system
http://en.wikipedia.org/wiki/Rashtrapati_Award

आहेत की ऑलरेडी भिन्न पुरस्कार.

भारतरत्न देणे आणि कौतुक करणे यात दर्जात्मक फरक आहे असे वाटते. (पुन्हा, हेही अतिशय वैयक्तीक मत आहे व ते न पटणे ह्याचाही आदरच).

>>>>>>>>

नक्कीच असेल, पण तुम्हाला यापैकी कशाचा दर्जा वरचा वाटतो?

अनेकदा हा 'भारतरत्न' पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे. बहुतांश वेळा मरणोत्तर पुरस्कार हे पुरस्कारप्राप्त व्यक्तीखेरीज इतर कोणाच्यातरी सोयी- स्वार्थासाठीच दिले जात असावेत असे जाणवते.

खरेतर कोणतेही पुरस्कार मरणोत्तर तर देऊच नये पण आयुष्याच्या अगदी उत्तरार्धात, सगळी गात्रे थकलेली असताना, पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठावर जाण्याचेही त्राण उरले नाहीयेत, मनुष्य जवळ जवळ स्थितप्रज्ञ बनला आहे, पुरस्काराचा आनंद घेण्यापलीकडे पोचला आहे अशा वेळेला देण्यापेक्षा तो माणूस स्वतः सक्षम आणि पुरस्काराचा आनंद घेऊ शकेल अशा स्थितीत आहे त्याच वेळी देण्यात एक निर्मळपणा आहे.

आजमितीस 'भारतरत्न' पुरस्कार दिल्या गेलेल्या व्यक्तींची यादी पाहिली तर तुलनात्मक दृष्ट्या सचिन रमेश तेंडुलकर ही व्यक्ती केवळ आपल्या कर्तृत्वाने सर्वतोपरी सुयोग्य आहे असे वाटते.

नक्कीच असेल, पण तुम्हाला यापैकी कशाचा दर्जा वरचा वाटतो?<<<

भारतरत्न देणे हे (माझ्यामते) नुसत्या कौतुकाहून अधिक आहे.

दुर्लक्ष करताहेत मग ते तसे बोलून का दाखवत आहात <<<

आपल्याकडे का दुर्लक्ष केले जात आहे हे धाग्याच्या कोणत्यातरी एका पानावर तुमच्या लक्षात यावे म्हणून!

(तेही धागा तुमचा आहे म्हणून)

>>>>>>>>>

मुद्दे संपले, बोलती बंद झाली की लोक दुर्लक्ष करायला सुरुवात करतात अशी शेलकी टिका मी करणार नाही, पण धागा माझा आहे याचा काय संबंध Uhoh

आजमितीस 'भारतरत्न' पुरस्कार दिल्या गेलेल्या व्यक्तींची यादी पाहिली तर तुलनात्मक दृष्ट्या सचिन रमेश तेंडुलकर ही व्यक्ती केवळ आपल्या कर्तृत्वाने सर्वतोपरी सुयोग्य आहे असे वाटते.<<<

ह्यातील 'तुलनात्मक दृष्ट्या' हे बर्‍यापैकी पटले. ज्यांना दिला गेला आहे त्यांच्या तुलनेत (मयेकर म्हणतात त्याप्रमाणे) सचिनने बरीच जास्त हिरवळ निर्माण केली असेल किंवा ती हिरवळ भाषामर्यादा ओलांडून सर्वत्र पोचली असेल (जसे कदाचित, केरळमधील माणूस भीमसेनांना किंवा लताला - आवाज व गायनकला हे घटक सोडा, फक्त आनंदाचे क्षण या निकषांवर - नेमके तितके अ‍ॅप्रिशिएट करू शकणार नाही जितका महाराष्ट्रातील माणूस करू शकेल, पण सचिनचे तसे नाही / नसावे).

पण 'तुलनात्मक दृष्ट्या' म्हंटल्यामुळे हे खरे ठरत नाही (/ ठरवले जाऊ नये) की सचिन भारतरत्न पुरस्कारासाठी सर्वतोपरी (अदरवाईज अल्सो) सुयोग्य आहे.

पण धागा माझा आहे याचा काय संबंध <<<

ज्यांचा धागा नाही त्यांच्याकडे केलेल्या दुर्लक्षाचे कारण सांगण्यास बांधील नाही. सहसा संकेतस्थळांवर असा एक संकेत पाळला जातो. विशेष काही नाही.

>>>>>>>>>खरेतर कोणतेही पुरस्कार मरणोत्तर तर देऊच नये पण आयुष्याच्या अगदी उत्तरार्धात, सगळी गात्रे थकलेली असताना, पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठावर जाण्याचेही त्राण उरले नाहीयेत, मनुष्य जवळ जवळ स्थितप्रज्ञ बनला आहे, पुरस्काराचा आनंद घेण्यापलीकडे पोचला आहे अशा वेळेला देण्यापेक्षा तो माणूस स्वतः सक्षम आणि पुरस्काराचा आनंद घेऊ शकेल अशा स्थितीत आहे त्याच वेळी देण्यात एक निर्मळपणा आहे.
आजमितीस 'भारतरत्न' पुरस्कार दिल्या गेलेल्या व्यक्तींची यादी पाहिली तर तुलनात्मक दृष्ट्या सचिन रमेश तेंडुलकर ही व्यक्ती केवळ आपल्या कर्तृत्वाने सर्वतोपरी सुयोग्य आहे असे वाटते.
<<<<<<<<
हर्पेन .. सहमत..

भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. तो कोणत्याही एका क्षेत्रापुरता सीमित नाही. (सैनिक सोडले तर- त्यांच्यासाठी परमवीरचक्र). त्याचे आहे ते स्वरूप मला मान्य आहे. (आधीचे निकष : कला, साहित्य , विज्ञान, जनसेवा यांतील सर्वोच्च/विलक्षण कामगिरी. पसंत आहे. तेंडुलकर आदींची निवड त्या स्वरुपाला साजेशी आहे.

आदिमानवाच्या गुहेच्या भिंतीवरही चित्रे रेखाटलेली असायची म्हणे. जिथे जगायची भ्रांत तिथेही त्याला कलेची ओढ वाटली. आपण त्यापेक्षा बरेच पुढे आलो आहोत ना?

Pages