ज्युनियर के जी अभ्यासक्रम.

Submitted by साती on 1 October, 2013 - 07:04

नर्सरीच्या अभ्यासक्रमाबद्दल सांगोपांग चर्चा इथे वाचली.
ज्युनियर आणि सिनीयर के जी च्या अभ्यासक्रमाबद्दल इथे चर्चा करूया.
आमच्या मुलाच्या शाळेत कन्नड, हिंदी मूळाक्षरे, इंग्रजी कॅपिटल , स्मॉल , करसिव रायटिंग , दोन ते पाच पाढे , एक ते शंभर आकडे एवढे सगळे लिहीणे ज्युनियर केजीत अपेक्षित आहे.
हे फारच जास्तं आहे असे आमचे मत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुणाला खरडी (पुणे) तल्या victoria school of educationची माहिती आहे का? माहिती असल्यास प्लीज शेअर केल्यास आनंद होईल.

काल पूर्ण दिवस बसून लेकीने कोणार्क टेंपलवर १५ पानाचा प्रॉजेक्ट बनवला. मी थोडी मदत आणि जास्त करून मोटिवॅशन करत करत तिला सोबत केली. आम्हाला फारच बिटरस्वीट वाटत होते कारण हे शेवटचे वर्स.
इथून पुढे स्कूल प्रोजे़कट्स नाही. एल के जी ते दहावी प्रवासात धीर सुटण्याचे प्रसंग येतात पण आपल्या मुला बरोबर ही वरषे नक्की एंजॉय करा. त्यांना हळूहळू ज्ञान येत जाते, समज येत जाते ते बघणे फार सुखदायक आहे. Treat the teacher like your child's growth partner. that will ease the journey.

पहिल्या पानावर राजसीने दिलेय तशा प्रकारचा अभ्यासक्रम माझ्या मुलाला डे केअरमध्ये असताना होता. आता तेव्हाच्या सगळ्या नोंदी शोधायला हव्यात.
ज्यु के म्हणजे २-३ वर्षांची मुलं असतील असं गृहीत धरून माझा मुलगा २-३ वर्षाच्या डे केअर ग्रुपला असतानाची एक नोट इथे चिकटवतेय आहे... गम्मत असते हे वय म्हणजे Happy

A small group worked on building garages. This was a purposeful play group to practice working together. The group started out making their own separate structures and by the end of the work time, they had joined together to build one big garage (for the three horse figures). There was a lot of figuring out to do; Is it ok to put your blocks on someone else’s structure? How do you ask someone if you can build with them? What happens when the person who you are building with changes their mind and doesn’t want you to build anymore? Will someone understand your message when you yell your message to them? Is it ok to knock someone else’s structure over?

The 2-3 year old often worries about what is theirs and not wanting someone else to take their things. This often interrupts or stagnates play. How do 4 children successfully work together? How can we help the children see the joy in working together?

मला यातला शेवटचा प्रश्न आवडला .मुलं एकमेकांबरोबर खेळतानाचा आनंद कशा प्रकारे घेतात. Happy

बाकी वरचा बराच अभ्यासक्रम बघून खरंच मुलांची दया येते.

रच्याकने प्रत्यक्ष लिहायला प्रीकेमध्ये तरी नव्हतं लावलं पण बरीच मुलं आपली आपण (किंवा घरच्यांनी घेतलं असेल) आपलं नाव एका फळ्यावर लिहायचे. ते पाहून आम्ही लागलीच ए बी सी डी च्या मागे लागलो Happy

लेकीला प्ले गृप, नर्सरीसाठी रेनबो ह्या शाळेत घातले होते. मध्ये ६ महिने ती वोकिंगच्या प्रीस्कूलला होती आणि आत ज्यु के, सि के, डी. ए. व्ही. ला सीबीएससीला आहे.

प्ले गृप मध्ये केवळ गाणी, उनिफॉर्म आणि सामुदायिक जीवन एवढच होतं.. म्हणजे मिळून गाणी म्हणा, रांगेत हात धुवायला जा, मग पाण्याचा नळ बंद करा, गृप डान्स करा, एकत्र खाऊ खा (शाळा सगळ्यांना समान खाऊ देत असे - डाल राईस, जाम सँडविच, उपमा, इ)

नर्सरीमध्ये अक्षर ओळख (विंग्रेजी), अ‍ॅनिमल पोएम, फेस्टीवल पोएम, हावभावाच्या पोएम्स, अंक ओळख, जीके असे होतं. जीके म्हणजे वेहिकल्स, फ्रूट्स, क्लोथ्स, फेस्टीव्हल्स, ई.

युकेच्या शाळेत तर नुसत्या अ‍ॅक्टीव्हीटीज होत्या - क्ले, वॉटर कलर्स, पोएम्स, गृप गेम्स, इ.

डी.ए.व्ही.त मात्र बराच लेखी अभ्यास आहे. त्याबद्दल नंतर.

४-५ मध्ये पण इतकं काहीच नाहीये. पण मग ५ ला लगेच a -z , 1 -20 writing, 1 - 100 counting, reading simple words असं येतं. म्हणजे आधी घरी काहीच घेतलं नसेल तर बोंबला Proud
आता महिन्याभरात कसं ते माहित नाही पण पोरग वाचतंय. रोज वीस मिनिटं वाचन हा होमवर्क असतो. फक्त एका जागी पाच दहा मिनिटांपे़क्षा जास्त बसत नाही आणि विषञाला अजिबात धरून नसलेले प्रश्न Happy

maazyaabaddal bolayacha tar mee maazaa mulaga 6 mahinyachaa asalyaapaasoon flash cards, dot cards suru kele hote. mag flash cards mage padale pan educational games aamhee khelat rahilo. to nau mahinyacha asataanaach raMg, aakaar olakhat ase. 2 varshacha asataanaa capital letters yet hote. shivay jig saw puzzles etc.

mazya mulachya shalet oral aani information input var jast bhar ahe, output var khoop jast naahee. to sawwa paach varshacha aani sr lg madhye aahe icse board. homework fakt shukravaree detaat. somwari parat karayacha 2 pages. malaa watata suttichya divashe roj ek pan lihun ghena thik aahe. pach varshala. nursery, jr kg kahi homework nasayacha. ekhad dusari worksheet asayachee pan ti punhaa shalet nahi dyaavee lagayachee. attaa hyaa varshee tyana environmental study, knowledge of indian states etc aahe. precipitation condensation ... karat asato. shivay paschim bangal goa kay kay sangat asato. aamhee vicharat pan naahee aaj shalet kay shikavala. tyala vatla tar to swatach sangato. aamhee matra officemadhe kay kela etc te saangato tala ekmekaanaa. mula anukaranane shikatat. to shikatoy ashee aashaa aahe. .

mala waatata, mulaanna hasat khelat maahitee dilee ki te changlee lakshaat thevataat. outputchya mage khoop jast nahi lagla pahije. tyaanaa kheloo dyaa baagadoo dyaa udyaa maaroo dyaa tasa karta karata jar tumhee tyaanaa tables kinva poems kinva ani kahihi shikavala taree chalta. atta aamhee mulaalaa gharee 2, 3 cha table shikavalay. to aamachaa claass gheto gharaat tyaalaa tables lihun dilet mothya paper var 2 X 2 = 4 asha prakare. te vachun amhala tables shikavato. ase karun tyachya swatachya lakshat rahtat. marathi moolaksharaaMchahee tasach.

amhalaa majaa yete mulga suddhaa shikato aani kasalahi pressure naahee stress naahe.

