भारतरत्न सचिन

Submitted by अंड्या on 16 November, 2013 - 05:48

आपल्या सचिनला भारतरत्न जाहीर झाले आहे हो sssssss !!!!

त्याच्या जाण्याने जड झालेले मन हलके करायला यापेक्षा आनंदाची बातमी ती आणखी काय..

माझ्यासह सर्वच सचिनच्या चाहत्यांचे अभिनंदन !! अभिनंदन !!! अभिनंदन !!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतरत्न देणे हे (माझ्यामते) नुसत्या कौतुकाहून अधिक आहे.
>>>>>>>>>
आणि माझ्यामते भारतरत्न ही सचिनसाठी तरी कौतुकाची नव्हे प्रेमाची पावती आहे Happy

तुमच्या विचारांना एक वाक्य आतिशयोक्ती वाटेल पण ऐका,
सचिनमुळे भारतरत्न या पुरस्काराची किंमत वाढली आहे,
जर नुसते शास्त्रज्ञ राव यांनाच मिळाला असता तर कित्येक सामान्य जण बर हम्म करून पुढच्या पानावर गेले असते, मात्र सचिनबरोबर भारतरत्न मिळवणारे त्याच तोडीचे हे कोण म्हणून लोक त्यांचे कार्य जाणून घ्यायला बघतात. म्हणून लोकप्रिय कर्तुत्ववानांना भारतरत्न अधूनमधून मिळत राहायला हवे.

आदिमानवाच्या गुहेच्या भिंतीवरही चित्रे रेखाटलेली असायची म्हणे. जिथे जगायची भ्रांत तिथेही त्याला कलेची ओढ वाटली. आपण त्यापेक्षा बरेच पुढे आलो आहोत ना?<<<

ह्या मुद्यावर वर चर्चा झालेली आहे. कला व क्रीडा ह्यांच्या आयुष्यातील स्थानाबाबत कोणताच वाद नाही आहे. त्यांच्या केल्या जाणार्‍या कौतुकाबाबतही नाही आहे.

भारतरत्न आणि कौतुक करणे ह्यात दर्जात्मक फरक आहे असे माझे म्हणणे वर नोंदवले आहे.

ज्यांचा धागा नाही त्यांच्याकडे केलेल्या दुर्लक्षाचे कारण सांगण्यास बांधील नाही. सहसा संकेतस्थळांवर असा एक संकेत पाळला जातो. विशेष काही नाही.
>>>>>
ओके मला या संकेताबद्दल माहीत नव्हते, तसेच मला धागा माझा असल्याचे कौतुक नाही, अन नसते कधी, मी तर अभिनंदनाला धागा काढला होता, चर्चा सुरु झाली, वेळ होता तर लगे हात आपण पण आपले विचार मांडून काढूया म्हटलं, दुर्दैवाने नेमके तुमचेच विचार पटले नाहीत बस्स !

अंड्या | 20 November, 2013 - 12:03 नवीन

आणि माझ्यामते भारतरत्न ही सचिनसाठी तरी कौतुकाची नव्हे प्रेमाची पावती आहे <<<

एक्झॅक्टली! इतकेच म्हणायचे होते. माझ्यादृष्टीने ही चर्चा माझ्यापुरती संपली.

हे कौतुक नसून हा एक भावनिक निर्णय अधिक आहे व आशा आहे की तो निर्णय घेण्याच्या टायमिंगचा कोणत्याही राजकीय धोरणाशी संबंध नसावा.

हर्पेन, मरणोत्तर पुरस्कार राजकारणाचा भाग म्हणून सुरू झाले. पहिला बहुतेक एमजीआरना दिला गेला. तिथे त्या पुरस्काराचे मोल कमी झाले.

आता मला जीवनाच्या आवश्यक गरजांकडे लक्ष देणे भाग असल्याने रजा घेतो. Happy

आता मला जीवनाच्या आवश्यक गरजांकडे लक्ष देणे भाग असल्याने रजा घेतो. <<< Proud

मीही Happy

चर्चेत सामावून घेणार्‍या सर्वांचे आभार!

