तेंडुलकरची निवृत्ती - "आवरा"

Submitted by बेफ़िकीर on 10 November, 2013 - 12:03

एक धागा आधीच असताना हा आणखी कशाला, असा प्रश्न माझ्याही मनात येत आहे. पण प्रामाणिकपणे सांगतो की हा धागा काढायची तीव्र इच्छा होत आहे. तसाही, हा धागा फक्त 'पाठ्यपुस्तकातील धड्याबाबत' नाही.

सचिन तेंडुलकर व त्याची निवृत्ती!

म्हणावेसे वाटते की कृपया आता आवर घातला जावा या सचिनपूजेला! त्याचे अगदी डायपर घालण्याच्या वयापासून बॅट हातात धरलेले फोटो, प्रत्येक यशस्वी अयशस्वी गतकालीन व समकालीनांनी तोंड फाटेस्तोवर त्याची केलेली स्तुती, नाही नाही त्या शाळेपासूनच्या आठवणी, त्याच्या त्याच त्या महान खेळ्या आणि त्यांचे महत्व!

वर्तमानपत्र आपण आपल्या पैशाने विकत घेतो म्हणून त्यात आपल्याला जे हवे ते छापले गेले पाहिजे असा कोणाचा आग्रह असू शकत नाही. पण अगदी अमिताभ बच्चनच्या जगण्याचे एक कारण नष्ट व्हावे वगैरे अती आहे. पानेच्या पाने तेच सगळे?

यात सचिनद्वेष वगैरे नसून लिटरली कंटाळा आलेला आहे. टीव्ही वाहिन्या, वर्तमान पत्रे यांना दुसरा उद्योग राहिलेला नाही. सर्वात मुख्य म्हणजे, चॅनेल बदलणे किंवा पेपरचे पान उलटून दुसरे काही वाचणे हा 'ते; टाळण्याचा सोप्पा उपाय वगैरे मुळीच नसून ते पान / चॅनेल उलटण्यापूर्वी मनात जो कंटाळा निर्माण होतो तो होतोच. चिडचिड होते.

हो बाबा एकदाचा निवृत्त! शांत, निगर्वी, मेहनती, याही वयात शिकायची इच्छा असणारा, अजुनही सराव करणारा, रन मशीन, क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर सगळे पाठ आहे. मला तर तू असाही कित्येकवेळा आठवतोस की संघाला अत्यंत आवश्यक असताना चुकीचे शॉट्स मारून बेजबाबदारीने बाद झालास! वडिलांना अर्पण केलेले शतक केनियाविरुद्ध, दुबळ्या संघांविरुद्ध भन्नाट खेळ्यांच्या मालिका! माझ्या आठवणीप्रमाणे ऑस्ट्रेलिया भारत वर्ल्ड कप फायनलमध्ये (२००३ बहुधा) तुझ्यावर महान भिस्त होती आणि तूही भरात होतास. बाकी तुझे पूजक आता ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तुझ्या महत्वाच्या खेळ्या आठवून देतीलच! पण असो!

सर्वात श्रीमंत क्रिकेट खेळणार्‍या महान तेंडुलकर, तुझ्या दैदीप्यमान कारकीर्दीला लवून कुर्निसात, पण म्हणतात तसा साधा, निगर्वी वगैरे असलास तर कृपया स्वतः उठून या माध्यमांना सांग की एक क्रिकेट खेळाडू निवृत्त होत आहे, अती करू नका!

=================================

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नशिब इथे "खेळण्याचे पैसे मिळतात म्हणुन " असे लिहिले नाही<<< तसे लिहीन असे वाटणे यातच लेखाला आलेल्या विरोधी प्रतिक्रियांचे गुपीत दडलेले आहे. सचिन पैशासाठी वगैरे पुन्हा खेळायला गेला इतक्या हीन पातळीवर ते जात असतील जे त्याचा द्वेष करत असतील. (व्यक्तिशः मी तरी) त्याचा द्वेष करत नाही व त्याचा द्वेष करण्याची पात्रताही मला कित्येक जन्म घेऊन लाभणार नाही. पण हे जे काही त्याच्या निवृत्तीच्या नावाखाली चाललेले आहे ते कंटाळवाणे, संतापजनक आणि त्याला क्रिकेटपेक्षाही मोठे ठरवणारे आहे, असे म्हणायचे आहे.