वेका, विषयाला धरून नसलेले प्रश्न विचारण्यात लहान मुलांचा कोणी हात धरू शकत नाही. उत्तर द्या. त्यासाठी आपण अभ्यास करा. मजा असते एकम्दरीत.

खूप अभ्यास देनार्या सगळ्या शिक्षकाMच्या ... कानाखाली मारा रे.. काय छळतात मुलाMना.

माज़्याबद्दल बोलयच तर मी माज़ा मुलग ६ महिन्यचा असल्यापासून फ़्लश cअर्द्स, दोत cअर्द्स सुरु केले होते. मग फ़्लश cअर्द्स मगे पदले पन एदुcअतिओनल गमेस आम्ही खेलत रहिलो. तो नौ महिन्यच असतानाच रंग, आकार ओलखत असे. २ वर्शच असताना cअपितल लेत्तेर्स येत होते. शिवय जिग सव पुज़्ज़्लेस एतc.

मज़्य मुलच्य शलेत ओरल आनि इन्फ़ोर्मतिओन इन्पुत वर जस्त भर अहे, ओउत्पुत वर खूप जस्त नाही. तो सव्व पाच वर्शच आनि स्र ल्ग मध्ये आहे इcसे बोअर्द. होमेवोर्क फ़क्त शुक्रवरी देतात. सोम्वरि परत करयच २ पगेस. मला वतत सुत्तिच्य दिवशे रोज एक पन लिहुन घेन थिक आहे. पच वर्शल. नुर्सेर्य, ज्र क्ग कहि होमेवोर्क नसयच. एखद दुसरि वोर्क्शीत असयची पन ति पुन्हा शलेत नहि द्यावी लगयची. अत्ता ह्या वर्शी त्यन एन्विरोन्मेन्तल स्तुद्य, क्नोव्लेद्गे ओफ़ इन्दिअन स्ततेस एतc आहे. प्रेcइपिततिओन cओन्देन्सतिओन ... करत असतो. शिवय पस्चिम बन्गल गोअ कय कय सन्गत असतो. आम्ही विचरत पन नाही आज शलेत कय शिकवल. त्यल वत्ल तर तो स्वतच सन्गतो. आम्ही मत्र ओफ़्फ़िcएमधे कय केल एतc ते सान्गतो तल एक्मेकाना. मुल अनुकरनने शिकतत. तो शिकतोय अशी आशा आहे. .

मल वातत, मुलान्न हसत खेलत माहिती दिली कि ते चन्ग्ली लक्शात थेवतात. ओउत्पुत्च्य मगे खूप जस्त नहि लग्ल पहिजे. त्याना खेलू द्या बागदू द्या उद्या मारू द्या तस कर्त करत जर तुम्ही त्याना तब्लेस किन्व पोएम्स किन्व अनि कहिहि शिकवल तरी चल्त. अत्त आम्ही मुलाला घरी २, ३ च तब्ले शिकवलय. तो आमचा cलास्स घेतो घरात त्याला तब्लेस लिहुन दिलेत मोथ्य पपेर वर २ X २ = ४ अश प्रकरे. ते वचुन अम्हल तब्लेस शिकवतो. असे करुन त्यच्य स्वतच्य लक्शत रह्तत. मरथि मूलक्शराMचही तसच.

अम्हला मजा येते मुल्ग सुद्धा शिकतो आनि कसलहि प्रेस्सुरे नाही स्त्रेस्स नाहे.
<<<

प्रतिसाद खिडकी वरचे ते उष्टे सफरचंद क्लिक केल्यावर एक खिडकी येते. तिथे परित्साद कॉपे केल्यावर हे आलं.

"खूप अभ्यास देणार्‍या" मास्तरांच्या "कानाखाली काढण्या"ची तुमची कन्सेप्ट संपूर्णपणे मूर्खपणाची व 'अर्धवट' आहे, हे तुम्हीच सिद्ध केलेत, कारण ६ महिने वयाच्या तुमच्याच मुलाला, तुम्ही 'शिकवणे' व अभ्यास घेणे सुरू केले. वरून कुठला स्ट्रेस नाही अन प्रेशर नाही हे तुम्हीच सांगत आहात. या वयात त्याने शिकाव्या अश्या इतर अनेक गोष्टी आहेत. वर्ड गेम्स पेक्षा टॉयलेट ट्रेनिंगकडे पहा. बरे होईल.

रच्याकने. कोणत्याही 'मास्तराच्या कानाखाली काढा' असे सांगायचा तुमचा काय संबंध? तुमचे वा तुमच्या तीर्थरूपांचे नोकर आहेत का ते??

- डॉ. इब्लिस.

Iblis yaana anumodan.
phonevarun moththi post takata yet nasalyane keval anumodan deun thambate atta.

इब्लिस, सहमत.
वल्लरी, तुमच्या सहा महिन्याच्या बाळाने फ्लॅश कार्ड्स, डॉट कार्ड्स वरून रंग, शेप्स इ ओळखावेत हा अट्टाहास का? त्या वयात त्यांच्याकडे शिकण्यासारखं, आत्मसात करण्यासारखं बरंच काही असतं. इनफॅक्ट प्रत्येक दिवस हा काहीतरी नवीन शिकण्याचाच असतो. वर शिक्षकांच्या कानाखाली मारा म्हणताय पण तुम्हीही तुमच्या बाळाला छळलंत असं बाकी कुणालाही वाटू शकतंच.

Dr Iblis yana १००% anumodan. Phone varun asalyane nantar savistar lihite!
६ mahinyachya baLala flashcards???

khoop abhyaas denaaryaa sagaLyaa shikshhakaaMchyaa ... kaanaakhaalee maaraa re.. kaay chhaLataat mulaaMnaa. >>>
हे वाचून खूप वाईट वाटले. आणि मग खालची पोस्ट वाचून मजा वाटली.
याच पानावरच्या मामींच्या पोस्टमधले 'Treat the teacher like your child's growth partner. that will ease the journey.' हे वाक्य वाचले का तुम्ही?

