भारतरत्न सचिन

Submitted by अंड्या on 16 November, 2013 - 05:48

आपल्या सचिनला भारतरत्न जाहीर झाले आहे हो sssssss !!!!

त्याच्या जाण्याने जड झालेले मन हलके करायला यापेक्षा आनंदाची बातमी ती आणखी काय..

माझ्यासह सर्वच सचिनच्या चाहत्यांचे अभिनंदन !! अभिनंदन !!! अभिनंदन !!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग होतेच की? होते काय आहेतच की? (व्यक्तिशः तर मला कपिलला ते मिळालेले अधिक रुचले असते पण ते माझे मत). कपिलच्या वेळीही बजबजपूरी होती, भ्रष्टाचार होता, कपिलही प्रामाणिक होता, अष्टपैलू होता, त्याने कर्णधार म्हणून विश्वचषकही जिंकून दिलेला होता, तोही भारताला हेही माहीत नसताना की आपण कधी विश्वचषकही जिंकू शकतो>>

कपिलने जेव्हा आय सी एल जॉइन केले, तेव्हा त्याला जाब विचारला असता तो म्हणाला "क्रिकेटची सेवा करायला कुठलीही संघटना चालते".

अरे सोंडक्या (हे कपिलला हां), मग पीच सुधार समितीचा तुला अध्यक्ष केला होता, तेव्हा संपूर्ण काळ काहीही सुधारणा झाली नाही भारतीय पिचेसची. इकडच्या पाटा पीचेसवर धो धो धावा धोपटून आपला संघ परदेशात मस्तपैकी मार खातच होता. तेव्हा नाही सगळे अधिकार असताना आपले पीचेस चांगले बनवण्याची सेवा करायला सुचलं तुला?

एक नंबर भंपक माणूस आहे हा कपिल. ही या माणसाची वृत्ती. आणि याला भारतरत्न? Proud

अरे सोंडक्या, मग पीच सुधार समितीचा तुला अध्यक्ष केला होता, तेव्हा संपूर्ण काळ काहीही सुधारणा झाली नाही भारतीय पिचेसची. इकडच्या पाटा पीचेसवर धो धो धावा धोपटून आपला संघ परदेशात मस्तपैकी मार खातच होता.

ही या माणसाची वृत्ती. आणि याला भारतरत्न<<<

कपिल त्या पुरस्कारास लायक नसणे ह्याचा अर्थ सचिन असणे असा होत नाही.

केदार जाधव,

तुमची यादी गिरी, राजेंद्रप्रसाद आणि नेहरूंपर्यंत पोचेपर्यंत उत्तरे देत बसण्याचा संयम अजून माझ्या ठायी नाही. तो मला प्राप्त झाला की नम्रपणे तसे नमूद करेनच!

कपिल त्या पुरस्कारास लायक नसणे ह्याचा अर्थ सचिन असणे असा होत नाही. >>
(१) तुम्ही कपीलला द्यायला हवा होता असे म्हणालात म्हणून ते उत्तर दिले. असो.
(२) यातच आणि वरील एका माझ्या पोस्ट मधे सचिन का लायक याचे विवेचन केले आहे.

तुम्ही माझाच मुद्दा सिद्ध करत आहात Wink

बेफिकीरजी ,
तुम्हाला माहित आहे की माझा प्रश्न सोपा आहे .

बर जाऊ दे ,
भारतरत्न हे पुरस्काराचे नांव वाचले तरीही पुरस्काराबाबत काहीही माहीत नसलेला माणूसही म्हणेल की ज्या माणसाने देशातील नागरिकांचे, देशाचे भले करण्यासाठी संपूर्ण आयुष्य व्यतीत केले त्याला हा पुरस्कार मिळत असणार! >>
भीमसेन जोशी यानी हे सर्व केल होते ?

तुम्ही माझाच मुद्दा सिद्ध करत आहात<<<

हे येथील आणखी एक वैशिष्ट्य आहे. चर्चेत आपणच चतुर ठरलो असे आपणच मानून त्याचे पेढेवाटपही सुरू करणे!