मित्रांनो मी जरा कामात आहे, थोड्यावेळाने येतो परत नाहीतर रात्री बोलू,
पण जोपर्यंत सचिनला भारतरत्न देणे हे योग्यच आहे हे सर्वांना पटत नाही तोपर्यंत येथील चर्चा थांबली नाही पाहिजे. Happy

अंड्या | 20 November, 2013 - 12:03 नवीन

आणि माझ्यामते भारतरत्न ही सचिनसाठी तरी कौतुकाची नव्हे प्रेमाची पावती आहे <<<

एक्झॅक्टली! इतकेच म्हणायचे होते.

>>>>>

आधीच सांगितले असते तर संपादन करून हे वाक्य धाग्यातच टाकले असते Lol

हे कौतुक नसून हा एक भावनिक निर्णय अधिक आहे >>>>>>>>>>
ह्या वरुन असे वाटते की लोकांच्या प्रेमामुळे.. इमोशन्स मुळे पुरस्कार मिळाला... जे बरोबर नाही..
he deserves it.. Happy

बेफिकीर,

>> हे कौतुक नसून हा एक भावनिक निर्णय अधिक आहे व आशा आहे की तो निर्णय घेण्याच्या टायमिंगचा
>> कोणत्याही राजकीय धोरणाशी संबंध नसावा.

१००% सहमत. हा राजकीय निर्णय असल्याची भीती साधार आहे. Sad

मला सचिन या माणसाविषयी प्रगाढ आदर आहे. पण त्याचं योगदान भारतरत्न या प्रकारात मोडतं का यावर देशव्यापी चर्चा व्हायला हवी. माबोवर होते आहे तशीच. Happy

पुरस्काराचं म्हणाल तर तो वेगळाच विषय आहे. अत्यंत विवादास्पद व्यक्तींना भारतरत्न मिळालं आहे. मग सचिनला का नको, हा युक्तिवाद ग्राह्य धरला जाऊ नये.

माझ्या मते काही निकष असे असावेत :

१. भारतरत्न हा पुरस्कार म्हातारपणी माणूस स्थितप्रज्ञ अवस्थेत सगळी गात्रे थकल्यावर देण्यात काय अर्थ असं हर्पेन म्हणाले होते. खरंतर नेमका हाच निकष म्हणून धरायला हरकत नसावी. जी व्यक्ति आयुष्यभर स्थितप्रज्ञ असते तिलाच हा पुरस्कार मिळायला हवा.

२. क्रिकेट म्हणजे पूर्ण क्रीडाक्षेत्र नव्हे. त्यातून भारताचा एक देश म्हणून काय लाभ झाला असं गणित मांडायला हवं. हाच मुद्दा भीमसेन जोशी व लताबाईंच्या बाबतीत लागू पडतो. याच न्यायाने आशाबाईंना देखील भारतरत्न मिळायला हवा.

आ.न.,
-गा.पै.

जी व्यक्ति आयुष्यभर स्थितप्रज्ञ असते तिलाच हा पुरस्कार मिळायला हवा.

मग तिला पुरस्कार तरी कशाला द्यायचा? स्थितप्रद्नच आहे म्हटल्यावर पुरस्कार दिला काय अन डोक्यात दगड हाणला काय, दोन्ही सेमच नै का? Happy

संजिव पिल्ले,

>> स्थितप्रद्नच आहे म्हटल्यावर पुरस्कार दिला काय अन डोक्यात दगड हाणला काय, दोन्ही सेमच नै का?

अगदी नेमकं विधान केलंत बघा! Happy भारतरत्न पुरस्कारातून भारतीयांची कृतज्ञता अभिप्रेत आहे, का उत्सवमूर्तींचा सत्कार? का दोन्ही? पुरस्कारांची नेमकी गरजच काय? लोकांना प्रेरणा मिळावी हा हेतू आहे का? की केवळ उत्सवमूर्तीला आनंद मिळावा एव्हढीच मर्यादित अपेक्षा आहे? विचारविनिमय व्हावा.