तुमच्या मुलांना ढीगभर होमवर्क देण्यात शिक्षकांना काही आनंद वाटत नसतो हो. उलट ४० मुलांचा होमवर्क तपासायचा, करेक्शन करायच्या हा जास्त ताप असतो त्यांच्या डोक्याला. वर्क शीटस् तयार करणे सोपे नसते. मुलांचे वय, आवड, कल, विषय बघून तयार कराव्या लागतात. वहीत होमवर्क देत असतील तर ४०- ४०वह्या सेट करणे हे काम थोडे नसते हो.
जरा शिक्षकाच्या बाजूनेही विचार करा.

आता सिलॅबसबद्दल
सध्याचा सिलॅबस, मग ती कोणतीही शाळा असो जास्तच आहे, हे मान्य आहे.
मी स्वतः ४-५ वर्षे सिलॅबस डिझाइन केला आहे म्हणून थोडे सविस्तर लिहिते. (इंग्रजीचा अभ्यासक्रम घेऊ उदाहरणादाखल.)

युकेजीत शब्द, वाक्य लिहायला शिकवावीच लागतात, कारण, १लीत त्यांना पूर्ण वाक्यात उत्तरे लिहायची असतात. मग १लीचापण अभ्यासक्रम कमी करा....पण मग २रीत मोठी मोठी उत्तरं लिहायची असतात...मग ते कमी केले तर ३रीत......ही गाडी चालूच राहते. वरच्या वर्गांचा अभ्यासक्रम पाहिला आहेत का तुम्ही? अहो, आम्ही ११वी,१२वीत जे शिकलो ते ही मुलं ७वी, ८वीत शिकत आहेत. मग खालच्या वर्गांचाही अभ्यासक्रम वाढणारच की. नाहीतर १लीपासून मुलांवर जाम लोड येणार.

मग युकेजीत शब्द शिकवायचे तर एल्केजीत स्मॉल, कॅपिटल (आणि काही शाळांमध्ये कर्सिव) शिकवले पाहिजे. पण मग एल्केजीतही लोड येऊ द्यायचे नसेल तर नर्सरीत कमीत कमी कॅपिटल शिकवलेच पाहिजे.

बरं, मग नर्सरीत फक्त लाइन कन्सेप्ट आणि कॅपिटल...यात कॅपिटलवर जास्त भर द्यायचा नाही. जेवढे शिकतील तेवढे. एल्केजीत सुरुवातीचे दोन महिने सराव करून घ्यायचा, मग स्मॉल लेटर्स(आणि काही शाळांमध्ये कर्सिव).

मग एल्केजीचा अभ्यासक्रम बघू --- वर्षात १२ महिने असले तरीही शाळेला १२ महिने मिळत नाहीत. जास्तीत जास्त ७ महिने? मग त्या सात महिन्यांत २६ कॅपिटल, २६ स्मॉल लेटर्स , हिंदी/मराठीची मुळाक्षरे, गणितातले अंकलेखन, वाचनाचे तास, इतर अ‍ॅक्टिव्हिटीज, कार्यक्रम, स्पर्धा...सगळे बसवायचे असते. कसे बसवायचे मग? मग थोडी गडबड उडते.
मुलं इतकी लहान असतात की काटेकोरपणे लेसनप्लान पाळता येत नाही. त्यांच्या मूडनुसार वेग कमी जास्त करावा लागतो. कधी कधी काही दिवसांच्या सुट्टीनंतर शाळा उघडली असेल तर १ले ३-४ दिवस मुलांना परत शाळेच्या वातावरणात सेट करायला लागतात. शाळेत फक्त चार तास मिळतात आणि शिकवण्यासरखे खूप असते, मग मुलांना काय काय आणि किती शिकवणार? मग इतर अ‍ॅक्टिव्हिटीजवर भर दिला जातो शाळांमधून आणि वर्गात एक-दोनदाच अक्षरे लिहून घेऊन मग सरावासाठी होमवर्क दिला जातो. द्यावाच लागतो. नाहीतर सराव कसा होणार?

आणि अगदी खरं सांगू का? खरं तर हा युक्तीवाद बरेच जण फेटाळून लावतात, पण आजकालची पिढी खरंच खूप स्मार्ट आहे. त्यांची ग्रास्पिंग पॉवर जबरदस्त आहे. पालकही जागरुक असल्याने मुलं लवकर शिकतात.
आजकाल शाळांमधूनही केवळ खरडणे न शिकवता मुलांना समाज, सणवार, भोवतालचा निसर्ग याबद्दलही अपडेटेड ठेवले जाते. त्यामुळे, मुलांच्या प्रगतीचा आलेख हा चढताच राहतो.

प्राची, उत्तम माहितीपूर्ण पोस्ट.

आणि अगदी खरं सांगू का? खरं तर हा युक्तीवाद बरेच जण फेटाळून लावतात, पण आजकालची पिढी खरंच खूप स्मार्ट आहे. त्यांची ग्रास्पिंग पॉवर जबरदस्त आहे. पालकही जागरुक असल्याने मुलं लवकर शिकतात.
आजकाल शाळांमधूनही केवळ खरडणे न शिकवता मुलांना समाज, सणवार, भोवतालचा निसर्ग याबद्दलही अपडेटेड ठेवले जाते. त्यामुळे, मुलांच्या प्रगतीचा आलेख हा चढताच राहतो.
>>>>>> प्राची, तुझा मुद्दा मला पूर्णपणे पटलाय की नाही, हे नक्की सांगू शकत नाही, पण तू ज्या प्रकारे मांडला आहेस, त्यामुळे तो तर्कशुद्ध वाटतोय तरी. माझी (शिक्षिका) आईसुद्धा (जी गेले २५ वर्षे ठरवून पहिली-दुसरीचाच वर्ग घ्यायची.) हे बर्‍याचदा म्हणते.

khoop abhyaas denaaryaa sagaLyaa shikshhakaaMchyaa ... kaanaakhaalee maaraa re.. kaay chhaLataat mulaaMnaa. >>>>> मुळात कुणालाही(लहान/मोठ्या व्यक्तीला) कानाखालीच नाही तर कसेही मारण्याचा हक्क दुसर्‍या कुणाही(पुन्हा, लहान/मोठ्या) व्यक्तीला नसतो.

आणि मारून का ही ही उपयोग नसतो, हे कितीदा तरी सिद्ध झालंय. निव्वळ तुमच्यावर ते खूप जास्त प्रेम करतात, किंवा त्यांना धाकात कंडीशन केलेले असतात, त्यामुळे लहान मुले प्रतिकार करू शकत नसतात. जर त्यांना संधी दिली आणि त्यांनी तुम्हाला उलट मारले तर बघा हिंमत होईल का कधी तुमची असं बोलण्याचीसुद्धा?

तेव्हा शिक्षकांना मारण्याची बात तर सोडूनच द्या. उलट अशा प्रकारचे बोलणे आणि त्यामुळे येणारी वृत्ती यामुळे आपल्या मुलांपुढे आपण काय प्रकारची 'आदर्श'(?) वर्तणूक ठेवतो, त्याविषयी विचार करा.