माझा पॉईंट कोणता आहे हे सूज्ञांना समजले आहे. 'वडील मेल्यावर' हा मुद्दा तुम्ही काढलेला आहेत. माझ्या लेखात तो मुद्दाच नाही आहे की वडील मेले असताना वगैरे तो खेळायला गेला.>>> मी सूज्ञ नाही, त्यामुळे हे जरा विषद करून सांगा ही विनंती. तुम्ही लेखात लिहिलेले वाक्य वडिलांना अर्पण केलेले शतक केनियाविरुद्ध, हेच आहे ना? तुम्ही १९९९च्या वर्ल्डकप मॅच बद्दल्च बोलत आहात ना? की अजून दुसर्‍या कुठल्या मॅचब्द्दल? माझ्यासारख्या अज्ञ बालिश लोकांना जरा समजावून सांगा.

<< याहून तिसरा काहे पॉइन्ट असेल तर सांगा जरा. >> पॉइंट एकच असावा- एका दैदिप्यमान कारकिर्दीचा व अफाट लोकप्रियतेचा लाभ उठवताना मिडिया अतिरेक करत्येय आणि 'चोर सोडून संन्याशाला फांशी ' द्यायच्या प्रकाराला ऊत आलाय !! Wink

ंमिडीयाचा राग सचिनवर ़ का काढताय ? अतिरेक मिडीया करतोय सचिन नाही. पण या लेखात मिडीयापेक्षा सचिनलाच दुषणे जास्त दिसतायेत

माझ्यासारख्या अज्ञ बालिश लोकांना जरा समजावून सांगा.<<<

माननीय नंदिनी,

दोन वेगळे मुद्दे कोणते ते बघा:

१. त्याने वडिलांना अर्पण केलेले शतक केनियाविरुद्ध होते. (यातून मला हेच सुचवायचे आहे की त्याची ती खेळी दुबळ्या संघाविरुद्ध होती. आता जसे तुम्ही विचारलेत की मॅचच केनियाविरुद्ध असेल तर तो काय करणार आणि त्याने काय सरस संघांसमोर चांगल्या खेळ्या केलेल्य अनाहीत का? तसेच मलाही असे म्हणता येईल की सरस संघांसमोर व अत्यंत मोक्याच्या वेळी तो बेजबादरापणेही खेळल्याचे अनेक दाखले आहेत. हे मी लिहिले की या वादाला अंत उरणार नाही).

२. दुसरा मुद्दा म्हणजे वडील गेलेले असताना तो पुन्हा खेळायला गेला. हा मुद्दा माझ्या लेखात नाही व हा वेगळा मुद्दा आहे. तो तसा गेला हे जणू असे सांगितले जात आहे की एखादा सैनिक पुन्हा लढायला गेला. त्याला हे असेच भावनिकरीत्या मोठे करणार्‍यांनीच इतके मोठे केले आहे की तो क्रिकेटपेक्षा मोठा ठरत आहे. हे गैर आहे. त्याचे त्या अवस्थेत पुन्हा खेळायला जाणे ही काही भारतीय सार्वभौमत्वासाठी युद्धात वगैरे घेतलेली उडी नव्हती. असे इतरही काही खेळाडूंच्या बाबतीत पूर्वी झालेले आहे.)

आशा आहे की तुम्हाला खालील बाबी लक्षात आल्या असतील.

१. दोन वेगळे मुद्दे आहेत.
२. त्यातील एक मुद्दा तुम्ही चर्चेत घुसडलेला आहेत, तो माझ्या लेखात नाही.

ंमिडीयाचा राग सचिनवर ़ का काढताय ? अतिरेक मिडीया करतोय सचिन नाही. पण या लेखात मिडीयापेक्षा सचिनलाच दुषणे जास्त दिसतायेत<<<

अहो कोण म्हणतंय सचिनवर राग काढलाय? जरा नीट लेख वाचा की राव? लेखाचा रोख मीडियाकडेच आहे, फक्त लेखाच्या शेवटी असे म्हणण्यात आलेले आहे की इतका जर तो निगर्वी, शांत असेल तर तो उठून मीडियाला का सांगत नाही की मला क्रिकेटपेक्षा मोठे ठरवू नका?

बेफिसाहेब तुमची मूळ पोस्ट मी बरोबर संदर्भाने घेतली होती. त्यावर सचिनवर थोडी टीका असली (जी मला मान्य नाही) तरी पूर्ण पोस्ट पाहता त्याच्या रिटायरमेण्टचे जे मार्केटिंग चालू आहे त्यावरचा तो राग होता हे समजले होते. त्यामुळे मी त्या एक दोन संदर्भाबद्दल (विशेषतः केनियाच्या मॅचच्या) काहीच बोललो नाही.

