तेंडुलकरची निवृत्ती - "आवरा"

Submitted by बेफ़िकीर on 10 November, 2013 - 12:03

एक धागा आधीच असताना हा आणखी कशाला, असा प्रश्न माझ्याही मनात येत आहे. पण प्रामाणिकपणे सांगतो की हा धागा काढायची तीव्र इच्छा होत आहे. तसाही, हा धागा फक्त 'पाठ्यपुस्तकातील धड्याबाबत' नाही.

सचिन तेंडुलकर व त्याची निवृत्ती!

म्हणावेसे वाटते की कृपया आता आवर घातला जावा या सचिनपूजेला! त्याचे अगदी डायपर घालण्याच्या वयापासून बॅट हातात धरलेले फोटो, प्रत्येक यशस्वी अयशस्वी गतकालीन व समकालीनांनी तोंड फाटेस्तोवर त्याची केलेली स्तुती, नाही नाही त्या शाळेपासूनच्या आठवणी, त्याच्या त्याच त्या महान खेळ्या आणि त्यांचे महत्व!

वर्तमानपत्र आपण आपल्या पैशाने विकत घेतो म्हणून त्यात आपल्याला जे हवे ते छापले गेले पाहिजे असा कोणाचा आग्रह असू शकत नाही. पण अगदी अमिताभ बच्चनच्या जगण्याचे एक कारण नष्ट व्हावे वगैरे अती आहे. पानेच्या पाने तेच सगळे?

यात सचिनद्वेष वगैरे नसून लिटरली कंटाळा आलेला आहे. टीव्ही वाहिन्या, वर्तमान पत्रे यांना दुसरा उद्योग राहिलेला नाही. सर्वात मुख्य म्हणजे, चॅनेल बदलणे किंवा पेपरचे पान उलटून दुसरे काही वाचणे हा 'ते; टाळण्याचा सोप्पा उपाय वगैरे मुळीच नसून ते पान / चॅनेल उलटण्यापूर्वी मनात जो कंटाळा निर्माण होतो तो होतोच. चिडचिड होते.

हो बाबा एकदाचा निवृत्त! शांत, निगर्वी, मेहनती, याही वयात शिकायची इच्छा असणारा, अजुनही सराव करणारा, रन मशीन, क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर सगळे पाठ आहे. मला तर तू असाही कित्येकवेळा आठवतोस की संघाला अत्यंत आवश्यक असताना चुकीचे शॉट्स मारून बेजबाबदारीने बाद झालास! वडिलांना अर्पण केलेले शतक केनियाविरुद्ध, दुबळ्या संघांविरुद्ध भन्नाट खेळ्यांच्या मालिका! माझ्या आठवणीप्रमाणे ऑस्ट्रेलिया भारत वर्ल्ड कप फायनलमध्ये (२००३ बहुधा) तुझ्यावर महान भिस्त होती आणि तूही भरात होतास. बाकी तुझे पूजक आता ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तुझ्या महत्वाच्या खेळ्या आठवून देतीलच! पण असो!

सर्वात श्रीमंत क्रिकेट खेळणार्‍या महान तेंडुलकर, तुझ्या दैदीप्यमान कारकीर्दीला लवून कुर्निसात, पण म्हणतात तसा साधा, निगर्वी वगैरे असलास तर कृपया स्वतः उठून या माध्यमांना सांग की एक क्रिकेट खेळाडू निवृत्त होत आहे, अती करू नका!

=================================

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व संजय मांजरेकर फॉर्मला आहेत.

म्हणजे सचिनच्या बाजूने पण लिहायचे आणि अंगाशी आले की चल चल मी काही सचिनचा द्वेष वगैरे नाही करत.
पण मजा आली चर्चा वाचून

अरे बघतोय काय रागाने, चौका मारलाय वाघाने !
शेवटी सचिन आहे आपला सचिन, होऊ दे खर्च !!

आवराच!
मिडीयावाले काय किंवा तुमच्यासारखे लेखक काय, टीआरपी साठी च करतात हो सगळं. Wink
मिडीयावाले टीआरपीसाठी का होईना कौतुक तरी करताहेत, काही लेखकांना टीआरपीसाठी सुद्धा कुजकटपणाच जमतो. असो.