वरील सर्वांना अनुमोदन. रोमन लिपीतून वाचायचा त्रास होत असल्याने मी ती पोस्ट वाचलीच नव्हती.

सहा महिन्याच्या बाळाला फ्लॅश कार्ड्स वगैरे? दुकानांतून मिळतात ते पाहिलं होतं. वापरणरे कुणी पाहिले नव्हते. सुनिधीला असले फ्लॅश कार्ड वगैरे न वापरता रोजच्या सम्भाषणामधून रंग, आकार, चव, स्पर्श या सर्व गोष्टी तिच्या बाबाने शिकवल्या आहेत. शिकवायचे म्हणून नाही तर गप्पा मारत मारत. कार, बस, बाईक वगैरे गाड्या कुणीही ओळखतं, आमच्या बाबांच्या शिकवणीने आम्ही जेसीबी, कंटेनर, क्रेन असले गाड्ञा पण ओळखू शकतो. याचा अभ्यासक्रमाशी काहीही संबंध नाही तरीदेखील.

प्राची, तुझी पोस्ट खूप आवडली. सुरेख लिहिले आहेत. एक पालक आणि एक शिक्षक या दोन्ही दृष्टीकोनामधून. मी इथे थोड्या दिवसांपूर्वी लिहिलं होतं तसं, पालकच अवास्तव अपेक्षा करतात मुलांकडून असं चित्र मला बरेच ट्।इकाणी दिसतंय.

अरे देवा...... मी म्हटलं कानाखाली मारा ते सात्विक संतापाने. खरोखर नाही. ही माझी पद्धत आहे माझा संताप व्यक्त करायची, पण फक्त मोठ्या माणसांबद्दलचा संताप बरं का, लहान मुलांचा मला संताप येत नाही की रागही येत नाही. माझं चुकलच मी असं बोलायला नको होतं.

डॉ इब्लिस आणी इतर सर्व कोणतेही मास्तर माझे नोकर नाहीत, खरं तर माझे दोन्ही आजोबा, आजी आणि आई देखील शिक्षक आहे.

डॉ इब्लिस, तुम्ही खरच डॉ आहात की नाही मला माहित नाही,

मी जेवढे वाचले आहे, आणि पेडियाट्रिशियन, ओर्थोपेडिक डॉक्टर यांच्याकडून जितके ऐकले आहे त्यावरून तीन चार वर्षाच्या मुलांना मराठी हिंदी, इंग्रजी अक्षर - कर्सिव लिहायला लावणं रोज अभ्यास - लेखन केला पाहिजे असा अट्टाहास धरणं चूक आहे. मुलांच्या बोटांचे स्नायू आणि हाडं अजून लेखनासाठी तयार नसतात. त्यांचे बोट पकडून लिहायला शिकवणे त्यानी एखादा आकार अमूक एका प्रकारेच काढावा हा अट्टाहास धरणे हा मोठा गुन्हा आहे कारण अशाने मुलांची बोटे कायमची अधू होऊ शकतात. अशा घटना भारतातही घडल्या आहेत.(ref my son's pediatrician, he was president of indian pediatrics association and my uncle in law who is also pediatrician) ह्याशिवाय शाळेने अभ्यास दिला म्ह्टल्यावर अनेक पाल़क मुलांना तो अभ्यास चांगल्या अक्षरात पूर्ण करण्याबद्दल ओरडतात आणि मारतात देखील, त्यामुळे ३-४-५-६ वर्षाच्या मुलांना ४-४ पाने अभ्यास देणे हे चूक आहे आणि ते शाळांनी थांबवले पाहिजे.

शिवाय मी मुलांला शिकवण्याबद्दल बोलते आहे, परिक्षा घेण्याबद्दल नाही.

3-4 महिन्याच्या मुलांनासुद्धा फ्लॅश कार्ड दाखवण्यात रंग, आकार, quantity शिकवण्यात काय चूक आहे?
मुलांच्या मेण्दूची ५०% वाढ वयाच्या चार वर्षापर्यंत होत असते. त्या वेळात त्यांना जमेल तितकी माहिती द्यावी. त्यात चूक किंवा मुलांना धोका होईल असे काही नाही. एका वेळी पाच मिनिटं दहा मिनिटं अर्धा तास जोवर मुलांचा पेशन्स असेल तोवर. मुलांची चूळबूळ सुरू झाली की समजावं आता अक्टिव्हिटी बदलायची वेळ झाली. असे दिवसातून मूल जागे असते तेव्हा अनेकदा करता येते. लहान मुलांना देखील जागे झाल्यावर नुसते चुळबुळत ठेवण्यापेक्षा त्यांच्यासोबत काही ना काही अ‍ॅक्टिव्हिटी करत राहाणे योग्य.

मी असा कधी अट्टाहास धरला नाही की मी सांगते आहे ते माझ्या मुलाने ओळखावं, मी सांगत राहिले, तो ऐकत राहिला, एक दिवस सहज प्रश्न विचारला ह्यातला लाल रंग कोणता, त्याने बरोबर उत्तर दिले आणि मग मी त्याला इतर रंग, आकार ह्याबद्दल प्रश्न विचारले. त्यावेळी त्याला पुरते बोलताहे येत नव्हते पण आकार, रंग ओळखता येत होते. आणि अशा प्रकारे शिकवण्यात आपल्या मुलांना कसलाही त्रास नसतो. उलट आपण त्यांना जास्त वेळ देतो ह्या निमित्ताने आणि आपला बाँड अधिक स्ट्राँग होतो. मी शिकवलं.. मी अभ्यास नाही घेतला. (तो तर मी / आम्ही अजून सुद्धा घेत नाही. शाळेत त्याचा अभ्यास होतो तेवढा पुरे.)

ह्या सगळ्याचा फायदा असा झाला की माझ्या मुलाने कधीच रडून त्रास नाही दिला. हट्ट नाही केला, थोडा मोठा झाला तेव्हा मी काम करत असताना १०-११ महिन्याचा तो माझ्या बाजूला बसून पुस्तक बघत असे, त्याचे शेप्स सोर्टर (अनेक प्रकारचे), टू, थ्री, नाईन पिसेस पर्यंत जिग सॉ पझल घेऊन खेळत असे. (एक वर्ष नऊ महिने). ह्यामुळे त्याचे विज्युअल लर्निंग खूप स्ट्राँग आहे शिवाय वयाच्या मानाने लॉजिकल रिझनिंग खूप चांगले आहे.अनेक मुलं विचारतात ते प्रश्न तो विचारत नाही आणि त्याला कधी विचारलं असा तुला प्रश्न पडला नाही का तर त्याचं त्याच्या मते उत्तर काय असत ते सांगून तो मोकळा होतो.जे उत्तर खूप योग्य असतं.