पण आता नंतर तुम्ही तो मुद्दा महत्त्वाचा असल्याप्रमाणे येथे आर्ग्युमेण्ट करत आहात. ("ते केनियाचे उदाहरण चुकीचे होते, त्याकडे दुर्लक्ष करा पण मुद्दा समजावून घ्या" असे म्हंटला असता तर अ‍ॅप्रेशिएट झाले असते). आता लष्कर कोठून आले मधेच? तेव्हाची परिस्थिती लक्षात आहे का? सचिन भारतात परत आला व पुढची मॅच भारत कमकुवत झिम्बाब्वेकडून दयनीय पद्धतीने हरला. संघावर सडकून टीका झाली. कदाचित त्यामुळे सचिनने परतावे अशी परिस्थिती निर्माण झाली. नंतरची मॅच केनियाविरूद्ध असणे यात त्याचा काही हात नव्हता.
सचिनने तेथे शतक मारणे, त्यानंतर मान वर करून आकाशाकडे पाहणे ही सर्व चाहत्यांसाठी एक जबरदस्त मूमेंट होती. त्यावेळची पब्लिक ची प्रतिक्रिया पूर्ण लक्षात आहे. त्याचा संदर्भ त्याच्या इतर अपयशी डावांमधे येथे यायला नको होता.

मला तर तू असाही कित्येकवेळा आठवतोस की संघाला अत्यंत आवश्यक असताना चुकीचे शॉट्स मारून बेजबाबदारीने बाद झालास! वडिलांना अर्पण केलेले शतक केनियाविरुद्ध, दुबळ्या संघांविरुद्ध भन्नाट खेळ्यांच्या मालिका! माझ्या आठवणीप्रमाणे ऑस्ट्रेलिया भारत वर्ल्ड कप फायनलमध्ये (२००३ बहुधा) तुझ्यावर महान भिस्त होती आणि तूही भरात होतास. बाकी तुझे पूजक आता ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तुझ्या महत्वाच्या खेळ्या आठवून देतीलच! पण असो! >>

अहो बेफिकीर तुम्ही आत्ता जे लिहिलंय आणि वर जे त्यात खूप फरक आहे हो. हे बघा. असो

२००३ सर्व वल्डकपच्या मॅचेस मध्ये सचिन फारच खराब खेळला. एकुण धावा केवळ ६७३ ! जिथे लोक एकुण २१७, ४७० अशा धावा काढतात तिथे ६७६ धावा काढण्यात मला तरी सचिनचा स्वार्थच दिसतो.

हे वाचा.

http://vishesh.maayboli.com/node/800

यातून मला हेच सुचवायचे आहे की त्याची ती खेळी दुबळ्या संघाविरुद्ध होती. आता जसे तुम्ही विचारलेत की मॅचच केनियाविरुद्ध असेल तर तो काय करणार आणि त्याने काय सरस संघांसमोर चांगल्या खेळ्या केलेल्य अनाहीत का? तसेच मलाही असे म्हणता येईल की सरस संघांसमोर व अत्यंत मोक्याच्या वेळी तो बेजबादरापणेही खेळल्याचे अनेक दाखले आहेत.<<<< बोल्ड केलेल्या वाक्याला परत माझा प्रश्न! ती मॅच जर दुबळ्या संघाविरूध अथवा बलाढ्य संघाविर्रूध असेल तरी त्या खेळीमागच्या भावनिक मूल्यांना काय फरक पडतो? त्याने शतक केले, ते त्याच्या वडलांना अर्पण केले. याम्धे "केन्या दोबळा संघ होता" हे महत्त्वाचे की तो दौरा अर्धवट सोडून घरी बसून राहिला नाही हा प्रोफेशनालिझम महत्त्वाचा??? वर्ल्ड कप सीरीज होती ती. केन्याची एकच मॅच खेळून सचिन परत आला नाही. पूर्ण सीरीज खेळलाय- नंतरच्या मॅचेस श्रीलंका, अ‍ॅम्ग्लंड, ऑस्ट्रेलिया, अशा तुल्यब्ळ संघाविरूध होत्या की. तिथे त्याने किती रन काढले ते जाऊ द्या, पण आज आपल्या वडलाचा दहावा बारव्वा इत्यादि दिवस आहेत हे लक्षात ठेवून ग्राऊंडवर येणरे चेंडू खेळायला काय मानसिक ताकद आणि एकाग्रता लागत असेल?

