भारतरत्न सचिन

Submitted by अंड्या on 16 November, 2013 - 05:48

आपल्या सचिनला भारतरत्न जाहीर झाले आहे हो sssssss !!!!

त्याच्या जाण्याने जड झालेले मन हलके करायला यापेक्षा आनंदाची बातमी ती आणखी काय..

माझ्यासह सर्वच सचिनच्या चाहत्यांचे अभिनंदन !! अभिनंदन !!! अभिनंदन !!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रेट न्यूज ! ग्रेट न्यूज !! ग्रेट न्यूज !!!

तो डिजर्व्ह करतो !

जी व्यक्ती देशाचे नाव जगभर करते आणि प्रत्येक भारतीयाला जिच्याबद्दल ती भारतीय आहे असे सांगताना अभिमान वाटतो ती व्यक्ती भारतरत्न या पुरस्काराला डिजर्व करतेच.

अवांतर - एक प्रेमळ विनंती (काही जणांनाच), हा धागा अभिनंदनापुरताच मर्यादित ठेवा, मग आताच का दिले, मग आधी का नाही दिले, मग याला नाही दिले अन त्याला का नाही दिले करायला दुसरा वापरा. Happy

ग्रेट न्यूज ! ग्रेट न्यूज !! ग्रेट न्यूज !!!

तो डिजर्व्ह करतो !

जी व्यक्ती देशाचे नाव जगभर करते आणि प्रत्येक भारतीयाला जिच्याबद्दल ती भारतीय आहे असे सांगताना अभिमान वाटतो ती व्यक्ती भारतरत्न या पुरस्काराला डिजर्व करतेच.

अवांतर - एक प्रेमळ विनंती (काही जणांनाच), हा धागा अभिनंदनापुरताच मर्यादित ठेवा, मग आताच का दिले, मग आधी का नाही दिले, मग याला नाही दिले अन त्याला का नाही दिले करायला दुसरा वापरा. स्मित
>>>

शब्दा शब्दाला अनुमोदन

तुझ्यामुळे आयुष्यात अनेक सुखी क्षण आले …. दुखातही तुझ्या षटकरांनी खळखळून हसवले ….विविध कारणांनी रोज भांडण्याऱ्या देशाला एक संघ केले , सभ्यतेच्या पिंजऱ्यात अडकलेल्या आम्हाला शत्रूवर (पाक ) मात करण्याचा आनंदही तुझ्या फटकाऱ्यानी दिला. , तू भारतात जन्म घेतला म्हणून आम्ही सारे भारतीय धन्य झाले …. तुझे किती कसे आभार मानू …. देवा.

हार्दिक अभिनंदन. गेम संपल्यवरचे भाषण ऐकले का? फार ट्चिंग होते. बायकोचे आभार मानले तिला पण अश्रु आले. अगदी थरो जंटल मन.

ग्रेट न्यूज ! ग्रेट न्यूज !! ग्रेट न्यूज !!!

तो डिजर्व्ह करतो !

जी व्यक्ती देशाचे नाव जगभर करते आणि प्रत्येक भारतीयाला जिच्याबद्दल ती भारतीय आहे असे सांगताना अभिमान वाटतो ती व्यक्ती भारतरत्न या पुरस्काराला डिजर्व करतेच.

अवांतर - एक प्रेमळ विनंती (काही जणांनाच), हा धागा अभिनंदनापुरताच मर्यादित ठेवा, मग आताच का दिले, मग आधी का नाही दिले, मग याला नाही दिले अन त्याला का नाही दिले करायला दुसरा वापरा
>> +++++१११११११११

सचिन चे, देशाचे, आणि सरकारचे अभिनंदन....!

>> मग आताच का दिले, मग आधी का नाही दिले, मग याला नाही दिले अन त्याला का नाही दिले करायला दुसरा वापरा.

छे! असला कुठलाही धागा कुणीच काढू नका. काढलाच तर अ‍ॅडमिन ने तो ऊडवून टाकावा अशी आगाऊ विनंती Happy

तुमचा अभिषेक यानी जे आवाहन केले आहे त्याचे सर्वच सदस्यांनी अगत्यपूर्वक पालन केले आहे. आपल्या घरातीलच एका मुलाला [होय....तो आजही मुलगाच वाटतो....लतादिदीना सचिन 'आई' म्हणून हाक मारतो, तर त्याला दिदी मुलगा समजतात.....त्याचे सारेच वर्तन एका आदर्श मुलासारखेच आहे....]

वानखेडे स्टेडियमवर दहा वर्षाच्या मुलापासून ७० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांतून या आदर्शाने पाणी काढले....कुणी रडत नव्हता असे दिसलेच नाही..... हे झाले स्टेडियमवरील दृष्य, पण टीव्हीवर पाहाणार्‍यांच्याही डोळ्यात किती पाणी आले होते ते मी पाहिले.....केवळ भावनाकुल प्रसंग सारा.... देशात पुन्हा असा प्रसंग कधी येईल याची खात्री नाही.