अगदी तो सहा- सात महिन्याचा होता, स्वतःहून बसत होता तेव्हापासून मी मुलाला मांडीवर बसवून फ्लॅश कार्डस, छोटी छोटी पुस्तकं वाचून दाखवत होते. हेच करण्याचा दुसरा प्रकार म्हणजे त्यांना कपडे घालताना त्यांना सांगणं हा बघ लाल रंगाचा टी शर्ट आहे ही पांढर्‍या रंगाची पॅंट आहे. किंवा तू ज्या वाटीत जेवतो आहेस ती गोल आहे, जे पुस्तक वाचतो आहेस ते स्क्वेअर आहे रेक्टँगल आहे, हा बॉल स्फीअर आहे. बॉल मध्ये खूप रंग आहेत. हे सशाचं, वाघाचं चित्र आहे. बॉल सॉफ्ट आहे खूर्ची कडक आहे. ह्या कपड्याला कॉटन म्हणतात, ह्याला सिल्क म्हणतात हे रफ आहे ते स्मूथ आहे. वगैरे वगैरे. त्याला फ्लॅश कार्ड मधलं आज काही आठवत नाही, पण माझं त्याबद्दल काही म्हणणं नाही.
मी त्याला कधी आठवण सुद्धा करून देत नाही की मी तुला हे सगळं शिकवलं होतं. कधी त्याला ती फ्लॅश कार्ड दिसली तर तो स्वतःहून विचारतो हे तू मला दाखवत होतीस ना लहानपणी, मी फक्त हो म्हणून उत्तर देते. ह्या सगळ्यात मुलाला कसला आलय स्ट्रेस?

आणि मी हे सगळे मेंटल ट्रेनिंग दिले ते माझ्या मुलाने कोणाच्या पुढे जावे म्हणून नाही तर त्याचा मेंदू अ‍ॅक्टिव्ह राहावा, त्याला मला एकत्र वेळ मिळावा, ह्याशिवाय मुलांच्या पोटाला जशी अन्नाची गरज असते तशी मेंदूलाही असते, ती पूर्ण व्हावी म्हणून. हे फक्त मीच नाही केलं माझ्या सोबत आम्ही अनेक मैत्रिणींनी केलं आणि आमची सगळ्यांची मुलं खूप कमी हट्ट करणारी, शांत, समजूतदार आहेत.

मूलं जेव्हा काही कारण नसतं तेव्हा रडतात, उगाच हट्ट करतात तेव्हा ते आपलं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत असतात - ६ महिन्याचं मूल किंवा ५ वर्षाचं मूल. ते जर आपण त्यांना न मागता दिलं लक्ष आणि वेळ, मुलं हट्टी, किरकिरी होत नाहीत.

माझ्या आणि माझ्या चाईल्ड स्पेशालिस्ट आणी काउन्सिलर्स च्या मते सहा - आठ - दहा महिन्यांच्या मुलांना टॉयलेट ट्रेनिंग आणि चालणे शिकवायची गरज नसते. वॉकरमध्ये घालून सुध्दा नाही. कारण ते सगळे ते आपोआप शिकणार असतात. सव्वदोन ते अडीच वर्षापर्यंत मुलं टॉयलेट ट्रेन होतात, निसर्गतः.

खरं तर आम्ही शिकवल्या त्या गोष्टीसुद्धा शिकवायची गरज नसते कारण त्या गोष्टीदेखील ते कधी ना कधी शिकणार असतात (शाळेत गेल्यावर आपल्या कडून ऐकून), पण मग मुलांसोबत आपण कसा वेळ घालवायचा? काय करत घालवायचा? किती वेळ त्यांना अंगावर घेऊन फिरणार?किती वेळ त्यांना घराबाहेर घेऊन फिरणार? त्यांना सवय लागते सतत अंगावर राहायची मग उचलून नाही घेतलं की ते चिडचिड करतात. ह्यापेक्शा लहान मुलांना गादीवर पडल्या पडल्या फ्लॅश कार्ड दाखवणं, पुस्तकं दाखवणं, गाणी श्लोक पाढे म्हणून दाखवणं, किंवा मुलं थोडी मोठी झाली, बसती झाली की त्यांच्या सोबत वेगवेगळे खेळ खेळणं हे नक्केच योग्य आहे माझ्या मते. यशिवाय आपण मुलांना बाहेर घेउण जातो तेव्हा थोडा वेळ त्यांनी निसर्गातली शांतता अनुभवली की त्यांना निसर्गाची ओळख करून देणं हेही शिकवणं आहे.

कोणाला अजून काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. मला माझे अनुभव सांगायला भारी आवडतं

रोमन लिपीतल्या पोस्ट्मुळे सगळ्यांना त्रास झालेला दिसतोय. इब्लिस, धन्यवाद. तुम्ही ती देवनागरीत लिहिलीत. माझ्या संगणकावर प्रतिक्रिया लिहिताना मराठीत लिहिती येत नाही. त्यामुळे. माझी त्यावर प्रतिक्रिया लिहून झाल्यावर मग बाकीच्या प्रतिक्रिया वाचल्या. त्यासाठी परत एकदा...

प्राची, शिक्षकांच्या दृष्टीकोनातून तू जे लिहिले आहेस ते पटले.

माझे एवढेच म्हणणे आहे की अभ्यास्क्रम बनवताना मुलांचा विचार व्हावा. नर्सरी, लोअर केजी ह्या वर्गातल्या मुलांना लिहिता यावं हा अट्टाहास कशाला? त्यांना कॅपिटल स्मॉल ओळखायला शिकवा ना. शब्द वाचायला शिकवा. पण लिहायला... त्यांना लिहिता आलच पाहिजे हा अट्टाहास चूक आहे, त्यंना जाडे रंगीत खडू किंवा जाड्या पेन्सिली द्याव्या, जाडे ब्रश यांनी रेघोट्या मारायला द्याव्या. त्यांना हवी ती चित्र काढा सांगावं. डॉ.च्या मते साडेचार वर्षानंतर मुलांना योग्य प्रमाणात आकार काढणे, अक्षरे लिहिणे शिकवावे. त्यापूर्वी मुले स्वतःच्या हौसेने लिहित असतील तर लिहू द्यावे पण त्यांच्या नाजूक बोटांवर ताण पडेल असे करू नये. आता माझ्या मुलाला सि. केजी मध्ये वॉटर सायकल, फुल्पाखरू, बेडूक ह्यांच लाईफ सायकल शिकवतात. मुलांना आवडतं शिकायला. हे सगळं आपण शिकलो तिसरीत. मुलांना कमी वयात जास्त शिकवावं पण लिहिणे ही शिकण्याची पद्धत नाही. लिहिणे ही आपण काय शिकलो हे दाखवून देण्याची पद्धत आहे.शिवाय मुले काय शिकली, त्यांना काय येते आहे हे कळायला लिहिणे - तेही सुवाच्य सुंदर अक्षरात आलेच पाहिजे तेही साडेचार - पाच वर्षापर्यंन्त ही खूप जास्त अपेक्षा आहे. अक्षरलेखन तीन चार वर्षाला हे चूक आहे.