माझा हा मुद्दा फक्त आणि फक्त या खेळीमधला त्याचा प्रोफेशनालिझम अधोरेखित करतोय, तुम्ही ते सोडून तो "यंव का नाही खेळला?"वगैरे मुद्दे काढत आहात. हाच प्रोफेशनालिझम सचिननेच नव्हे तर इतर कुणीही दाखवला तरी तो सन्मानाला पात्रच असतो. मी वर एक उदाहरण दिले आहे.

तुमच्या मूळे लेखातल्या वाक्यातच वडिलांना अर्पण केलेले शतक केनियाविरुद्ध दुसरा मुद्दा अधाहृत आहे. अन्यथा, त्याच्या इतक्या शतकी खेळांमधे (त्यापैकी कितीतरी सोकॉल्ड दुवळ्या संघाविरूद्ध असतीलच) तुम्हाला हीच एक खेळी आठवण्यामागचे काही विशेष कारण?

पण आता नंतर तुम्ही तो मुद्दा महत्त्वाचा असल्याप्रमाणे येथे आर्ग्युमेण्ट करत आहात.<<<

मी नव्हे, नंदिनी तोच एक मुद्दा महत्वाचा सल्याप्रमाणे अर्ग्यूमेंट करत आहेत हे तुम्हाला लक्षात येईल. Happy

("ते केनियाचे उदाहरण चुकीचे होते, त्याकडे दुर्लक्ष करा पण मुद्दा समजावून घ्या" असे म्हंटला असता तर अ‍ॅप्रेशिएट झाले असते). <<<

उदाहरण चुकीचे नाही. केनिया हा दुबळाच संघ आहे. तेंडुलकरने दुबळ्या संघांविरुद्ध मोठमोठे विक्रम केलेले आहेत. (शंभरावे शतक - बांग्लादेश, त्या आधीच्या अनेक सामन्यात शतक न होणे).

आता लष्कर कोठून आले मधेच?<<<

हा प्रश्न नंदिनी यांच्याकडे ढकलणे आवश्यक आहे. तेंडुलकरच्या परत खेळायला जाण्याला त्यांनी देशभक्ती, त्याग वगैरे लेबले लावायचा प्रयत्न केला. पुन्हा सांगतो, मुळ लेखात मी त्यावर एकही विधान लिहिलेले नाही. नंदिनींचे मुद्दे खोडून काढताना मी जे लिहिले त्याचाच प्रतिवाद करण्यात काही अर्थ नाही. मूळ लेखाबद्दल लिहिण्याचा हेतूच कसा काय नष्ट झाला लोकांचा? Proud

सचिनने तेथे शतक मारणे, त्यानंतर मान वर करून आकाशाकडे पाहणे ही सर्व चाहत्यांसाठी एक जबरदस्त मूमेंट होती. <<<

आपले चाहते अंधपणे व्यक्तीपूजा करतात. हे त्यातून सिद्ध होते. सचिनच्या त्या वर पाहण्याला, शतक मारण्याला उगाच्च वडिलांना अर्पण केलेले शतक असा रंग कोणी दिला? शून्यावर बाद झाला असता तर पितृशोकामुळे म्हणाला असतात का? तीन सामन्यांनंतर शतक केले असते तर तेव्हा त्याने खरी श्रद्धांजली वाहिली म्हणाला असतात का?

त्यावेळची पब्लिक ची प्रतिक्रिया पूर्ण लक्षात आहे. त्याचा संदर्भ त्याच्या इतर अपयशी डावांमधे येथे यायला नको होता.<<< हीसुद्धा भावनिकताच आहे. 'बिचार्‍याचे वडिल गेले होते आणि त्या खेळीची येथे शहानिशा केली जातीय, ही काय माणूसकीय का' असा काहीसा सूर आहे हा!

तेंडुलकरच्या परत खेळायला जाण्याला त्यांनी देशभक्ती, त्याग वगैरे लेबले लावायचा प्रयत्न केला.>>> माझ्या कुठल्या पोस्टमधे असा एक तरी शब्द आहे तो दाखवून द्या प्लीज. मी फक्त प्रोफेशनालिझम असा शब्द वापरलेला आहे. कुणालाही कसलीही लेबल्स लावलेली नाहीत.

लाष्करी सैनिक, युवराज सिंग वगैरे मुद्दे तुम्ही आणलेले आहेत. मी नाही.

पुन्हा एकदा माझा मुद्दा: तुम्हाला हीच एक खेळी आठवण्यामागचे काही विशेष कारण?

तुमचं ते केन्याचं उदाहरण झालं की लेखामधल्या अजून एका जेमबद्दल लिहेन मी नंतर.