बिग एफ एम वर दर पाच मिनिटानी सचीन सचिन म्हणून ओरडत आहेत. आणि तो रिटायर झाल्यवर काय करेल अशी एक स्पर्धा आयोजित केलेली आहे त्यात त्याच्या आवाजात बस कंडक्टर/ बातमीदार इत्यादी
संवाद बोलले जात आहे त्याची जी कोण पी आर फर्म आहे त्यांना मजबूत बोनस मिळणार असेल.

आनंदच्या लढतीबद्दल अगदी पावकिलो छापून येत नाहि. जितक्यास तितके. तोही आपल्या फील्ड मध्ये जिनिअस आहेच की.

आणि रेडिओवर असले सांपल बोलले जात आहे. पहले तो थोडे बहुत बच्चोंके नाम सचिन होते थे. लेकिन सचिन के आने के बाद मुनिसिपाल्टीमें दो ऑपशन्स देते है. देख तेरे बेटेका नाम क्या रखने का?

१) सचिन २) कुच्छ और. शुद्ध वैताग.

ग्रेट असामान्य वगैरे पूर्ण मान्यच आहे. मीडिया ओवरकिलचा त्रास होतो आहे.

आता पुढचा धागा काय असेल याची उत्सुकता लागलीये..<<< Lol

विराटद्वेष नव्हे, विराटप्रेम! Proud

पुढचा धागा:

'महाभारत चुकीचे लिहिले गेले, कौरव योग्य वागले'!

Biggrin

जे बेफिकीर आहेत त्यांना काय फरक पडतोय काय चुकीचे आहे आणि काय बरोबर?? <<<

पुढच्या धाग्याचे शीर्षक सांगितले. तसे पाहिले तर मी आणि तुम्हीच काय, येथल्या एक दोन सोडून बहुतेकांना खरोखरच स्वतःचे अतिशय वेगळे असे आयुष्य असते / मिळालेले आहे. तरीही कोणाला ना कोणाला अनुमोदन द्यायला किंवा विरोध करायला लोकं येथे जमतातच ना?

यास 'काढता न येणारी भडास काढता येण्यासाठी उपलब्ध असलेले तुलनेने कमी किंमतीचे व कमी भयावह व्यासपीठ' हा घटक कारणीभूत आहे.

म्हणून तर वादविवाद होणे हे (येथे) (सुद्धा) जिवंतपणाचे लक्षण मानले जाते.

Happy

आय अ‍ॅम शॉक्ड !
सचिनबद्दल इतका तिरस्कार ? तो कुणी कसाब आहे कि पाकिस्तानचा अतिरेकी आहे कि ओसामा बिन लादेनच्या गँगमधला खतरनाक तालिबानी ? नाही नाही, जर यापैकी कुणी असता तर मग त्याचा सत्कार झाला असता. त्याची आरती उतारली असती. अरे त्या , मॅच फिक्सिंगमधल्या अजय जडेजाला सेलिना जेटली देता तुम्ही लोक ! सचिननं चूक केली. त्यानं मॅच फिक्सिंग सेरेमनीत सहभाग घेतला नाही. नाहीतर त्याला पण कतरिना कैफ सहज मिळाली असती. एखाद्या फिक्सरशी सूत जुळालं असतं तर त्याचा एव्हढा द्वेष झाला नसता रे जितका शतकं काढल्याने होतोय.
नामर्दों कि बस्ती मे बदनाम हुए, कुछ मर्द थे गुमनाम हुए

दुर्दैवाने सगळ्याच वृत्तवाहिन्या हिंदीत ज्याला फूहड म्हणतात तशा वागतात. या गोष्टी चा खरा राग आहे. एरवी सचिन सारखा सार्वकालीक महान क्रीडापटूंच्या मांदीयाळीतला खेळाडू जेव्हा निवृत्त होतो तेव्हा लोकभावना उचंबळून येणे साहजिक आहे. पण या वृत्तवाहिन्या जे काही ज्या तर्‍हेने दाखवतात त्याने उद्विग्नताच येउ शकते दुसर काही नाही. डिस्कव्हरी वाले सचिन वर कार्यक्रम बनवतील त्याची वाट बघणे इतकेच आपल्या हाती आहे.

इथे सचिन्प्रेमि कमि आनि सचिनचे वकिल जास्त दिसत आहे इथे सचिन हा वादाचा मुद्दा नसुन मिडियाचा अतिरेक हा मुद्दा असावा असे वाटते

मिडीयाचा अतिरेक तर कुठेही चालतो राव, धाग्याचा विषय सचिनच आहे.