आणि सगळ्यांनाच राग आला मी "खूप अभ्यास देणार्‍या" मास्तरांच्या "कानाखाली काढण्या"ची गोष्ट केली तेव्हा. राग येण्यासारखंच बोलणं होतं ते. पण मग मुलांचा हात पाठ दुखेल, अधू होईल अशा प्रकारे त्यांच्यावर त्यांना न पेलवणारं लिहिण्याचं फिजिकल लोड टाकणार्‍या मास्तरांचा राग नाही येत का? विचार करा आपल्या माहितीतल्या एखाद्या मुलाला असा त्रास झालाय केवळ खूप लिहिण्याच्या अट्टाहासापायी? तेव्हा तुम्ही काय म्हणाल? कानाखाली द्यायची गोष्ट कराल का त्यांना तुरुंगात टाकायची? शिवाय लहान वयात मुलांवर असं प्रेशर टाकल्याने अनेक मुलं मनोमन अभ्यास देणार्‍याचा, अभ्यास करून घेणार्‍याचा आणि मुळात अभ्यासाचा तिरस्कार करतात. हे हवय का आपल्याला. हा फक्त माझ्या किंवा आपण जे माबोकर बोलतोय त्यांच्या मुलांचा प्रश्न नाहीये. भारतातल्या - शिकू शकणार्‍या प्रत्येक मुलाचा आहे. टीव्ही वरच्या बातम्या विसरलात? शिक्षकांनी अभ्यास (लिहिण्याचा गृहपाठ) न करणार्‍या मुलांना बेदम चोपलं, आईने अक्षर खराब काढणार्‍या मुलीला डागलं. हे कशामुळे? दिलेलं सगळं लिहिता आलं पाहिजे ह्या अट्टहासामुळे. अनेल शाळांमधली लिहिणे हा बेस असलेली अभ्यास पद्धती चुकत नाहीये का?
तुम्ही सगळ्यांनी मला एकच सांगा आपण कॉलेज सोडून बाहेर आल्यावर हाताने कितिसे लिहितो?
अत्ता अनेक शाळांमधून नवीन नवीन पद्धती वापरतात. लिहिण्यावर भर कमी असतो, त्याऐवजी प्रोजेक्ट बनवा, बोला, सांगा, डिस्कशन करा ह्या अनेka पद्धती वापरतात एव्हल्युएशन साठी त्या खूप चांगल्या कारण मुलं त्यात स्वतः रमतात स्वतः जे करतात ते त्यांच्या जास्त लक्शात राहतं. मल्टिपल सेन्सरी इंपॅक्ट.

प्राची तुझे हे म्हणणे पटले. << वरच्या वर्गांचा अभ्यासक्रम पाहिला आहेत का तुम्ही? अहो, आम्ही ११वी,१२वीत जे शिकलो ते ही मुलं ७वी, ८वीत शिकत आहेत. मग खालच्या वर्गांचाही अभ्यासक्रम वाढणारच की. >> पण मुलांना शिकण्याचा लोड नाही येत ग. मला सांग आपण सर्वसाधारणपणे सि केजी किंवा पहिलीत लिहायला शिकलो, आपलं काही कमी झालं का? आपण कमी शिकलो का? मला असं वाटतं की मुलांचा (३-४-५ वर्षे) वेळ लिहून घेण्यात अक्षर गिरवण्यात वाया घालवण्यापेक्षा बाकी खूप काही त्यांना शिकवता येईल - सुरुवात रंग, आकार, लहान मोठे, जोड्या लावा, वेगळे ओळखा, सिरिजमधेल पुढचे ओळखा, २६ कॅपिटल, २६ स्मॉल लेटर्स , हिंदी/मराठीची मुळाक्षरे, गणितातले अंकलेखन, मग बेरीज वजाबाकी. इंग्रजी आणि हिंदी/ मराठी शब्द, २-५ पाढे. पिक्चरटॉक, इमॅजिनेशन, संगीत, सा रे ग म म्हणणे, ओळखणे, वेगवेगळ्या वाद्यांचे आवाज ओळखणे. शरीराची माहिती, फक्त हात पाय नाही तर मेंदू, हृदय, स्नायू, हाडे, मेंदूतले पार्टस, हृदयाचे पार्टस, मॅग्नेटिसम, एलेक्ट्रिसिटी, बागकाम, मातीकाम, खूप खूप काही. त्याकरता, विचार करून आणि प्रवाहापेक्षा वेगळं करण्याची तयारी पाहिजे, सुरुवातीला शिक्षकांचा वेळ खूप जाईल, अनेक पालकांना मान्य होणार नाही. पण घाई कुठे आहे, हे सगळं मुलांना ओरली आणि वेगवेगळे खेळ (टॉय आणि गेम्स)वापरून शिकवलं तर मुलं हे लक्षात सुद्धा ठेवतात आणि जेव्हा आऊट्पुट द्यायची वेळ येते तेव्हा ओरली आणि भविष्यात लिहून (दुसरी -तिसरी-चौथी-पाचवी आणि पुढे)खूप छान आऊट्पुट देतात. मी शिक्षिका नाही पण अशा प्रकारे वाढवलेली मुलं मी पाहिली आहेत म्हणून.

नंदिनी, मुलांना शिकवणे फ्लॅश कार्ड वापरून किंवा न वापरता हे महत्वाचे. आम्ही अनुभव देऊन, वस्तू प्रत्यक्ष दाखवून शिकवलच पण त्यासोबत फ्लॅश कार्ड वापरून शिकवतानासुद्धा खूप मजा आली हा अनुभव. मग फ्लॅश कार्ड वापरूनसुद्धा आम्ही लपवाछपवीचा गेम खेळायचो. ट्रक कुठे ठेवलाय, माझ्या हातात चार चाकाचे वाहन आहे ज्याच्या रंग लाल आहे आग विझवताना ते वापर्तात असे.. फ्लॅश कार्ड फक्त चित्र किंवा रंगांची नसतात तर शब्द, अंक, क्वांटिटी ह्यांची पण असतात, घरात बसल्या बसल्यासुद्धा मजा येते.

*****

इब्लिस, << प्रतिसाद खिडकी वरचे ते उष्टे सफरचंद क्लिक केल्यावर एक खिडकी येते>> कुठे येते, मला नाही दिसली, मी डेस्कटॉपवर इंटरनेट एक्स्प्लोरर वापरते,

रच्याकने म्हणजे काय?

मला सांग आपण सर्वसाधारणपणे सि केजी किंवा पहिलीत लिहायला शिकलो, आपलं काही कमी झालं का? आपण कमी शिकलो का? <>>> आपल्या पिढीची आणि आताच्या पिढीची तुलना करणेच मुळात चूक आहे. गेल्या वीस व र्षामधे झलेले प्रचंड तांत्रिक, समाअजिक, सांस्कृतिक आणि इतर बदल पाहता.