डोळे सुकतात न सुकतात तोच ही अत्यंत आनंददायी बातमी आली....आणि केन्द्र सरकारने योग्य वेळ साधली असेच म्हटले पाहिजे.....आता आमचे लक्ष २६ जानेवारी २०१४ कडे.

योग यांच्या पोस्टलाही अनुमोदन.

>>परफेक्ट टायमिंग << ++१

व्हॉट अ वे टु एंड अ करीयर! हॅट्स ऑफ टु द चँपियन!!

Roger Federer tweets "What a remarkable career @sachin_rt. Wish you the very best moving forward #ThankYouSachin "

अवांतर - एक प्रेमळ विनंती (काही जणांनाच), हा धागा अभिनंदनापुरताच मर्यादित ठेवा, मग आताच का दिले, मग आधी का नाही दिले, मग याला नाही दिले अन त्याला का नाही दिले करायला दुसरा वापरा. स्मित
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
यासाठी खरेच +१११११

कोणताही खेळाडू ना खेळापेक्षा मोठा असतो ना देशापेक्षा, मात्र सचिनसारखे खेळाडू खेळालाही मोठे करतात आणि देशाचेही नाव काढतात.
तसेच पुरस्कार प्राप्त करणारा देखील कधीच त्या पुरस्कारापेक्षा मोठा नसतो, ना तो त्या पुरस्काराचा सन्मान वाढवतो, पण "भारतरत्न सचिन तेंडुलकर" असा उल्लेख करताना आज उराशी एक अभिमान दाटून येतोय एवढे मात्र खरे.

हार्दिक अभिनंदन. गेम संपल्यवरचे भाषण ऐकले का? फार ट्चिंग होते. बायकोचे आभार मानले तिला पण अश्रु आले. अगदी थरो जंटल मन.
>>>>>>>

अगदी अगदी, आणि ते इथेही सापडेल

http://www.espncricinfo.com/india/content/story/689203.html

सचिनचं अभिनंदन, त्याला मानाचा मुजरा व त्याच्या अगणित अप्रतिम खेळी पाहून मिळालेल्या अत्यानंदाबद्दल त्याला धन्यवाद.
<< असला कुठलाही धागा कुणीच काढू नका. >> आजचा सोहळा व सचिनचं मनोगत पाहिल्या/ऐकल्यावर त्या सर्वाला दॄष्ट लागूं नये म्हणून तरी अशा धाग्याची तीट लागणं कदाचित इष्टापत्तिच ठरेल !!!

untitled_6.JPG

ग्रेट न्यूज ! ग्रेट न्यूज !! ग्रेट न्यूज !!!

तो डिजर्व्ह करतो !

जी व्यक्ती देशाचे नाव जगभर करते आणि प्रत्येक भारतीयाला जिच्याबद्दल ती भारतीय आहे असे सांगताना अभिमान वाटतो ती व्यक्ती भारतरत्न या पुरस्काराला डिजर्व करतेच. >>>>>>

+१११११११

भाऊ नमसकर....

अतिशय मार्मिक आणि योग्य व्यंगचित्र.....व्यंगचित्रापेक्षाही त्या सौ. चा शेरा जास्त भावला. मला वाटते वानखेडेवर जमलेल्या ३०-३५ हजाराच्या जमावाचे सारे लक्ष सचिनकडेच असल्याने सामना पाच दिवस जरी चालला असता तरी नजरा एकाच व्यक्तीच्या हालचाली टिपत असणार.....मी पाहिले की गोलंदाजाने बॉल टाकल्यवर दुसरा बॉल टाकेपर्यंत जो वेळ जात असे त्या वेळेत कॅमेरे फक्त सचिन ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करीत आहे तिकडेच वळत होता.....सचिन आणि सचिनमय सारे वातावरण असल्याने अडीच दिवसात संपला म्हणून आणि नवर्‍याची तक्रार नाही हे पाहून चित्रातील बाईनी त्याचे जे आभार मानले ते योग्यच होय.

हो खरेच, अडीज दिवसांत संपल्याचे तितकेसे वाईट वाटले नाही. मी तर उलट देवाकडे प्रार्थना केली होती की सामना तिसर्‍या वा चौथ्या दिवशी संपू दे, कारण शनिवार रविवार मला सुट्टी होती पण सोमवारी काही महत्वाच्या कामानिमित्त सुट्टी घ्यायला जमणार नव्हते. आणि सचिनचा निरोप सोहळा मला चुकवायचा नव्हता. तो लाईव्ह बघण्यातच मजा होती, तुकड्या तुकड्यातली क्षणचित्रे नाही.