केदार अनुमोदन. शास्त्रीय संगीतातले ओ की ठो कळत नसणारे आणि त्यात काडीचा रस नसणारे कोट्यावधी भारतीय आहेत. तरीही भीमसेन जोशींना भारतरत्न देणे योग्य असे त्यातल्याच अनेकांचे मत असू शकते व आहे.

बेफी, मला चर्चेत चतुर ठरण्यात किंवा स्वतःला ठरवण्यात काडीचा रस नाही. पण सूर्यावर थुंकण्याची वृत्ती कितीही जागतिक आणि सर्वव्यापी असली तरी ते बघितलं की सहन होत नाही इतकेच.

मग जर असे न करता भीमसेन जोशीना भारतरत्न मिळत असेल तर
<<<<<<<<<<<<
भारतरत्न हे पुरस्काराचे नांव वाचले तरीही पुरस्काराबाबत काहीही माहीत नसलेला माणूसही म्हणेल की ज्या माणसाने देशातील नागरिकांचे, देशाचे भले करण्यासाठी संपूर्ण आयुष्य व्यतीत केले त्याला हा पुरस्कार मिळत असणार! >>>>>>>>>>>>>>
ही तुमची व्याख्या चुकीची आहे ना ?

बेफी तुमचा नेमका मुद्दा काय तो एकदा स्पष्ट करा.......

कधी इकडे कधी तिकडे

बेफ़िकीर | 20 November, 2013 - 10:47
भीमसेन जोशी यानी हे सर्व केल होते ?<<<

असे मी म्हंटले?

-----------------------

मी कधी असे म्हटले... मी असे बोललो नाही.माझ्या बोलण्याचा हा अर्थ नाही.........ही लेखकी बाज बाजुला ठेउन मुद्दा बोला तुमचा....

मग मी उतरतो ...:खोखो:

पूर्णविराम ! [ कृपया माझ्या नांवाला 'साहेब' नका जोडूं. सध्या माझ्यासाठी तरी खरा 'साहेब' एकच आहे !!]
>>>>>>>>
भाऊ .. Happy .. जियो...

पण सूर्यावर थुंकण्याची वृत्ती कितीही जागतिक आणि सर्वव्यापी असली तरी ते बघितलं की सहन होत नाही इतकेच.<<<

अतीरंजित विधान आहे. सचिनला भारतरन्त मिळणे चूक आहे हे म्हणणे म्हणजे सचिनवर थुंकणे नाही.

>>>मग जर असे न करता भीमसेन जोशीना भारतरत्न मिळत असेल तर......
......ही तुमची व्याख्या चुकीची आहे ना ?<<<

१. माझी व्याख्या बरोबर आहे असा दावाच नाही. तसेही, ती व्याख्या नाहीच आहे. भारतरत्न हे पुरस्काराचे नांव वाचून तो कोणाला दिला जात असेल याबद्दल पुरस्काराची काहीही माहिती नसलेल्या माणसाच्या मनातसुद्धा काय येईल ते लिहिलेले आहे.

२. भीमसेन जोशींना भारतरत्न द्यायलाच हवे असे तर माझे मत मुळीचच नव्हते पण ते दिले गेल्याबद्दल तीव्र आनंद किंवा तीव्र शोकही कुठे व्यक्त केलेला नव्हता.

तस्मात, तुम्हाला मला जसे पकडायचे आहे तसे पकडता येणे अशक्य आहे हे आता नीट समजून घ्या.

बेफी तुमचा नेमका मुद्दा काय तो एकदा स्पष्ट करा.......<<<

उदयन, स्मार्ट विधाने अशीच असतात. माझा मुद्दा माझ्या या धाग्यावरील पहिल्या काही प्रतिसादांत आहे. त्यानंतरचे माझे प्रतिसाद हे निव्वळ दुसर्‍या सदस्यांच्या प्रतिसादांवर दिलेले असल्याने मधूनच ते वाचणार्‍याला मुद्दा समजणे अवघडच आहे. तेव्हा तुम्हाला मुद्दा समजत नाही ह्याचा अर्थ तो मलाच मांडता येत नाही आहे असा सोयीस्करपणे काढू नयेत. इथे अनेकजण माझ्यासवे चर्चा करत आहेत व त्यांना त्यांचे व माझे मुद्दे नीट समजत आहेत. माझ्याकडे नेमका मुद्दाच नाही असा काहीतरी स्वस्त अर्थ लावण्याची घाई करू नका.