मी दोन लोकांना मानतो, सचिन आणि शाहरुखखान, त्यांचे एकदा नाव आले की धाग्याचे विषय तेच बनतात, इतर सारे मुद्दे गौण ठरतात.

भाऊ Lol

भाऊ Lol

शाहरूखखानला अ‍ॅक्टींग येते का ?
बकरीच्या पिल्लाला पण सुपरस्टार बनता येतं मेडीयाच्या कृपेनं हेच सिद्ध झालं त्याच्या उदाहरणातून.
बें बें बें बें बें बें बें बें बें बें बें बें
याच्याशिवाय मला तर कधीच काही ऐकू आलं नाही त्याच्या डायलॉगमधून. त्या हिरवीणींना आधी वाचायला द्येतात म्हणून बरंय.
शाहरूखला सच्नचं डबिंग ठेवलं तरी चालेल.

सचिन या शेवटच्या कसोटीत शतक करेल की नाही माहिती नाही पण हा धागा शतकांचे सगळे रेकॉर्ड मोडणार दिसतय. Happy

शाहरूखखानला अ‍ॅक्टींग येते का ?
बकरीच्या पिल्लाला पण सुपरस्टार बनता येतं मेडीयाच्या कृपेनं हेच सिद्ध झालं त्याच्या उदाहरणातून.
बें बें बें बें बें बें बें बें बें बें बें बें
याच्याशिवाय मला तर कधीच काही ऐकू आलं नाही त्याच्या डायलॉगमधून. त्या हिरवीणींना आधी वाचायला द्येतात म्हणून बरंय.
शाहरूखला सच्नचं डबिंग ठेवलं तरी चालेल.

>>>>>>>>>>>>

भाई म्हणून तर आपण त्याला मानतो, अ‍ॅक्टींग नही आती तो ये जलवे, अगर आती तो बंदे ने कयामत ढानी थी ..

केवळ नशीब सुदैव ह्या बळावर बिन्लायकीचा माणूस काय काय बनतो ह्याचे शरुख्सारखे उदाहरण नाही
तेंडल्याच्या धाग्यावर त्याचा विषय काढावा इतकी पात्रतातर अजिबातच नाहीये शार्‍याची
ज्या लोकांना शारुख आवडतो त्याना स्वताला स्वता:ची किंमत कमी करायला जमत असावे किंवा सत्वयुक्त गोष्टी नीट ओळखता येत नसाव्यात मुलखाचा सत्वहीन दर्जाहीन तो शारुख कुणाची पूजा करावी हे कळायला देखील नशीब लागतं !!! ज्यांचं नशीब फुटकं त्याना असली माणसे आवडतात
(बघूया आता पेटतोय का धागा Wink )

शाहरुख आयपीएल विजेत्या संघाचा मालक आहे, त्याचा विषय क्रिकेटच्या धाग्यावर काढण्यात काही गैर नाही, आधुनिक क्रिकेटच्या वाढीसाठी त्याचे भरीव योगदान आहे, ज्यामुळे तुमचे कोहली, रैना, जडेजा वगैरेंना चमकायला संधी मिळाली तसेच रोजगार उत्पन्न झाला.

केवळ नशीब सुदैव ह्या बळावर बिन्लायकीचा माणूस काय काय बनतो ह्याचे शरुख्सारखे उदाहरण नाही
तेंडल्याच्या धाग्यावर त्याचा विषय काढावा इतकी पात्रतातर अजिबातच नाहीये शार्‍याची
ज्या लोकांना शारुख आवडतो त्याना स्वताला स्वता:ची किंमत कमी करायला जमत असावे किंवा सत्वयुक्त गोष्टी नीट ओळखता येत नसाव्यात मुलखाचा सत्वहीन दर्जाहीन तो शारुख कुणाची पूजा करावी हे कळायला देखील नशीब लागतं !!! ज्यांचं नशीब फुटकं त्याना असली माणसे आवडतात
>>> Happy Happy Happy
बाकी काही बोलायच नाहीये . पण आगरकरला बोलिंग येत नाही हे मॅकग्रा/अक्रम ने म्हणाव , उगाच रस्त्यावर अंडरआर्म बोलिंग करणार्याला बोलायला काही बंदी नाही , पण ते हास्यास्पद वाटत Happy

Pages