आ.न.,
-गा.पै.

मग तिला पुरस्कार तरी कशाला द्यायचा? स्थितप्रद्नच आहे म्हटल्यावर पुरस्कार दिला काय अन डोक्यात दगड हाणला काय, दोन्ही सेमच नै का?<<<

Lol

अरे माझ्या भारतीय बंधू भगिनीनो, तुम्ही का भांडताय.

सध्या निवडणुकीचा हंगाम चालू आहे. सत्ताधारी पक्षाने बरोबर नेम साधलाय.

र्पेन, मरणोत्तर पुरस्कार राजकारणाचा भाग म्हणून सुरू झाले. पहिला बहुतेक एमजीआरना दिला गेला.
----- लाल बहादुर शास्त्री ?

अवांतर - एक प्रेमळ विनंती (काही जणांनाच), हा धागा अभिनंदनापुरताच मर्यादित ठेवा, मग आताच का दिले, मग आधी का नाही दिले, मग याला नाही दिले अन त्याला का नाही दिले करायला दुसरा वापरा. <<<

असल्या प्रेमळ विनंत्या फारच भ्या दाखवतात ब्वॉ!

ही कसली असली लाडीक प्रेमळ विनंती?

'दुसरा वापरा'??????

>>>>>>>>>>>>>>>>>>>

आता वापरा बिनधास्त हाच धागा, त्या दोनेक दिवसांसाठी ती प्रेमळ विनंती होती, आता तो भावनेचा जोर ओसरला आहे, आता प्रॅक्टीकल चर्चा करायला हरकत नाही, तसेच धाग्याला टीआरपीची गरज सुद्धा आहेच की, शेवटी आपल्या सचिनचा धागा आहे, प्रतिसादांचे शतक झळकायलाच हवे

^^^^^^^^^^^^^^^^^
^^^^^^^^^^^^^^^^^

माझ्या दुसर्‍या प्रेमळ विनंतीचा देखील मान राखून धाग्याचे शतक झळकवल्याबद्दल आभारी आहे.
पण आता द्विशतक देखील होऊ दे, होऊ दे खर्च !
शेवटी आपल्या सचिनला भारतरत्न मिळाले आहे, चर्चा तर होणारच!

काही लोकांनी तर कोर्टात देखील धाव घेतली आहे या निर्णयाविरुद्ध. >>>>>>> पोट दुखी.. विरोधी पक्षाची Wink

काही जण तर अतिरेकी सोडणार्‍यंना सुध्दा भारत रत्न देण्याची हास्यास्पद मागणी करतात Biggrin

चालायचच.. लोकशाही आहे Wink

काही जण तर अतिरेकी सोडणार्‍यंना सुध्दा भारत रत्न देण्याची हास्यास्पद मागणी करतात >> मागणी हास्यास्पद आहे खरंच.

लोक्स पण कमाल करतात राव, चर्चा करू नका सांगितले तर करतात आणि आणखी करा सांगितले तर थांबतात Uhoh

मी... सचिनची लकी सिस्टर ! (सविता पालेकर)

आपल्या तळपत्या बॅटनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये "एकमेवाद्वितीय' ठरलेल्या "भारतरत्न' सचिन तेंडुलकरच्या हाती लहानपणी पहिली बॅट आली, ती त्याच्या भगिनी सविता पालेकर यांच्यामुळं...सचिनसाठी त्यांनी ही भेट काश्‍मीरहून आणली होती...क्रिकेटमधून निवृत्त होताना केलेल्या निरोपाच्या भाषणात सचिननं या बॅटचा आवर्जून उल्लेख केला. सचिनची निवृत्ती आणि त्याला जाहीर झालेला "भारतरत्न' सन्मान, यानिमित्त त्या उलगडत आहेत सचिनबरोबरचे खास भावबंध.

http://www.esakal.com/Tiny.aspx?K=u37QG

Pages