<कपिल त्या पुरस्कारास लायक नसणे ह्याचा अर्थ सचिन असणे असा होत नाही. >
आधी म्हणता सचिन लायक आहे तर कपिलही लायक आहे. एकपे रेहना जी.

It is awarded in recognition of exceptional service/performance of the highest
order in any field of human endeavour. असे लोकनियुक्त सरकारने ठरवलेले आहे.
आधी कला, साहित्य, विज्ञान आणि जनसेवा (पब्लिक सर्व्हिस) यांतील सर्वोच्च्/विलक्षण कामगिरी असा निकष होता. आता क्षेत्रांची बंधने दूर केलेली आहेत.

गाणे, खेळ यांमुळे भारताची सेवा कशी होते असे वाटत असेल तर असंख्य भारतीयांच्या जीवनात आनंदाचे असंख्य क्षण निर्माण होतात. आपली मान हा भारतीय आहे म्हणून उंच होते. ही कारणे पुरेशी ठरावीत.

भीमसेन जोशींना भारतरत्न द्यायलाच हवे असे तर माझे मुळीचच नव्हते पण ते दिले गेल्याबद्दल तीव्र आनंद किंवा तीव्र शोकही कुठे व्यक्त केलेला नव्हता. >>

मग सचीनच्या बाबतीच पोटशूळ का?

आधी म्हणता सचिन लायक आहे तर कपिलही लायक आहे. एकपे रेहना जी<<<

स्वस्त शेरा! तसेच मूळ चर्चा घाईघाईत किंवा पूर्वग्रहाने वाचल्यामुळे मारलेला ताशेरा! त्यामुळे दुर्लक्ष!

It is awarded in recognition of exceptional service/performance of the highest
order in any field of human endeavour. <<<

मयेकर, यू आर अ स्कॉलर स्टुडंट ऑफ लाईफ!

दुरुस्ती - तुम्ही तुमचा प्रतिसाद संपादीत केल्यामुळे मी माझ्या प्रतिसादातील 'जस्ट' हा शब्द काढलेला आहे.

आनंदाचे असंख्य क्षण <<< ह्याचे मोजमाप, कोणाला कोणामुळे किती मिळाले, वगैरेचेही निकष असतीलच नाही का? आणि ते तसे क्षण देणार्‍यांमध्ये पुरस्कारासाठी प्रचंड चढाओढही होत असेल.

उदयन, स्मार्ट विधाने अशीच असतात >>>>>>>>

बेफी.....मी अजुन तुम्हाला प्रतिवाद केला नाही........यावरुन काही गोष्टी लक्षात घ्या...

मी प्रतिवाद तेव्हाच करतो जेव्हा समोरच्या कडे एक मुद्दा असतोच.. तुमची विधाने प्रत्येक पोस्टीत बदलत आहे .. ती अजुन मी समजुन घेतच आहे.. मी घाई करत नाही

घाई केली असती तर तुम्हाला प्रतिवाद करायला मी केव्हाच सुरुवात केली असती.. Wink

तेव्हा तुम्हाला मुद्दा समजत नाही ह्याचा अर्थ तो मलाच मांडता येत नाही आहे असा सोयीस्करपणे काढू नयेत. >>> मी असे म्हणत नाहीच आहे.. तुम्ही दुसर्यांना प्रतिवाद करत आहात हे कळत आहे मला..

म्हनुन तर थांबलोय ... Wink

अन्यथा कधीच सुटलो असतो Biggrin

जय सचिन ब्रिगेड ...;)

एकुण बेफींना म्हणायचे आहे..
भारतात.. कोणीच भारतरत्न द्यायच्या लायकीचे नाही..
भीमसेन जोशी , लता ,कपिल कोणीच नाही..
मग सचिन पण नाही ..
मग पुरस्कारच रद्द करु...
बेफी भारतरत्नाची एकुण पोहच आमच्या लक्षात यावी म्हणुन एका व्यक्तीच नाव सांगा की जी या पुरकाराच्या लायक आहे .. आणि पुन्हा म्हणु नका मी म्हणालो का त्याला द्या ( जस की कपिल ला द्यायला हवा म्हणुन पलटलात.. )

तस्मात, तुम्हाला मला जसे पकडायचे आहे तसे पकडता येणे अशक्य आहे हे आता नीट समजून घ्या. >>>
Happy

बाय द वे ,
भीमसेन जोशींना भारतरत्न दिलेले योग्य आहे का यावर तुमचे मत काय ?

