हँडपेंटेड ज्वेलरी बॉक्स

Submitted by अल्पना on 6 November, 2013 - 05:57

गेल्या महिन्यात मला एका क्राफ्ट सामानाच्या दुकानात एक छोटसं दागिन्यांचं कपाट मिळालं होतं. स्वतःसाठी घरी आणून ते रंगवल्यानंतर एंड प्रॉडक्ट खूपच आवडला.
मग दिवाळीमध्ये जावांना भेट देण्यासाठी मुद्दाम परत त्या दुकानातून पाच कपाटं आणली. (खरंतर आम्ही सात जणी आहोत. मला सहा कपाटं हवी होती, पण पाचच मिळाल्यानी माझं कपाट पण मी भेटवस्तूंमध्ये दिलं. आता माझ्यासाठी नविन कपाट आणून रंगवायचं आहे.)

गावाला जायच्या आधी आठवडाभरात ती पाची कपाटं रंगवून (एक कोट प्रायमरचा, दोन कोट बेस कलरचे आणि मग त्यावर डीझाइन आणि सगळ्यात शेवटी एक हात वॉर्निशचा) तयार केली.

पॅक करताना घाईघाईनी इथे दाखवण्यासाठी फोटो काढून ठेवले होते.

कपाट १. : मधुबनी स्टाईल
समोरुन
DSCN1578-001.JPG
वरून
DSCN1579.JPG
बाजूने
DSCN1580.JPG

कपाट २: वारली स्टाइल
समोरुन
DSCN1581.JPG

वरून
DSCN1584.JPG

दोन्ही बाजूने : वारलीमध्ये दोन्ही बाजूंना वेगवेगळी चित्रं काढली होती.
DSCN1585.JPGDSCN1587.JPG

कपाट ३: सनमायका /फोरमायका रंगामध्ये तांब्याच्या रंगाचे मेटल पिसेस चिटकवून
समोरून
DSCN1588.JPG

वरूनः
DSCN1589.JPG
या कपाटावर बाजूने काहीही डिझाइन रंगवलं नाही. फक्त शेडेड बेस कोट दिला.

कपाट ४ : बारीक कलाकुसर
समोरून
DSCN1591.JPG

वरून
DSCN1592.JPG

बाजूने:
DSCN1593.JPG

कपाट ५: व्हिक्टोरियन चार्म्स चिटकवून

समोरूनः
DSCN1594.JPG

यावर वरच्या बाजूला आणि साइडना दोन्ही बाजूंना सारखीच डिझाइन आहे.
DSCN1595.JPG

आधी रंगवलेलं कपाट :
DSCN1541-001.JPGDSCN1542.JPG

हे दोन टी कोस्टर्सचे सेट - जावेच्या माहेरी भाऊबीजेला देण्यासाठी

DSCN1596.JPGDSCN1598.JPG

या ज्वेलरी बॉक्सची साइझ ६.५" * ६* * ३" आहे. हे बॉक्सेस एमडीएफ चे बनवलेले आहेत. टी कोस्टर्स पण एमडीएफ चेच आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान झालेत सगळेच. अशा छोट्या कपाटांसारख्या छोट्या संदुकी पण मिळतात. (त्या मिळाल्या तर आण, रंगव आणि इथे फोटो टाक :))

DSCN1599.JPGDSCN1600.JPG

सिंडे, या अश्या संदुका का? या तिन आणून ठेवल्यात, पण गावाला जायच्या आधी रंगवणं जमलं नाही. अजून एक या कपाटांपेक्षा थोडं मोठं कपाट (९ छोट्या कप्प्यांचं) पण आणून ठेवलंय. आणि ज्या दुकानातून हे सामान आणलं होतं तो दुकानदार डिझाइन दिलं तर हव्या तश्या वस्तू बनवून द्यायला तयार आहे. (किमान असं म्हणाला तर होता) Happy

वॉव अल्पना...सुंदरच दिसताहेत,,

कोण आहेत हे लक्कीश लोकं ज्यांना अल्पना कडून या हटके गिफ्ट्स मिळतात?????? Happy

खूप सुंदर...................अल्पना ..अग मैत्रींणींसाठी अशा भेटी चालतील ह............ Happy

वॉव, सहीच ग
ए मी ना तुझ्या नवर्याच्या आतेभावाच्या मावसभावाची बायको.. म्हणजे तुझी जाऊच की नाही ग Proud

सुंदर.

अल्पना, हो अशाच. तो मनुष्य तुला हव्या तशा बनवून देणार असेल तर गूगलवर plain wooden jewelry box शोधशील तर खूप डिझाइन्स मिळतील.

धन्यवाद.

मैत्रिणींना पण मिळतात हो आमच्यात गिफ्टा. पण त्या घेण्यासाठी भेटावं मात्र लागतं. Proud
(ऑन सिरीयस नोट, कुणाला हव असेल तर मला सांगा विपुमध्ये. जमेल तसे बनवून ठेवेन मी. )

फार सुंदर झालीय कलाकुसर Happy

३ कप्प्यांवरुन ९ कप्प्यांवर आलीस. असं करता करता ६ फुटी कपाट रंगवलंस तर नवल नाही ! Wink Light 1 Happy

३ कप्प्यांवरुन ९ कप्प्यांवर आलीस. असं करता करता ६ फुटी कपाट रंगवलंस तर नवल नाही >>> सहा फुटी कपाट नाही, पण भिंत रंगवायची खूप दिवसांपासून इच्छा आहे. Happy

कॅमलिन कंपनीचा टेक्श्चर व्हाइट नावाचा वॉटर बेस्ड गेसो /प्रायमर रंग प्रायमर म्हणून वापरला. रंगवण्यासाठी अ‍ॅक्रेलिक रंग वापरले. बाटल्यांमध्ये मिळणारे साधे अ‍ॅक्रेलिक रंग, फॅब्रिक कलर्स (हे पण अ‍ॅक्रेलिकच असतात), हॉबी आयडीयाजचे अ‍ॅक्रेलिक कलर्स, गोल्डन /सिल्व्हर पेंट पेन्स, गोल्डन, सिल्व्हर थ्री डी रंग असं घरात जे जे अ‍ॅव्हलेबल होतं ते वापरलंय. काही ठिकाणी बाटलीतला अ‍ॅक्रेलिक रंग संपल्याने आर्टीस्ट ग्रेड ट्युबमधले रंग पण वापरलेत.
सगळ्यत शेवटी कॅमलिनचे वॉर्निश वापरलेय.

मस्त. ज्वेलरी बॉक्स आणि कोस्टर्स खूप आवडले. I wish I could Paint.
अल्पना माझी ऑर्डर घेवून टाक.

वाह!
वारलीमध्ये तर तुझा हात चांगलाच बसल्याचं जाणवतयं. मेटलवालं आणि चार्म्सची आयडीया पण भारी.
भिंतीचं मनावर घेच. वारलीमध्ये एखादी स्ट्रीप करून बघ सुरुवातीला.

Pages