तेंडुलकरची निवृत्ती - "आवरा"

Submitted by बेफ़िकीर on 10 November, 2013 - 12:03

एक धागा आधीच असताना हा आणखी कशाला, असा प्रश्न माझ्याही मनात येत आहे. पण प्रामाणिकपणे सांगतो की हा धागा काढायची तीव्र इच्छा होत आहे. तसाही, हा धागा फक्त 'पाठ्यपुस्तकातील धड्याबाबत' नाही.

सचिन तेंडुलकर व त्याची निवृत्ती!

म्हणावेसे वाटते की कृपया आता आवर घातला जावा या सचिनपूजेला! त्याचे अगदी डायपर घालण्याच्या वयापासून बॅट हातात धरलेले फोटो, प्रत्येक यशस्वी अयशस्वी गतकालीन व समकालीनांनी तोंड फाटेस्तोवर त्याची केलेली स्तुती, नाही नाही त्या शाळेपासूनच्या आठवणी, त्याच्या त्याच त्या महान खेळ्या आणि त्यांचे महत्व!

वर्तमानपत्र आपण आपल्या पैशाने विकत घेतो म्हणून त्यात आपल्याला जे हवे ते छापले गेले पाहिजे असा कोणाचा आग्रह असू शकत नाही. पण अगदी अमिताभ बच्चनच्या जगण्याचे एक कारण नष्ट व्हावे वगैरे अती आहे. पानेच्या पाने तेच सगळे?

यात सचिनद्वेष वगैरे नसून लिटरली कंटाळा आलेला आहे. टीव्ही वाहिन्या, वर्तमान पत्रे यांना दुसरा उद्योग राहिलेला नाही. सर्वात मुख्य म्हणजे, चॅनेल बदलणे किंवा पेपरचे पान उलटून दुसरे काही वाचणे हा 'ते; टाळण्याचा सोप्पा उपाय वगैरे मुळीच नसून ते पान / चॅनेल उलटण्यापूर्वी मनात जो कंटाळा निर्माण होतो तो होतोच. चिडचिड होते.

हो बाबा एकदाचा निवृत्त! शांत, निगर्वी, मेहनती, याही वयात शिकायची इच्छा असणारा, अजुनही सराव करणारा, रन मशीन, क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर सगळे पाठ आहे. मला तर तू असाही कित्येकवेळा आठवतोस की संघाला अत्यंत आवश्यक असताना चुकीचे शॉट्स मारून बेजबाबदारीने बाद झालास! वडिलांना अर्पण केलेले शतक केनियाविरुद्ध, दुबळ्या संघांविरुद्ध भन्नाट खेळ्यांच्या मालिका! माझ्या आठवणीप्रमाणे ऑस्ट्रेलिया भारत वर्ल्ड कप फायनलमध्ये (२००३ बहुधा) तुझ्यावर महान भिस्त होती आणि तूही भरात होतास. बाकी तुझे पूजक आता ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तुझ्या महत्वाच्या खेळ्या आठवून देतीलच! पण असो!

सर्वात श्रीमंत क्रिकेट खेळणार्‍या महान तेंडुलकर, तुझ्या दैदीप्यमान कारकीर्दीला लवून कुर्निसात, पण म्हणतात तसा साधा, निगर्वी वगैरे असलास तर कृपया स्वतः उठून या माध्यमांना सांग की एक क्रिकेट खेळाडू निवृत्त होत आहे, अती करू नका!

=================================

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

(बघूया आता पेटतोय का धागा डोळा मारा )
>>>
धागा रणजीत ने काढलेला नसल्याने शक्यता कमी आहे...

केदार, उदय (हे आधीच) आणि इतर... लक्ष देऊ नका....
होतं असं काही माणसांचं!

हां ऐकल खर की सचिन तेन्डुलकर म्हणे रिटायर होतोय.
हीच बाजारबसवी मिडीया तो रिटायर होत नव्हता तेव्हा त्याने रिटायर होणे कसे योग्य यावर निरनिराळ्या प्रकारे रतिबच्या रतिब घालत होती
आता तो रिटायर होतोय म्हणल्यावर "इव्हेण्ट एनक्याश" करण्याचा पराकोटीचा प्रयत्न चाललाय. राजकारणी देखिल याचा वापर लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याकरता करुन घेत आहेत.
दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहीये, हल्ली याचा मक्ता राजकारणी आणि मिडीया यांनी संयुक्तपणे उचलला आहे.
बिचारा सचिन तेन्डुलकर! त्याचाही "वापर करुन" घेतला जातोय.

मूळ लेखाशी सहमत.

Pages