बेफी ......किनार्या किनार्याने फिरण्यापेक्षा ........या उतरा पाण्यात .. Wink

मला गगो वर गिरीने सुचवलेले.....

स्वतःच्या मुलाचे नाव भारतरत्न ठेवा......... तुमच्या नावा पुढे आपोआप "भारतरत्न" लागेल

उदा. मुलाचे संपुर्ण नाव " भारतरत्न उदय इनामदार" Biggrin

जस की कपिल ला द्यायला हवा म्हणुन पलटलात.. <<<

माझा प्रतिसाद नीट वाचा, खेळाडूला मुळातच असे पुरस्कार नसावेत असे स्पष्ट लिहिलेले आहे.

बेफी भारतरत्नाची एकुण पोहच आमच्या लक्षात यावी म्हणुन एका व्यक्तीच नाव सांगा की जी या पुरकाराच्या लायक आहे <<<

तुमच्या काय लक्षात यावे व येऊ नये ह्यावर कोणाचेही नियंत्रण नाही.

का नसावेत ? जरा स्पष्ट करतात का ?<<<

अभिनय (किंवा इतर काही कला) क्षेत्रात जसे सर्वोच्च पुरस्कार आहेत तसे क्रीडा क्षेत्रातही आहेत किंवा निर्माण केले जावेत.

भारतरत्न हा पुरस्कार राष्ट्र, समाज, विकास अश्यासारख्या क्षेत्रांमध्ये आयुष्य झोकून भरीव कामगिरी करणारा व त्यासाठी त्याग करणारा माणूस असल्यास दिला जावा (हे मात्र अतिशय वैयक्तीक मत आहे, हे मतच पटत नसेल तर चर्चेतूनही माघार घेतो व विरोधी मतांचा आदरही आहेच)

स्वतःच्या मुलाचे नाव भारतरत्न ठेवा......... तुमच्या नावा पुढे आपोआप "भारतरत्न" लागेल.
उदा. मुलाचे संपुर्ण नाव " भारतरत्न उदय इनामदार
" >>> हे लयच भारी आहे की!

कपीलला भारतरत्न ? हहपूवा.

कुठ्ल्या तरी एका मुलाखतीत तो ढ्साढ्सा रड्ल्याचे आठ्वत आहे. असा पब्लीकली रडणारा भारतरत्न चालेल आपल्याला?

अचीवमेंट्स ग्रेट हव्यातच पण एकंदर व्यक्तीमत्व ग्रेसफूल असणंदेदेखील आवश्यक आहे. लतादीदी, भीमसेनजी, सचीन आणी ईतर सर्व ह्या निकषावर खरे उतरले आहेत असं माझं मत.

<भारतरत्न हा पुरस्कार राष्ट्र, समाज, विकास अश्यासारख्या क्षेत्रांमध्ये आयुष्य झोकून भरीव कामगिरी करणारा व त्यासाठी त्याग करणारा माणूस असल्यास दिला जावा >

कला, क्रीडा याही माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. यांनीही माणसाच्या आयुष्यात गुणात्मक फरक पडतो. आपण आदिमानव होतो, त्याला बराच काळ लोटला.

'त्याग करणारा' हा निकष कशाला ? सरळमार्गाने पैसे कमावणे ही चुकीची गोष्ट आहे का? एका क्षेत्रात अशी कामगिरी करताना त्या व्यक्तीला अन्य कितीतरी गोष्टींचा त्याग करावाच लागतो.

सेवाक्षेत्रातील अनेक लायक व्यक्तींना भारतरत्न मिळालेला नाही असे माझे मत आहे. पण त्यामुळे ज्यांना तो मिळाला, त्यांची कामगिरी कमी होत नाही.

Pages