माझा हा मुद्दा फक्त आणि फक्त या खेळीमधला त्याचा प्रोफेशनालिझम अधोरेखित करतोय<<<

प्रॉब्लेम असा आहे नंदिनी, की तुमचा मुद्दा सचिनची व्यावसायिकता सिद्ध करत आहे हे बरोबर आहे पण त्यासाठी प्रतिवाद करताना तुम्ही स्वतः जी अव्यावसायिक व अपरिपक्व विधाने करत आहात (त्याने कविता कराव्यात का, माझे बाबा असा लेख लिहावा का) त्यावरून तुमच्यात व्यावसायिकपणे फोरमवर राहण्याचा संयम नावालाही उरलेला नसल्याचे दिसत आहे. तेव्हा, तुमचे मुद्दे तुम्हाला लखलाभ!

नंदिनी,

व्यावसायिकता, व्यावसायिकता हे शब्द अनेकदा वापरलेत पण मूळ विधान लिहिताना मात्र 'मोठेपणा' हा शब्द वापरला होतात. हे बघा तुमचे मूळ वाक्यः

>>>त्याने केन्याविरूद्ध शतक केले हा त्याचा मोठेपणा की वडलांच्या मृत्यूनंतर ताबडतोब खेळायला मैदानात उतरणे हा मोठेपणा??<<<

म्हणूनच म्हणतो, तुम्हाला जे म्हणायचे आहे ते समजण्यासारखे आहे पण ते म्हणण्यासाठी तुम्ही जो आवेश दाखवत आहात त्यात नावालाही व्यावसायिकता नाही. Proud

ण त्यासाठी प्रतिवाद करताना तुम्ही स्वतः जी अव्यावसायिक व अपरिपक्व विधाने करत आहात (त्याने कविता कराव्यात का, माझे बाबा असा लेख लिहावा का) त्यावरून तुमच्यात व्यावसायिकपणे फोरमवर राहण्याचा संयम नावालाही उरलेला नसल्याचे दिसत आहे. तेव्हा, तुमचे मुद्दे तुम्हाला लखलाभ!>>>

हेच आणि अगदी हेच अपेक्षित आहे तुमच्याकडून. माझ्या मुद्द्याला प्रतिवाद करता येत नाही हे कसेतरी का होइनात कबूल केलेत. Proud

हेच आणि अगदी हेच अपेक्षित आहे तुमच्याकडून. माझ्या मुद्द्याला प्रतिवाद करता येत नाही हे कसेतरी का होइनात कबूल केलेत<<<

हम्म्म! Proud

ही मेथडॉलॉजीसुद्धा खूप जुनीच आहे. Wink

कोणीकडून 'है शाब्बास, शेवटी मीच जिंकलो की नै' असे स्वतःच म्हणून हसायचे. Proud

चिनच्या त्या वर पाहण्याला, शतक मारण्याला उगाच्च वडिलांना अर्पण केलेले शतक असा रंग कोणी दिला?>>> सचिननेच त्या मॅच नंतर सांगितले होते.

उदाहरण चुकीचे नाही. केनिया हा दुबळाच संघ आहे. >>> उदाहरण चुकीचे यासाठी की तो दुबळ्या संघाविरूद्ध चांगला खेळतो हा मुद्दा असेल तर हे उदाहरण बरोबर नाही. कारण संघासाठी परत येणे व नंतरच्या सामन्यात चांगले खेळणे एवढेच त्याच्या हातात होते. तो संघ कोणता ते नाही.

तेंडुलकरने दुबळ्या संघांविरुद्ध मोठमोठे विक्रम केलेले आहेत. (शंभरावे शतक - बांग्लादेश, त्या आधीच्या अनेक सामन्यात शतक न होणे).>>> आता हे सिलेक्टिव्ह ऑब्झर्वेशन झाले. तितक्याच सरस संघांविरूध्द भरपूर धावा केलेल्या आहेत. फायनल मधे फेल गेला आहे, फायनल मधे शतके ही मारली आहेत. आणि "आधीच्या सामन्यात शतक न होणे" म्हणजे काय? त्या मॅचच्या दोन सामने आधी ऑस्ट्रेलियात मेलबर्न ला ७३ व सिडने ला ८० वर आउट होणे व नंतर बांगला देश विरूद्ध शतक होणे म्हणजे दुबळ्या संघाविरूद्ध मोठे विक्रम व सरस संघाविरूद्ध अपयश का?

मला वाटले त्याच्या धावांच्या दर्जाबद्दल येथे वाद नव्हता.