मला असं वाटतं की मुलांचा (३-४-५ वर्षे) वेळ लिहून घेण्यात अक्षर गिरवण्यात वाया घालवण्यापेक्षा बाकी खूप काही त्यांना शिकवता येईल सुरुवात रंग, आकार, लहान मोठे, जोड्या लावा, वेगळे ओळखा, सिरिजमधेल पुढचे ओळखा, २६ कॅपिटल, २६ स्मॉल लेटर्स , हिंदी/मराठीची मुळाक्षरे, गणितातले अंकलेखन, मग बेरीज वजाबाकी. इंग्रजी आणि हिंदी/ मराठी शब्द, २-५ पाढे. पिक्चरटॉक, इमॅजिनेशन, संगीत, सा रे ग म म्हणणे, ओळखणे, वेगवेगळ्या वाद्यांचे आवाज ओळखणे. शरीराची माहिती, >> माझ्या माहितीप्रमाणे हे सर्व शाळेत आजही शिकवतात, आणी तेच "जास्त" आहे असे बहुसंख्य पालकांचे मत आहे. तुमच्या वाक्यामधला बोल्ड केलेला भाग पुन्हा एकदा बघा.

वल्लरीच, मी माझ्या पोस्टमध्ये लिहिलेले 'सध्याचा सिलॅबस, मग ती कोणतीही शाळा असो जास्तच आहे, हे मान्य आहे.' हे वाक्य वाचलेत का?

एवढ्या लहान वयाच्या मुलांना लिहायला लावू नये, त्यांचे मोटर स्किल्स डेव्हलप झालेले नसतात, अश्या वेळी लिहायला लावल्याने त्रास होतो. हे मलाही माहिती आहे. म्हणूनच नर्सरीत लिखाणावर जास्त भर दिला जात नाही.

साधारण, १२ वर्षांपूर्वी मी ज्या शाळेत शिकवत होते, तिथे आम्ही तुम्ही म्हणता त्याप्रमाणे केवळ ओरलवर्क घ्यायचा प्रयोग करून पाहिला आहे. आणि मग त्या मुलांना १लीत गेल्यावर अभ्यासाक्रमाशी जुळवून घ्यायला झालेला त्रासही पाहिला आहे.
या वयात अक्षर सुंदर हवे असा अट्टाहास असेल तर चुकीचे आहे. एकंदरच कोणतीही गोष्ट परफेक्ट यावी असा अट्टाहास असेल तर चुकीचेच आहे. मी नेहमी पालकांना जे सांगते तेच इकडे सांगते की अभ्यासक्रम हा एका वर्षाचा असतो, ज्या काही गोष्टी वर्गात शिकवल्या जातात, त्या वर्षाच्या शेवटापर्यंत येणे अपेक्षित असते. शिकवल्या शिकवल्या १ल्याच आठवड्यात्/महिन्यात येणे अपेक्षित नसते. आज लिहिता/बोलता येत नसेल तर मुलाला थोडा वेळ द्यावा.
हे पालकांनी आणि शिक्षकांनीही लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

या वयात अक्षर सुंदर हवे असा अट्टाहास असेल तर चुकीचे आहे. एकंदरच कोणतीही गोष्ट परफेक्ट यावी असा अट्टाहास असेल तर चुकीचेच आहे. मी नेहमी पालकांना जे सांगते तेच इकडे सांगते की अभ्यासक्रम हा एका वर्षाचा असतो, ज्या काही गोष्टी वर्गात शिकवल्या जातात, त्या वर्षाच्या शेवटापर्यंत येणे अपेक्षित असते. शिकवल्या शिकवल्या १ल्याच आठवड्यात्/महिन्यात येणे अपेक्षित नसते. आज लिहिता/बोलता येत नसेल तर मुलाला थोडा वेळ द्यावा.
हे पालकांनी आणि शिक्षकांनीही लक्षात ठेवणे गरजेचे आहे.>>>>> अनुमोदन

यातच अ़जून अ‍ॅडीशन... जर अगदी वर्षाअखेरीस पण नाहीच आलं तरी पुढच्या वर्षी येईल हे लक्षात ठेवावं.. स्पेशली पालकांनी.

प्राचीची पोस्ट थोडीफार पटली... अभ्यासक्रम डिझाइन करण्याबद्दलची. आमच्या शाळेत पण मला पहिली-दुसरीचा अभ्यासक्रम दाखवला होता. पहिलीत वाक्य लिहायची असल्याने युकेजीमध्ये २ /३ अक्षरी शब्द लिहायला-वाचायला शिकवतो आम्ही हेच शाळेनी सांगितलं होतं.

अ.मा. - वाक्य काढले.

<<मी नेहमी पालकांना जे सांगते तेच इकडे सांगते की अभ्यासक्रम हा एका वर्षाचा असतो, ज्या काही गोष्टी वर्गात शिकवल्या जातात, त्या वर्षाच्या शेवटापर्यंत येणे अपेक्षित असते. शिकवल्या शिकवल्या १ल्याच आठवड्यात्/महिन्यात येणे अपेक्षित नसते. आज लिहिता/बोलता येत नसेल तर मुलाला थोडा वेळ द्यावा. हे पालकांनी आणि शिक्षकांनीही लक्षात ठेवणे गरजेचे आहे. >> प्राची पूर्णपणे पटले.

<< साधारण, १२ वर्षांपूर्वी मी ज्या शाळेत शिकवत होते, तिथे आम्ही तुम्ही म्हणता त्याप्रमाणे केवळ ओरलवर्क घ्यायचा प्रयोग करून पाहिला आहे. आणि मग त्या मुलांना १लीत गेल्यावर अभ्यासाक्रमाशी जुळवून घ्यायला झालेला त्रासही पाहिला आहे. >> ह्याचे कारण "माझ्या मते" हेच की पहिलीत अचानक मुलांना खूप काही लिहिता यावे ही अपेक्षा. मुळात लेखनाबद्दलची अपेक्षा कमी केली पाहिजे, प्रत्येक शाळेतून, किंवा शासनाने अभ्यासक्रमातून (आता शासनाचं नाव घेण्यपलिकडे पर्याय नाही. कारण शाळा हे स्वतःहून करणार नाही.) पहिलीतल्या मुलाचे कमीत कमी वय सादेपाच - पावणे सहा असते. त्यांच्याकडून खूप लेखनाची अपेक्षा ठेवणे - पालकांनी आणि शिक्षकांनी आणि शाळेने हे चूकच. (आपण कॉलेज सोडलं की किती वेळा पेन हातात धरतो हे सगळ्या पालकांनी आठवावं. )

आपण हे लक्षात घेतो का हा जो शिक्षणाचा अभ्यासक्रम बनवला तो ब्रिटिशांनी बनवला. त्यांना कारकून तयार करायचे होते म्हणून आणि आपण सुद्धा तोच फॉलो करतो आहोत भारतात.....