पण त्यातूनही एक गडबड झाली. सकाळी मला ब्लड टेस्टला जायचे होते जे लंच टाईमच्या ब्रेकला जाणार होतो. पण वेस्टईंडिजने सकाळच्या सत्रात हाराकिरी केल्यामुळे त्यांचा डाव आटोपल्यावर सचिनला ग्राऊंड ते पॅविलियन जाताना पाहिले आणि मगच धावतपळत जाऊन ब्लडटेस्ट करून आलो. त्यानंतर आलो ते टिव्हीसमोर जे ठाण मांडून बसलो ते दुपारी सव्वा-दिडच्या सुमारास आईनेच आठवण करून दिली की ब्लडटेस्ट म्हणून मी उठल्यापासून काहीच खाल्ले नव्हते, पाण्याचा घोटही घेतला नव्हता, पोहे तयार होते जे ब्लडटेस्ट करून आल्यावर लगेच खाणार होतो, पण ते देखील माझी वाट बघत तसेच थंड पडून राहिले होते. अर्थात या काळात ना मला भूक लागली, ना माझ्या आईला मला पोहे द्यायची आठवण झाली, ज्याला कारणीभूत फक्त सचिन सचिन आणि सचिनवरचे आपले प्रेम होते !

ग्रेट न्यूज ! ग्रेट न्यूज !! ग्रेट न्यूज !!!

तो डिजर्व्ह करतो !

जी व्यक्ती देशाचे नाव जगभर करते आणि प्रत्येक भारतीयाला जिच्याबद्दल ती भारतीय आहे असे सांगताना अभिमान वाटतो ती व्यक्ती भारतरत्न या पुरस्काराला डिजर्व करतेच.

अवांतर - एक प्रेमळ विनंती (काही जणांनाच), हा धागा अभिनंदनापुरताच मर्यादित ठेवा, मग आताच का दिले, मग आधी का नाही दिले, मग याला नाही दिले अन त्याला का नाही दिले करायला दुसरा वापरा.

>>>>>>>>> प्रचंड अनुमोदन!!

हॅट्स ऑफ सचिन !!!

पण "भारतरत्न सचिन तेंडुलकर" असा उल्लेख करताना आज उराशी एक अभिमान दाटून येतोय एवढे मात्र खरे. >>> अगदी अगदी... "भारतरत्न सचिन तेंडुलकर Happy

>>अवांतर - एक प्रेमळ विनंती (काही जणांनाच), हा धागा अभिनंदनापुरताच मर्यादित ठेवा, मग आताच का दिले, मग आधी का नाही दिले, मग याला नाही दिले अन त्याला का नाही दिले करायला दुसरा वापरा.

हे दळभद्री काम आजच्या लोकसत्ता संपादकीय ने केले आहे.

तीव्र शब्दात निषेध! Angry
(लोकसत्ता ऑनलाईन वर नोंदवला आहेच)

हे दळभद्री काम आजच्या लोकसत्ता संपादकीय ने केले आहे.

तीव्र शब्दात निषेध! राग
---- निषेध कधाला नोन्दवायला हवा? मताचा आदर करा आणि पुढे चला... मला तर अग्रलेख जाम आवडला... सर्व प्रवाह भारतरत्न सचिनची स्तुती करत असताना असे लिहायलाही कमालीचे धाडस लागते.... अत्यन्त मुद्देसुद असा अग्रलेख लिहीलेला आहे.

सचिनचे अभिनन्दन आणि भारतरत्न मिळाले म्हणुन आनन्दाने दिवाळी साजरी करतानाच विरोधी मताचा आदर करणे जास्त योग्य दिसेल आणि त्याने भारतरत्नाची शोभा पण वाढेल... Happy

अवांतर - एक प्रेमळ विनंती (काही जणांनाच), हा धागा अभिनंदनापुरताच मर्यादित ठेवा, मग आताच का दिले, मग आधी का नाही दिले, मग याला नाही दिले अन त्याला का नाही दिले करायला दुसरा वापरा. <<<

असल्या प्रेमळ विनंत्या फारच भ्या दाखवतात ब्वॉ!

ही कसली असली लाडीक प्रेमळ विनंती?

'दुसरा वापरा'??????

कोणीतरी परवा येथे म्हंटले होते की 'परफेक्ट टायमिंग'! परफेक्ट टायमिंग ऑफ गेनिंग पॉप्युलॅरिटी!

अब्जावधी क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत, जो चोवीस वर्षे फिटनेस राखून खेळत राहिला व दोनशेव्या कसोटीतही ज्याने डोळ्याचे पारणे फेडले, तो भारतरत्न?

कोणीतरी (जदयूचा एक नेता) काल म्हणाले की क्रिकेट काय फुकट खेळला का? मग काय लता'दीदी' आणि भीमसेनजी फुकट गायले होते का? पण तरीही, अगदी प्युअरली मनोरंजनासाठी भारतरत्न तेही त्या बिचार्‍याचा सेलफोन बिझी असताना टायमिंग पाळून दिले जाणे आणि त्याने ते स्वीकारणे......

...... कन्फेसिंग व्हॉट वुई आर!

अ‍ॅन्ड व्हॉट वुई डोन्ट एव्हर विश टू बी!

'सॉरी अंड्या, अंड्यातच गफलत असली तर कोंबडे कसेही असले तरी गुबगुबीत मानले जावे ही अपेक्षाच फोल आहे'

Pages