तेंडुलकरने दुबळ्या संघांविरुद्ध मोठमोठे विक्रम केलेले आहेत. >>
हांग अश्शी , आता आली गाडी मूळ मुद्द्यावर .

बाकी , जर खरोखर प्रतिवाद करायचाच तर ,
सचिनची सर्वात चांगली कामगिरी ऑसीज विरूध्द आहे .
अन त्या (९९ ते २०१० ऑसीज )संघाला दुबळा म्हणणार्याना उत्तर देणे हा क्रिकेटचा अपमान आहे Happy

पुन्हा पलटी मारून सचिनच्या टीममधे जायच्या आधी ऑपोझमधे लिहीतो.

इथं बेफिकीर यांनी कुठंच सचिनचा देव्ष करतोय असं काही लिहीलेलं नाही. अती होतंय हे खरच आहे. फक्त कुनी तरी व्हिसलब्लोअर पाहीजे होता. मला माझ्या मुलाचे पण कोडकौतुक चोवीस तास सहन होणार नाहीत. जर कुणी असं करत असेल तर मी दहा वेळा विचार करीन कि याचं माझ्या मुलाकड काम आहे किंवा याच्यावर काहीतरी उपकार केलेले आहेत.

एक मुद्दा सचिनह्या बाजूनं
सचिन टेस्ट मधे खेळायला लागला त्यानंतर मी चार का पाच वर्षांनी बाहेर पडलो आणि एक दोन वर्षात कामाला लागलो. मी लहानपणापास्न खेळताना नाही पाहीलं. श्रीकांतला पाहीलं होतं आणि फॅन झालो होतो. लहानपणीचे हिरो हे वगेळेच असतात. त्यांना पाहून आपण शिकतो. ते आपले दैवत असतात. आमच्या हे लक्षातच नाही आलं कि एक पिढी सहिनला बघत लहानाची मोठी झाली आहे. त्यांच्या भावना सच्च्या असू शकतील ( हा ताजा फीडबॅक )

विरोधात
पण पेप्रात बातम्यांखालच्या प्रतिक्रिया या रसिकांच्या नसतात हे शंभर टेक्के. त्या प्रोफेशनली दिलेल्या असतात. स्टॅट्स तर कुणा स्टॅटसमनकडून पॅकेजेस आणल्यासारखे असतात.
यात खेळाडूचा सहभाग नाही हे पटत नाही. असं वातावरण आधी नव्हतं

सचिनच्या बाजून
उदयन म्हणतात तसं सचिन आउत झाला तर ही परिस्थिती काही काळ होी. हे बरोबर आहे
विरोधात
पण खूप वर्षे नाही. यापेक्षा जास्तवेळा सुनील गावस्क्रने या दबावाला तोंड दिलेल॑म आहे. आता जे इंटर्व्ह्यु चालू आहेत त्यात एका म्हाता-याने सांगितलं< कि तेरा वर्षांचा असताणाच मी म्हणालो कि हा जॉनीयस होणार. मुलाखत संझगिरी घेत होते. तेरा वर्षांच्या मुलाच्या खेळाकडे दिग्गजांचं लक्ष असणं, सोळाव्या वर्षी संधी मिळणं हे किती जणांना शक्य आहे ?
कॉलेजमधे एक जबरदस्त फास्ट बॉलर होता. त्याला सिलेक्टर्सच्या भेटी मिळत नव्हत्या. कुणी ओळखीचंही नव्हतं. मुद्दा असा कि, सचिन जर मौजे बाभुळवाडी, ता॓लुका भोर इथं< ज्ञमाला आला असता तर त्याचा खेळ दिग्गजांच्या लक्षात आला असता का ? अर्थ असा कि अनेक जणांचा खेळ कोमेजतो. म्हणून गॉड म्हणणे हा अतिरेक.

बोटं दुखायला लागली. नंतर लिहीन. फाटे फोडू नयेत.

< दुबळ्या संघांविरुद्ध भन्नाट खेळ्यांच्या मालिका! माझ्या आठवणीप्रमाणे ऑस्ट्रेलिया भारत वर्ल्ड कप फायनलमध्ये (२००३ बहुधा) तुझ्यावर महान भिस्त होती आणि तूही भरात होतास>

या दोन वाक्यांमुळे मिडिया करीत असलेला सचिनगुणगौरव किती आवश्यक आहे हेच कळतेय.