<<'सध्याचा सिलॅबस, मग ती कोणतीही शाळा असो जास्तच आहे,>> हे पूर्णपणे मान्य नाही करता येत. कारण मुलांची कपॅसिटी आहे तेवढं सगळं शिकायची. पण त्यांना कळलं आहे की नाही हे आपण सगळं लिहिण्याच्या आणि परिक्षेच्या मार्फत तपासतो. सगळ्या मुलांची आऊटपुट द्यायची पद्धत वेगळी असते. पण आपण त्यांना एकाच प्रकारे जोखतो. (ते एक कार्टून आहे ना, माकड परिक्षा घेतय, विषय आहे झाडावर चढणे आणि परिक्षार्थी आहेत, पक्षी, वाघ, कोल्हा, हत्ती, मासा इत्यादी)

याशिवाय माझ्या मते आपण काय आणि कसे शिकवतो तेही थोडे चूक आहे. म्हणजे उद. कोणत्या साली कोणत्या दिवशी कोणाचा जन्म झाला आणि कोणती लढाई लढली गेली ह्याचा अभ्यास आणि त्यावर प्रश्न? ... त्याऐवजी आपण त्या लढाईतून काय शिकलो किंवा त्या व्यक्तिकडून आपण काय शिकलो हे का कोणी शिकवत नाही? ह्यावर कोणी प्रश्न का विचारत नाही? शिवाय आपण जे शिकवतो ते सगळं क्लासरूम ट्रेनिंग. मग मुलांच्या डोक्यात घट्ट बसत नाही आणि मग आपण म्हणतो सिलॅबस जास्त आहे. आपली पद्धत चुकतेय कुठे तरी ( आपली म्हणजे शासनाने ठरवलेली.) अगदी साध उदाहरण घेतलं तर थियरी ऑफ रिलेटिव्हिटी - फ्रेम्स ऑफ रिलेटिव्हिटी - आम्ही शिकलो फायनल बी एस सी ला. पण त्याचा रेफरन्स अगदी ज्यु केजी पासून येतो ना? मग ती थियरी का नाही समजावून सांगत तेव्हाच प्रत्यक्शिकातून. . (स्ट्रेट मोशन, सर्क्युलर मोशन, तेव्हा समजावून सांगितली तर ती लक्षात राहिल आणि मग त्याचं डेरिवेशन वगैरे कॉलेज मध्ये शिकवता येईल आणि तेव्हा त्याचा लोड नाही वाटणार, कारण बेस पक्का झाला आहे . असं माझं मत आहे. चूक असू शकतं.

शेवटी काय आपल्याला सगळ्यांना एकच वाटत आहे. शिक्षण पद्धती बदलायला हवी, काय खरं ना?

धन्यवाद वल्लरी. माझी आईपण शिक्षिका आहे आणि नणंद आर्मीच्या शाळेत अश्याच छोट्या वर्गाला शिकवत असे. मी त्या वर्गासाठी कवितांवर आधारित पोस्टर्स वगैरे बनवून तिला दिली होती
चब्बी चीक्स वगैरे. तुम्हाला पेरेंटिंग साठी अनेक शुभेच्छा.

मला वाटतं, इतक्या लवकर शाळेत घालणं हाच मुळात अन्याय आहे. ज्या वयात उबदार गोधडीत गाढ झोपी जायतं त्या वयात कुठली आली सकाळची शाळा?
मी गंमत सांगते, माझ्या मुलाला मी साडेचार वर्षांचा होइपर्यंत नव्हतंच घातलं कुठल्या शाळेत. आम्ही मायलेकांनी घरीच खूप धमाल केली होती. स्पर्श, गंध, दृष्टी, पाटी पेन्सिल, रेघोट्या यातून आम्ही खूप काही शिकलो होतो. तो पाच वर्षांचा होइपर्यंत घराला रंगच दिलेला नव्हता. चुना दिलेल्या भिंतीवर त्याने मनसोक्त रंगीत पेन्सिल चालवल्या होत्या.
शाळेने प्रवेश द्यायचा नाकारला खरा पण नंतर दिला. आता तो नववीला आहे. आणि खरं सांगू का, खूप लवकर शाळेत घातलं नाही म्हणून त्यांचं आत्तापर्यंत तरी फारसं काही अडलेलं नाही.
इतक्या लहानपणी होम वर्क करणं, शाळेत लिहिणं यामुे अभ्यासाची धास्ती बसेल असं नाही वाटतं का?
शेवटी हे सगळं व्यक्तीसापेक्ष आहे. आपल्याला आपल्या पिलुला इतक्या लवकर शाळेत घालायचं आहे की नाही हे ज्याचं त्यानं ठरवावं असं वाटतं.

ते वाक्य काढल्याने नंतर त्याबद्दल लिहीणारे सगळे वेडे ठरले त्याचं काय ? Lol
ते काढलं आणि माझी वाचण्यातली गंमत मिस झाली असं वाटणार्‍यांचं काय ? Proud

रच्याकने = रस्त्याच्या कडेने = बाय द वे.

मयुरा - हे ब्येश्टच.. मला पण वाटत होतं असं करावं. पण ........ असो पण आम्हाला शाळा बरीच बरी मिळाली. लेखनाच्या फार मागे लागत नाहीत. तोंड पाटीलकी करण्यात बाकी आमचे चिरंजीव पहिले.

मिलिंदा - ते वाक्य एक्दम सुरुवातीला होतं पुन्हा वाचा ते वाक्य इमॅजिन करून. (आपल्याला शाळेत इमॅजिनेशन शिकवलं होतं का? बघा अभ्यासक्रमाला नावं ठेवायला अजून एक संधी...)

मी दीड वर्षाची लेक असताना शाळेत (प्ले स्कूल) घातलं. फंडा क्लीअर होता, मुलीने खूप सोशलाईज व्हावं, नवीन भाषा तिला शिकता यावी. एकटं मूल असल्याने "म्मा पायजे" वाले हट्ट करता कामा नयेत. शिवाय मला स्वत"ला चोवीस तास तिच्या दावणीला जुंपल्यासारखं वाटू नये. आता वयाच्या साडेतीन वर्षाला ती बरीच अ‍ॅक्टीव्ह आहे, कुणाहीसोबत खेळते, व्यवस्थित तमिळ बोलू शकते. शाळॅत जायचं असेल तर त्या तयारीने आवरू शकते. आई चार पाच दिवस सोडून गेली तर वडलांकडे, आज्जीकडे बिनधास्त राहू शकते. घरामधे राहून मस्ती तर चालूच असते प घराबाहेरचं जग (खास करून तिच्या वयाची मुलं तिला खेळायला मिळायला हवीत)

Pages