( ऑपेरात टाइप करताना प्रॉब्लेम येतो आहे )

त्यांचं म्हणणं समजून घ्या.
सचिन भरात होता तेव्हां डार्लिंग होता, पण म्हणून अपेक्षाभंगाच्या खेळ्यांबद्दल बोलायचंच नाही का ? तो डार्लिंग असतानाचा खेळ हा वरून मारलेले शॉटस होते. नंतर त्याचा खेळ खूप बदलला. त्याबद्दल कुणी काही बोललं तर चुकलं का ? सचिनच्या बाबतीत असं झालं कि त्याचा बहर ओअसरल्यानंतर त्याच्या बाजून लिहीणा-यांनी ताळतंत्र सोडला. लोकांनी त्याच्या विरोधात ब्र काढणंही बंद केलं.

कारण मग सचिनदेव्ष, याला फेमस व्हायचंय, हा जळतो हे. त्यांचं म्हणणं मांडू न देण्याचं कारन एक मिनिटात सिद्ध होईल.

सचिन नवा होता तेव्हां (म्हणजे तसा जुनाच पण विरोधक फारसे नसताना) त्याच्या हवेत खेळण्याबद्दल कुनी तरी बोललं तेव्हां इटस टू अर्ली म्हटलं होतं. त्यात मी पण आलो.
आता विराट कोहली रन आउट झाला तर कुठाय तो तुमचा विराट कोहली ? चालला होता सचैनचं रेकॉर्ड मोडायला. ही प्रतिक्रिया चूक नाही का ?

एकाच बातमीत कोहली शून्यावर आउत झाला असं बिनिद्क्कतपणे लिहील पण सचिनला चुकीचा निर्नय फटका बसला असम लिहीलय. सचिन कमी रनवर जातो तेव्हा बातम्या देताना काळजी घेतात. मग त्याच बातमीत विराट म्हणाला कि सचिन ही आम्ची प्रेरणा आहे, लारा असं म्हणाला ही चौकट असते.

हे लक्षात येण्यासारखं नाही का ? सुनंदन लेले, संझगिरी, हर्षा भोगले ही मंडळी काय आणि कसं लिहीतात तेच मुद्दे प्रतिकियेत येतात.

खरं तर सध्याचा संघ हा भारताला रिप्रेझेण्ट करत नसून तो बीसीसीआय प्रा लि ची प्यायव्हेट मालमत्ता॓ आहे असं कोर्‍तात सांगितलेलं तेव्हापासून ७० टक्के इंटरेस्ट कमी झाला. तसच भारताचे कायदे आम्हाला लागू होत नाहीत असही म्हटलय. मग हे देशाला रिप्रेझेण्ट करत नाहीत.

म्हणजेअ अन्फेअर प्रॅक्टीसससाठी त्यांना जाब विचारणे कुणाला शक्य नाही.

केदार, इथेही तुझी आणि माझी सगळी मतं जुळतायेत Happy

इतका जर तो निगर्वी, शांत असेल तर तो उठून मीडियाला का सांगत नाही की मला क्रिकेटपेक्षा मोठे ठरवू नका? >>>>>>>>>>>>>>>
अरे देवा!!!!!!!!!!!! बिचारा सचिन! Sad Sad Sad Sad

माझ्या आठवणीप्रमाणे ऑस्ट्रेलिया भारत वर्ल्ड कप फायनलमध्ये (२००३ बहुधा) तुझ्यावर महान भिस्त होती >>>

सर्व सामन्यात जीव तोडुन खेळला तो...............................................................ते विसरा
अंतिम सामन्यात आपल्या गोलंदाजांनी ३५० रन्स ऑस्ट्रेलियला करु दिल्या............. ते विसरा
गोलंदाजांची अक्षरशः पसे काढली होती.............................................................ते विसरा
कुठल्यानी गोलंदाजाने धावा रोखण्याचा प्रयत्न केला नाही .....................................ते विसरा
३५० रन्स या मोठ्या धावांना समोर जाण्याचे दडपण ते ही अंतिम फेरीत काय असते .... ते विसरा
समोर आजच्या जॉन्सन, कुलिन. सारखे गोलंदाज नव्हते.........................................ते विसरा
मॅक्ग्रा, ब्रेट ली. शेन वॉर्न.. सारखे गोलंदाज ऑसी संघात होते.....................................ते विसरा

इतक्या प्रचंड धावसंखेचा पाठलाग करताना आक्रमक होणे गरजेचेच होते.. आणि त्यात चांसेस घ्यावे लागतात...
ते घेताना ...सचिन आउट झाला.............हे मात्र लक्षात ठेवा........;)

बाय द वे , ते दुबळ्या संघाच्या मुद्द्याच काय झाल ?

वीरूजी ,

पण पेप्रात बातम्यांखालच्या प्रतिक्रिया या रसिकांच्या नसतात हे शंभर टेक्के. त्या प्रोफेशनली दिलेल्या असतात. स्टॅट्स तर कुणा स्टॅटसमनकडून पॅकेजेस आणल्यासारखे असतात.
यात खेळाडूचा सहभाग नाही हे पटत नाही. असं वातावरण आधी नव्हतं
>> बर . ह्याचा काही पुरावा ? सॉरी , तुम्ही म्हणता म्हटल्यावर .. Happy

हल्ली निवडणूकीचे वारे वाहायला लागल्यापासून सर्वच पक्षांची आणि पक्षनेत्यांची भाषणाबाजी, डायलॉगबाजी, उठसुठ एकमेकांवर आरोप करणे, मिळेल त्या गोष्टीचे राजकारण करणे, राजकारणाशी संबंधित नसलेल्या व्यक्तींनी अमुक तमुक पक्षाला सपोर्ट द्यायला मुक्ताफळे उधळणे वगैरे वगैरे जी काही खुफियापंक्ती चालू आहे, सतत बातम्यांवर मोठाल्या आवाजात त्या चर्चा आणि ब्रेकींग न्यूज(????) बघाव्या लागताहेत त्यामध्ये आलेले हे काही सचिनमय दिवस खरे तर भारतीय क्रिकेटरसिकांसाठी (सचिनप्रेमी हा शब्द मुद्दाम नाही वापरला कारण गट सामाईक) शीतल झुळूकच आहे. न्यूज चॅनेलवर जास्त बोरमारी होतेय असे वाटले तर तो बदलायचा आणि स्टार स्पोर्टसवर सचिनच्या जुन्या खेळी दाखवत आहेत त्या विश्लेषन आणि एक्स्ट्रा शॉटसह चहा पिता पिता बघायच्या.

या माझ्या मतात सचिनप्रेम आहेच पण त्याबरोबर माझी आवडसुद्धा आहे.

तळटीप - लेख वाचला आहे प्रतिसाद एकही नाही, वर्षांनुवर्षे उगाळले जाणारे तेच तसेच मुद्दे यात असतील म्हणून.... अन जर खरेच तेच मुद्दे असतील तर त्यांना मात्र खरेच आवरा बोलून बोलून थकलोय.

तेंडुलकरने दुबळ्या संघांविरुद्ध मोठमोठे विक्रम केलेले आहेत. >>

भाऊ... जरा तरी विचार करा..

हातात की बोर्ड आला की झाल का?
Centuries against different nations
Test ODI
Australia:- 11 & 9
Sri lanka:- 9 & 8
South Africa:- 7 & 5
England :- 7 & 2
New zealand :- 4 & 5
west indies :- 3 & 4
zimbabwe :- 3 & 4
pakistan :- 2 & 5
Bangladesh:- 5 & 1
kenya :- – & 4
namibia :- – & 1

माध्यमांनी काय करावे ह्यावर सचिनचा अंकुश असू शकत नाही.

माध्यमांकडून सद्या काहीही होत असले तरी त्याने सचिनच्या क्रिडेन्शियल्समध्ये घट होऊ शकत नाही. किंवा चाललेल्या गोष्टींना काही लोक कंटाळले म्हणूनही ते होऊ शकत नाही.

जगात अनेक आपल्याला वीट्/शिसारी आणणार्‍या गोष्टी दररोज होत असतात असे समजून पटत नसल्यास सोडून दयावे. कारण आपल्याला कंटाळा येणारा विषयच आपण छेडला तर जास्तच कंटाळा येईल.

मते टोकाची वाटत असल्यास दिलगीर आहे.

वॉस्सअप वरचे काही मेसेज एंजॉय करा

Last few working days of sachin Tendulkar..
Our HR's should learn from BCCI,
how to treat an employee during notice period .. Wink

............................................................

10 runs by sachin in kolkata test truly shows:

नोटीस पिरीअड मे कोई भी काम नही करता.. Proud

.............................................................

हे झाले जोक्स, आता थोडे फॅक्ट -

Some Interesting Calculations !!

Day-1 of 1st Test

West Indies scored 234/10 = 2+3+4+1+0 = 10

India Scored 37/0 = 3+7 = 10

Number of runs scored today : 234 +37 = 271 = 2+7+1 = 10

Wickets fell 1st day = 10

Sachin jersy no. = 10

10, 10, 10dulakar everywhere...!!!!

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
‌‌‌‌आता मला सांगा, अजूनही कोणाला या माणसाच्या देव असण्यावर संशय आहे Happy

Pages